सुभाषचंद्र बोस यांची संपूर्ण माहिती Subhash Chandra Bose Information In Marathi

Subhash Chandra Bose Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो भारतातील सर्वात प्रसिद्ध असणाऱ्या काही स्वातंत्र्य सैनिकांपैकी एक असणारे म्हणजे सुभाष चंद्र बोस. यांना सुभाष बाबू म्हणून देखील ओळखले जाते. ते एक अतिशय प्रभावशाली युवा नेतृत्व होते. त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात हिरीरीने भाग घेऊन भारतीय राष्ट्रीय सैन्य अर्थात आय एन ए सारख्या संस्थेची स्थापना करून भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले होते. त्यांच्या स्वातंत्र्यासाठीच्या महान कार्यामुळे त्यांना नेताजी हा बहुमान दिला गेला होता.

Subhash Chandra Bose Information In Marathi

सुभाषचंद्र बोस यांची संपूर्ण माहिती Subhash Chandra Bose Information In Marathi

सुरुवातीला त्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला, मात्र तेथे त्यांचे वैचारिक मतभेद झाले, परिणामी त्यांना पक्ष सोडावा लागला. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी त्यांनी ब्रिटिशांना नमवीण्यासाठी जर्मनीमध्ये जाऊन नाझी चे सहकार्य घेतले, तसेच जपानच्या इम्पेरियल आर्मी यांची देखील मदत मागितली. ते १९४५ च्या दरम्यान भारतातून गायब झाले, आणि त्यानंतर अनेक वेळा त्यांचे अस्तित्व असल्याचे देखील सिद्ध झाले.

आजच्या भागामध्ये आपण नेताजी हा बहुमान मिळवणाऱ्या सुभाषचंद्र बोस अर्थात सुभाष बाबू यांच्या विषयी माहिती बघणार आहोत…

नावसुभाषचंद्र बोस
पदवीनेताजी
जन्म दिनांक२३ जानेवारी १८९७
जन्मस्थळओरिसा राज्यातील कटक
कुटुंबातील सदस्यजानकिनाथ बोस (वडील), प्रभावती देवी (आई), एमिली शेंकल (पत्नी), अनिता बोस (मुलगी)
शिक्षणi) बारावीचे शिक्षण कटक येथील रेनशॉ कॉलेजीएट स्कुल, ii) तत्वज्ञानाचा अभ्यास, कलकत्ता च्या प्रेसिडेन्सी कॉलेज मध्ये, iii) केम्ब्रिज विद्यापीठ, इंग्लड
विचारधारासाम्यवादी व राष्ट्रवादी विचारसरणी
निधन१८ ऑगस्ट १९४५

मित्रांनो २३ जानेवारी १८९७ या दिवशी ओडिसा राज्यातील कटक या ठिकाणी, श्रीमती प्रभावती देवी आणि जानकीनाथ बोस या दांपत्याच्या पोटी सुभाष चंद्र बोस यांचा जन्म झाला. त्यांच्या आई-वडिलांना एकूण १४ मुले होती, ज्यापैकी सुभाष चंद्र बोस हे नवव्या क्रमांकाचे होते. सुभाषचंद्र बोस यांचे वडील तत्कालीन प्रसिद्ध वकील होते. ज्यांनी सरकारी वकील म्हणून देखील काम पाहिलेले होते. त्यामुळे घरामध्ये लहानपणापासूनच शिस्त होती, म्हणूनच सुभाष चंद्र बोस देखील अतिशय शिस्तप्रिय बनले होते.

काही काळ खाजगी प्रॅक्टिस केल्यानंतर त्यांच्या वडिलांनी कटक महानगरपालिका येथे देखील काम केले. आणि पुढे जाऊन ते बंगालच्या विधानसभेचे सदस्य देखील झाले. इंग्रजांकडून रायबहादूर ही पदवी मिळवलेले जानकीनाथ बोस यांच्याकडून सुभाष चंद्र बोस यांना देशभक्तीचा वारसा मिळाला. आणि ते देशसेवेमध्ये सक्रियपणे सहभागी झाले.

सुभाष चंद्र बोस यांचे शैक्षणिक जीवन:

मित्रांनो, कुठलाही व्यक्ती त्याच्या शिक्षणाने प्रगल्भ होत असतो. सुभाषचंद्र बोस हे अतिशय धाडसी आणि शाळेमध्ये देखील हुशार व्यक्तिमत्व होते. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण हे एका युरोपियन शाळेत घेतले. सुभाष चंद्र बोस यांचे वाचन अतिशय प्रचंड होते, त्यामुळे त्यांचे विचार देखील खूपच प्रगल्भ बनले होते.

त्यांच्यावर स्वामी विवेकानंदांनी लिहिलेल्या पुस्तकांचा आणि श्रीमद्भगवद्गीतांचा खूपच प्रभाव पडला होता. तसेच एक व्यक्ती म्हणून त्यांच्या शाळेचे मुख्याध्यापक असणारे बेनि माधव दास यांचा देखीलच त्यांच्यावर मोठा प्रभाव होता.

सुभाष चंद्र बोस हे त्यावेळी मॅट्रिक परीक्षेमध्ये दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते, यावरून त्यांची हुशारी लक्षात येते. सुभाष चंद्र बोस जे कोणते काम हाती घेत त्यामध्ये पूर्ण समर्पण देत असत, त्यामुळे ते प्रत्येक कार्यात यशस्वी होत असत.

प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये असताना १९११ यावर्षी व्याख्यान दरम्यान व्याख्याता आणि मुले यांच्यामध्ये संघर्ष झाला. त्यावेळी सुभाष चंद्र बोस यांनी विद्यार्थ्यांची पाठराखण केली होती, त्यामुळे त्यांच्यासह या विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकण्यात आले होते. सुभाष चंद्र बोस यांनी १९१८ या वर्षी कलकत्ताच्या स्कॉटिश कॉलेजमधून बीए तत्त्वज्ञान ही परीक्षा पूर्ण केली होती.

सुभाष चंद्र बोस यांनी भारतीय नागरी सेवा ही परीक्षा चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण केली होती. त्यांना इच्छा नसताना देखील त्यांच्या वडिलांच्या आग्रहाखातीर त्यांनी ही नोकरी स्वीकारली, मात्र ते काही काळानंतरच या नोकरीला रामराम करून देशसेवेस लागले.

नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा राजकीय क्षेत्रामध्ये प्रवेश:

मित्रांनो, नेताजी सुभाषचंद्र बोस यांना १९२७ मध्ये तुरुंगातून सोडण्यात आले, त्यावेळी त्यांनी लोकांना संघटित करून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. त्यांना काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस म्हणून देखील निवडण्यात आले होते. आणि तिथून त्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभाग नोंदवला.

सुभाष चंद्र बोस यांचे व्यक्तिमत्व लोकांना भुरळ घालणारे होते, त्यांचा लोकांवर इतका प्रभाव होता की त्यांची कलकत्त्याच्या महापौरपदी सुद्धा निवड झालेली होती. त्यांनी संपूर्ण युरोप प्रवास करून आपल्या पायदळी तुडवला होता. यादरम्यान त्यांनी जगभरातील अनेक मुसद्दी लोकांची देखील गाठ भेट घेतली होती. त्यातून त्यांच्या ज्ञानामध्ये अतिशय भर पडलेली होती.

फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना:

मित्रांनो, सुभाषचंद्र बोस हे काँग्रेसचे सरचिटणीस होते. त्यानंतर त्यांना काँग्रेसचे अध्यक्षतेपदी सुद्धा निवडण्यात आले होते. मात्र ज्यावेळी १९३९ यावर्षी त्रिपुरामध्ये काँग्रेसचे वार्षिक अधिवेशन भरवण्यात आले होते, तेथे आजारपणाच्या कारणास्तव नेताजी सुभाषचंद्र बोस अनुपस्थित होते.

त्यामुळे त्यांना काँग्रेसचे अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला. ती तारीख होती २९ एप्रिल १९३९. त्यानंतर अवघ्या काही दिवसात म्हणजेच २२ जून १९३९ या दिवशी त्यांनी आपला स्वतःचा स्वतंत्र असा फॉरवर्ड ब्लॉक नावाचा पक्ष स्थापन केला, आणि त्याच्या माध्यमातून राजकीय कारकीर्द सुरू ठेवली.

निष्कर्ष:

मित्रांनो, आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेक शूरवीरांनी प्रयत्न केले, काहींनी अहिंसेच्या मार्गाने तर काहींनी क्रांतीच्या मार्गाने. त्यातीलच एक शूरवीर स्वातंत्र्य सेनानी म्हणजे सुभाषचंद्र बोस होय. सुभाष चंद्र बोस म्हणजे असे व्यक्तिमत्व ज्यांनी केवळ स्वतःच्या इच्छाशक्तीच्या जोरावर भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रयत्न केले, त्यांनी आपली स्वतःची देखील एक संघटना स्थापन केली.

भारतामध्ये काँग्रेस सोबत वैचारिक मतभेद झाल्यामुळे त्यांनी तेथून बाहेर पडण्याची ठरविले, अगदी परदेशात जाऊन जर्मनी व जपान सारख्या देशांकडे त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी मदतीची मागणी केली. या देशाने देखील सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्या व्यक्तिमत्वाला मदत केली, ज्यामुळे भारताला स्वातंत्र्य मिळवण्यात  बराच फायदा झाला.

भारताला मिळालेले जावा व सुमित्रा बेट (ज्यांची नावे आज भारताने बदलली आहेत) देखील सुभाषचंद्र बोस यांचीच कृपा म्हणावी लागेल. अशा या सुभाष चंद्र बोस यांच्या बद्दल आज आपण माहिती बघितलेली आहे.

FAQ

नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दिलेली सुप्रसिद्ध घोषणा कोणती होती?

नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी दिलेली सुप्रसिद्ध घोषणा “तूम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूंगा” ही होती.

सुभाष चंद्र बोस यांनी कोणत्या संघटनेमध्ये प्रवेश केला होता?

सुभाषचंद्र बोस यांनी इसवी सन १९४३ यावर्षी इंडियन नॅशनल आर्मी या संघटनेमध्ये प्रवेश केला होता.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे प्रेरणास्थान काय होते?

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे प्रेरणास्थान श्रीमद्भगवद्गीता हे होते.

नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या बद्दल थोडक्यात काय सांगता येईल?

नेताजी सुभाष चंद्र बोस हे राष्ट्रीय काँग्रेसचे नेते होते, तसेच त्यांनी असहकार चळवळ आणि समाजवादी चळवळीमध्ये देखील भाग घेतला होता.

नेताजी सुभाष चंद्र बोस यांची विचारसरणी जहाल प्रकारची होती की मवाळ प्रकारची होती?

नेताजी सुभाषचंद्र बोस यांची विचारसरणी मवाळ प्रकारची नसून जहाल प्रकारची होती.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण नेताजी ही पदवी धारण करणारे सुभाष चंद्र बोस यांच्या विषयी माहिती पाहिली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून कळवा, आणि सोबतच तुमच्या इतरही मित्र-मैत्रिणींना ही माहिती शेअर करा.

धन्यवाद…

Avatar

i am marathi content writer from last 5 years.

Leave a Comment