सिंधुताई सपकाळ यांची संपूर्ण माहिती Sindhutai Sapkal Information In Marathi

Sindhutai Sapkal Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या थोर समाज सुधारक म्हणून सिंधुताई सपकाळ यांचे नाव अगदी आदराने घेतले जाते. भारतातील अनाथ मुलांचे संगोपन करणे, आणि त्यांची काळजी घेऊन त्यांना मोठे करणे यामध्ये सिंधुताईंचा हातखंडा आहे. सिंधुताईंना इसवी सन २०१६ यावर्षी डी वाय पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च येथून साहित्य क्षेत्रातली पीएचडी ही पदवी मिळालेली आहे.

Sindhutai Sapkal Information In Marathi

सिंधुताई सपकाळ यांची संपूर्ण माहिती Sindhutai Sapkal Information In Marathi

समाज सेवेच्या क्षेत्रामध्ये महान कार्य केलेल्या या सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्कार देखील मिळालेला आहे. त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्यात त्यांनी अनेक अडचणींना तोंड दिलेले आहे, त्यामुळे अनाथांनी तसेच भोग भोगावे लागू नये म्हणून संपूर्ण आयुष्यभर कार्य केलेले आहे.

सामाजिक दृष्टीने महिलांना दुय्यम स्थान मिळत असे, यातून स्वतःची सुटका करून घेत सिंधुताईंनी संपूर्ण महाराष्ट्राचा तारणहार बनवून अनेकांचे जीवन समृद्ध केलेले आहे. अशा या थोर समाजसुधारक सिंधुताई सपकाळ यांनी ४ जानेवारी २०२२ या दिवशी पुण्यामध्ये वयाच्या ७३ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आजच्या भागामध्ये आपण या थोर समाजसेवक असणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनचरित्र बद्दल थोडक्यात माहिती बघणार आहोत…

नावसिंधुताई सपकाळ
जन्म दिनांक१४ नोव्हेंबर १९४८
जन्म स्थळवर्धा, महाराष्ट्र.
वडीलअभिमान जी साठे
पतीश्रीहरी सपकाळ
शिक्षणइयत्ता चौथी
व्यवसायसमाजसेवा
ओळखअनाथांची माय
मृत्यू दिनांक ४ जानेवारी २०२२
मृत्यू स्थळपुणे, महाराष्ट्र

सिंधुताई सपकाळ यांचे प्रारंभिक जीवन:

मित्रांनो, थोर समाज सुधारक सिंधुताई सपकाळ यांचा महाराष्ट्राच्या वर्धा जिल्ह्यामध्ये गरीब पशुपालक कुटुंबामध्ये दिनांक १४ नोव्हेंबर १९४८ या दिवशी जन्म झाला. गरीब घराण्यामध्ये जन्माला आल्यामुळे सिंधुताई लहानपणी एका कापडाच्या तुकड्याचे कपडे करून घालत असत. ज्याला मराठीमध्ये चिंदी असा शब्द होता, त्यामुळे सर्वजण त्यांना चिंधी म्हणून ओळखत असत. पुढे याच नावाचे अपभ्रंश होऊन त्यांचे नाव सिंधुताई असे करण्यात आले.

सिंधुताई सपकाळ यांनी शिकून फार मोठे व्हावे असे त्यांच्या वडिलांना नेहमी वाटत असे, त्यासाठी त्यांचे वडील त्यांना जनावरे चारण्याच्या बहाण्याने शाळेत घेऊन जात असत. अभिमान जे त्यांचे वडील होते ते इतके गरीब होते की,अभ्यासासाठी साधी पाटी खरेदी करणे देखील त्यांच्यासाठी अवघड होते. त्यामुळे त्यांनी झाडाच्या पानांनी बनवलेली पाटी वापरली.

लहानपणापासून अठरा विश्व दारिद्र्य, आणि कुटुंबाच्या जबाबदाऱ्या यामुळे सिंधुताईंचे लहानपणीच विवाह लावण्यात आला. त्यावेळी त्यांचे वय अवघे दहा वर्ष इतके होते, मात्र विवाह मुळे त्यांचे शिक्षण बंद झाले. त्यामुळे सिंधुताई केवळ चौथी इयत्तेपर्यंतच शिकू शकल्या.

सिंधुताई सपकाळ यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल:

मित्रांनो, आपण बघितले की सिंधुताई यांचा वयाच्या दहाव्या वर्षी विवाह झाला होता. त्यांच्या नवऱ्याचे नाव श्रीहरी सपकाळ असे होते, व लग्नावेळी श्रीहरी सपकाळ यांचे वय सुमारे ३० वर्षे होते. वयाच्या विसाव्या वर्षी सिंधुताईंनी तीन मुलांना जन्म दिला, त्यानंतर पतीशी काही कारणास्तव खटके उडाल्यामुळे त्यांनी पतीचे घर सोडले ते कायमचेच. पुढे त्यांनी अनेक समाजसेवी कार्य केले, त्यांचे सर्वात पहिले समाजसेवी कार्य म्हणजे ग्रामस्थांना मजुरी मिळवून देण्यासाठी थेट जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज करणे होय.

सिंधुताईंच्या संघर्षमय जीवनाचा प्रवास:

मित्रांनो, सिंधुताई सपकाळ यांचा नवरा त्यांच्यावर नेहमी संशय घेत असे. ज्यावेळी सिंधुताई नऊ महिन्यांच्या गरोदर होत्या, त्यावेळी त्यांच्या पतीने त्यांना घराबाहेर काढले, त्याच रात्री गोठ्यामध्ये त्यांनी एका मुलीला जन्म दिला. त्यानंतर त्या आपल्या माहेरी आल्या, मात्र तिथे देखील त्यांना थारा देण्यात आला नाही.

मग मात्र पोटाची भूक भागवण्यासाठी आणि मुलीसाठी त्यांनी भीक मागण्याचे सुरू केले. त्यावेळेस त्यांना असेच अनेक लोक दिसले, या सर्व लोकांसाठी काहीतरी करावे म्हणून त्यांनी समाजसेवेचा ध्यास घेतला, आणि तिथून पुढे अनेक अनाथ लोकांच्या सेवेसाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतले. अशा प्रकारे सिंधुताई या सिंधुताई पासून अनाथांची माय झाल्या. त्यांना संपूर्ण महाराष्ट्र माई या नावाने ओळखतो.

आजपर्यंत त्यांनी सुमारे एक हजार पन्नास मुलांना दत्तक घेऊन त्यांना आजपर्यंत सुमारे २०७ जावई व ३६ सुना आहेत. तसेच नातवंडांची संख्या ही सुमारे १००० पर्यंत आहे. त्यांची मुलगी एक चांगली वकील आहे, मात्र त्यांनी त्या मुलीला वेगळे आणि इतरांना वेगळे असे कधीच वागविले नाही.

सिंधुताई सपकाळ यांना मिळालेले पुरस्कार:

मित्रांनो, सिंधुताई सपकाळ यांना अनेक प्रकारचे पुरस्कार मिळालेले आहेत. यामध्ये अहिल्याबाई होळकर पुरस्कार, मदर तेरेसा सामाजिक न्याय पुरस्कार, आयनिक मदर पुरस्कार, रियल वारस पुरस्कार, अहमदिया मुस्लिम शांतता पुरस्कार, हिरकणी, सह्याद्री पुरस्कार, राजाई पुरस्कार,  अडॅप्टीव्ह मदर पुरस्कार, यांसारखे पुरस्कार मिळालेले आहेत.

याबरोबरच त्यांना इतरही अनेक पुरस्कार मिळालेले आहे. मित्रांनो पुरस्कारामुळे सिंधुताई सपकाळ मोठ्या नाहीत, तर सिंधुताई सपकाळ यांच्यामुळे ते पुरस्कार मोठे आहेत हे या बाबत येथे प्रकर्षाने जाणवते.

निष्कर्ष:

मित्रांनो, अनाथ होणे हे कोणाच्या हातात नसते, मात्र अनाथांच्या वाटेला नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे भोग येत असतात. त्यामुळे अनाथ होणे हे अतिशय दुर्दैवाचे लक्षण समजले जाते. या अनाथांना समाजातील अनेक लोक तिरस्कार आणि दूर ढकलत असतात, मात्र या सर्वांच्या डोक्यावर मायेचा हात फिरवून त्यांना जवळ घेणे, आणि त्यांच्यासाठी काही कार्य करणे हे फक्त एखाद्या कोमल हृदयाच्या माणसालाच शक्य होते. अशीच एक व्यक्ती म्हणजे सिंधुताई सपकाळ, त्यांनी अनाथ लोकांसाठी फार मोठी कार्य केलेली आहे.

आजच्या लेखामध्ये आपण सिंधुताई सपकाळ यांच्या विषयी माहिती पाहिली, तुम्हाला त्यांच्या जीवनचरित्र सह त्यांचे प्रारंभिक जीवन, जन्म, शिक्षण, वैयक्तिक आयुष्यातील घटना, त्यानंतर त्यांनी केलेला संघर्ष, त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल आणि कुटुंबाबद्दल माहिती, वैवाहिक जीवनाबद्दल माहिती, तसेच त्यांनी काढलेल्या विविध संस्था, त्यांना मिळालेले पुरस्कार त्यांच्यावर निर्माण झालेले चित्रपट इत्यादी गोष्टींवर बरीच माहिती बघितलेली आहे.

FAQ

सिंधुताई सपकाळ कोण होत्या?

मित्रांनो अनाथांची माय म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिंधुताई सपकाळ एक थोर समाजसेविका होत्या. ज्यांनी अनाथ मुलांसाठी खूप मोलाचे कार्य करून, अनेक संस्था काढलेल्या आहेत व त्यांच्या पालन पोषणाचे सर्व जबाबदारी स्वतः उचलत होत्या.

सिंधुताई सपकाळ यांच्या लग्नाबद्दल काय सांगता येईल?

सिंधुताई सपकाळ यांचे वय दहा वर्ष असताना त्यांनी श्रीहरी सपकाळ यांच्यासोबत लग्न गाठ बांधली होती. या जोडप्याला ममता सपकाळ नावाची एक गोड कन्या देखील आहे, तसेच त्यांनी दीपक गायकवाड नावाच्या एका मुलाला दत्तक देखील घेतले होते.

सिंधुताई सपकाळ यांच्या मृत्यूचे कारण काय आहे?

अनाथांची माय म्हणून प्रसिद्ध असलेल्या सिंधुताई सपकाळ यांनी आयुष्यभर अनाथांसाठी सेवा केली. या सिंधुताई सपकाळ यांचे हृदयविकाराच्या झटक्याने एका खाजगी रुग्णालयामध्ये निधन झाले.

सिंधुताई सपकाळ यांच्यावर कोणता चित्रपट आलेला आहे?

अनंत महादेवन यांनी दिग्दर्शित केलेला मी सिंधुताई सपकाळ हा चित्रपट सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर आधारित आहे. जो २०१० मध्ये आला होता. या चित्रपटाला ५४ लंडन पिक्चर फेस्टिवल येथे नामांकित करण्यात आले होते.

सिंधुताई सपकाळ यांच्या विविध संस्थांची नावे काय आहेत?

सिंधुताई सपकाळ यांनी स्थापन केलेल्या विविध संस्थांची नावे बालभवन, अभिमान, वसतीगृह, गंगाधर बाबा संमती, बालनिकेतन, चिखलदरा आश्रम आणि सप्तसिंधू महिला आधार बालसंगोपन असे आहेत.

मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण सिंधुताई सपकाळ या अनाथांची माय म्हणून प्रसिद्ध असलेल्या समाजासेविकेबद्दल माहिती पाहिली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली, आवडली ना!  मग लगेचच कमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य कळवा. आणि तुमच्या इतरही मित्र-मैत्रिणींना ही माहिती शेअर करून वाचायला सांगा.

 धन्यवाद…

Avatar

i am marathi content writer from last 5 years.

Leave a Comment