टरबूज फळाची संपूर्ण माहिती Watermelon Fruit Information In Marathi

Watermelon Fruit Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो टरबूज ज्याला कलिंगड असे देखील म्हटले जाते ते उन्हाळ्यामध्ये येणारे फळ असून, बाहेरच्या बाजूस हिरवे तर आतील बाजूस लाल मांसल गर असणारे हे फळ असते. उन्हाळ्यामध्ये थंडावा देण्याचे काम हे फळ चांगले करत असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये या फळाला प्रचंड मागणी असते.

Watermelon Fruit Information In Marathi

टरबूज फळाची संपूर्ण माहिती Watermelon Fruit Information In Marathi

पूर्वीपासून उन्हाळ्यामध्ये अनेक लोक टरबूज खाण्यासाठी पसंती देतात. उन्हाळ्यात थंडावा देण्याचे कार्य करणारे हे टरबूज फळ आरोग्यदायी सुद्धा आहे. एका निष्कर्षानुसार रक्तदाब नियंत्रित ठेवणे, आणि विविध रोग होण्यापासून शरीराचा बचाव करण्याचे कार्य हे टरबूज करत असते.

या टरबुजामध्ये जवळपास ९७% पाणी असल्यामुळे ज्या लोकांना थकवा जाणवत असेल, किंवा शरीरातील ग्लुकोजची पातळी कमी झाली असेल अशा लोकांसाठी हे टरबूज अतिशय फायदेशीर आहे. राजस्थानमध्ये याला मातीरा तर हरियाणाच्या काही भागांमध्ये याला हदवाना म्हणून ओळखले जाते. आजच्या भागामध्ये आपण या टरबूज फळाबद्दल माहिती बघणार आहोत.

नावटरबूज
इतर नावेकलिंगड, मातीरा, हदवाना
शास्त्रीय नावCitrullus lanatus
ओर्डरcucurbitales
फॅमिलीcucurbitaceae

मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये सगळ्यात जास्त खाल्ले जाणारे फळ म्हणजे टरबूज होय. आकाराने बरेच मोठे असणारे हे फळ वेलीवर येते. ज्याची बाहेरील साल हिरवट पोपटी तर आत मधील गर हा गुलाबीसर लाल असतो. तर यामधील बिया या काळसर तपकिरी रंगाच्या असतात.

टरबूज हे गराच्या स्वरूपात तर खाल्लेच जाते, मात्र त्याच्या बिया देखील मगज बी च्या स्वरूपात खाल्ल्या जातात. पृथ्वीवर सुमारे १२०० पेक्षा जास्त टरबुजाच्या प्रजाती आढळून येतात. ज्या वर्षभर देखील घेतल्या जातात, मात्र उन्हाळ्यामध्ये पक्व होणारे टरबूज हे सर्वात जास्त चालते. जगभरात विचार केल्यास चीन हा सर्वाधिक टरबुजाचे उत्पादन करणारा देश आहे.

टरबुजाचा एक पीक म्हणून इतिहास:

मित्रांनो, असे मानले जाते की टरबुजाचा उगम इजिप्त देशामध्ये झाला होता. येथे सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी पहिले टरबूज आढळून आले होते. तिथे लोक व्यक्तीच्या मृत्यूनंतर थडग्यामध्ये हे टरबूज ठेवत असत, जेणेकरून व्यक्तीच्या मृत्यूनंतरही त्याला अन्न खायला मिळू शकेल, अशी त्यांची मान्यता होती.

टरबुजाचे आरोग्यदायी फायदे:

मित्रांनो, टरबूज हे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर असून उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना टरबुजाचे सेवन करण्यास सांगितले जाते. यामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशियम, आणि अमिनो ऍसिड इत्यादी घटक आढळतात. जे रक्तवाहिन्यांना मोकळे करण्याचे आणि रक्तप्रवाह सुरळीत करण्याचे कार्य करतात. पोटॅशियम मुळे अनाठाई ताणणाऱ्या रक्तवाहिन्या आणि धमन्या यांना आराम मिळतो. तसेच संपूर्ण रक्ताभिसरण संस्थेवरील ताण कमी होण्यास देखील मदत होते.

यामुळे रक्तदाब नियंत्रित तर होतोच, मात्र हृदयविकाराच्या झटक्याचा धोका देखील कमी होतो. रक्तदाबाचे प्रमाण लठ्ठ लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येते, भले ते तणावात असो किंवा नसो. मात्र दररोज एक ग्लास टरबूजाचा रस सेवन केल्यामुळे लठ्ठ लोकांच्या मधील रक्तदाब तर नियंत्रित होतोच मात्र त्यांचे वजन देखील नियंत्रणात येण्यास मदत होते.

टरबूजा मध्ये कॅलरीज ची संख्या कमी असते, मात्र त्या तुलनेत पोट जास्त भरते. त्यामुळे चरबी कमी होण्यासाठी सुद्धा टरबूज फायदेशीर ठरते. सोबतच वजन कमी करणे, कोलेस्ट्रॉल पातळी नियंत्रण ठेवणे, इत्यादी गोष्टीतही फायदे ठरतात. टरबूजा मधील सिट्रुलिन नावाचा घटक वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करतो. २००७  साली प्रकाशित झालेल्या जर्नल ऑफ न्यूट्रिशन नुसार सिट्रुलिन हा घटक शरीरातील चरबी तर कमीच करतो, शिवाय नवीन चरबी तयार होण्यास सुद्धा आळा घालतो.

टरबुजा मध्ये जवळपास ९० ते ९७ टक्के पाणी असल्यामुळे टरबूज हे इलेक्ट्रोलाईट चे काम देखील करते. त्यामुळे टरबूज सेवन हे निर्जलीकरण रोखण्यास देखील मदतगार असते. शिवाय त्यामधील असणारे विविध खनिजे जसे की कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, सोडियम हे शरीरातील कमी झालेली पाणी पातळी पुन्हा मूळ पदावर आणण्यास मदत करतात. तर टरबुजाचा गोडपणा ज्यामुळे येतो ती नैसर्गिक साखर शरीराला एनर्जी देण्याचे देखील कार्य करते.

टरबुजाच्या बियांचे फायदे:

मित्रांनो, टरबूजच्या बिया देखील अतिशय फायदेशीर असतात. टरबुजाच्या बिया सेवन केल्यामुळे मेंदूमधील रक्तवाहिन्या आणि नसा मजबूत होण्यास मदत मिळते, तसेच शरीरावरील सूज कमी होण्यास देखील मदत मिळते.

टरबुजाच्या बियांचा रस पिल्याने स्मरणशक्तीमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर वाढ होते.टरबुजाच्या बियांसोबत साखर आणि बडीशेप बारीक करून खाल्ल्यामुळे गर्भवती महिलांमधील गर्भाचा विकास चांगला होतो. टरबुजाच्या बिया चघळल्यामुळे दातांच्या पायोरियाला या आजारात देखील फायदा होतो.

जर तुम्हाला नेहमीच डोकेदुखीची समस्या किंवा मायग्रेनची समस्या असेल तर, टरबुजाच्या बिया पाण्यात भिजत घालून त्यांची अतिशय बारीक अशी पेस्ट तयार करावी. आणि तिचा लेप कपाळावर लावावा. त्यामुळे डोकेदुखी मध्ये आराम मिळण्यास मदत होते.

मित्रांनो, टरबुजाच्या बियाचे फायदे असले तरीदेखील त्याचे अति सेवन करणे देखील घातक ठरते. एका व्यक्तीने दर दिवशी फक्त दहा ते वीस ग्रॅम इतकेच टरबूज बियाणे खावे. जास्त टरबूज बिया सेवन केल्यामुळे शरीरातील प्लिहा या अवयवास त्रास होऊ शकतो.

निष्कर्ष:

मित्रांनो, निसर्गाने प्रत्येक गोष्टीची रचना अशा प्रकारे केलेली आहे की योग्य हंगामामध्ये योग्य फळे आणि योग्य भाजीपाला तयार होतो, जेणेकरून ज्या पद्धतीचा हंगाम असेल त्यामध्ये मानवाला तग धरण्यासाठी त्याचा फायदा व्हावा. उन्हाळ्यामध्ये अनेक लोकांना शरीरातील पाण्याची पातळी कमी होण्याची म्हणजेच डिहायड्रेशन ची समस्या भेडसावते.

त्यामुळे उन्हाळ्यामध्ये येणारी बरीचशी फळे ही पाण्याने समृद्ध असतात. त्यामध्ये टरबूज या पिकाचा देखील समावेश होतो. लाल रंगाचा गर असणारे हे टरबूज पिक आपल्यामध्ये सुमारे ९७ टक्के पाणी साठवते. त्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघण्यास मदत होते.

तसेच टरबूज खाल्ल्यामुळे रक्त काहीशा प्रमाणात पातळ झाल्यामुळे रक्तदाबाची समस्या देखील निकालात निघते. म्हणजेच टरबूज हे बहुरूपी कार्य करणारे फळ असून ते शरीराला थंडावा देणे, शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवणे, आणि रक्तदाब नियंत्रित ठेवणे अशी वेगवेगळी कार्य करते.

FAQ

टरबूज हे कोणत्या प्रकारचे फळपीक आहे?

टरबूज हे वेलवर्गीय प्रकारचे फळपीक आहे.

सर्वात पहिले टरबूज कोठे आणि केव्हा उगवले गेले होते?

सर्वात पहिले टरबूज इजिप्त या देशांमध्ये सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी उगवले गेले होते.

टरबूज फळामधील कोणते घटक रक्तवाहिन्या नीरोगी ठेवण्यासाठी आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर असतात.

टरबूज फळ मध्ये असणारे मॅग्नेशियम, पोटॅशियम, आणि अमिनो ऍसिड इत्यादी घटक रक्तवाहिन्या निरोगी ठेवणे आणि रक्तदाब नियंत्रित करणे इत्यादी गोष्टींसाठी फायदेशीर असतात.

टरबुजाच्या गराला लालसर रंग कशामुळे प्राप्त होतो?

टरबुजाच्या गराला लालसर रंग लायकोपीन नावाच्या अँटिऑक्सिडेंट मुळे प्राप्त होतो मात्र या लहकोबींचे प्रमाण कमी असल्यामुळे गडद लाल होण्याऐवजी तो रंग थोडासा गुलाबी दिसतो.

कॉस्मेटोलॉजी मध्ये टरबुजाला काय महत्त्व आहे?

टरबूजा मधील विविध अँटिडॉक्सिडंट आणि पाण्याचे उच्च प्रमाण शरीरावरील सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात. तसेच त्यामुळे शरीरावर एक वेगळेच तेज येते, आणि अकाली वृद्धत्व येण्यापासून वाचविले जाते.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण उन्हाळी फळ असणारे आणि शरीराला थंडावा देण्याचे कार्य करणारे टरबूज या फळाबद्दल माहिती पाहिली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली, हे आम्हाला तुमच्या प्रतिक्रियांच्या स्वरूपात कमेंट मध्ये नक्की कळवा. तसेच इतरही मित्र-मैत्रिणींना ही माहिती वाचता यावी यासाठी नक्की शेअर करा.

धन्यवाद…

Kasturi Khule

कस्तुरी खुळे (Kasturi Khule) हि एक content writer असून यांना पोस्ट लिहिण्याचा २ वर्षांचा अनुभव आहे. हि बी.सी.एस.(Bachelor Of Computer Science) च्या तिसऱ्या वर्षाला असून ती content writer चे काम उत्तम प्रकारे करीत असतात.

Leave a Comment