व्हॉलीबॉल खेळाची संपूर्ण माहिती Volleyball Game Information In Marathi

Volleyball Game Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रानो व्हॉलीबॉल हा खेळ हल्ली सर्वत्र खेळला जात असला तरी बऱ्याच लोकांना ह्याबद्दल अजूनही शास्त्रोक्त माहिती नाही. हॉलीबॉल हा अगदी अलीकडे १९ व्या शतकामध्ये अमेरिकेत उगम पावलेला खेळ. शारीरिक आणि मानसिक दोन्ही स्तरावर शरीराला चालना देणार हा खेळ मोठ्या आनंदाने खेळला जातो.

Volleyball Game Information In Marathi

व्हॉलीबॉल खेळाची संपूर्ण माहिती Volleyball Game Information In Marathi

शालेय स्तरापासून आंतरराष्ट्रीय स्तरावर या खेळाच्या स्पर्धा भरविल्या जातात. त्यामध्ये भारत देखील नेत्र दीपक कामगिरी करत आहे. अशा या आगळ्यावेगळ्या खेळाला स्वतःचे असे नियम देखील आहेत, मात्र स्थानिक पातळीवर खेळल्या जाणाऱ्या खेळांमध्ये प्रत्येकालाच हे नियम माहिती असतील असे नाही. आजच्या भागामध्ये आपण हॉलीबॉल बद्दल माहिती तर घेणारच आहोत, सोबतच हॉलीबॉल मधील नियम, मैदानाची माहिती, इतिहास याबद्दल देखील इत्यंभूत माहिती बघणार आहोत…

खेळाचे नावव्हॉलीबॉल
प्रकारसांघिक
उपप्रकारमैदानी
संघातील खेळाडूंची संख्या०६
ऑलिम्पिक मध्ये समावेश१९६४ साली
प्रथम सामन्याचा उल्लेख१८९५ साली
प्रथम खेळाचे ठिकाणमॅसॅच्यूसेट्स, यू एस ए.
सर्वात मोठी प्रशासकीय संस्था एफ आय व्ही बी

व्हॉलीबॉल खेळाच्या मैदानाविषयी:

मित्रांनो, मैदानी खेळ म्हटलं की त्याची मैदाने व त्याची मोजमापे याविषयी माहिती असणे अतिशय गरजेचे ठरते. हॉलीबॉल हा दोन समोरासमोरील संघांमध्ये खेळला जात असल्यामुळे मैदानाचे दोन भाग करणे अपरिहार्य ठरते. मैदानाची एकूण लांबी ही १८ मीटर तर रुंदी ०९ मीटर असते.

मात्र लांबीच्या अगदीच मध्यभागी दोन भाग पाडून तेथे जाळी लावली जाते, परिणामी जाळीच्या दोन्ही बाजूला नऊ मीटर रुंद व नऊ मीटर लांब असणारी दोन चौकोन तयार होतात. या दोन्ही चौकोनांमध्ये समोरासमोरील संघ असतो.

खेळताना कुठल्याही प्रकारचा अडथळा येऊ नये म्हणून मैदानाच्या सर्व बाजूंनी तीन मीटर अतिरिक्त जागा असणे देखील आवश्यक ठरते. हॉलीबॉलचे मैदान हे पाच सेंटीमीटर रुंद पांढऱ्या पावडर ने आखले जाते. दोन्ही बाजूच्या मैदानांवर तीन मीटर अंतर सोडून एक आक्रमक रेषा आखली जाते. उरलेल्या आतील मैदानाला सर्विस एरिया किंवा सेवा क्षेत्र असे म्हटले जाते.

हॉलीबॉल खेळाचे महत्त्वाचे नियम:

हॉलीबॉल खेळामध्ये दोन संघ असावे, हे एकमेकांच्या प्रतिस्पर्धी खेळतील आणि या प्रत्येक संघामध्ये सहा इतके खेळाडू असावेत. कोणत्या संघाचा खेळाडू सर्वप्रथम खेळायला सुरुवात करणार हे नाणेफेक करून ठरविले जाते. चेंडू प्रतिस्पर्धी संघाकडे जाळीवरून फेकण्यासाठी एका संघाला तीनच चान्स दिले जातात.

ज्यावेळी आपल्या मैदानात बॉल येतो त्यावेळेस पहिला खेळाडू त्याला मारतो, मात्र काही कारणास्तव तो जाळीच्या पलीकडे गेला नाही तर दुसरा खेळाडू तसा प्रयत्न करतो, त्याला सेटर असे म्हटले जाते. हा खेळाडू जाळीच्या सर्वात जवळ असणाऱ्या खेळाडूकडे हा चेंडू देण्याचा प्रयत्न करतो, तर तिसऱ्या खेळाडूला स्पाईक असे म्हटले जाते  हा चेंडूला स्पर्श करणारा शेवटचा खेळाडू असतो. यानंतर जर कोणी चेंडूला स्पर्श केल्यास तो निगेटिव्ह पॉईंट ठरतो.फाउल, सर्विस चेंज, आणि प्ले इत्यादी गोष्टींवर अंपायरने दिलेला निर्णय हा अंतिम असतो.

हॉलीबॉल खेळामधील त्रुटी किंवा दोष:

मित्रांनो, कुठलाही खेळ असला तरी त्यामध्ये त्रुटी ह्या असतातच. तशाच त्रुटी हॉलीबॉल या खेळांमध्ये देखील आहेत. या त्रुटींमुळे संघ सामना बाद होऊ शकतो, त्यामुळे या चुका टाळणे अतिशय महत्त्वाचे ठरते.

मित्रांनो, हॉलीबॉल खेळताना बॉल हा आपल्या कमरेखालील कुठल्याही शरीराच्या भागाला स्पर्श होता कामा नये, अन्यथा खेळातून बाहेर काढले जाते. बॉल हातात धरणे म्हणजे होल्डिंग होय. या होल्डिंगचा देखील एक निश्चित कालावधी असतो. त्यापेक्षा जास्त किंवा कमी वेळेसाठी बॉल हातात धरू नये.

एका पेक्षा जास्त वेळा चेंडू मारणे म्हणजे ड्रिबलिंग होय, तर एका वेळेला एकापेक्षा जास्त खेळाडूंनी चेंडू मारणे म्हणजे फाऊल होय. या दोन्हीही गोष्टी निगेटिव्ह पॉईंट देतात. खेळताना नेटला किंवा समोरच्या संघातील कुठल्याही खेळाडूला स्पर्श करणे हे देखील चुकीचे मानले जाते  तसेच बॉल जर नेटला स्पर्श करून गेला किंवा अलीकडेच पडला तर ते देखील चुकीचे समजले जाते.

खेळताना चुकून नेटच्या पलीकडे जाणे हे देखील हॉलीबॉल साठी चुकीचे लक्षण मानले जाते. चेंडू सीमारेषेबाहेरील क्षेत्रात गेल्यास देखील निगेटिव्ह पॉईंट्स मिळतात.

खेळताना खेळण्यासाठी असणाऱ्या सर्विस एरिया किंवा सेवा क्षेत्रातूनच खेळणे हे गरजेचे असते. तसेच खेळताना कुठल्याही सीमारेषेला स्पर्श होऊ देऊ नये किंवा त्या सीमारेषा ओलांडू नयेत किंवा बॉल मारण्याच्या योग्य पद्धती अवलंबल्या जाव्यात. अन्यथा हे सर्व खेळातील दोष समजून निगेटिव्ह गुण दिले जातात.

हॉलीबॉल क्षेत्रामधील उत्कृष्ट पुरस्कार म्हणजेच हॉलीबॉल अर्जुन पुरस्कार होय. या पुरस्काराचे मानकरी ठरलेली अनेक भारतीय हॉलीबॉलपटू आहेत. ज्यामध्ये पलानी सामी, बलवंत सिंग, शामसुंदर राव, केसी इल्लमा, निर्जीत सिंग, जी मालिनी रेड्डी, रणवीर सिंग आणि जिमी जॉर्ज इत्यादी खेळाडूंचा समावेश होतो.

निष्कर्ष:

मित्रांनो, खेळ खेळणे हे प्रत्येकाच्याच आवडीच्या गोष्टींमध्ये येते. मग तो मैदानी खेळ असो की बैठा खेळ असो, आनंद मात्र तेवढाच देतो. पारंपरिक खेळांमध्ये कुठल्याही साधनांशिवाय खेळता येण्याजोगे खेळ असत, मात्र हळूहळू काळ बदलला आणि खेळाचे स्वरूप ही बदलले.

जागतिकीकरणाच्या कालावधीमध्ये भारतामध्ये अनेक बाहेरील देशांमध्ये खेळल्या जाणाऱ्या खेळांचा शिरकाव झाला. ते येथे लोकांना इतके आवडले की भारतीयांनी या खेळांना डोक्यावर घेतले. अगदी पूर्वापर भारतामध्ये चालत असणारे खेळ असावेत अशा पद्धतीने या खेळांमध्ये भारतीयांनी प्राविण्य मिळविले. त्यामध्ये हॉलीबॉल या खेळाचा देखील समावेश होतो.

हॉलीबॉल हा फुटबॉल सारख्या एका मोठ्या बॉल ने खेळला जातो. ज्यामध्ये एका जाळीच्या दोन्ही बाजूस दोन संघ उभे असतात. आणि एकमेकांकडे हाताने बॉल मारतात. ज्या संघानी बॉल खाली न पडू देता उत्कृष्ट कामगिरी केली, त्यांना पॉईंट्स नुसार विजयी घोषित केले जाते. या खेळामध्ये अनेक भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केलेली असून अनेकांना हॉलीबॉल अर्जुन पुरस्कार देखील मिळालेले आहेत.

व्हॉलीबॉल खेळाबद्दल संपूर्ण माहिती | Volleyball Information in Marathi

Volleyball Information in Marathi with all details.Written, Edited, and Voice by Majhi Marathi TeamSOURCE:- https://www.majhimarathi.com/volleyball-informat...

FAQ

हॉलीबॉल या खेळाचा उगम कोणत्या देशामध्ये झाला?

हॉलीबॉल या खेळाचा उगम यु एस ए अर्थात अमेरिका या देशांमध्ये झाला.

हॉलीबॉल या खेळाचा शोध कोणी व केव्हा लावला?

हॉलीबॉल या खेळाचा शोध विल्यम जी मॉर्गन यांनी १८९५ मध्ये लावला. श्री मॉर्गन हे मेसेजसेट्स येथील यंग मेन्स ख्रिश्चन असोसिएशन या संस्थेचे भौतिक संचालक होते.

हॉलीबॉल खेळाला इतर काय नावे आहेत?

हॉलीबॉल या खेळाला व्हॉली, ओव्हरलॅपिंग, डीपपास, हूक सर्व्ह, आणि बूस्टर इत्यादी नावांनी देखील ओळखले जाते.

हॉलीबॉल कोर्ट चे मोजमाप काय असते?

हॉलीबॉल कोर्ट चे मोजमाप हे १८ मीटर लांब व ०९ मीटर रुंद असे आयताकृती असते. लांबीचे दोन समान भागांमध्ये विभाजन केले जाते जेणेकरून दोन्ही भाग ०९ बाय ०९ मीटर अंतराचे होतात.

हॉलीबॉल या खेळाचा समावेश ऑलिंपिक स्पर्धांमध्ये कोणत्या वर्षी करण्यात आला?

हॉलीबॉल या खेळाचा समावेश ऑलिंपिक स्पर्धांमध्ये १९६४ यावर्षी करण्यात आला.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण हॉलीबॉल या खेळाविषयीची इत्यंभूत माहिती पाहिली. तसेच या खेळाचे नियम देखील पाहिले. या खेळाबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये वाचायला नक्कीच आवडेल. तसेच हॉलीबॉल या खेळामध्ये रुची असणाऱ्या आपल्या मित्र-मैत्रिणींपर्यंत ही माहिती पोहोचवण्याची जबाबदारी तुम्ही पार पाडालच.

धन्यवाद.

Siddharth Tambe

सिद्धार्थ तांबे (Siddharth Tambe) हे एक content writer असून यांना पोस्ट लिहिण्याचा ३ वर्षांचा अनुभव आहे. यांचे शिक्षण बी.एसस्सी Agri.झाले असून ते मराठी भाषेत अचूक लेखनाचे कार्य करतात.

Leave a Comment