साप प्राण्याची संपूर्ण माहिती Snake Animal Information In Marathi

Snake Animal Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो साप म्हटलं की थोड्यावेळापुरते का होईना आपल्या छातीत धस्स होते, आणि त्याचे कारण म्हणजे सापांबद्दल असणारी अनामिक भीती होय. मित्रांनो विना हात पायाचे अतिशय लांबच लांब शरीर असणारे सरपटणारे प्राणी म्हणून सापांना ओळखले जाते. जगभरात सापांच्या सुमारे ३४०० पेक्षाही अधिक प्रजाती आढळून येतात. उत्क्रांतीच्या काळामध्ये सरड्याचे सापामध्ये रूपांतर झाले असावे असे काही अभ्यासक सांगतात. मित्रांनो सापाला हातपाय नसले आणि तो सरपटत असला तरी देखील असे विना हात पायाचे सरपटणारे सर्वच प्राणी साप असतीलच असे नाही.

Snake Animal Information In Marathi

साप प्राण्याची संपूर्ण माहिती Snake Animal Information In Marathi

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण सर्वांच्या भीतीचे कारण ठरणाऱ्या मात्र शेतकऱ्यांचा मित्र असणाऱ्या साप या प्राण्याबद्दल माहिती बघणार आहोत. चला तर मग सुरु करूया सापाबद्दलच्या या मनोरंजक माहितीच्या प्रवासाला…

नावसाप
प्रकारप्राणी
विविध प्रकारविषारी साप व बिनविषारी साप
सर्वात भीतीदायक सापइंडियन किंग कोब्रा
संस्कृत नावसर्प
इंग्रजी नावsnake
साधारण आयुष्यमान ९ – १० वर्षे अंदाजे
साधारण गती२९ किलोमीटर प्रति तास
हायर क्लासिफिकेशनऑफीडिया
किंगडमअँनिमालिया
ऑर्डरस्क्वामाटा

सापाचे आकार:

मित्रांनो, संपूर्ण भारत देशामध्ये सापाच्या खूप प्रजाती आढळून येतात. त्यामुळे सापांचे आकार देखील वेगवेगळे बघायला मिळतात. नॅशनल जिओग्राफी या चॅनलच्या माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार सर्वात लहान साप हा धागा आहे. ज्याची लांबी केवळ दहा सेंटिमीटर अर्थात ३.९ इंच इतकीच आहे. ते गांडूळाच्या स्वरूपा सारखे असतात.

तर सर्वात मोठा साप हा अजगर असून त्याची लांबी सुमारे ९ मीटर अर्थात ३० फुटांपर्यंत असते. जीवाश्माबद्दल म्हणायचे झाल्यास टायटॅनोबोहा नावाचे जीवाश्म सर्वात मोठे जीवाश्म असून त्याची लांबी सुमारे १५ मीटर अर्थात ५० फुटापर्यंत होती, आणि कार्बन डेटिंग टेक्नॉलॉजीनुसार काढलेल्या अंदाजाने त्याचे वय ६० दशलक्ष वर्षांपूर्वीचे असावे असा अंदाज बांधला जातो.

सापांच्या अंड्या बद्दल माहिती:

मित्रांनो, साप हा प्राणी अंड्यांच्या माध्यमातून आपल्या पिल्लांना जन्म देतो, हे सर्वांनाच माहिती आहे. मात्र आपल्या पिल्लाच्या अंड्याच्या रक्षणासाठी हे साप कधीही घरटे बांधताना आढळून येत नाहीत. मात्र यामध्ये देखील एक अपवाद आहे. किंग कोब्रा हा सापांमधील असा एक प्रकार आहे जो त्याच्या अंड्यांकरिता घरटे बांधत असतो.

बऱ्यापैकी ७० टक्के साप अंडी घालत असले, तरी देखील उर्वरित ३० टक्के साप हे ओवीपेरस असतात. ते सस्तन प्राण्यांप्रमाणेच आपल्या लहानपिलांना जन्म देतात. शक्यतो या प्रकारचे साप थंड हवामानाच्या प्रदेशात आढळून येतात. कारण थंड  हवामानामध्ये अंडी उबवण्यास अडचणी निर्माण होतात, ते साप पिल्लांना जन्म देणे पसंत करतात.

साप या प्राण्याच्या खानपानाच्या सवयी:

मित्रांनो, साप हे प्राणी मांसाहारी गटात मोडतात. ते विविध प्रकारचे लहान कीटक, उंदीर, बेडूक, यांसारख्या छोट्या छोट्या प्राण्यांना खातात. शक्यतो खाताना हे प्राणी त्या प्राण्याला गिळून पोटातील विषारी आणि विविध पाचकरसांनी पचविण्याचे कार्य करतात. सर्वच प्राणी शिकार करण्याआधी विषाचा वापर करत नसले तरी देखील कोब्रा आणि त्याच्या जवळच्या प्रजातीतील साप शिकार मारण्याकरिता विषाचा वापर करत असतात. काही साप हे पक्षांची अंडी किंवा इतर लहान सापांची अंडी देखील खात असतात.

मित्रांनो, साप हा त्याची संपूर्ण शिकार गिळत असतो, तर अजगरासारखी मोठी प्रजाती आपल्या शिकारींना गुरफटवून गुदमरतात. आणि त्यानंतर संपूर्ण शिकार भक्षण करतात. नॅशनल जिओग्राफी या चॅनलने दिलेल्या माहितीनुसार एक साप त्याच्या आकारापेक्षा सुमारे ७५ ते १०० पट जास्त मोठ्या प्राण्यांना सहजतेने खाऊ शकतो. काही प्रकारच्या सापांनी मगरींना व गायांना देखील खाल्ल्याच्या नोंदी आढळतात. सापांचा जबडा मोठ्या प्रमाणावर विस्तार होऊ शकतो.

सापांचे निवासस्थान किंवा वास्तव्य:

पृथ्वी ग्रहावर जवळजवळ सर्वत्र म्हणजे जंगलात, जमिनीवर, पाण्यात सर्वत्र सापांच अस्तित्व आहे. वेगवेगळ्या ठिकाणानुसार त्यांनी आपल्यामध्ये पर्याप्त बद्दल करत, तेथील वातावरणाला अंगीकारले आहे. मुख्यत्वे साप हे लपायला जागा असलेल्या ठिकाणी अर्थात बोगद्यामध्ये, खडकाच्या खाली, दगडाखाली, किंवा जमिनीच्या भेगांमध्ये राहणे पसंत करतात. थंडीच्या दिवसात बाहेर न निघणारे हे साप उन्हाळ्याच्या दिवसात संध्याकाळच्या वेळेला निवांत जमिनीवर पसरलेले दिसून येतात.

भारतात आढळणाऱ्या पाच विषारी सापांची माहिती:

मित्रांनो, पृथ्वीवर आढळणाऱ्या सर्वच सापांच्या प्रजाती या विषारी नसल्या तरी देखील भारतामध्ये आढळणाऱ्या सर्वात जास्त विषारी असणाऱ्या सापांमध्ये किंग कोब्रा या सापाचा ही समावेश होतो. याचा विषाने ३० मिनिटात माणूस मृत्यूमुखी पडतो. त्याखालोखाल भारतीय क्रेट या सापाचा क्रमांक येतो. या सापाचे विष इतके जहाल असते की ते सुमारे ७० लोकांना देखील एका चाव्यामध्ये यम सदनी पाठवू शकते.

मित्रांनो, त्यानंतर इंडियन कोब्राचा क्रमांक येतो. हा साप दूरवरूनच माणसावर विष फेकू शकतो. या विषाने माणूस जगणे कठीण असते. त्या खालोखाल रसेल वाईपर आणि सॉ स्केल्ड वाईपर या दोन सापांचा क्रमांक लागतो. यांचे वैशिष्ट्य म्हणजे हे साप हल्ला करताना अतिशय वेगाने हल्ला करतात, त्यामुळे मनुष्याला पळून जाण्यासही वाव मिळत नाही.

निष्कर्ष:

मित्रांनो, सापाला प्रत्येकच व्यक्ती घाबरत असतो. कारण सापाच्या चावताच मानवाचा मृत्यू होतो हेच समीकरण प्रत्येकाला पाठ आहे. मात्र अनेक बिनविषारी साप देखील येथे आढळून येतात. साप दिसला की त्याला मारण्याचे प्रकार सर्रास दिसून येतात, मात्र साप हा प्राणी देखील शेतकऱ्यांसाठी मित्र ठरू शकतो. त्यामुळे त्याला न मारण्याचे फायदे देखील आहेत.

आजच्या भागामध्ये आपण याच सापाविषयीची माहिती बघितली. त्यामध्ये तुम्हाला सापाचा साधारण आकार, साप अंडी घालण्याची पद्धती, त्यांचे विविध प्रकारचे खाद्य, साप कोठे राहतात, तसेच विषारी सापांमधील सर्वात जास्त भारतीय पाच विषारी सापांची यादी, यांसारख्या गोष्टीसह सापाबद्दलचे काही तथ्य देखील बघितलेले आहेत.

FAQ

भारतामध्ये आढळणाऱ्या पाच सर्वात विषारी सापांची नावे काय आहेत?

भारतामध्ये आढळून येणाऱ्या पाच सर्वात विषारी सापांच्या यादीमध्ये किंग कोब्रा प्रथम क्रमांकावर येतो. शिवाय त्याबरोबरच भारतीय क्रेट, इंडियन कोब्रा, रसेल वाईपर, आणि सॉ स्कोल्ड वाईपर इत्यादी सापांच्या प्रजातींचा समावेश होतो.

सापाला रडता येते का?

मित्रांनो साप हा अतिशय छोटे डोके असलेला प्राणी आहे. सापाच्या डोळ्याच्या कडांवर असलेले अश्रू सस्तन प्राण्याप्रमाणे बाहेर येऊ शकत नाहीत. अर्थात पापण्यांवरून वाहू शकत नाहीत, त्यामुळे साप रडू शकत नाही.

साप या प्राण्यांमध्ये हाड असते का?

मित्रांनो, सापाची लवचिकता आणि नागमोडी सरपटण्याच्या पद्धतीवरून अनेकांना असे वाटते की सापामध्ये हाड असणार नाही. मात्र तुम्हाला सांगू इच्छितो की सापांच्या शरीरामध्ये मानवापेक्षाही अधिक प्रमाणात हाडे असतात.

सापांमध्ये रक्त असते का?

मित्रांनो, तुम्ही साप मारताना बघितले असेल की सापाला रक्त असते. मात्र त्याचा रंग हा किरीमिजी असतो. सापाच्या शरीराबाहेर रक्त राहून बऱ्याच वेळ वाळले गेले तर त्याचा रंग गडद तपकिरी ते पिवळसर व्हायला लागतो.

सर्वाधिक सापांची संख्या कुठे आढळून येते?

ब्राझील या देशाच्या किनारपट्टी जवळ एक स्नेक आयलँड नावाचे ठिकाण असून येथे सापांची सर्वात जास्त लोक वस्ती आढळते. येथे केवळ एका चौरस मीटर मध्ये सुमारे पाच साप आढळून येतात. म्हणजे तुमच्या घरातील बेडवर सुमारे २० साप आहेत असे समजा.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण साप या प्राण्याबद्दल माहिती पाहिली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते आम्हाला कमेंट मध्ये कळवाच. शिवाय सोबतच सापाविषयीच्या तुमच्या आठवणी किंवा काही गमती जमती असतील तर त्या देखील नक्की लिहून पाठवा. तसेच आपल्या इतरही मित्र-मैत्रिणींना आणि विशेषतः सापाची भीती वाटणाऱ्या लोकांना ही माहिती अवश्य शेअर करा.

धन्यवाद…

Avatar

i am marathi content writer from last 5 years.

Leave a Comment