विराट कोहली यांची संपूर्ण माहिती Virat Kohli Information In Marathi

Virat Kohli Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो जगातील अनेक सुप्रसिद्ध क्रिकेटपटूंमध्ये विराट कोहली हे नाव प्रामुख्याने घेतले जाते. एक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू असण्याबरोबरच तो आयपीएल सारख्या सामन्यांमध्ये देशांतर्गत देखील खेळत असतो. तो उजव्या हाताचा फलंदाज असून, तो सद्यस्थितीमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार देखील आहे. त्याच बरोबरीने इंडियन प्रीमियर लीग अर्थात आईपीएल मधील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघामध्ये देखील तो कर्णधार पदी आहे. त्यांनी २००३ पासून भारताचे क्रिकेटमधील नेतृत्व स्वीकारलेले आहे.

Virat Kohli Information In Marathi

विराट कोहली यांची संपूर्ण माहिती Virat Kohli Information In Marathi

अगदी लहानपणापासूनच क्रिकेटमध्ये आवड असणाऱ्या या विराट कोहली ची प्रतिभा त्यांच्या वडिलांनी लहानपणीच हेरली होती. आणि त्यांना क्रिकेटसाठी नेहमीच प्रोत्साहित केले होते. त्यामुळे तो इथपर्यंत येऊ शकला असं तो नेहमी सांगत असतो. त्याला २०१७ मध्ये पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आलेले आहे, ते त्याच्या उत्कृष्ट खेळीमुळेच. आजच्या भागामध्ये आपण या विराट कोहली बद्दल माहिती घेऊन त्याच्या जीवनचरित्राबद्दल जाणून घेणार आहोत…

नावविराट कोहली
संपूर्ण नावविराट प्रेम कोहली
टोपणनावचिक्कू
जन्म दिनांक५ नोव्हेंबर १९८८
जन्म स्थळनवी दिल्ली
आईसरोज कोहली
वडीलप्रेमजी कोहली
पत्नीअनुष्का शर्मा

विराट कोहलीचे प्रारंभिक जीवन:

मित्रांनो, ०५ नोव्हेंबर १९८८ या दिवशी दिल्लीच्या प्रेम कोहली यांच्या पोटी विराट कोहलीचा जन्म झाला. तो जन्माने पंजाबी होता. त्याचे वडील हे गुन्हेगारी वकील म्हणून कार्यरत होते. या विराट कोहलीला एक मोठा भाऊ व बहीण आहे. अलीकडेच तो विवाह बंधनात अडकलेला असून, त्याच्या पत्नीचे नाव अनुष्का शर्मा असे आहे.

अगदी लहान असतानाच त्याला बॅट व बॉल चे प्रचंड आकर्षण होते, त्यामुळे त्याच्यातील क्रिकेटची आवड त्याच्या वडिलांनी लहानपणीच हेरली होती. आणि त्याला या क्षेत्रात करिअर करण्यासाठी पाठिंबा देखील दिला होता. त्याचे वडील त्याच्या क्रिकेटच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, त्याला रोज सरावाला घेऊन जात असत.

त्यामुळे तो इतक्या मोठ्या पदावर पोहोचू शकला. मात्र २००६ साली त्याच्या वडिलांनी हे जग सोडले. तो आपल्या वडिलांचा कायम ऋणी आहे असे सांगत असतो, कारण त्यांच्या पाठिंबामुळेच तो आज या इथपर्यंत पोहोचू शकलेला आहे.

विराट कोहली ची क्रिकेटमधील कारकीर्द:

मित्रांनो २००२ च्या १५ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेमध्ये प्रथमतः त्यांनी खेळून पदार्पण केले होते. त्यानंतर मात्र त्याला सोळा वर्षाखालील संघामध्ये २००६ साली खेळण्याचे स्थान मिळाले. या दोन्ही स्पर्धा मधील त्याच्या अप्रतिम खेळीमुळे त्याची पुन्हा २००८ साली १९ वर्षाखालील स्पर्धेमध्ये सुद्धा निवड झाली.

त्यांनी या स्पर्धेमध्ये भारताला चांगला विजय मिळवून दिला होता. यानंतर त्याची कारकीर्द चांगलीच गाजली, पुढे अनेक सामन्यांसाठी त्याची निवड झाली. त्यामध्ये वनडे आंतरराष्ट्रीय सामन्याचा देखील समावेश होतो.

श्रीलंके विरुद्ध खेळला गेलेल्या सामन्यांमध्ये त्यांनी भारताला विजय मिळवून दिला होता. यानंतर त्याच्या सर्वात मोठ्या उपलब्धी बद्दल म्हणजेच २०११ सालीच्या विश्वचषक स्पर्धेबद्दल बोलले जाते. या स्पर्धेमध्ये त्यांनी भारताला जिंकवण्यासाठी मोठी कामगिरी केली होती. आज तो एक प्रसिद्ध खेळाडू तर आहेच, शिवाय भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार व रॉयल चॅलेंजर्स बंगळूर या आयपीएल संघाचा देखील कर्णधार आहे.

विराट कोहली चे वडिलांशी नाते:

मित्रांनो, प्रत्येकाला आपले आई वडील प्रिय असतात. मात्र वडिलांचा एक धाकयुक्त दरारा देखील असतो. मात्र विराट कोहलीच्या बाबतीत हे वेगळे होते. विराट कोहलीच्या वडिलांनी त्याच्या प्रत्येक निर्णयात त्याची साथ दिली, मात्र असे असून देखील त्याच्या वडिलांची साथ त्याला फार काळ लाभली नाही. कोहलीच्या वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी त्याचे वडील त्याला सोडून गेले. ते वर्ष होते २००६. त्यावेळी विराट कोहलीचे कुटुंब देखील आर्थिक संकटात होते.

येथे एक महत्त्वाची गोष्ट नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे ज्यावेळी कर्नाटक विरुद्ध रणजी सामना चालू होता त्यावेळी पहाटे तीन वाजता त्याला वडील निधन पावलेची माहिती मिळाली. मात्र त्यांनी आपला सामना आटोपून मगच अंत्यसंस्काराला उपस्थित राहिला. त्याच्या वडिलांनी त्याला मोठे क्रिकेटर होण्याचे स्वप्न बघितले होते. आणि त्यासाठीच त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली असे तो नेहमी सांगत असतो, आणि आपल्या  प्रत्येक यशाला वडील जबाबदार असल्याचे सांगतो.

निष्कर्ष:

मित्रांनो, आपल्या देशामध्ये क्रिकेटला खेळ न मानता देवाचे स्वरूप देण्यात आलेले आहे. अनेक जण क्रिकेटचे फारच चाहते आणि वेडे आहेत. या क्रिकेट वेडामुळे अनेक जण अगदी देशाचे नेतृत्व देखील करत असतात. मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण अशाच एका क्रिकेटपटूची अर्थात विराट कोहली ची माहिती पाहिली. त्याच्या लहानपणीच्या जीवनापासून कौटुंबिक जीवनापर्यंत माहिती बघितली.

तसेच त्याच्या शिक्षणाबद्दल, त्याच्या क्रिकेटमधील करिअर बद्दल, तसेच विविध सामन्या बद्दल माहिती बघितली. त्यांच्या वडिलांबद्दल, त्याच्या विविध पुरस्काराबद्दल माहिती बघतानाच, त्याचे अफेयर आणि लग्न याबाबत देखील माहिती पाहिली. तसेच वास्तविक जीवनात विराट कोहली कसा आहे, त्याचे कुटुंब, याविषयी देखील जाणून घेतले. ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी आशा आहे.

FAQ

विराट कोहलीचे शिक्षण काय झालेले आहे?

मित्रांनो, शिक्षण हेच अंतिम ध्येय मानणाऱ्या व्यक्तींसाठी महत्त्वाचे म्हणजे, विराट कोहली यांनी आपल्या नववीपर्यंतचे शिक्षण विशाल भारती पब्लिक स्कूलमध्ये घेतले. त्यानंतर सीबीआर कॉन्व्हेंट स्कूल पश्चिम विरार येथे त्यांनी आपल्या दहावीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मात्र त्यांनी क्रिकेटमध्ये रुची असल्यामुळे आणि क्रिकेटमध्येच करिअर करण्याचे ठरवल्यामुळे शिक्षण सोडले.

विराट कोहलीच्या प्रसिद्धीची कारणे काय आहेत?

मित्रांनो, विराट कोहली हा २०११ मध्ये सर्वात प्रथम कसोटी क्रिकेट खेळला होता. तसेच त्यांनी आयसीसी क्रमवारी मध्ये नेहमीच आपले अव्वल स्थान राखून ठेवलेले आहे. तसेच ट्वेंटी-ट्वेंटी मध्ये त्याला दोन वेळेस मॅन ऑफ द टूर्नामेंट म्हणून देखील गौरव प्राप्त झालेला आहे. तसेच २३,००० आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करणारा तो जागतिक विक्रम नावावर असणारा एक सर्वात वेगवान खेळाडू आहे. याशिवाय त्याने चर्चेचा विषय ठरणारा म्हणजे अनुष्का शर्मा यांच्या सोबत विवाह केलेला आहे. या सर्व गोष्टींमुळे विराट कोहली अतिशय प्रसिद्ध आहे.

विराट कोहली सचिन तेंडुलकरच्या शंभर आंतरराष्ट्रीय शतकांचा विक्रम मोडीत काढू शकेल का?

रिकी पॉंटिंगच्या मते विराट कोहलीला तेंडुलकरचा विक्रम मोडणे शक्य असून, यासाठी मात्र त्याला प्रत्येक वर्षी कसोटी सामन्यांमध्ये सुमारे पाच किंवा सहा शतके करणे गरजेचे ठरेल.

विराट कोहलीच्या कोणत्या सवयी अनेक दिवस चर्चेत होत्या?

विराट कोहली एक सेलिब्रिटी बनलेला आहे. तो रोज आठ ग्लास पाणी पिण्याला प्राधान्य देतो, मात्र महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पाणी फ्रान्समधून आयात केले जाते त्यामुळे ही गोष्ट अतिशय चर्चेत आहे.

विराट कोहलीच्या खानपानाच्या सवयी काय आहेत?

मित्रांनो, प्रसिद्धीच्या शिखरापर्यंत पोहोचण्यापूर्वी विराट कोहलीला मोठ्या प्रमाणावर फास्ट फूड व मिठाई आवडत असे. तसेच तो मांसाहार देखील करत असे. मात्र २०१२ नंतर त्यांनी पूर्णपणे शाकाहारी बनण्याचा निर्णय घेतला. तसेच तो आता फास्ट फूड देखील खात नाही. तो घरी बनवलेले जेवण खाण्यास प्राधान्य देत असतो.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण विराट कोहली या भारतीय क्रिकेटरबद्दल आणि भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारक पदी असलेल्या व्यक्तीबद्दल माहिती पाहिली. ही माहिती प्रत्येक क्रिकेट रसिकाला नक्कीच आवडली असेल. तसेच विराट कोहलीच्या चाहत्यांना देखील आवडली असेल. तर मग कमेंट मध्ये तुमच्या प्रतिक्रिया येण्याची आम्ही वाट बघत आहोत. यासोबतच तुमच्या मित्र-मैत्रिणींना ही माहिती शेअर करून त्यांना देखील प्रतिक्रिया देण्यास नक्की सुचवा.

धन्यवाद…

Avatar

i am marathi content writer from last 5 years.

Leave a Comment