जल प्रदूषणाची संपूर्ण माहिती Water Pollution Information In Marathi

Water Pollution Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो आज जलप्रदूषण ही एक पृथ्वीवरील गंभीर समस्या बनलेली असून, त्यामुळे मानवासह संपूर्ण जीवसृष्टीला खूप मोठा त्रास भोगावा लागत आहे. प्रगतीच्या काळात केलेल्या अनेक चुकांमुळे आज पाणी इतके प्रदूषित झाले आहे की, पिण्याच्या पाण्यासाठी माणसाला वन वन भटकावे लागत आहे. पाणी प्रदूषण म्हणजे काय, तर पिण्यासाठी योग्य असलेले पाणी खराब होऊन ते अयोग्य बनाने होय.

Water Pollution Information In Marathi

जल प्रदूषणाची संपूर्ण माहिती Water Pollution Information In Marathi

प्रदूषण अनेक कारणांनी होत असले तरी त्यामध्ये प्रमुखतेने काही कारणांचा समावेश होतो. जसे की शहरी सांडपाणी सोडणे, शेतीमध्ये रासायनिक खतांचा मोठा वापर करणे. औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी, जलस्त्रोतांमध्ये गाळ साचने, जमिनीत गाडवलेल्या कचऱ्यातून दूषित पाणी पाझरने, तसेच मानवाचे स्वच्छ पाण्यामध्ये चालणारे विविध कार्यकलाप, यांचा समावेश होतो. मित्रांनो पाणी हे जीवन आहे असे म्हटले जाते, त्यामुळे पाण्याचे प्रदूषण झाल्यास संपूर्ण निसर्गावर त्याचा विपरीत परिणाम दिसून येतो.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण जलप्रदूषण अर्थात पाण्यामध्ये होणाऱ्या प्रदूषणाविषयी माहिती घेणार आहोत…

नावजलप्रदूषण
प्रकारप्रदूषण
कारणशुद्ध पाण्यामध्ये अनेक अशुद्धी सोडणे
मुख्य स्त्रोत मानवनिर्मित
परिणामआरोग्याच्या गंभीर समस्या
संस्थाकेंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (CPCB)

जल प्रदूषण म्हणजे काय?:

मित्रांनो, मानवाच्या अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा असल्या, तरी देखील या तीनही गोष्टींमध्ये एक कॉमन आवश्यक असणारी गोष्ट म्हणजे पाणी होय. मग तुमच्या अन्न बनवण्यासाठी असो, वस्त्रे बनवण्यासाठी असो किंवा निवारा बनवण्यासाठी असो, पाण्याची आवश्यकता ही लागते.

इतकेच काय मानवाच्या सकाळपासून संध्याकाळपर्यंतच्या सर्व कार्यांसाठी पाण्याची फार मोठी आवश्यकता असते. मात्र हेच पाणी दूषित झाले तर मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण होतात.

मित्रांनो, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ अर्थात सीपीसीबी यांनी सांगितल्यानुसार भारतामध्ये प्रत्येक दिवशी सुमारे ६५ अब्ज लिटर सांडपाणी तयार होते.

ज्यांना कुठलेही प्रक्रिया न करता जलाशयांमध्ये सोडले जाते, आणि याच पाण्यामधून शुद्ध पाण्यामध्ये उष्ण पाणी, जड धातू, विविध रसायने, तेल, अनेक अशुद्धी या पाण्यामध्ये मिसळत असतात. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता खराब होण्याबरोबरच, त्या पाण्यातील जलजीवन आणि शेतीसाठी असणाऱ्या जलसिंचनावर मोठा परिणाम होतो.

जल प्रदूषणाची व्याख्या:

मित्रांनो, पाणी हे ऑक्सिजन आणि हायड्रोजन या दोन घटकांपासून बनलेले आहे हे आपल्याला माहित आहे. ज्याला डिस्टिल्ड वॉटर किंवा शुद्ध पाणी म्हटले जाते. मात्र हे पाणी पिण्यासाठी योग्य ठरण्याकरिता त्यामध्ये काही प्रमाणात मिनरल्स आणि विटामिन्स असावे लागतात.

मात्र कुठल्याही गोष्टीचे प्रमाण वाढले तर ते हानिकारक ठरत असते. या पाण्यामध्ये अति प्रमाणात मिनरल्स किंवा भौतिक अथवा रासायनिक पदार्थ मिसळली की हे पाणी पिण्यायोग्य न राहता, दूषित होते. ज्यावेळी पाण्याचे हे रासायनिक किंवा भौतिक गुणधर्म बदलतात त्यामुळे पाण्यातील जीवसृष्टीला धोका पोहोचतो. आणि त्या प्रक्रियेला जलप्रदूषण असे म्हटले जाते.

कुठल्याही प्रकारच्या प्रदूषणामध्ये जबाबदार घटकांना प्रदूषके असे म्हटले जाते, हे असे कण असतात ज्यांचे प्रमाण पाण्यामध्ये वाढले असता पाणी वापरा योग्य राहत नाही.

पाणी नेमके दूषित होते तरी कसे:

मित्रांनो, पाणी दूषित होण्याचे अनेक कारणे असले, तरी देखील सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे औद्योगिकीकरण होय. या कारखानदारीमुळे पाण्यामध्ये घातक घटक सोडले जातात. त्यामुळे अगदी नदीपासून धरण किंवा समुद्र इत्यादी गोष्टी देखील प्रदर्शित होत असतात.

मित्रांनो ज्या ठिकाणावरून पाण्याचे प्रदूषण सुरू होते त्याला बिंदू स्त्रोत असे म्हटले जाते. आणि या ठिकाणी असणारे प्रदूषण हे काही प्रमाणात नियंत्रित करता येऊ शकते. मात्र अनेक स्त्रोतांकडून होणारे प्रदूषण नियंत्रित केले जाऊ शकत नाही, कारण या प्रदूषणाचा बिंदू स्त्रोत शोधता येत नाही. जसे की शेतातून येणारे रासायनिक खतांचे अवशेष, नदिने आपल्या सोबत वाहून आणलेला गाळ, शहरातील छोटे छोटे सांडपाण्याचे आउटलेट इत्यादी गोष्टी.

प्रदूषकांचे प्रकार:

मित्रांनो, प्रदूषकांचे दोन प्रकार पडत असतात. ज्यांना विघटनिशील आणि अविघटनशील अशा दोन गटात वर्गीकृत केले जाते. विघटनशील घटकांमुळे पाण्याचे प्रदूषण केवळ काही काळाकरिता होत असते. या प्रदूषकांना जलचर प्राणी खाऊन त्यांचे विघटन करत असतात, आणि कालांतराने पुन्हा पाणी स्वच्छ होण्यास मदत होते.

मात्र अविघटनाशील घटक हे रासायनिक स्वरूपाचे असल्यामुळे ते विघटित होत तर नाहीतच, शिवाय पाण्यामध्ये असलेल्या अनेक जलचरांना घातक ठरतात.

परिणामी पुढे पुढे या पाण्याचे प्रदूषण कमी तर होत नाहीच, शिवाय यामध्ये आलेल्या विघटनशील पदार्थांचे देखील जलचर सृष्टीवर परिणाम झाल्यामुळे विघटन होत नाही. हा प्रकार जास्त घातक समजला जातो. तसेच या प्रदूषणामुळे पाण्याच्या स्त्रोतातील बायोलॉजिकल ऑक्सिजन डिमांड खालवली जाते.

जल प्रदूषणाचे विविध कारणे:

मित्रांनो, शेतीमध्ये वापरले जाणारे रासायनिक खते, शहरातील सांडपाणी व घनकचरा, पाण्यामध्ये जमा होणारे तेल, आम्ल पर्जन्य, आणि औद्योगिक कचरा यांचा समावेश जलप्रदूषणाच्या कारणांमध्ये होतो.

जल प्रदूषणाचे प्रकार:

मित्रांनो, जलप्रदूषण मानवासाठी खूपच घातक ठरते. त्यामुळे आरोग्यावर वाईट परिणाम होतो. शिवाय जलचर प्राणी आणि आसपास राहणाऱ्या प्राण्यांसाठी देखील घातक ठरते, तसेच पर्यावरणाचा ऱ्हास होतो. शेती धोक्यात येते, अनेक साथीचे आजार बळवतात, तसेच काही ठिकाणी कॅन्सर सारख्या आजारांचा देखील धोका संभवतो.

निष्कर्ष:

मित्रांनो, जलप्रदूषण हे आजच्या काळामध्ये मानवासह संपूर्ण प्राणी सृष्टीला घातक ठरत आहे. शिवाय त्यामुळे निसर्गावर देखील विपरीत परिणाम दिसून येत आहे. आजच्या भागामध्ये आपण या जलप्रदूषणाविषयी माहिती घेतलेली आहे.

ज्यामध्ये तुम्हाला जलप्रदूषण म्हणजे काय, त्याची व्याख्या काय आहे, तसेच पाणी दूषित कसे होते, दूषित होण्याचे विविध स्त्रोत काय आहेत, तसेच त्याची कारणे काय आहेत, याशिवाय प्रदूषणामुळे होणारे विविध घातक परिणाम, आणि या प्रदूषणाला रोखण्याकरिताचे उपाय योजना इत्यादी गोष्टींची माहिती घेतली. तसेच अनेक प्रश्न उत्तरे देखील बघितलेले आहेत.

FAQ

जल प्रदूषण म्हणजे काय?

शुद्ध पाण्याचे न पिण्यायोग्य व न वापरायोग्य अशुद्ध पाण्यामध्ये रूपांतर होणे म्हणजेच जल प्रदूषण होय. यामध्ये पाण्यात हवे असलेल्या घटकांपेक्षा पाण्यात अनावश्यक घटकांचे प्रमाण वाढत असते.

जलप्रदूषणाला मोठ्या प्रमाणावर केव्हापासून सुरुवात झालेली आहे?

मित्रांनो, जलप्रदूषणाचे मूळ हे औद्योगिक क्रांती मध्ये सापडते. अठराव्या शतकामध्ये सुरुवात झालेल्या या औद्योगिक क्रांती पासून वायू आणि जल प्रदूषणाला मोठ्या प्रमाणावर सुरुवात झालेली आहे, मात्र याचे परिणाम हे सगळ्या शतकामध्ये भोगावे लागत आहेत.

जलप्रदूषणाची गंभीरता किती आहे?

मित्रांनो, जलप्रदूषणामुळे मानवाला पिण्यासाठी शुद्ध पाणी उपलब्ध होत नाही. तसेच पिकांसाठी देखील अशुद्ध पाणी वापरल्यामुळे पिकांमध्ये टॉक्सिक घटक तयार व्हायला सुरुवात होते. सोबतच जलप्रदूषणामुळे संपूर्ण जल परिसंस्था बिघडते, आणि नद्यांना गटारीचे स्वरूप प्राप्त होते.

पाण्याचे प्रदूषण होण्याचे मुख्य कारणे काय आहेत?

मुख्यतः शहरे व कारखाने यांच्यापासून निघणारे सांडपाणी नदीत सोडल्यामुळे मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण होत असते. याच बरोबरीने शेतामध्ये टाकलेली भरमसाठ रासायनिक खते, जड धातू, कीटकनाशके इत्यादी पावसाच्या पाण्यासोबत नदीमध्ये वाहून येतात, आणि पाण्याचे प्रदूषण होते.

प्रदूषक म्हणजे काय?

मित्रांनो, कुठलेही प्रदूषण करण्यासाठी कारणीभूत असणाऱ्या घटकांना प्रदूषके असे म्हणतात. जसे की पाण्यामध्ये जड धातू, साबणाचा फेस, इतर कचरा, सांडपाणी इत्यादी प्रदूषके असतात.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण जलप्रदूषण या विषयावर माहिती बघितली. मित्रांनो तुम्ही जलप्रदूषण रोखण्याकरिता काय काय उपाययोजना करता, याविषयीची माहिती आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवा. तसेच जलप्रदूषण रोखण्यासाठी तुम्ही इतरांना काय सांगू इच्छिता ते देखील अवश्य लिहून कळवा. सोबतच जलप्रदूषणाचा गांभीर्याने विचार न करणाऱ्या आणि जलप्रदूषण करणाऱ्या तुमच्या मित्र-मैत्रिणींना देखील ही माहिती अवश्य शेअर करा.

धन्यवाद…

Avatar

i am marathi content writer from last 5 years.

Leave a Comment