सूर्यफुलाची संपूर्ण माहिती Sunflower Information In Marathi

Sunflower Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो निसर्ग हा प्रत्येक गोष्टींमधून सौंदर्याने ओतप्रोत भरलेला आहे. आणि या सौंदर्याचे एक प्रतीक म्हणून ओळखले जाणारे सूर्यफूल देखील अगदी लहरत बहरत उभा असते. सूर्यफुलाला सूर्यफूल किंवा सूर्यमुखी अशी नावे असून, हे फुल तेलवर्गीय बिया प्रदान करते. याचे मूळ उगम स्थान हे अमेरिकेमध्ये सापडत असले तरी देखील जगातील प्रत्येक देशामध्ये सूर्यफुलाचे पीक घेतले जाते.

Sunflower Information In Marathi

सूर्यफुलाची संपूर्ण माहिती Sunflower Information In Marathi

आपल्या देशामध्ये हंगामी प्रकारचे घेतले जाणारे हे पीक मात्र अमेरिकेत वर्षभर उगविले जाते. अमेरिकेबरोबरच डेन्मार्क, रशिया, स्वीडन, भारत, अमेरिका, इंग्लंड, आणि इजिप्त इत्यादी देशांमध्ये देखील या सूर्यफूल पिकाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते.

मित्रांनो, या सूर्यफुलाचे नाव सूर्यफूल पडण्यामागे एक मनोरंजक कारण देखील आहे. हे फुल सकाळी सूर्य उगवल्यापासून मावळेपर्यंत नेहमी सूर्याकडे तोंड करून असते.

हे फुल विशिष्ट पद्धतीने रचना केलेले असते. यामध्ये पिवळसर पाकळ्यांच्या मध्यभागी काळ्या रंगाच्या बिया एकमेकांमध्ये अडकलेल्या असतात.

सूर्यफूल याच्या नावामध्ये फुल असले तरीदेखील हे एक तेलवर्गीय पीक आहे. त्याच्या बियांचा वापर तेल बनविण्यासाठी केला जातो, तसेच उर्वरित फोलपटांपासून कोंबड्यांसाठीचे अन्न बनविले जाते.

चला तर मग वेळ न दवडता आजच्या भागामध्ये सूर्यफूल या तेलवर्गीय पिकाबद्दल माहिती बघूया…

नावसूर्यफूल
इंग्रजी नावSunflower
इतर नावेसुर्यमुखी
शास्त्रीय नाव Helianthus annuus
कुळ/कुटुंबAsteraceae / Compositae
जिनस (जमात) Heliantheae
स्पेसिज (वंश)annuus

एक सुंदर गुच्छ म्हणून ओळखले जाणारे फुल म्हणजे सूर्यफूल होय. आपल्या सौंदर्याने प्रत्येक सजीवाला आपल्याकडे आकर्षित करून घेण्याची क्षमता या सूर्यफुलामध्ये आहे. सर्वप्रथम मेक्सिको येथे लागवड केल्या गेलेल्या या सूर्यफुलाचा उगम काळ सुमारे २६०० बी सी इतका जुना आहे.

त्यानंतर इतरही ठिकाणी या फुलाची लागवड करण्यात आली, त्यामध्ये मीसीपीसी व्हॅलीचा देखील समावेश होतो. यामध्ये असणाऱ्या चरबीमुळे हे एक ऊर्जा देणारे पीक म्हणून ओळखले जाते. या सूर्यफुलापासून फ्रान्सिस्को पिझारो हे एक युरोपियन फुल उत्क्रांतीत झालेले आहे.

पुढे १६ व्या शतकाच्या दरम्यान युरोप मधून या सूर्यफुलाच्या बिया स्पेन पर्यंत पसरल्या गेल्या, आणि बघता बघता सर्व जगभर या सूर्यफुलाचा प्रसार झाला. त्यानंतर सुमारे अठराव्या शतकाच्या दरम्यान सूर्यफूल तेलाच्या वापरामध्ये प्रचंड मोठी वाढ झाली, आणि ती आजतागायत टिकून आहे. आरोग्यासाठी चांगले तेल म्हणून सूर्यफुलाचा तेलाचा उल्लेख केला जातो.

सूर्यफूल बिया खाण्याचे फायदे:

मित्रांनो, निसर्गातील प्रत्येक खाद्यपदार्थ गोष्ट ही आरोग्यासाठी चांगलीच असते. त्यातील काही न काही घटक हे शरीरासाठी खास ठरत असतात, मात्र कुठल्याही गोष्टीचा अतिवापर मात्र घातक ठरत असतो.

सूर्यफुलामध्ये अनेक अँटीमाइक्रोबियल आणि ज्वलन विरोधी गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे शरीरातील हानिकारक जिवाणूंचं उच्चाटन करण्यास मदत मिळते, आणि शरीर निरोगी होते.

सूर्यफूल बियांमध्ये विविध प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स आढळून येतात, त्यामुळे मानवासाठी याचा फायदा होतो. आणि यातील चरबीमुळे शरीरावर झालेल्या विविध जखमा भरून काढण्याचे प्रमाण वाढते.

आजकाल आपण ऐकतो की तेल हे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले नाही, मात्र सूर्यफुलाच्या तेलामध्ये पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड तसेच विविध जीवनसत्वे आणि फ्लेहोनोईड आढळून येतात, जे हृदयासाठी अतिशय फायदेशीर समजले जातात.

तसेच आजची मोठी समस्या असणाऱ्या कर्करोगाविरोधी देखील गुणधर्म या सूर्यफुलामध्ये आढळतात. त्यामधील लिग्नान हा घटक या कामी मोठी मदत करतो.

तेलकट पदार्थ खाऊन शरीरातील कोलेस्ट्रॉल चे प्रमाण वाढते, असे आपण ऐकलेलंच असेल, मात्र कोलेस्ट्रॉलची समस्या असणाऱ्या रुग्णांसाठी सूर्यफुलाच्या बिया खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल ला बाहेर टाकले जाते.

मित्रांनो, सूर्यफूल हे तेलवर्गीय पीक आहे, असे आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे त्यातील चरबी ही शरीरासाठी फायदेशीर ठरत असते. ज्यावेळी वाढत्या वयामुळे हाडे आणि सांधे तसेच गुडघे दुखण्याची समस्या सुरू व्हायला लागते, त्यावेळी सूर्यफुलाचा आहारामध्ये समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. कारण यातील चरबी ही शरीरातील विविध सांध्यांना वंगण देण्याचे कार्य करत असते.

मित्रांनो, आज काल प्रत्येक जण सौंदर्याच्या बाबतीत जागरूक झालेला आहे, मात्र असे असले तरी देखील आजकालच्या धावपळीच्या युगामध्ये आपल्याला नेहमी बाहेर पडावे लागते. अशा वेळी बाहेरील धुळीमुळे केस हे निर्जीव व्हायला लागतात, आणि कोरडे देखील पडायला लागतात. अश्या वेळी सूर्यफूल बिया खाल्ल्याने केसांमध्ये पुन्हा चमक यायला सुरुवात होते, तसेच सूर्यफूल बिया खाण्याबरोबरच सूर्यफूल तेल केसांना देखील लावले जाते.

सूर्यफुलाच्या सेवनामुळे होणारे तोटे किंवा नुकसान:

मित्रांनो, प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. एखाद्या गोष्टीचे फायदे दिसत असले तरी देखील त्याबरोबरच त्याचे काही तोटे देखील असतात. हेच सूर्यफुलाच्या बाबतीत देखील आहे. येथे सूर्यफुलाचे तोटे सांगून सूर्यफूल सेवन हे वाईट आहे हे दाखविण्याचा मुळीच हेतू नाही, मात्र आमच्या वाचकांनी जागरूक असायला हवे हा यामागील उद्देश आहे.

सूर्यफुलाच्या बिया खाणे फायदेशीर असले तरी देखील त्याची टरफले खाणे हे विषारी ठरू शकते. त्यामुळे बिया नेहमी सोलून खाव्यात.अति प्रमाणात सूर्यफूल तेल त्वचेला लावणे ऍलर्जी करू शकते.

सूर्यफुलचे किती सेवन करावे, हे डॉक्टर अथवा डायटिशियन व्यक्तीला विचारूनच करावे, जेणेकरून होणारा संभाव्य धोका टाळला जाऊ शकेल.

निष्कर्ष:

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण सूर्यफूल याविषयीची माहिती पाहिली. सूर्यफूल हे सर्वांच्या आवडीचे आणि अतिशय सुंदर दिसणारे फुल असून, या फुलातील बियांपासून तेल निर्मिती केली जाते. मेक्सिको या देशांमध्ये सर्वप्रथम लागवडीत आलेल्या या सूर्यफुलाला आज जगभर पसंती दिली जाते.

अनेक देश याची लागवड करतात, मात्र असे असले तरी देखील शेतकऱ्यांच्या दृष्टीने ही पीक काही प्रमाणात दुर्लक्षित आहे, असेच म्हणावे लागेल. कारण सूर्यफूल घेणाऱ्या शेतकऱ्यांची टक्केवारी ही फार कमी आहे. त्यामुळे की काय आज आपण बाजारात सूर्यफूल तेल आणायला गेलो तर इतर तेलांच्या तुलनेत सूर्यफूल तेलाचा भाव आपल्याला अधिक बघायला मिळतो. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सूर्यफूल पिकाची लागवड केल्यास, त्यातून आपल्याला चांगला नफा तर मिळेलच, शिवाय सूर्यफूल तेलाच्या वाढलेल्या अव्वाच्या सव्वा किमती देखील नियंत्रणात येण्यास मदत होईल.

FAQ

सूर्यफूल हे जिरायती पीक आहे की बागायती पीक आहे?

सूर्यफूल पीक बागायती पीक असून, त्याला ओलावा हा नेहमी असावा लागतो. असे असले तरी देखील थंडीच्या हंगामात त्याला कमी पाणी दिले तरी चालते. पाण्याची बचत होण्याकरिता तुम्ही आधुनिक सिंचन पद्धतीचा देखील वापर करू शकता.

सूर्यफुलाच्या फुलाला कशाचे प्रतीक समजले जाते?

सूर्यफुलाच्या फुलाला मुलगी आणि मुलगा यांच्यामधील प्रेमाचे प्रतीक समजले जाते.

उमलल्यानंतर किती दिवस सूर्यफुलाचे फुल आकर्षक दिसते?

उमलल्यानंतर सुमारे दहा ते बारा दिवस सूर्यफुलाचे फुल हे आकर्षक दिसते, त्यानंतर मात्र ते परिपक्वतेकडे झुकते आणि काळसर पडायला लागते.

सूर्यफूल पिकाचा मूळ उगम कोणत्या देशातील आहे?

सूर्यफूल पिकाचा मूळ उगम हा अमेरिका देशातील मेक्सिको येथील आहे.

कोणत्या देशाने सूर्यफुलाला राष्ट्रीय फुलाचा दर्जा दिलेला आहे?

हल्ली चर्चेत असणारे दोन देश अर्थात रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांचे सूर्यफूल हे राष्ट्रीय फूल आहे.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण सूर्यफूल या पिकाबद्दल माहिती पाहिली. ही माहिती एक शेतकरी म्हणून तुम्हाला किती फायदेशीर ठरली ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा. तसेच आपल्या इतरही शेतकरी मित्र मैत्रिणींना ही माहिती शेअर करण्यास बिलकुल विसरू नका. धन्यवाद…

Avatar

i am marathi content writer from last 5 years.

Leave a Comment