Sinhagad Fort Information In Marathi आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये भरपूर किल्ले आहेत आणि त्यातील प्रत्येक किल्ला आपल्याला आपल्या पूर्वजांनी केलेल्या पराक्रमाची गाथा सांगत आहे.आजच्या लेखामध्ये आपण अशाच एका ऐतहासिक शिवकालीन किल्ल्याबद्दल म्हणजे सिंहगड किल्ल्या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.चला तर मग आजच्या लेखाद्वारे सिंहगड किल्ल्या विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.
सिंहगड किल्ल्याची संपूर्ण माहिती Sinhagad Fort Information In Marathi
किल्ल्याचे नाव | सिंहगड किल्ला |
जिल्हा | पुणे जिल्हा |
राज्य | महाराष्ट्र |
जमिनीपासून उंची | २,४९० फूट |
समुद्र सपाटी पासून उंची | ४,४०० फूट |
सिंहगड किल्ला Sinhagad Fort in Marathi
आपल्या मराठी लोकांचा इतिहास खूप गौरवपूर्ण आहे.छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सहकारी मावळ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता या मराठी भूमीचे रक्षण केले.या मराठी भूमीचे रक्षण करण्यामध्ये किल्ल्यांची देखील महत्वाची भूमिका होती ,त्याकाळी किल्ल्याच्या मदतीने किल्ल्याच्या आसपास असणाऱ्या प्रदेशावर लक्ष्य ठेवले जात असे.आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये खूप ऐतहासिक किल्ले आहेत ,त्यातील एक ऐतहासिक किल्ला म्हणजे “सिंहगड किल्ला”.
सिंहगड किल्ला हा पुणे जिल्ह्यापासून २५ किलो मीटरच्या अंतरावर आहे.एका रिपोर्ट नुसार असे समजते की सिंहगड किल्ला हा २००० वर्ष जुना आहे.२००० वर्षा पूर्वी या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती.सिंहगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव ” कोंढाणा किल्ला “असे होते आणि परत छत्रपती शिवाजी महाराज यांनी या किल्ल्याचे नामकरण कोंढाणा किल्ला केले. दंत कथांच्या मते प्राचीन काळामध्ये हा किल्लावर कौंडिन्य आणि शृंगी ऋषी यांचे आश्रम होते.
सिंहगड किल्ल्याचा इतिहास History of Sinhagad Fort in Marathi
सिंहगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यातील एक महत्वाचा किल्ला होता .इतिहासकारांच्या मते ह्या किल्ल्याची निर्मिती महाराष्ट्र राज्यातील यादवांनी केली होती.नंतर मुहमद तुग्लक यांच्या काळामध्ये हा किल्ला नागनायक यांच्या अधिकारा खाली होता आणि नंतर मलिक अहमद याने हा किल्ल्यावर आपला ताबा मिळवला.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजी राजे भोसले हे आदिलशहाचे एक सेनापती होते आणि आदिलशहाने त्यांना एक जमीन भेट म्हणून दिली होती.छत्रपती शिवाजी महाराज यांना आदिलशहा आणि मुघल सत्तेपुढे झुकने मान्य नव्हते ,म्हणून त्यांनी मावळ्यांनी घेऊन स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली आणि हळू हळू त्यांनी एक एक किल्ले जिंकायला सुरवात केली.त्याकाळी कोंढाणा किल्यावर सिद्दी अंबर हा राज्य करत होता.छत्रपती शिवाजी महाराज यांनी सिंहगड किल्ला जिंकून तो आपल्या स्वराज्यामध्ये शामील केला.
सिंहगड किल्ल्याचे नामकरण Naming of Sinhagad fort in Marathi
छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्झाराजे जयसिंह यांच्यात झालेल्या करारामध्ये हा कोंढाणा किल्ला १९६५ मध्ये परत मुघल सत्तेकडे गेला.छत्रपती शिवाजी महाराज यांना हा किल्ला परत आपल्या स्वराज्यामध्ये शामिल करायचा होता .हा कोंढाणा किल्ला जिंकण्याची मोहीम छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुभेदार तानाजी मालुसरे यांच्यावर सोपवली.सुभेदार तानाजी मालुसरे यांनी हा किल्ला जिंकला देखील ,परंतु यामध्ये त्यांना स्वतःचा जीव गमवावा लागला.
सुभेदार तानाजी मालुसरे यांचे जेव्हा निधन झाले आहे ,हे छत्रपती शिवाजी महाराज यांना जेव्हा समजले ,तेव्हा त्यांच्या तोंडातून वाक्य निघाले की ,”गड आला पण ,माझा सिंह गेला ” आणि या नंतर छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या आठवणीत या किल्ल्याचे नाव “सिंहगड” ठेवले.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या निधनानंतरचा सिंहगड किल्ल्याचा इतिहास History of Sinhagad Fort after death of Chatrapati Sambhaji Maharaj in Marathi
छत्रपती संभाजी महाराज यांच्या निधनानंतर हा किल्ला परत मुघलांनी जिंकून घेतला आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे निधन ३ मार्च १७०० मध्ये याच सिंहगड किल्ल्यावर झाले.१७०३ मध्ये औरंगजेबाने हा किल्ला जिंकून घेतला आणि परत १७०६ मध्ये हा किल्ला मराठा साम्राज्याने आपल्या ताब्यात केला.या युद्धात पंताजी शिवदेव यांची महत्वाची भूमिका होती.पेशवा काळात २ मार्च १८१८ मध्ये हा किल्ला ब्रिटिश सत्तेने जिंकला.
सिंहगड किल्ल्या जवळ असणारी पर्यटकीय स्थळे Tourist places near Sinhagad Fort in Marathi
१) टिळक बंगला- भारत स्वतंत्र होण्यामध्ये महत्वाची भूमिका असणाऱ्या बाळ गंगाधर टिळक यांचा बंगला सिंहगड किल्यावर स्थित आहे.लोकमान्य टिळक त्यांच्या जिवंतपणी या किल्ल्यावर येत जात असत.१९१५ मध्ये झालेली लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांची बैठक ही याच किल्ल्यावर असणाऱ्या बंगल्यावर झाली होती.
२) कल्याण दरवाजा – सिंहगड किल्ल्याच्या पश्चिम बाजूला हा कल्याण दरवाजा आहे आणि या किल्ल्यावरून कोंढनपुर गावाला जायचा रस्ता याच दरवाज्यापासून जातो.
३) देवटाके – सिंहगडावर असणारी तानाजी मालुसरे यांच्या समाधी जवळ दोन पानाच्या टाक्या आहेत ,त्यांना ” देवटाके” असे नाव देण्यात आले होते.ह्या टाकीतील पाण्याचा वापर पिण्यासाठी केला जातो.
४) उदयभान राठोड याचे स्मारक – सुभेदार तानाजी मालुसरे यांनी उदयभान राठोड यांना हरवूनच सिंहगड किल्ला जिंकला होता.याच उदयभान राठोड यांचे स्मारक देखील या किल्ल्यावर स्थित आहे.
५) छत्रपती राजाराम महाराज समाधी – छत्रपती शिवाजी महाराज यांचे दुसरे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांचे निधन २ मार्च १७०० मध्ये वयाच्या ३० व्या वर्षी याच किल्ल्यावर झाले होते.आजही छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी सिंहगडावर स्थित आहे.
६) सुभेदार तानाजी मालुसरे समाधी – सुभेदार तानाजी मालुसरे यांनी जीवाची आहुती देऊन हा किल्ला मुघलांकडून जिंकला होता.सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या निधनानंतर त्यांची समाधी या सिंहगड किल्ल्यावर बांधण्यात आली होती.आजही सुभेदार तानाजी मालुसरे यांची समाधी सिंहगड किल्ल्यावर आहे.
सिंहगड किल्ल्यावर जाण्याचा मार्ग Best way to Sinhagad Fort in Marathi
सिंहगड किल्ला हा पुणे शहरापासून खूप जवळ आहे ,त्यामुळे तुम्ही पुणे शहरातून कार च्या मदतीने सिंहगडावर जाऊ शकता.पुणे शहरातील स्वारगेट एस्टी स्टँड पासून नियमित अंतरानंतर एस्टी सिंहगडावर जात असतात.
सिंहगड किल्ला संपूर्ण माहिती Sinhagad Fort #MarathiKnowledgeWorld
𝐅𝐫𝐞𝐞 𝐃𝐞𝐦𝐚𝐭 𝐀𝐜𝐜𝐨𝐮𝐧𝐭 http://tinyurl.com/yaxf7bf6 𝐎𝐭𝐡𝐞𝐫 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥𝐬 𝙋𝘿𝙑𝙡𝙤𝙜𝙨 https://youtube....
FAQ
सिंहगड किल्ला हा कोणत्या राज्यात आहे ?
सिंहगड किल्ल्या हा महाराष्ट्र राज्यातील सह्याद्री पर्वत रांगेत वसलेला एक किल्ला आहे.
सिंहगड किल्ला हा कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ?
सिंहगड किल्ला हा महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात स्थित आहे.
सिंहगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते ?
सिंहगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव ” कोंढाणा” होते.
सिंहगड किल्ल्याचे नाव बदलण्यामागे काय कहाणी आहे ?
सुभेदार तानाजी मालुसरे यांनी उदयभान राठोड यांना हरवून कोंढाणा किल्ला स्वराज्यामध्ये शामिल केला होता.परंतु या लढाईत त्यांना वीर गती प्राप्त झाली होती.छत्रपती शिवाजी महाराज यांना जेव्हा सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या निधनाची वार्ता कळली तेव्हा त्यांच्या तोंडून हे शब्द निघाले की ,” गड आला पण ,पण माझा सिंह गेला ” .तेव्हापासून या किल्ल्याला सिंहगड असे नाव पडले.
सिंहगड किल्ल्यावर कोणकोणती पर्यटन स्थळे आहेत ?
सिंहगड किल्ल्यावर सुभेदार तानाजी मालुसरे समाधी ,छत्रपती राजाराम महाराज समाधी , देवटाके ,कल्याण दरवाजा ,इत्यादी पर्यटन स्थळे आहेत.
सिंहगड किल्ला पुणे शहरापासून कित्ती किमी च्या अंतरावर आहे ?
सिंहगड किल्ला हा पुणे शहरापासून २५ किमी च्या अंतरावर आहे.
सिंहगड किल्ल्याची उंची समुद्र सपाटी पासून किती फूट आहे ?
सिंहगड किल्ल्याची उंची समुद्र सपाटी पासून ४,४०० फूट उंच आहे.
सिंहगड किल्ला हा जमिनीपासून किती फूट उंचीवर आहे ?
सिंहगड किल्ला हा जमिनीपासून २४९० फूट उंचीवर आहे.
आजच्या लेखामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील एका महत्वाच्या किल्ल्या विषयी म्हणजे सिंहगड किल्ल्या विषयी संपूर्ण माहिती पाहिली.