सिंधू संस्कृतीची संपूर्ण माहिती Sindhu Sanskruti Information In Marathi

Sindhu Sanskruti Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो बदल हा निसर्गाचा नियम आहे, आणि यानुसार वेळ परत्वे अनेक गोष्टी बदलत जातात. याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे डायनासोर प्राण्याचा नाश होय. मित्रांनो जमिनीवर विविध भौगोलिक बदल होत गेले, आणि त्यात विविध संस्कृती नामशेष झाल्या तर काही नवीन संस्कृतींचा उदय झाला. यातील एक महत्त्वाची संस्कृती म्हणजे सिंधू संस्कृती होय. सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये उदय तसेच पतनही झालेला म्हणून या संस्कृतीला सिंधू असे नाव पडले असावे. संपूर्ण जगामधील सर्वात प्राचीन संस्कृती म्हणून सिंधू संस्कृतीला ओळखले जाते.

Sindhu Sanskruti Information In Marathi

सिंधू संस्कृतीची संपूर्ण माहिती Sindhu Sanskruti Information In Marathi

या संस्कृतीला हडप्पा संस्कृती म्हणूनही ओळखले जाते. हे नाव सर जॉन मार्शल यांनी दिले होते. इसवी सन पूर्व २५०० या कालावधीमध्ये ही संस्कृती अस्तित्वात होती. चीनमध्ये आढळणाऱ्या सर्वात जुन्या मेसोपोटेमियान या संस्कृतीहूनही सिंधू संस्कृती प्राचीन आहे.

भारतीय पुरातत्त्व विभागाने १९२० या वर्षी सेंद्रिय संस्कृतीच्या उत्खननांना दरम्यान मोहेंजोदारो आणि हडप्पा ही दोन शहरे शोधून काढली. आणि पुढे सर जॉन मार्शल यांनी या सिंधू संस्कृतीचा अर्थात हडप्पा संस्कृतीचा शोध जाहीर केला.

आजच्या भागामध्ये आपण सर्वात प्राचीन संस्कृती म्हणून ओळखळ्या जाणाऱ्या सिंधू संस्कृती अर्थात हडप्पा संस्कृती बद्दल माहिती घेणार आहोत…

नावसिंधू संस्कृती
इंग्रजी नावइन्ड्स सिव्हीलायजेशन
इतर नावेहडप्पा संस्कृती, हडप्पा सभ्यता, प्राचीन सिंधू
प्रमुख शहरेमोहेंजोदारो, हडप्पा, राखीगडी आणि धोलावीरा
युग दक्षिण आशियाई कांस्ययुग
कालावधीइसवी सन पूर्व ३३०० ते इसवी सन पूर्व १३०० BCE
पुढील संस्कृतीपेंटेड ग्रे वेअर संस्कृती

भौगोलिक क्षेत्र: भारत आणि पाकिस्तान मधील सिंधू नदीचे खोरे तसेच घगर 11 या नद्यांच्या मधील प्रदेश भारताचा वायव्य आणि पाकिस्तानचा पूर्व भाग

मित्रांनो, सिंधू या नदीवरून नाव पडलेल्या सिंधू संस्कृतीचे भौगोलिक स्थान हे देखील सिंधू संस्कृतीच्या खोऱ्यामध्येच आढळून येते. आजच्या पाकिस्तान या देशाच्या सिंध आणि पंजाब या दोन प्रांतांमध्ये सिंधू संस्कृतीचे महत्त्वाचे ठिकाण आढळून येतात.

सिंधू संस्कृतीच्या उपनद्या असणाऱ्या रोपर, रंगापूर, लोथल, वनमाळी, आणि कालीबंगा इत्यादी नद्यांच्या खोऱ्यामध्ये देखील सिंधू संस्कृतीचे अवशेष सापडलेले आहेत. ज्यावेळी १९२० या वर्षी सिंधू संस्कृतीचा शोध लागला, त्यावेळेस हा प्रांत अविभाजित अखंड भारताचाच भाग होता.

सिंधू संस्कृती मधील सर्वात महत्त्वाची ठिकाणे:

मित्रांनो, सिंधू संस्कृतीच्या शोधा बरोबरच सिंधू संस्कृतीमधील अतिशय महत्त्वाची ठिकाणे किंवा शहरे देखील सापडलेली आहेत. त्यामध्ये मोहेंजोदारो हे शहर सर्वप्रथम सापडलेल्या ठिकाणांमध्ये येते. सिंधी भाषेमध्ये या शब्दाचा अर्थ मृतांचा ढिगारा असा होतो. सोबतच येथे लारखाना नावाचा देखील एक प्रदेश आहे. जिथे सिंधू संस्कृतीतील एक स्मारक आणि मोठे स्नानगृह सापडले आहे. तसेच याच ठिकाणी तत्कालीन धान्याचे अवशेष व पशुपतिनाथ भगवान महादेव यांची मूर्ती देखील सापडलेली आहे.

सिंधू संस्कृतीतील सर्वात महत्त्वाचे दुसरे ठिकाण म्हणजे हडप्पा होय. या शहराच्या नावावरूनच सिंधू संस्कृतीला हडप्पा संस्कृती म्हणूनही ओळखले जाते.तसेच या ठिकाणी सुतकांगेडोर नावाचे ठिकाणही सापडलेले आहे. हे हडप्पा व बेबीलोन यामधील व्यापाराचे हे एक प्रमुख केंद्र किंवा क्रॉस रोड म्हणून ओळखले जाते.

या महत्त्वाच्या ठिकाणांबरोबरच सिंधू संस्कृतीमध्ये चांहुदर, आमरी, सुरकोटाडा, कालीबंगण, धोलविरा, बाणवली, आणि लोथल इत्यादी महत्त्वाची ठिकाणे देखील सापडलेली आहेत.

सिंधू संस्कृती आणि शहरांचे नियोजन:

मित्रांनो, सिंधू संस्कृतीमध्ये शहरांचे आणि सांडपाण्याचे नियोजन अतिशय व्यवस्थित आणि काटेकोर पद्धतीने केले होते, असे आपण ऐकतो. तत्कालीन कालखंडाचा अंदाज घेता सिंधू संस्कृती ही खूप पुढारलेली संस्कृती म्हणून ओळखली जाते. येथे तुम्हाला भाजलेल्या विटांची घरे देखील बघायला मिळतात.

मोहेंजोदारो आणि हडप्पा या दोन ठिकाणांमध्ये आपल्याला किल्ले देखील बांधलेले आढळून येतात. यावरून बांधकाम शैलीचा विकास देखील लक्षात येतो. उच्चभ्रू लोकांची वस्ती ही शहरातील उंच ठिकाणी असे. येथे टोलेजंग इमारती देखील बघायला मिळत.

सिंधू संस्कृतीमधील रस्ते देखील खूपच व्यवस्थित नियोजनपूर्वक बनविलेले होते. जे एकमेकांना काटकोनामध्ये छेदत असत, जेणेकरून सर्वांच्या सोयीचे व्हावे. तसेच आजच्या पद्धतीप्रमाणेच तत्कालीन घरांमध्ये देखील आतमध्येच शौचालय आणि स्नानगृहे असत, आणि त्यातून निघणाऱ्या सांडपाण्याची नियोजन करण्यासाठी अतिशय विचारपूर्वक व्यवस्था केलेली होती. काही घरांमध्ये हे पाणी बागेतील झाडांना देखील पुरविले जाई.

सिंधू संस्कृतीतील लोक हे भविष्याबद्दल सुद्धा खूप जागरूक होते, असे म्हणावे लागेल. कारण सिंधू संस्कृतीच्या उत्खननामध्ये आढळलेल्या शहरांमध्ये धान्यांचा बराच मोठा साठा सापडलेला आहे. यावरून त्यांच्या भविष्याच्या तरतुदीबद्दल प्रत्यय येतो.

मित्रांनो आज आपण ज्या पद्धतीचे जीवन जगत आहोत त्याहूनही कित्येक पटीने आदर्श जीवन सिंधू संस्कृतीतील लोक जगत असत. त्यावेळी त्यांनी अवगत केलेली तंत्रे काळाच्या दुर्बिणीतून बघितल्यास आजच्या युगापेक्षा कित्येक पटीने पुढारलेली होती असेच म्हणावे लागेल. मात्र या संस्कृतीच्या पतना बरोबरच त्याबद्दलची अनेक रहस्य आणि ज्ञान देखील लुप्त झाले, आणि ते पुन्हा हस्तगत करण्यासाठी मानवाच्या बऱ्याच पिढ्या खर्च झाल्या.

सिंधू संस्कृतीतील लोक हे अर्थशास्त्राबद्दल सुद्धा खूप जागरूक होते. त्यामुळे त्यांनी शेती व्यवस्था अतिशय काळजीपूर्वक बनविली होती. सोबतच पशुपालन आणि व्यापार इत्यादी जोडधंदा देखील केला जाईल.

निष्कर्ष:

मित्रांनो, कुठल्याही नागरिकाचे वर्तन तेथील संस्कृती वरून ठरत असते. तसेच नागरिकांच्या वर्तणानुसार संस्कृतीमध्ये वेळेनुसार बदल होत असतात. भारतीय संस्कृती ही सर्वात प्राचीन आणि जगातील सर्वात महान संस्कृती समजली जाते. भारतीय संस्कृतीला सिंधू संस्कृतीचे वरदान लाभलेले आहे. सिंधू संस्कृती ही मुख्यत्वे करून भारताच्या आणि सध्याच्या पाकिस्तानमध्ये असणाऱ्या सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये आढळून येते. मात्र काही कारणास्तव ही संस्कृती लयाला गेली, आणि तिचे पतन झाले.

आज विविध उत्खनन प्रक्रियांमध्ये या संस्कृतीचे अवशेष मानवाला सापडत आहेत. इतक्या जुन्या कालावधीमध्ये सुद्धा अगदी व्यवस्थित आणि नियोजनपूर्वक वसवल्या गेलेल्या संस्कृतीला एक आदर्श संस्कृती म्हणून ओळखले जाते. सिंधू संस्कृती हा एक अभ्यासाचा मोठा विषय असून त्याची व्याप्ती फार मोठी आहे. आजच्या भागामध्ये आपण या सिंधू संस्कृतीबद्दल थोडक्यात माहिती बघण्याचा प्रयत्न केला.

FAQ

सिंधू संस्कृती कोठे आढळून आली?

मित्रांनो, सर्वात प्राचीन समजल्या जाणाऱ्या सिंधू संस्कृतीचे ठिकाण हे सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये असणाऱ्या पंजाब प्रांतामधील मोहेंजोदारो या ठिकाणी इसवी सन १९२० २१ या साली आढळून आली.

सिंधू संस्कृती इतकी प्रसिद्ध होण्याचे कारण काय?

सिंधू संस्कृती ही प्राचीन संस्कृती असून देखील जमिनीचा योग्य वापर, शहराचे काटेकोर नियोजन, विविध तांत्रिक घटक, सर्वात उत्तम सांडपाण्याची व्यवस्था इत्यादी गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे.

सिंधू संस्कृतीमधील उल्लेखनीय बाबी कोणत्या?

वजने आणि मापे यांचे अचूक प्रमाण, दाग दागिने बनविण्याची शुद्ध पद्धत, धातू काम, दगड काम, विविध शिल्पे, शहराची नियोजन, इत्यादी सिंधू संस्कृतीमधील उल्लेखनीय बाबी आहेत.

सिंधू संस्कृती मधील लोक कशाची पूजा करत असत?

सिंधू संस्कृतीमधील लोक पृथ्वीला प्रजनन देवी म्हणून ओळखत असत, आणि तिची पूजा मोठ्या भक्ती भावाने करत असत.

हडप्पा संस्कृती मधील लोकांना कोणत्या धातूची कला आत्मसात होती?

हडप्पा संस्कृती मधील लोकांना कांस्य या धातूची कला आत्मसात होती.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण भारतातील सर्वात प्राचीन संस्कृती अर्थात सिंधू संस्कृती ज्याला हडप्पा संस्कृती म्हणूनही ओळखले जाते याबद्दल माहिती पाहिली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला प्रतिक्रियांच्या स्वरूपात कमेंट सेक्शन मध्ये जरूर कळवा. तसेच आपल्या इतरही मित्र-मैत्रिणींना सिंधू संस्कृती वाचायला मिळावी म्हणून ही माहिती नक्की शेअर करा.

धन्यवाद…

Vaishnavi Raut

वैष्णवी राउत (Vaishnavi Raut) हि एक content writer असून यांना पोस्ट लिहिण्याचा ३ वर्षांचा अनुभव आहे. यांचे शिक्षण बी.एसस्सी Agri.झाले असून ती मराठी भाषेत अचूक लेखनाचे कार्य करतात.

Leave a Comment