सूर्याची संपूर्ण माहिती Sun Information In Marathi

Sun Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो लहानपणी आपण सूर्य उगवला नाही तर… या विषयावर अगदी खूप खूप कल्पना करून लिहीत असू. मात्र आता मोठे झाल्यानंतर सूर्य उगवला नाही तर काय होईल असा विचार देखील करवत नाही. कारण सूर्याचे खरे महत्त्व आता आपल्या लक्षात आलेले आहे.

Sun Information In Marathi

सूर्याची संपूर्ण माहिती Sun Information In Marathi

मित्रांनो सूर्य हा सूर्यमालेचा केंद्रबिंदू आहे, सूर्याभोवती सर्व ग्रह फिरत असतात आणि सर्व ग्रहांना या सूर्यापासूनच ऊर्जा मिळत असते. पृथ्वीवर सजीव सृष्टी असण्यामागे सूर्याचा फार मोठा वाटा आहे. काही दिवसांसाठी सूर्य नाहीसा झाला तर पृथ्वीवरील जीवन धोक्यात येऊ लागेल. आपल्या पुराणापासून प्रत्येक धर्मग्रंथांमध्ये सुद्धा सूर्याला देवतेचे स्थान देण्यात आलेले आहे. तसेच सूर्याला सकाळी जल अर्पण करून आपण सूर्याचा आशीर्वाद देखील घेत असतो.

शरीर उपासक लोक सूर्याला नमस्कार करून सूर्यनमस्कार घालतात, आणि सूर्यासारखे तेजवान होण्यासाठी सूर्याची उपासना देखील करतात. सूर्याचे अगणित फायदे असले तरी देखील त्याच्या नसल्याने होणारे तोटे अधिक आहेत. त्यामुळे सूर्य हा खूप महत्त्वाचा असा तारा आहे. आजच्या भागामध्ये आपण या सूर्याबद्दल इत्यंभूत माहिती बघणार आहोत चला तर मग सुरु करूया सूर्याविषयीच्या या ज्ञानमय प्रवासाला…

नावसूर्य
प्रकारतारा
सूर्यमालेतील स्थानसर्वात मध्यभागी
पृथ्वीपासून अंतर८ मिनिटे आणि २० सेकंद (प्रकाश मिनिटे)
तापमान५७०० ते ६०००°से.

सूर्याबद्दल प्राथमिक माहिती:

मित्रांनो, सूर्य हा आपल्या सूर्यमालेचा कुटुंबप्रमुख. या सूर्याची निर्मिती सुमारे साडेचार अरब वर्षांपूर्वी झाली असावी असे शास्त्रज्ञ सांगतात. शास्त्रज्ञानुसार सौरमंडळाची निर्मिती ही अवाढव्य अश्या मोलेक्युलर वायूंच्या ढगापासून झाली असावी, ज्याला नेब्युला असे म्हणले जाते.

सूर्य हा उष्ण वायू पासून तयार झालेला आहे, असे आपण बऱ्याच ठिकाणी वाचले असेल. याच नेब्युलामधील वायू मध्यभागी एकवटून त्यापासून सूर्याची निर्मिती झाली, आणि फिरत फिरत हा नेब्युला गोलाकार झाला आणि सूर्याभोवती फिरू लागला. पुढे जाऊन उर्वरित वायूपासून अनेक ग्रहांची निर्मिती झाली.

वरवर सूर्य आपल्याला गोल तप्त आगीचा गोळा दिसत असला तरी देखील या सूर्याचे सहा भागात विभाजन केलेले आहे. अतिशय आतील म्हणजेच केंद्रकाचा भाग म्हणजे कोर, त्याच्यावर रेडिएटिव्ह झोन आणि कनेक्ट झोन असे दोन झोन असतात. सूर्याच्या वरील भागामध्ये फोटोस्पियर, क्रोमस्पियर, आणि संक्रमण क्षेत्र असते. सूर्याच्या पृष्ठभागाकडेने पसरलेल्या आवरणाला कोरोना असे म्हटले जाते. कोर हा सूर्याच्या पृष्ठभागापेक्षा २५% इतका असतो. रेडिएटिव्ह झोन हा ७०% असतो.

सौरमालेबद्दल थोडक्यात माहिती:

मित्रांनो, आपण आपल्या सूर्यमालेबद्दल थोडीशी माहिती बघूया, आपली सूर्यमाला म्हणजे एक जटिल प्रक्रिया आहे, सूर्याच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे सूर्यमालेतील सर्व ग्रह या सूर्या ताऱ्याभोवती फिरत असतात. ज्यामध्ये मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि, पृथ्वी, युरेनस, आणि नेपच्यून इत्यादी ग्रहांचा समावेश होतो. यापैकी बुध हा ग्रह सूर्याच्या सर्वात जवळ आहे.

सूर्यापासून पृथ्वीपर्यंत असलेल्या ग्रहांना अंतर्ग्रह, तर पृथ्वीच्या नंतर येणाऱ्या ग्रहांना बाह्यगृह असे म्हटले जाते. हे प्रत्येक ग्रह सूर्याभोवती फिरत असतात, मात्र त्या प्रत्येकाची कक्षा ही वेगळी असते.

कोणी सूर्यापासून जवळ तर कोणी सूर्यापासून लांब असल्यामुळे त्यांच्या प्रदक्षिणा करण्याच्या वेळेमध्ये देखील फरक पडतो. यामध्ये बुध हा ग्रह प्रदक्षिणा करण्यासाठी सर्वात कमी वेळ घेतो. आपली पृथ्वी स्वतःभोवती प्रदक्षिणा तर करतेच सोबत सूर्याभोवती देखील प्रदक्षिणा करत असते यासाठी पृथ्वीला सुमारे ३६५ दिवसांचा कालावधी लागतो.

मित्रांनो, सूर्यमालेचा कुटुंबप्रमुख हा आकाराने देखील तसाच मोठा आहे, या सूर्याचा व्यास सुमारे १३ लाख ९० हजार इतका असून, त्याचे वजन देखील तेवढेच जास्त आहे. सूर्याचे वस्तुमान किती आहे याचा अंदाज तुम्ही यावरून देऊ शकता, की एका पारड्यात सूर्य ठेवल्यास दुसऱ्या पारड्यामध्ये तब्बल १३ लाख ग्रह टाकावे लागतील तेव्हा ते वजन समसमान होईल.

मित्रांनो, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घराच्या बाहेर निघालं की आपल्याला उन्हाचे चटके बसतात, सूर्य आपल्यापासून इतका लांब असून देखील आपल्यापर्यंत इतकी उष्णता पोहोचते तर सूर्य किती उष्ण असेल याच्या तुम्ही अंदाज घेऊ शकता. सूर्याच्या पृष्ठभागाचे व गाभ्याचे तापमान हे वेगवेगळे असते. पृष्ठभाग हा सुमारे ६०००°c तर गाभा हा सुमारे १ लाख ६० हजार डिग्री सेल्सिअस इतका उष्ण असतो. सूर्याच्या कित्येक किलोमीटर लांब असतानाच कुठल्याही गोष्टीचा जळून अंत होणे निश्चित आहे.

सूर्याविषयीची काही तथ्य माहिती:

मित्रांनो, सूर्याला अरुण असे देखील म्हटले जाते, हे आपल्याला माहितीच आहे. आणि सूर्योदयाला अरुणोदय असे देखील म्हणतात. सूर्याच्या उगवण्यावरून अरुणाचल प्रदेश या राज्याचे नाव पडले आहे, हे तुम्हाला माहिती आहे का. कारण भारतामधील सर्वात पहिला सूर्योदय हा अरुणाचल प्रदेश या राज्यातील डोंग व्हॅली येथे होतो.

मित्रांनो, सूर्यप्रकाश हा वेगवेगळ्या सात रंगांनी बनलेला आहे, मात्र या सर्व रंगांचे मिश्रण होऊन सूर्याचा प्रकाश आपल्याला पांढरा दिसतो. हे सात रंग म्हणजे लाल, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा, आणि जांभळा होय.

मित्रांनो, आपण सूर्योदय अमुक अमुक मिनिटांना झाला असे नेहमी ऐकत असतो. मात्र त्यावेळी आधी तब्बल आठ मिनिटे आणि वीस सेकंद इतका आधी सूर्य उगवलेला असतो. मात्र तो आपल्याला उशिरा दिसतो.

मित्रांनो, सूर्य उगवतेच्या वेळी आणि मावळतेच्या वेळी आपल्याला केशरी रंगाचा तर दिवसभर पिवळ्या रंगाचा दिसतो. मात्र अंतराळातून सूर्यास पाहिले तर तो केवळ पांढऱ्या रंगाचा दिसून येतो. सूर्याचा वेग इतका प्रचंड आहे की तो आपल्या डोळ्याची पापणी लवेपर्यंत तब्बल २२० किलोमीटर प्रवास करतो.

निष्कर्ष:

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण सूर्या विषयी माहिती घेतली. सूर्य किती महत्त्वपूर्ण आहे याचे महत्त्व प्रत्येक सजीवाला पटलेले आहे. आपण रोज ग्रहण करणारे अन्न, ते अन्न वनस्पतीमध्ये तयार करताना तयार होणारा ऑक्सिजन, सगळं काही सूर्याचीच देन आहे. इतकंच कशाला रोज आपल्याला मिळणारी ऊर्जा देखील सूर्याकडूनच मिळते.

सूर्याकडून मिळणारी ऊर्जा विविध प्रकारात परिवर्तित होऊन आपल्याला मिळत असते, त्यामुळे माणूसच काय तर विविध प्राणी आणि वनस्पती यांच्यासाठी सुद्धा सूर्य हा खूप महत्त्वाचा तारा आहे. आपल्या सूर्यमालेचा केंद्र म्हणून सूर्याला ओळखले जाते. सर्व ग्रहांना या सूर्यानेच एकत्र बांधून ठेवले आहे. सूर्याला सूर्यमालेचा कुटुंबप्रमुख म्हटलं तरी वावग ठरायला नको.

सूर्य काय आहे? सूर्य कशापासून बनलाय? Sun's information in marathi. what is sun? 🌞 #sun #सूर्य

#whatissun#sun#सूर्य #marathivideo #mpsc #marathiinformation #marathinews #trytounderstand what is sun?Surya mhanje Kay?Surya kadhyapasun banla ahe?nuclear f...

FAQ

सूर्य हा ग्रह आहे की तारा?

सूर्य हा तारा असून तो आपल्या सूर्यमालेचा प्रमुख आहे.

सूर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर किती आहे?

सूर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर ८.२० प्रकाश मिनिटे इतके आहे.

सूर्याचे आकाशगंगेच्या केंद्रकापासून अंतर किती आहे?

आकाशगंगेच्या केंद्रकापासून सूर्याचे अंतर सुमारे २५ ते २८ हजार प्रकाश वर्ष इतके आहे. आणि सूर्य हा आकाशगंगेच्या केंद्रकाला सुद्धा प्रदक्षिणा घालत असतो. त्याच्यासोबत संपूर्ण सूर्यमाला देखील ही प्रदक्षिणा पूर्ण करत असते.

सूर्याला आकाशगंगेची प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी किती वर्षे लागतात?

सूर्याला आकाशगंगेची प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी सुमारे साडेबावीस ते पंचवीस कोटी वर्षे लागतात.

सूर्याचे तापमान किती आहे?

सूर्याचे तापमान सुमारे पाच हजार सातशे अंश सेल्सिअस इतके आहे.

सूर्य पृथ्वी पेक्षा किती पटीने मोठा आहे?

सूर्य हा पृथ्वीपेक्षा प्रचंड मोठा असून, पृथ्वीपेक्षा सूर्याचा व्यास हा १०९ पट मोठा आहे.

मित्रांनो, आज या लेखाच्या माध्यमातून आपण सूर्य विषयीची माहिती घेतली. यातून आपल्याला सूर्याचे महत्त्व देखील समजले, त्यामुळे याविषयी तुमच्या प्रतिक्रिया अगदी थोडक्या शब्दांमध्ये आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तसेच थोडासा वेळ काढून आपल्या मित्र-मैत्रिणींना देखील या माहितीचा आस्वाद घेता यावा म्हणून त्यांच्यासोबत ही माहिती शेअर करा.

 धन्यवाद.

Vaishnavi Raut

वैष्णवी राउत (Vaishnavi Raut) हि एक content writer असून यांना पोस्ट लिहिण्याचा ३ वर्षांचा अनुभव आहे. यांचे शिक्षण बी.एसस्सी Agri.झाले असून ती मराठी भाषेत अचूक लेखनाचे कार्य करतात.

Leave a Comment