Tiger Animal Information In Marathi नमस्कार मित्रांनो, भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून वाघ ओळखला जातो. शास्त्रीय भाषेमध्ये त्याला पँथेरा टीग्रीस असे म्हटले जाते. मित्रांनो वाघाची मावशी म्हणजेच मांजर हे आपण लहानपणापासूनच ऐकले असेल, तर हा वाघ मांजर कुळातीलच असून या कुळातील तो सर्वात मोठा व हिंस्त्र प्राणी आहे. वाघ हा मुख्यत्वे करून भारतीय उपखंडातील भारत, इंडोनेशिया, बांगलादेश, नेपाळ, अफगाणिस्तान, आणि भूतान या देशांमध्ये आढळून येतो. अतिशय रुबाबदार असलेला हा प्राणी पिवळसर काळा आणि पट्टेरी असतो. आजच्या भागामध्ये आपण वाघ या प्राण्याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत…
वाघ प्राण्याची संपूर्ण माहिती Tiger Animal Information In Marathi
नाव | वाघ |
इंग्रजी नाव | Tiger |
शास्त्रीय नाव | Panthera Tigris |
रंग | पिवळसर काळा पट्टेरी |
पट्यांची अंदाजित संख्या | १०० पट्टे |
आढळ | भारतीय उपखंड |
प्रकार | मांसाहारी |
उपप्रकार | हिंस्त्र जंगली |
मित्रांनो, मांजर कुळातील सर्वात मोठा हिस्त्र आणि मांसाहारी प्राणी कोणता असेल तर तो म्हणजे वाघ होय. पिवळ्या आणि काळ्या पट्ट्याचे मिश्रण असणारा हा वाघ भारतीय उपखंडातील अफगाणिस्तान, इंडोनेशिया, भारत, बांगलादेश, नेपाळ, आणि भूतान यांसारख्या देशांमध्ये आढळून येतो.
वाघ हा शिकारी प्राणी असल्यामुळे अतिशय चपळ असा आहे, त्यामुळे तो दबा धरून बसतो, आणि शिकार टप्प्यात येताच मोठी झडप घालून त्यास पकडतो, आणि शिकारीला आपल्या टोकदार दातांमध्ये घट्ट पकडून झाडावर नेऊन किंवा एकांतात नेऊन शिकारीचा फडशा पाडतो. वाघ कळपाने राहण्यापेक्षा एक एकटे राहणे पसंत करतात. इतर आक्रमक प्राण्यांसारखे वाघाचे सुद्धा क्षेत्र असतात.
या क्षेत्रामध्ये ते दुसऱ्या वाघांना येऊन देत नाहीत, मात्र वाघिणींना येऊ देतात. वाघाच्या बछड्यांना सांभाळण्याचे कार्य ही वाघीणच करत असते, तसेच नवीन बछड्यांना शिकार करणे शिकवण्याचे कार्य हे देखील वाघिणीचेच असते.
वाघ राहण्याची सामान्य ठिकाणे:
मित्रांनो, खऱ्या अर्थाने बघायचे झाल्यास वाघाचे वास्तव्य हे जंगलातच असते. मात्र एका सर्वेक्षणानुसार वाघाच्या या पारंपारिक निवासांच्या ठिकाणी मानवाने हस्तक्षेप केल्याने सुमारे ९३% वाघांचे नैसर्गिक राहण्याचे क्षेत्र बाधित झाले आहे. त्यामुळे वाघांनी आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळविला आहे.
आज वाघ राहू शकतील अशी केवळ सातच टक्के ठिकाणे शिल्लक राहिली आहेत. सध्या तरी वाघ गवताळ प्रदेश, पावसाळ्यात वाढणारी जंगले, सवाना आणि मॅगरूव्ह प्रकारातील दलदली वने येथे राहतात. आणि बऱ्याचदा अन्नाच्या शोधात मानवी वस्तीमध्ये देखील प्रवेश करतात.
वाघाचे आर्थिक फायदे:
मित्रांनो, आजकाल वाघाचे प्रमाण अतिशय कमी होत चालले आहे, त्यामुळे सरकारने वाघाच्या शिकारीवर पूर्णतः प्रतिबंध लावलेला आहे. मात्र काही लोक वाघाची तस्करी करत त्यांचे विविध अवयव विकतात. मात्र असे करणे कायद्याने गुन्हा आहे, त्यामुळे कृपया कोणीही वाघाची शिकार करू नये. मात्र वाघापासून मिळणारे काही उत्पादने आपण बघणार आहोत.
मित्रांनो, वाघाचे जवळजवळ प्रत्येकच अवयव कुठल्या ना कुठल्या आजाराच्या उपचाराकरिता वापरले जातात. ज्यामध्ये मुख्यतः दात दुखणे, डोके दुखणे, डोक्यावरील केस गळणे, अंगदुखी, कामोत्तेजक आणि आळशीपणाचा आजारावर उपचार करणाऱ्या औषधांमध्ये वापर केला जातो.
यामध्ये, वाघाची त्वचा देखील वापरली जाते. ज्यापासून मानसिक आजार बरे करणाऱ्या औषधाची निर्मिती केली जाते. तसेच वाघाचे टोकदार दात हे रेबीज, दमा, इत्यादी रोगांवर प्रभावीपणे वापरले जातात. वाघांची हाडे देखील अतिशय गुणकारी आहेत, ज्यापासून उच्च दर्जाची वाईन बनविली जाते.
तर वाघाची शेपटी त्वचा रोग तज्ञांद्वारे औषध बनवण्यासाठी वापरली जाते. मित्रांनो वाघ शिकार करून इतर प्राण्यांचे रक्त पितो, आणि ते रक्त त्याला पचते सुद्धा, त्यामुळे वाघाचे रक्त खूप अमूल्य असते. ज्याचा वापर इच्छाशक्ती वाढविण्यात होतो. तसेच आळशीपणा बरा करणे, आणि चेहऱ्यावरील मुरूम घालविणे यासाठी वाघाच्या मेंदूचा वापर करण्यात येतो.
वाघाबद्दलची काही आकर्षक तथ्ये:
मित्रांनो, सर्वांना भीतीची धडकी भरवणारा हा वाघ अतिशय मनोरंजक प्राणी आहे. त्याबाबत काही तथ्य आता आपण जाणून घेऊयात.…
- वाघ हा शिकारी प्राणी असल्याने तो अतिशय वेगाने धावतो. ज्याचा वेग सुमारे ताशी ६४ किलोमीटर इतका असतो.
- पोहण्यामध्ये वाघ अत्यंत तरबेज असतो.
- वाघ हा सस्तन प्राणी असल्याने तो पिलांना जन्म घालतो, मात्र वाघाची मादी एका वेळी तब्बल तीन ते चार बछड्यांना जन्म देऊ शकते.
- मित्रांनो, वाघांची संख्या अतिशय कमी होत आलेली आहे. वाघाच्या अनेक प्रजाती नाश पावलेल्या असल्या तरी देखील अजूनही सुमारे सहा प्रजाती जिवंत आहेत.
- सद्यस्थितीत भारतामध्ये सुमारे ३१६७ इतक्या वाघांची संख्या आहे, मात्र १०० वर्षांपूर्वी वाघांची हीच संख्या सुमारे एक लाखाच्या घरात होती. यावरून येत्या काळात वाघांची संख्या किती झपाट्याने कमी होऊ शकते याचा तुम्ही अंदाज लावू शकता.
- वाघ हा प्राणी कच्चे मांस भक्षण करत असल्यामुळे त्याच्या लाळे मध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म आढळतात.
- मित्रांनो, वाघ हा उष्ण प्राणी आहे, त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात त्यास फार गरम होते. त्यामुळे तो कितीही तास सलग पाण्यामध्ये बसून राहतो.
- वाघाचे आयुष्य सुमारे पंचवीस वर्षांपर्यंत असते.
- वाघाची डरकाळी चा आवाज इतका तीव्र असतो की तो सुमारे दोन मैल अंतरापर्यंत ऐकू जाऊ शकतो.
- वाघ हा मांसाहारी प्राणी असल्याने तो कधीही गवत घास खाताना दिसत नाही.
- ज्याप्रमाणे, कुठल्याही माणसांच्या हाताच्या बोटांचा ठसा सारखा नसतो, त्याचप्रमाणे कुठल्याही दोन वाघांच्या अंगावरील पट्ट्याचा प्रकार हा सारखा नसतो.
- वाघ शक्यतो दिवसभर झोपून असतात, आणि रात्रीच्या वेळी आपल्या शिकारीवर निघतात.
- वाघाचे पाण्यासोबत अतिशय घट्ट नाते आहे, वाघाला पाण्यामध्ये पोहणे आणि तासंतास पाण्यामध्ये खेळत राहणे खूप आवडते.
- वाघ कळपाने राहण्यापेक्षा एकटे राहणे पसंत करतात.
- वाघ हा अतिशय कलात्मक प्राणी आहे, तो आपल्या शिकारीला आकर्षित करण्यासाठी इतर प्राण्यांचे आवाज हुबेहूब काढू शकतो.
वाघांचे विविध प्रकार:
मित्रांनो वाघ कोठे राहतो, आणि त्याचे राहण्याचे आणि खाण्याचे प्रकार कसे आहेत, यावरून वाघाचे विविध प्रकार पडतात. ज्यामध्ये बेंगॉल वाघ, मलयान वाघ, सायबेरियन वाघ, सुमंत वाघ, बाली वाघ, दक्षिण चीनी वाघ, इंडो चायनीज वाघ इत्यादी प्रकार पडतात.
निष्कर्ष:
मित्रांनो, भारताच्या राष्ट्रीय प्राण्याची बिरुदावली मिळविणाऱ्या वाघ या प्राण्याचा सर्वत्र प्रचंड दबदबा आहे. या प्राण्याला जंगलाचा राजा म्हणून ओळखले जाते. वाघ हा प्राणी शिकारी असून तो मोठी उडी घेऊन आपले भक्ष पकडतो, आणि नरडीमध्ये आपले टोकदार दात रोवून तो भक्षाचा फडशा पाडतो. त्याला मांस खाण्यापेक्षा रक्त प्यायला फार आवडते. रक्त पिऊन झाल्यानंतर तो मांस देखील खातो.
वाघाची संपुर्ण माहिती | वाघ भारताचा राष्ट्रीय प्राणी | Tiger Information
#tiger_information_in_marathiयामध्ये वाघावर संपुर्ण माहिती आहे ही व्हिडिओ अभ्यासाच्या दृष्टीकोनातून टाकली आहेयामध्ये वाघाचे राहणीमान त्याचे खाद्य तो कुठे राह...
FAQ
वाघ या प्राण्याला इंग्रजी मध्ये काय म्हटले जाते?
वाघ या प्राण्याला इंग्रजीमध्ये टायगर असे म्हटले जाते.
वाघ या प्राण्याचे शास्त्रीय नाव काय आहे?
वाघ या प्राण्याचे शास्त्रीय नाव पॅंथरा टीग्रीस असे आहे.
वाघ आपल्या पिल्लांना कसा जन्म देतो?
मानवाप्रमाणेच वाघ हा सस्तन प्राणी असल्याने तो आपल्या पिल्लांना स्वतः जन्म देतो.
वाघ हा प्राणी शाकाहारी आहे की मांसाहारी?
वाघ हा प्राणी मांसाहारी गटातील आहे.
वाघाची संख्या भारतामध्ये सर्वात जास्त कोठे आहे?
भारतातील सुंदरबन या पश्चिम बंगाल येथील अभयारण्यामध्ये वाघांची संख्या सर्वाधिक आहे.
मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण भारताच्या राष्ट्रीय प्राणी असणाऱ्या वाघ या प्राण्याबद्दल माहिती पाहिली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळविण्यात अजिबात विसरू नका, आणि ही माहिती आठवणीने आपल्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा.
धन्यवाद…