सुखदेव यांची संपूर्ण माहिती Sukhdev Information In Marathi

Sukhdev Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेक जणांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यामध्ये अनेक असे देखील लोक आहेत ज्यांनी आपले सर्वस्व स्वातंत्र्यासाठी पणाला लावले, मात्र त्यांची कुठेही प्रसिद्धी झाली नाही. मित्रांनो, सर्वांच्या परिचित असणारे एक स्वातंत्र्य सेनानी म्हणून सुखदेव यांचे देखील नाव घेतले जाते.

Sukhdev Information In Marathi

सुखदेव यांची संपूर्ण माहिती Sukhdev Information In Marathi

भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या तिकडी मधील एक व्यक्तिमत्व म्हणून सुखदेव यांचा उल्लेख केला जातो. यांना २३ मार्च १९३१ या दिवशी फासावर लटकवण्यात आले होते. आणि त्यानंतर सतलज नदीकाठी त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.

त्यांच्या बलिदानामुळे संपूर्ण देशभर क्रांतीची लाट उसळली आणि ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडण्यात आली. आजच्या भागात आपण या सुखदेव यांच्या विषयी माहिती बघणार आहोत. चला तर मग सुरू करूयात, या अंगावर शहारे आणणाऱ्या सुखदेव यांच्या विषयीच्या माहितीला.…

नावसुखदेव
संपूर्ण नावसुखदेव रामलाल थापर
जन्म दिनांक१५ मे १९०७
आई वडिलांचे नावरल्ला देवी आणि प्रभाकर थापर
बंधूमथुरदास थापर
धर्महिंदू
कार्यभारतीय स्वातंत्र्य चळवळ
ओळखक्रांतिकारक
मृत्यू२३ मार्च १९३१

मित्रांनो, श्रीमती रल्लादेवी आणि रामलाल थापर या दांपत्याच्या पोटी १५ मे १९०७ या दिवशी सुखदेव यांचा जन्म झाला. सुखदेव यांचे भगतसिंग व राजगुरू हे अतिशय जिवलग मित्र होते. ज्यांनी आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत एकमेकांची साथ सोडली नाही.

सुखदेव यांना लहानपणापासूनच गुलामगिरीचा राग येत असे, ब्रिटिशांनी भारतीयांवर केलेल्या अत्याचाराची त्यांना जाण होती. भारताला स्वातंत्र्य मिळवणे फारच गरजेचे आहे हे त्यांनी अगदी पूर्वीच ओळखले होते, म्हणून त्यांनी स्वतःला क्रांतिकारक बनविण्याचे ठरविले. आणि आपल्या सवंगड्यांसोबत मिळून त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी अनेक चळवळी केल्या.

सुखदेव यांची क्रांतिकारी जीवनाकडे वाटचाल:

मित्रांनो, हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिक असोसिएशन या संघटनेचा सदस्य होण्याबरोबरच त्यांनी पंजाब प्रांतासह उत्तर भारतातील अनेक शहरांमध्ये क्रांतिकारी कार्य राबवून आपली जबाबदारी सांभाळली. त्यांनी आपले संपूर्ण जीवन देशासाठी आणि देशातील लोकांच्या कल्याणाकरिता वाहिले होते. ते लाहोरच्या नॅशनल कॉलेज या ठिकाणी भारताचा गौरवशाली इतिहास सांगत असत, जेणेकरून तरुण रक्तामध्ये देशभक्ती जागृत होईल.

सुखदेव यांनी आपल्या सवंगड्यांसोबत मिळून लाहोर या ठिकाणी नौजवान भारत सभा ही संघटना स्थापन केली. या मार्फत त्यांनी तरुणांना स्वातंत्र्याच्या महत्त्वाची जाणीव करून दिली, आणि स्वातंत्र्याच्या दिशेने वाटचाल करण्यास प्रेरित केले. सुखदेव यांनी अनेक क्रांतिकारी कार्यामध्ये आपला सहभाग नोंदवलेला आहे, त्यातील एक महत्त्वाची घटना म्हणजे १९२९ यावर्षी कैद्यांनी केलेले उपोषण होय. ज्यामुळे ब्रिटिश राजवटीचा अमानुष चेहरा सर्वांसमोर येण्यास मदत झाली.

आज भारतीय लोक राजगुरू यांना त्यांच्या कार्यामुळे देण्यात आलेल्या फाशीमुळे ओळखतात. त्यांनी भारताला स्वातंत्र्य देण्याबरोबरच देशाचे सामाजिक व राजकीय दृष्टिकोन बदलण्यास मदत केली होती. या तिघांना फाशी जरी झाली असली, तरी देखील त्यामुळे अनेक तरुण युवकांमध्ये देशभक्तीची लाट येण्यास मदत झाली, आणि त्याचे रूपांतर पुढे स्वातंत्र्यात होण्यास फार मोलाचा हातभार लागला.

लाहोर कटामध्ये देखील सुखदेव सहभागी होते, ज्यामुळे त्यांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. काही संदर्भानुसार असे सांगण्यात येते की ब्रिटिश सरकारला या तिघा जणांनी फार जेरीस आणले होते. त्यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांच्या फाशीच्या शिक्षा आधीच ठरवल्या होत्या, फक्त त्यांना अटक करण्याचे तेवढे बाकी होते.

इंग्रज अधिकारी सोंडर्स यांच्या हत्यांमध्ये सुखदेव यांचा सहभाग:

मित्रांनो, इंग्रज अधिकारी सोंडर्स याच्या हत्येमध्ये देखील सुखदेव यांचा संबंध होता. याचे कारण असे की लाला लजपतराय यांचा इंग्रजांच्या अत्याचार मध्ये मृत्यू झाला होता. त्याचा बदला घेण्यासाठी भगतसिंग व सुखदेव यांनी राजगुरूंना सोबत घेऊन या गोष्टीचा बदला घेण्याचे ठरविले, आणि एक योजना आखली.

खरे तर त्यांना सोंडर्स ऐवजी स्कॉट या अधिकाऱ्याला मारायचे होते, मात्र दिनांक १८ डिसेंबर १९२८ च्या या योजनेनुसार ही गोळी चुकून सोंडर्सला लागली. या घटनेमध्ये भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू सह चंद्रशेखर आजाद देखील सहभागी होते. त्यामुळे पोलिसांनी या सर्वांची धरपकड सुरू केली.

सुखदेव यांचे गांधीजींना पत्र:

मित्रांनो, सुखदेव यांनी तुरुंगामधून गांधीजींना पत्र लिहिले होते की, ज्या राजकीय कैद्यांवर कुठलेही आरोप सिद्ध झाले नाहीत, किंवा त्यांच्यावर हिंसाचाराचा आरोप नसेल तर त्यांची सुटका करण्यासाठी प्रयत्न करा. मात्र गांधीजींनी याकडे दुर्लक्ष केले. सुखदेव यांच्या पत्रामध्ये असे दिसून येते की त्यांचे ध्येय केवळ बोलणारे नाही तर करून दाखवणारे होते.

मात्र शेवटी या तिघांना फाशी ही झालीच. त्यानंतर सुखदेव यांनी लिहिलेले हे पत्र २३ एप्रिल १९३१ या दिवशी यंग इंडिया या वृत्तपत्रामध्ये प्रकाशित करण्यात आले. मात्र त्यावेळी या तिघांनाही फाशी देऊन झालेली होती.

सुखदेव यांना फाशी:

मित्रांनो, लाहोर कटाचा आरोप म्हणून सुखदेव यांना भगतसिंग व राजगुरू यांच्यासोबत २४ मार्च १९३१ या दिवशी फाशी देण्यात येणार होती, मात्र ब्रिटिश सरकारने घाबरून ही तारीख एक दिवस आधी घेतली. त्यांच्या फाशी आधी कुटुंबीयांना देखील भेटू दिले नाही. फाशी दिल्यानंतर त्यांना सतलज नदीकाठी जाळण्यात आले, त्यामुळे संपूर्ण देशातून असंतोषाची लास्ट उसळली.

मित्रांनो, आपल्या अवघ्या २४ वर्षांच्या आयुष्यात सुखदेव यांनी देशासाठी जे बलिदान दिले, त्यासाठी संपूर्ण देश त्यांचा ऋणी असेल. त्यांच्या फाशीच्या दिवसाला अर्थात २३ मार्चला हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो.

निष्कर्ष:

मित्रांनो, अनेक लोकांनी स्वातंत्र्यासाठी आपले बलिदान दिलेले आहे. तेव्हा कुठेतरी आज आपण स्वातंत्र्यात अगदी बिनधास्तपणे फिरू शकत आहोत. या प्रत्येक स्वातंत्र्य सेनानी च्या कार्यामुळे आपल्याला एक चांगले जीवन अनुभवायला मिळाले आहे. मात्र यामागे त्यांनी भोगलेल्या कठीण यातना आणि हालअपेष्टा आहेत, हे आपण विसरता कामा नये. मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण राजगुरू या महान स्वातंत्र्य सैनिका बद्दल माहिती बघितली.

ज्यामध्ये तुम्हाला त्यांच्या जीवनचरित्रासह त्यांचे जन्म, कौटुंबिक माहिती, क्रांतिकारी जीवनाकडे वाटचाल, सायमन कमिशन विरुद्धचे कार्य, सोंडर ची हत्या, लाहोर कट, मध्यवर्ती विधानसभेवर बॉम्ब, अनेक बॉम्बस्फोटांमध्ये त्यांची भूमिका, त्यांना झालेली अटक आणि मिळालेली शिक्षा, त्यांचे तुरुंगातील उपोषण, आणि लाहोर खटला इत्यादी विषयांवर माहिती पाहिली. तसेच काही प्रश्न उत्तरे देखील पाहिली.

FAQ

स्वातंत्र्य सेनानी सुखदेव यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला होता?

स्वतंत्र सेनानी सुखदेव यांचा जन्म १५ मे १९०७ या दिवशी झाला होता.

सुखदेव यांच्या आई वडिलांचे नाव काय होते?

सुखदेव यांच्या आईचे नाव रल्ला देवी थापर तर वडिलांचे नाव रामलाल थापर  होते.

सुखदेव यांनी कोणत्या राजकीय चळवळीमध्ये सहभाग नोंदविला होता?

सुखदेव यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळ या राजकीय चळवळीमध्ये आपला सहभाग नोंदवला होता.

थोर स्वातंत्र्य सेनानी सुखदेव यांना कोणत्या दिवशी फाशी देण्यात आली होती?

थोर स्वातंत्र्य सेनानी सुखदेव यांना त्यांचे आणखी दोन साथीदार भगतसिंग आणि राजगुरू यांच्या समवेत २३ मार्च १९३१ या दिवशी फाशी देण्यात आले होते.

स्वातंत्र्य सेनानी सुखदेव हे कोणत्या क्रांतिकारी असोसिएशनचे सदस्य होते?

स्वतंत्र सेनानी सुखदेव हे हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिक असोसिएशन या असोसिएशनचे सदस्य होते.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण सुखदेव यांची माहिती अर्थात जीवन चरित्र जाणून घेतले. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट मध्ये तुम्ही दर वेळेप्रमाणेच अवश्य कळवा. तसेच तुमच्या काही शंका, प्रश्न, अधिकची माहिती अथवा सूचना असतील तर त्यासाठी देखील कमेंट बॉक्स खुलाच आहे. सोबतच तुमच्या मित्र-मैत्रिणींना ही माहिती शेअर करून त्यांच्या देखील ज्ञानामध्ये आवश्य भर पाडा.

धन्यवाद…

Avatar

i am marathi content writer from last 5 years.

Leave a Comment