पालकची संपूर्ण माहिती Spinach Information In Marathi

Spinach Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो हल्लीच्या कालावधीमध्ये दवाखान्याची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. मात्र असे असून देखील दवाखान्यांमध्ये गर्दी ओसरताना दिसत नाही. याचे कारण म्हणजे बदलत्या जीवनशैलीमुळे आणि प्रत्येकाच्या धावपळीच्या आयुष्यामुळे खाण्यापिण्याच्या सवयी बदलत चाललेले आहेत. आणि त्यामुळेच शरीराला आवश्यक असणाऱ्या घटकांची कमतरता पडत चालली आहे. परिणामी आजार आणि रोग मागे लागलेली आहेत. आज फार तर फार एक महिना झाला की घरातील कोण न कोणीतरी आजारी पडतेच. त्यामुळे आरोग्यदायी खाणे खूप महत्त्वाचे झालेले आहे. हेल्थ कोंशियस लोक तर चांगल्या प्रतीचे अन्न खाण्यास प्राधान्य देतात.

Spinach Information In Marathi

पालकची संपूर्ण माहिती Spinach Information In Marathi

शहरी जीवनशैलीमुळे पालेभाज्या मागे पडत चाललेल्या आहेत. त्यामुळे पालेभाज्यातून मिळणारी जीवनसत्वे आणि खनिजे पुरेश्या या प्रमाणात शरीराला मिळत नाहीत. यातीलच एक महत्त्वाची पालेभाजी म्हणजे पालक. पालक ही शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची एक चांगली तरकीब आहे. ज्या व्यक्तींना अगदी थोडेसे हवामान बदल झाले तरी सर्दी, खोकला, ताप सुरू होतो, त्यांच्यासाठी तर पालक अतिशय उपयुक्त आहे. तसेच रक्त कमी पडणे, हिमोग्लोबिनची पातळी खालावणे, किंवा अनिमिया यांसारख्या परिस्थितीमध्ये आवर्जून पालक खाण्याचा सल्ला दिला जातो.

 मित्रांनो ऍलोपॅथी औषध उपचारांमध्ये पैसा खर्च करून आजारपण घेण्यापेक्षा चांगला सकस आहार आणि पालेभाज्यांचा समावेश आहारात केला की पुष्कळ झाले.

आजच्या भागामध्ये आपण स्पिनाच अर्थात पालक याबद्दल माहिती बघणार आहोत…

मित्रांनो, चांगली माहिती ही फार थोड्या लोकांकडे असते असे नेहमी म्हटले जाते, आणि ते खरे देखील आहे. आपल्याकडे ‘एक सफरचंद तुम्हाला डॉक्टर पासून दूर ठेवेल’ ही म्हण फार मोठ्या प्रमाणावर प्रचलित आहे. मात्र सफरचंद या फळापेक्षाही जास्त गुणकारी असणारा पदार्थ म्हणजे पालक होय. पालक ही वैद्यकीय दृष्ट्या खूप महत्त्वाची आणि बहुगुणी आहे.

पालक ही महाराष्ट्र मध्ये मोठ्या प्रमाणावर उगवली जाणारी पालेभाजी असून, यामध्ये अनेक पोषक तत्वांची रेलचेल असते. म्हणूनच तिला सुपरफुड म्हणूनही ओळखले जाते. या पालकचे शास्त्रीय नाव Spinacia oleracea असे आहे, तर इंग्रजीमध्ये तिला स्पिनाच म्हणून ओळखले जाते.

एक वनस्पती म्हणून पालक:

मित्रांनो, आपण पालक ही पालेभाजी म्हणून ओळखत असलो, तरीदेखील ती एक वनस्पती सुद्धा आहे. पालकच्या लागवडीसाठी थंड हवामान अतिशय योग्य समजले जाते. आणि याच कारणामुळे हिवाळ्यामध्ये पालक उगवली जाते. ती दाट गडद हिरव्या पानांच्या स्वरूपात उगवते. तिची पाने आकाराने काहीशी त्रिकोणी, जाडसर आणि स्पार्षाला गुळगुळीत अशी असतात. या पानांमध्ये मोठ्या प्रमाणावर क्लोरोफिल साठवलेले असते, त्यामुळे ती रंगाने अतिशय गडद दिसतात.

सोबतच यामध्ये विविध प्रकारची जीवनसत्वे आणि खनिजे असल्यामुळे तिचा वास थोडासा मातकट येतो, मात्र चांगल्या पद्धतीने शिजवल्यास चवीला अतिशय उत्तम असते. पान हे मध्यभागी मोठ्या प्रमाणावर मांसल असते, त्यामुळे त्यामध्ये पाण्याचे प्रमाण देखील खूप असते. पालखी हिरवी पालेभाजी म्हणून खाल्ली जात असली, तरी देखील काही ठिकाणी पालक वाळवून वर्षभर देखील वापरली जाते.

पालक आणि आरोग्यासाठीचे फायदे:

मित्रांनो, आपण संपूर्ण लेखांमध्ये पालक ही वैद्यकीय दृष्ट्या खूप महत्त्वाची आणि चांगली असल्याची गोडवे गायले आहेत. मात्र कशा रीतीने ते आरोग्यास फायदेशीर ठरते, ते आता बघुयात…

भाज्यांचा राजा म्हणून ओळखली जाणारी ही पालक भारतासह संपूर्ण आशिया खंडात मोठ्या प्रमाणावर उगवली जाते. यामध्ये ॲनिमिया, लठ्ठपणा, बद्धकोष्ठता, उच्च रक्तदाब, हृदयाची ठोके, आंधळेपणा, यकृताचे आजार, मानसिक वाढ, मेंदूची वाढ, कर्करोग विरोधी गुणधर्म, पाठदुखी इत्यादी प्रकारच्या रोगांमध्ये आणि आजारांमध्ये लढण्याची ताकद आहे. सर्वात जास्त महत्त्वाचे म्हणजे ज्या लोकांना ॲनिमिया किंवा रक्त कमी पडण्याची समस्या असेल त्यांच्यासाठी डॉक्टर पालक रोज खाण्याचा सल्ला देतात.

पालक खाण्याच्या पद्धती:

मित्रांनो, पालक ही पालेभाजी असल्यामुळे प्रत्येक ठिकाणानुसार पालक बनविण्याच्या पद्धती या बदलतात. मात्र या ठिकाणी आपण सर्वत्र सर्वसाधारणपणे वापरले जाणाऱ्या पद्धती बद्दल जाणून घेऊयात…

पालक शिजवून आणि पळीच्या साह्याने कढईमध्येच बारीक करून त्याला जिरे, मोहरी, लसूण इत्यादीने फोडणी देऊन पातळ भाजी बनवली जाते, जी चवीला अतिशय उत्कृष्ट लागते. काही ठिकाणी पालक हिरव्या कोशिंबीर मध्ये देखील चिरून घातली जाते. मात्र थोड्याशा मातकट चवीमुळे हा प्रकार फारसा कुठे आढळून येत नाही.

आजारी माणसांसाठी पालकाच्या कच्च्या पानाचा ज्यूस बनवून पिला जातो. काही ठिकाणी मसुराची डाळ आणि पालकाची भाजी एकत्र शिजवून त्याला भात अथवा चपाती किंवा भाकरी सोबत खाल्ले जाते. पालक घालून केलेली भजी आणि पराठे खूप प्रचलित असून, लहान मुलांना देखील या पद्धतीने पालक खायला फार आवडते.

आजकाल लहान मुले पालेभाज्या खायच्या म्हंटल्या की नाक मुरडतात, त्यांना आरोग्यदायी आणि चवीलाही चांगले असे पदार्थ द्यायचे झाल्यास तुम्ही पालक पनीरचा पर्याय निवडू शकता. ज्यामध्ये पालक आणि पनीर या दोघांचेही आरोग्यदायी गुणधर्म त्यांना मिळतात. शिवाय काहीतरी नाविन्यपूर्ण पदार्थ खायला मिळाल्यामुळे मुले देखील पोटभर जेवतात.

आजारी माणसासाठी पालक खाण्याचे योग्य प्रमाण आणि वेळ:

मित्रांनो, आजारी असले तरी देखील अति प्रमाणात पालक सेवन करणे देखील चांगले नसते. एक दिवसभरात शिजवलेली अर्धा कप किंवा कच्ची एक कप पालक एका व्यक्तीसाठी पुरेशी ठरते. मात्र पोषण तज्ञांचा सल्ला घेऊन, आपल्या आरोग्यानुसार योग्य ते प्रमाण ठरवावे.

मित्रांनो, दिवसभरात केव्हाही पालक खाल्ला तरी चालू शकतो, त्याचे काही बंधन नाही. मात्र पालकाच्या पानांचा रस सेवन करायचे असल्यास सकाळची वेळ उत्तम समजली जाते.

निष्कर्ष:

मित्रांनो, सुरुवातीलाच पाहिल्याप्रमाणे आजाराचे प्रमाण वाढत चालले आहे. आणि त्याचबरोबर ऍलोपॅथिक औषधांचा शरीरावर होणारा भडीमार देखील वाढत चाललेला आहे. ही औषधी अल्पकाळ आजारास बरे करत असले, तरी देखील दीर्घकाळासाठी अशी औषधे घेणे खूपच धोकादायक ठरते. त्यामुळे आजार होत नाही आणि अशा गोळ्या औषधे घ्यावे लागूच नये यासाठी आहारामध्ये योग्य घटकांचा समावेश केला पाहिजे.

पालक हा असा घटक आहे यामध्ये तुम्हाला शरीरास आवश्यक असणाऱ्या घटकांपैकी बऱ्याच घटकांची पूर्तता करण्याची शक्ती आहे. या पालकमध्ये तुम्हाला सर्व प्रकारची जीवनसत्त्वे तर बघायला मिळतीलच, शिवाय विविध खनिजांनी देखील ही पालक समृद्ध असते. आजारी माणसाला आणि नुकतीच बाळंतीण झालेल्या स्त्रीला देखील पालक आवर्जून खायला देतात.

FAQ

पालक कोणत्या हंगामामध्ये उगवली जाते?

पालक या पिकाला थंड हवामान उपयुक्त असल्यामुळे, थंडीमध्ये अर्थातच रब्बीच्या हंगामात पालक पिकविली जाते.

पालक या पिकाच्या सर्वात जास्त लोकप्रिय असणाऱ्या जाती कोणत्या?

पालक या पिकांमध्ये जॉबनर ग्रीन, पुसा ग्रीन, ऑल ग्रीन, पंजाब ग्रीन, पंजाब सिलेक्शन, आणि अर्का अनुपमा इत्यादी सर्वाधिक लोकप्रिय जाती आहेत.

पालक या पिकांमध्ये कोणकोणती जीवनसत्वे आढळतात?

पालक या पिकांमध्ये जीवनसत्व ए, बी कॉम्प्लेक्स, आणि सी आढळतात.

कोणत्या आजारावर पालक सर्वात जास्त गुणकारी समजली जाते?

ॲनिमिया, अर्थात रक्तासंदर्भातल्या आजारांवर पालक सर्वात जास्त गुणकारी आहे.

पालक या पालेभाजीमुळे रक्त आणि हृदयाचे ठोके नियंत्रणात ठेवले जाऊ शकतात का?

होय, नक्कीच पालक रक्त नियंत्रण आणि हृदयाचे ठोके नियंत्रण यामध्ये खूप गुणकारी आहे.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण आरोग्याच्या दृष्टीने सर्वगुणसंपन्न असणाऱ्या पालक या पालेभाजी विषयी माहिती पाहिली. ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली तर असेलच, मात्र तेवढीच महत्त्वपूर्ण असणारी ही माहिती तुम्ही तुमच्या आरोग्याच्या सतत तक्रारी असणाऱ्या मित्राला शेअर कराल यात मात्र शंका नाही. सोबतच या माहितीबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया देण्यास मात्र बिलकुल विसरू नका.

धन्यवाद…

Vaishnavi Raut

वैष्णवी राउत (Vaishnavi Raut) हि एक content writer असून यांना पोस्ट लिहिण्याचा ३ वर्षांचा अनुभव आहे. यांचे शिक्षण बी.एसस्सी Agri.झाले असून ती मराठी भाषेत अचूक लेखनाचे कार्य करतात.

Leave a Comment