स्वामी विवेकानंद यांची संपूर्ण माहिती Swami Vivekananda Information In Marathi

Swami Vivekananda Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो भारतातील सनातन संस्कृतीसह वैदिक धर्माला मूर्त रूप देण्याचे कार्य करणारे युवक म्हणजे स्वामी विवेकानंद होय. त्यांनी भारतीय संस्कृती, तिची उदात्त तत्वे, धार्मिक श्रद्धा आणि नैतिक मूल्य यांची जगाला ओळख करून दिली.

Swami Vivekananda Information In Marathi

स्वामी विवेकानंद यांची संपूर्ण माहिती Swami Vivekananda Information In Marathi

स्वामी विवेकानंदांना वेदसाहित्यावर प्रचंड प्रभुत्व होते. तसेच त्यांचे इतिहासाबद्दल चे ज्ञानदेखील वाखाणण्याजोगे होते. ज्यावेळी अमेरिकेमध्ये शिकागो परिषद झाली, त्यावेळी त्यांनी भारतीय संस्कृतीचा झेंडा अटकेपार अमेरिकेमध्ये रोवला. आणि हिंदू धर्माच्या अध्यात्मिक ज्ञानाचा संपूर्ण युरोपभर आणि अमेरिका भर प्रसार केला. आजच्या भागामध्ये आपण अशा या युवकांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या स्वामी विवेकानंदाबद्दल माहिती बघणार आहोत.

नावस्वामी विवेकानंद
मूळ नावनरेंद्रदास विश्वनाथ दत्त
इतर नावेनरेंद्र, नरेन
वडीलविश्वनाथ दत्त
आईभुवनेश्वरी देवी दत्त
जन्म दिनांक१२ जानेवारी १८६३
जन्म स्थळकलकत्ता
ओळखधार्मिक उपासक व आध्यात्मिक गुरू
कार्य इंग्लंड युके यु एस आणि युरोपमध्ये हिंदू संस्कृतीचा आणि हिंदुत्वज्ञानाचा प्रसार
गुरूगुरू रामकृष्ण परमहंस
निधन४ जुलै १९०२

कलकत्ता येथील एका प्रतिष्ठित कुटुंबात आई भुवनेश्वरी देवी व वडील विश्वनाथ दत्त यांच्या पोटी १२ जानेवारी १८६३ या दिवशी स्वामी विवेकानंदांचा जन्म झाला. जन्मतः त्यांचे नाव नरेंद्र असे ठेवले गेले.

ज्यावेळी स्वामी विवेकानंद तरुणपणात आले, त्यावेळी त्यांची भेट रामकृष्ण परमहंस यांच्याशी झाली. ज्यांच्यामुळे स्वामी विवेकानंदांची सनातन धर्माच्या आचरणाच्या संदर्भात ओढ वाढली, आणि ते रामकृष्ण परमहंसना आपले गुरु मानू लागले. पुढे जाऊन तर त्यांनी रामकृष्ण परमहंसांचे कार्य पुढे चालू ठेवले.

इसवी सन १८९३ मध्ये शिकागो येथे झालेल्या जागतिक धर्म परिषदेमध्ये किंवा महासभेमध्ये त्यांनी केलेले भाषण फार गाजले. या भाषणाची सुरुवात त्यांनी माझ्या अमेरिकन बंधू आणि भगिनींनो या शब्दांनी केली होती. ज्यामुळे अमेरिकेमधील प्रत्येकाला स्वामी विवेकानंद आपलेच आहेत असे वाटले. आणि भारतीय संस्कृतीच्या या आपुलकीपणाचा प्रत्येक अमेरिकन नागरिकाला आनंद वाटला.

त्यामुळे तेथे त्यांची फार प्रशंसा झाली. यापूर्वी अमेरिकन नागरिक भारताला निरक्षर लोकांचे आणि गुलामांचे राष्ट्र म्हणून ओळखत होते, मात्र स्वामीजींच्या प्रगाढ ज्ञानामुळे त्यांचा हा भ्रम क्षणार्धात नाहीसा झाला, आणि स्वामीजी या परिषदेतील सर्वात उत्कृष्ट व्यक्तिमत्व ठरले.

स्वामी विवेकानंद हे एक अतिशय दूरदर्शी विचारांचे व्यक्तिमत्व होते, त्यांनी हिंदू धर्माच्या भविष्यासाठी फार मोठे कार्य केले. तसेच पारतंत्र्यात असलेल्या भारताच्या प्रगतीमध्ये फार मोठा वाटा निर्माण केला. स्वामी विवेकानंद यांनी सरळ सरळ स्वातंत्र्य कार्यात भाग घेतल्या नसला, तरी देखील त्यांनी हिंदू तरुणांना संघटित आणि प्रशिक्षित केले. हिंदू तरुणांना आपल्या शक्तीचा कसा उपयोग करावा याची जाण करून दिली. परिणामी त्यांच्या सहवासात अनेक देशभक्त घडले गेले.

स्वामी विवेकानंद हे मनाने अतिशय दयाळू व्यक्तिमत्व होते, त्यांना प्राण्यांबद्दल फार दया वाटे. त्यांनी आयुष्यभर आपल्या भाषणांमध्ये आणि प्रवचनांमध्ये मानवा मानवा मधील प्रेम, बंधुभाव आणि सुसंवाद वाढविण्यावर लक्ष केंद्रित केले. तसेच प्राणीमात्रांविषयी आणि सकल निसर्गातील सजीवांंबद्दल दया बुद्धि बाळगण्याबद्दल त्यांनी आवाहन केले.

स्वामी विवेकानंद आणि बालपण:

मित्रांनो, इतर व्यक्तींप्रमाणेच स्वामी विवेकानंदांचे बालपण अतिशय खोडकर आणि मजे मध्ये गेले. लहानपणी ते फारच खोडकर म्हणून प्रसिद्ध होते. त्यांची आई त्यांना पुराणातील अनेक गोष्टी सांगत असे, त्यामुळे त्यांच्या मनावर त्याचा चांगलाच ठसा पडला. पुढे रामकृष्ण परमांसाच्या सहवासात आल्यानंतर मात्र स्वामी विवेकानंद पूर्णतः धार्मिक वृत्तीचे बनले. त्यांच्या बालपणाबद्दल एक किस्सा सांगितला जातो, तो म्हणजे हुक्का ओढण्याचा.

त्यांच्या वडिलांकडे येणाऱ्या लोकांसाठी जातीनिहाय वेगवेगळे हुक्के ठेवलेले होते. हे हुक्के वेगवेगळे का आहेत याविषयी बाल नरेंद्रला नेहमीच कुतूहल वाटे. त्यामुळे त्यांनी एक दिवस या प्रत्येक हुक्यामधील एक एक झुरका घेऊन बघितला, आणि नेमकं त्यावेळी त्यांच्या वडिलांनी त्यांना बघितले. वडिलांनी विचारणा केल्यावर बाल नरेंद्रनी सर्व खरे काय ते सांगून टाकले.

विवेकानंदांचा गुरु परमहंशांशी संबंध:

भारतीय संस्कृतीमध्ये गुरु आणि शिष्याचा संबंध हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. स्वामी विवेकानंदांचे गुरु असलेले परमहंस यांची पहिली भेट एका प्रश्नाने झाली, आणि तो प्रश्न म्हणजे तुम्ही देव पाहिला आहे का? या प्रश्नाने स्वामी विवेकानंदांमधील एक महान व्यक्तिमत्व गुरु रामकृष्ण परमहंसांनी हेरले.

पुढे रामकृष्ण परमहंस यांचे विचार ऐकून विवेकानंद धार्मिक वृत्तीचे घडले. आणि त्यांनी रामकृष्ण परमहंस यांचे हिंदू धर्माचे कार्य पुढे चालत ठेवले. ज्यावेळी १८८५ मध्ये परमहंस यांना कर्करोग झाला, तेव्हा विवेकानंद यांनी आपल्या गुरुची मनोभावे सेवा केली. आणि त्यांच्या मृत्यूनंतर देखील त्यांच्या विचारांचे सर्वत्र प्रसारण केले.

स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील काही सिद्धांत:

मित्रांनो, कुठलाही महान व्यक्ती असला की तो आपल्या सिद्धांत वर जगण्यास प्राधान्य देतो. तसे स्वामी विवेकानंद यांचे देखील काही सिद्धांत आहेत.

स्वामी विवेकानंद नेहमी सत्य बोलण्यास प्राधान्य देत असत.स्वामीजी जीवनामध्ये शिक्षणाला फार महत्त्व देत, त्यांच्या मते कोणत्याही पद्धतीने मिळालेले ज्ञान हे सर्वश्रेष्ठ असते. आणि प्रत्येकाने ते मिळविले पाहिजे. स्वामीजींच्या मते जीवनात कितीही संकटे आली तरी त्याला डगमगून न जाता धैर्याने तोंड दिले पाहिजे.

निष्कर्ष:

मित्रांनो, स्वामी विवेकानंद एक महान भारतीय तत्त्वज्ञानी, विचारवंत व अध्यात्मिक गुरु होते. त्यांनी प्रचंड वाचन केलेले होते, आणि त्यामुळे त्यांना खूप विद्या प्राप्त झाली होती. त्यांची स्मरणशक्ती देखील प्रचंड वाखानानेजोगी होती. त्यांना ज्ञानाचा इतका व्यासंग लागलेला होता, की एकदा वाचायला बसले की त्यांना कशाचेही भान उरत नसे. त्यांच्याबद्दल एक कथा सांगितली जाते, ती म्हणजे स्वामीजी कुठलेही पुस्तक वाचून झाले की त्याची पाने फाडत असत. आणि त्यानंतर कधीही ते पुस्तक परत वाचत नसत.

मात्र त्यांना कधीही आणि कोणत्याही वेळी त्या पुस्तकातील कुठल्याही गोष्टीवर प्रश्न विचारला तर ते कोणत्या क्रमांकाच्या पानावर आणि काय उत्तर आहे हे अगदी बिनचूक सांगत असत. यावरून त्यांच्या स्मरणशक्तीची कल्पना करता येऊ शकेल. मित्रांनो, स्वामी विवेकानंद हे तरुणांसाठी एक मोठे प्रेरणास्थान आहेत. तरुणांनी त्यांच्याकडून प्रेरणा घेत, आपली तरुणपणाची ताकद ही वाईट गोष्टींसाठी खर्च न करता देश सेवेसाठी आणि विधायक कामांसाठी जर खर्च केली तर भारताला प्रगती करण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. त्यासाठी प्रत्येक तरुणांनी स्वामीजींचा आदर्श घेणे अतिशय गरजेचे आहे.

FAQ

स्वामी विवेकानंदांचे मूळ पूर्ण नाव काय होते?

स्वामी विवेकानंद यांचे मूळ पूर्ण नाव नरेंद्र कुमार विश्वनाथ दत्त असे होते.

स्वामी विवेकानंद कोणत्या घटनेमुळे खूप प्रसिद्ध झाले?

शिकागो येथे झालेल्या धर्म परिषदेमध्ये स्वामी विवेकानंदांचे भाषण प्रचंड गाजल्यामुळे ते सर्वत्र प्रसिद्ध झाले.

स्वामी विवेकानंद यांच्या गुरूंचे नाव काय होते?

स्वामी विवेकानंदांच्या गुरूंचे नाव रामकृष्ण परमहंस असे होते.

स्वामी विवेकानंद यांच्या आई आणि वडिलांचे नाव काय होते?

स्वामी विवेकानंद यांच्या आईचे नाव भुवनेश्वरी देवी, तर वडिलांचे नाव विश्वनाथ दत्त असे होते.

स्वामी विवेकानंद यांचा जन्म कोठे व कोणत्या दिवशी झाला?

स्वामी विवेकानंद यांचा जन्म कलकत्ता येथे १२ जानेवारी १८६३ या दिवशी झाला.

मित्रांनो, आज आपण तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या स्वामी विवेकानंद यांच्या बद्दल माहिती पाहिली, ही माहिती प्रत्येक तरुणाला प्रेरणादायी ठरेल. या माहिती वरील तुमच्या प्रतिक्रिया कळविण्याबरोबरच तुमच्यासारख्या इतरही तरुणांना ही माहिती अवश्य शेअर करा.

धन्यवाद…

Avatar

i am marathi content writer from last 5 years.

Leave a Comment