सुगरण पक्षाची संपूर्ण माहिती Sugaran Bird Information In Marathi

Sugaran Bird Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो सुगरण पक्षी हा भारतीय पक्षी सृष्टीचा एक महत्त्वाचा पक्षी आहे. मुख्यत्वे पिवळ्या रंगाचा आणि काही परिस्थितीमध्ये तपकिरी, लाल, काळा पिसारा असणारा हा पक्षी त्याच्या घरटे बांधण्याचा पद्धतीसाठी सुप्रसिद्ध आहे.

Sugaran Bird Information In Marathi

सुगरण पक्षाची संपूर्ण माहिती Sugaran Bird Information In Marathi

हा पक्षी घुमटाच्या आकाराचे घरटे बनवितो. या घरट्यामधील कौशल्य बाब म्हणजे त्यासाठी लांबच लांब असे बोगद्या स्वरूप दार बनविले जाते. मात्र या दारातून दोन दरवाजे उघडतात, त्यातून समोरच दिसणारे दार हे फसवे दार असते. जेणेकरून कुठल्याही शत्रुनी आपल्या पिल्लांवर चाल करू नये असा उद्देश असतो.

सुगरण हा पक्षी मुख्यत्वे करून शाकाहारी असतो, तो विविध बियाणे, शेतातील पिके, त्यांच्या बिया, किंवा गवताच्या बिया यांवर आपली उपजीविका करतो. मात्र काही वेळेस तो लहान लहान कीटक आणि अळ्या देखील खातो. सुगरण हा पक्षी एक समाजशील पक्षी असून, तो नेहमी सर्वांसोबत मिळून एकत्र घरटी बांधतो.

आजच्या भागामध्ये आपण सुगरण या पक्षाविषयी इत्यंभूत माहिती बघणार आहोत…

नावसुगरण पक्षी
इतर नावविणकर पक्षी
शास्त्रीय नावप्लॉ बेघ्यालेन्सिस
साधारण लांबी१४ ते १५ से. मी.
साधारण वस्तुमानकेवळ २५ ते ३० ग्राम
पिसाऱ्याचा रंगमुख्यत्वे पिवळसर, मात्र काहीवेळा काळसर तापकीरी किंवा पांढरा
आयुष्यमानजवळपास ५ वर्षे

सुगरण पक्षाचे वितरण:

मित्रांनो, सुगरण पक्षी हा  आशिया खंडामध्ये मोठ्या प्रमाणावर विस्तारलेला आहे. मात्र आफ्रिकेमध्ये सुद्धा त्याचा काही प्रजाती आढळून येतात. अमेरिकेच्या अगदी दक्षिणेपासून सहारा वाळवंट पर्यंत हा पक्षी आढळून येतो.

सुगरण पक्षाचे राहण्याचे ठिकाण किंवा अधिवास:

मित्रांनो, सुगरण पक्षी हा विविध पर्यावरणीय स्थितीमध्ये राहण्यास तयार झालेला आहे. अगदी आफ्रिकेतील रखरखित वाळवंटात, तसेच थंड गवताळ प्रदेशात देखील हा पक्षी आढळून येतो. काही ठिकाणी तर डोंगराळ भाग आणि जंगलाच्या ठिकाणी देखील या सुगरण पक्षाचे निवासस्थान असते.

या पक्षाच्या निवासस्थानामध्ये गवताळ प्रदेश, दलदलीचा प्रदेश, पाणथळ प्रदेश, कुरणांची ठिकाणे, जंगले, खारफुटी वने, तलावाचे काठ किंवा नदी ओढ्यांचे काठ इत्यादी ठिकाणांचा समावेश होतो.

सुगरण पक्षाच्या खानपानाच्या सवयी:

मित्रांनो, सुगरण हा पक्षी त्याच्या प्रजातीनुसार वेगवेगळे आहार घेतो. मुख्यत्वे करून शाकाहारी असणारा हा प्राणी, विविध धान्याच्या बिया शेतातील पिके, किंवा गवत आणि गवतांचे बिया इत्यादी पदार्थांवर आपली उपजीविका करत असला, तरी देखील पाठीचा कणा नसलेले लहान लहान कीटक, टोळ, डास, कोळी, आणि विविध अळ्या इत्यादींचे भक्षण करतो.

सुगरण पक्षाचे घरटे बनवण्याची पद्धत:

मित्रांनो, सुगरणीचे घरटे हे अतिशय लोकप्रिय पावलेली गोष्ट आहे. सुगरणी आपले घरटे नेहमी उंच झाडावर बांधतात. शक्यतो हे घरटे आकाराने घुमटा सारखे आणि दंडगोलाकार प्रवेशस्थान असलेले असतात. हे घरटे बनविताना सुगरण पक्षी आसपास पाण्याचा स्त्रोत असल्याचे खात्री करून घेतात.

सुगरण आपले घरटे बनवताना त्याचे दरवाजे हे दोन बनवत असते, यातील एक दरवाजा हा सरळ सरळ दिसत असला तरी देखील तो फसवा असतो, आणि त्याच्या पाठीमागे एक कोणालाही दिसू शकणार नाही असा मुख्य दरवाजा असतो. यातील प्रवेशीय स्थान हे अतिशय निमुळते, आणि लांब ठेवण्यात येते. जेणेकरून कुठल्याही शत्रूची चाल होऊ नये.

घरटे कोठे बनवायचे ही जागा निश्चित झाली की सुगरण पक्षी गवताचे विविध धागे आणि पाने आणून हे घरटे विणायला सुरुवात करते. हळूहळू घुमट तयार केल्यानंतर सुगरण पक्षी या घरट्यासाठी प्रवेशद्वार बनवायला घेते. जे नळीच्या आकाराचे असते. यातून एकावेळी एकच पक्षी आत जाऊ शकतो, किंवा येऊ शकतो.

सुगरण पक्षाचे आयुष्यमान:

मित्रांनो, अतिशय गुणाचा असणारा हा पक्षी म्हणजे सुगरण. तो किती वर्ष जगतो हे तुम्हाला माहित आहे का?, मित्रांनो गावामध्ये राहणारा आणि जंगलात राहणारा सुगरण पक्षी यांच्यातील आयुष्यमान हे वेगवेगळे असते. साधारणपणे जंगलात राहणारा सुगरण पक्षी दहा ते पंधरा वर्षे; तर गावात राहणारा सुगरण पक्षी पाच ते सात वर्ष जगतो. त्यातूनही बंदिस्त केलेला सुगरण पक्षी सुमारे २४ वर्षांपर्यंत सुद्धा जगू शकतो. असे असले तरी देखील या सर्वांची सरासरी लक्षात घेता सुगरण पक्षाचे आयुष्य हे पाच वर्षे इतके आहे असे सांगितले जाते.

जंगलातील सुगरण पक्षाचे आयुष्यमान काढण्यासाठी पक्षांना पकडून त्यांना निशान लावले जाते, त्यानंतर काही कालावधी गेला की त्यातील किती पक्षी जिवंत सापडतात आणि किती मृत सापडतात यावरून हे आयुष्यमान निश्चित केले जाते.

सुगरण पक्षाविषयी काही मनोरंजक तथ्ये:

मित्रांनो, सुगरण पक्षांमधील केवळ नर घरटे बांधण्यासाठी सक्षम असतात. मादी, आपल्या पिल्लांची योग्य काळजी घेऊ शकेल आणि आपल्यासाठी चांगले घरटे बनवू शकेल अशा नराची जोडीदार म्हणून निवड करत असतात.

सर्व पक्षांपैकी फक्त सुगरण हाच असा एक पक्षी आहे, जो मानवाप्रमाणे धाग्याची गाठ बांधू शकतो. सुगरण हा पक्षी घरटे बनवताना इतके मऊ बनवतो की, इतर पक्षांप्रमाणे त्यांना आतल्या बाजूने कुठलेही आच्छादन टाकण्याची गरज भासत नाही.

सुगरण पक्षी हिवाळ्यामध्ये आपले प्रजनन करत नाहीत. जगभरामध्ये सुगरण या पक्षाच्या वेगवेगळ्या सुमारे ६४ प्रजाती आढळून येतात. यामध्ये आशियातील पाच, मादागास्कर मधील दोन प्रजातींचा आणि इतर सहारा या आफ्रिकन वाळवंटातील प्रजातींचा समावेश होतो.

सुगरण पक्षी आपल्या आरामासाठी घरटे न बनवता केवळ प्रजननासाठी घरटे बनवत असतात. प्रजनन झाल्यानंतर घरट्याचे काम संपले की शक्यतो सुगरण पक्षी हे घरटे सोडून जात असतो.

निष्कर्ष:

मित्रांनो, सुगरण पक्षी भारतातील एक गूढ पक्षी म्हणून देखील ओळखला जातो. याची घरटे बनवण्याची यंत्रणा आणि कौशल्य अतिशय वाखाणण्याजोगे असते. हा पक्षी आपल्या पिलांची इतकी काळजी घेतो की, पिलांवर कोणीही आक्रमण करू नये, म्हणून आपल्या घरट्याची रचना अशा पद्धतीने करतो की, येणारा कुठलाही शत्रू दुसऱ्या वाटेने जाईल. आणि घरट्याचे मुख्य दार मात्र त्याच्या निदर्शनास पडणार नाही. आणि पिल्ले वाचली जातील.

मित्रांनो कुठल्याही पक्षाकडून मानवाने घेण्यासारखे खूप काही गुण आहेत, त्यातील सुगरण या पक्षाकडून घेण्याचा गुण म्हणजे त्याची असामान्य अशी इंजिनिअरिंग आणि घरटे बनवण्याआधी केलेला संपूर्ण विचार होय. मानवाने देखील कुठल्याही इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्याआधी असा संपूर्ण विचार केला, तर पुढे जाऊन तोटा होण्याची शक्यता कमी होईल. आजच्या भागामध्ये आपण या सुगरण पक्षाविषयी माहिती पाहिली.

FAQ

सुगरण पक्षाला आणखी कुठल्या नावाने ओळखले जाते?

सुगरण पक्षाला आणखी विणकर या नावाने ओळखले जाते.

सुगरण पक्षाचे आकारमान आणि वस्तुमान अंदाजे किती असते?

सुगरण पक्षाचे साधारण आकारमान १४ ते १५ सेंटीमीटर आणि वस्तुमान हे २५ ते ३० ग्रॅम इतके असते.

सुगरण पक्षी साधारणपणे किती वर्षे जगतो?

सुगरण पक्षी साधारणपणे पाच वर्षांपर्यंत जगतो.

सुगरण पक्षाला विणकर पक्षी असे नाव का देण्यात आलेले आहे?

सुगरण पक्षाला विणकर पक्षी असे नाव देण्यामागे त्याचे घरटे बनविण्याच्या कौशल्य आहे.

जगभरात सुगरण पक्षाच्या अंदाजे किती प्रजाती आढळून येतात?

जगभरात सुगरण पक्षाच्या सुमारे ६४ वेगवेगळ्या प्रजाती आढळून येतात.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण एक असामान्य इंजिनिअरिंग कौशल्य असणाऱ्या पक्षाबद्दल अर्थात सुगरण पक्षाबद्दल माहिती पहिली. या सुगरण पक्षाकडून आपण काय शिकलात हे आम्हाला कमेंट मध्ये वाचायला नक्की आवडेल. तसेच तुमच्या इतरही मित्र-मैत्रिणींना या माहितीचा लाभ घेता यावा म्हणून त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवणे तुमची जबाबदारी आहे.

धन्यवाद…

Avatar

i am marathi content writer from last 5 years.

Leave a Comment