श्री स्वामी समर्थ यांची संपूर्ण माहिती Shri Swami Samarth Information In Marathi

Shri Swami Samarth Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो दत्त परंपरा संभाळणारे एक प्रसिद्ध आध्यात्मिक गुरु अशी ओळख असणारे अक्कलकोटचे स्वामी श्री स्वामी समर्थ हे सर्वांनाच परिचित आहेत. “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” हे वाक्य ऐकले किंवा वाचले की लगेच आपल्या डोळ्यासमोर वैराग्याची मूर्ती असणारे श्री स्वामी समर्थ उभे राहतात. भारतासह ते अनेक राज्यांमध्ये देखील प्रसिद्ध असून, त्यांनी संपूर्ण भारतीय उपखंडात भटकंती करून ज्ञान प्राप्त केले. आणि महाराष्ट्राच्या अक्कलकोट या गावी स्थायिक झाले.

Shri Swami Samarth Information In Marathi

श्री स्वामी समर्थ यांची संपूर्ण माहिती Shri Swami Samarth Information In Marathi

मित्रांनो, श्री स्वामी समर्थांचे व्यक्तिमत्व अतिशय गूढ आहे. स्थानिक लोकांच्या माहितीनुसार १८५६ यावर्षी साधारणपणे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात बुधवारच्या दिवशी त्यांनी अक्कलकोट मध्ये प्रवेश केला. पुढील जवळपास २२ वर्ष ते अक्कलकोट येथे राहिले, मात्र तरी देखील त्यांचा वंश कोणता आहे, व ते मूळ कुठले आहेत याबाबत माहिती सापडत नाही.

त्यांच्याबद्दल अनेक लोक कथा सांगितल्या जातात, त्यापैकी एका लोक कथेनुसार स्वामीजींच्या एका शिष्याने त्यांना त्यांच्या जन्माबद्दल विचारले, त्यावेळी स्वामी समर्थांनी उत्तर दिले की मी वटवृक्षाच्या झाडापासून निर्माण झालेलो आहे, आणि माझे पूर्वीचे नाव नृसिंह भान असे आहे.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण या गूढ व्यक्तिमत्त्वाबद्दल, अर्थात श्री स्वामी समर्थ यांच्या बद्दल माहिती बघणार आहोत…

नावश्री स्वामी समर्थ
रूप दत्तगुरूंचे अवतार
पुनर्जन्मनरसिंह / नृसिंह सरस्वती यांचा पुनर्जन्म
प्रकटस्थानश्रीशैलम येथील कर्दळीचे जंगल
वास्तव्यअक्कलकोट
मोठे मंदिरअक्कलकोट
मंदिरांचा प्रकारमठ
भक्तसेवेकरी

मित्रांनो, हिंदू संस्कृतीमध्ये दत्तप्रभू यांना खूप मानले जाते. आणि या दत्तगुरूंचा एक अवतार म्हणून ओळखले जाणारे श्री स्वामी समर्थ हे देखील अतिशय पूजनीय आहेत. भारतातील एक गूढ, व्यक्तिमत्व आणि देवत्व प्राप्त असलेले हे स्वामी समर्थ दत्तप्रभूंच्या दत्तात्रय पंथाच्या अध्यात्मिक गुरु असणाऱ्या श्री नरसिंह सरस्वती स्वामी यांचा पुनर्जन्मित अवतार आहे असे देखील मानले जाते. त्यांच्या जीवनाबद्दल अनेक आख्यायिका सांगितल्या जातात, त्यामध्ये त्यांचे जीवन आपल्याला समजून येते.

श्री स्वामी समर्थ यांचे जीवन:

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ हे आधुनिक काळातील म्हणजे १९ व्या शतकातील संत होते. त्यांनी समाजातील जनमानसांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्यासाठी आपल्या चमत्कारांच्या आणि लीलांच्या माध्यमातून समाधान केले होते.

काही आख्यायिका नुसार असे सांगितले जाते की, आंध्र प्रदेश या राज्यांमधील एक पवित्र हिंदू शहर असणारे श्रीशैलम या शहराजवळील एका कर्दळीच्या जंगलामध्ये श्री स्वामी समर्थ प्रथमतः प्रकट झाले होते. आणि याची पुष्टी म्हणजे त्यांनी आपल्या एका शिष्याला सांगताना म्हटले होते की माझा उगम हा वृक्षापासून झालेला आहे.

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ यांनी अतिशय मोठ्या प्रमाणावर प्रवास करत जगाची भटकंती केली आहे. त्यांनी उत्तरेच्या भागात फिरताना अगदी चीन, नेपाळ आणि तिबेट यांसारख्या देशांमधून देखील प्रवास केलेला आहे, असे सांगितले जाते.

आयुष्यभर भ्रमंती करत त्यांनी काशी, जगन्नाथ पुरी, गिरनार, हरिद्वार, काठीयावाड, रामेश्वरम इत्यादी महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना देखील भेट दिलेली आहे. तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठू माऊलीच्या पंढरपूर जवळील मंगळवेढा या ठिकाणी देखील त्यांनी बराच काळ वास्तव्य केले होते. त्यानंतर मात्र त्यांनी अक्कलकोट येथे कायमसाठीचे आपले वास्तव्य केले.

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ हे कर्नाटकच्या माणिकनगर येथे देखील काही काळ राहिले होते. त्याचे कारण म्हणजे श्री माणिक प्रभू चरित्र यानुसार त्यांनी हे वास्तव्य केले होते. मित्रांनो माणिक प्रभू आणि श्री स्वामी समर्थ उंबर अर्थात औदुंबर या अध्यात्मिक वृक्षाखाली बराच काळ बसायचे, तेथे त्या दोघांमध्ये अध्यात्मिक विषयांवर प्रगल्भ चर्चा चालत असे. स्वामी समर्थ माणिक प्रभू यांना आपले बंधू मानत असत. स्वामी समर्थांना दत्तगुरूंचा चौथा अवतार तर भौतिक रूपाने बघितल्यास तिसरा अवतार म्हणून ओळखले जाते.

या माणिक नगर मधील वास्तव्यानंतर त्यांना चिंतोपंत टोल यांनी साधारणपणे १८५६ या  वर्षाच्या दरम्यान अक्कलकोट येथे राहण्यास येण्याचे निमंत्रण धाडले. आणि या नुसार स्वामी समर्थांनी आपला पुढील मुक्काम अक्कलकोट येथे हलविला, आणि त्यांनी येथे सुमारे २२ वर्षे वास्तव्य केले. या वास्तव्यादरम्यान ते त्यांचे एक उत्तम शिष्य समजले जाणारे चोलप्पा यांच्या घरी राहत असत, आणि आता या चोलप्पा यांच्या घरालाच अक्कलकोट येथील प्रसिद्ध मंदिर बनविलेले आहे.

अश्या या गूढ संतांनी अर्थात श्री स्वामी समर्थ महाराज यांनी सन १८७८ वर्षाच्या चैत्र महिन्याच्या तेराव्या तिथीला समाधी घेतली.

श्री स्वामी समर्थ यांच्या शिकवणी:

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ यांनी आपल्या उपदेशामध्ये अनेक उत्तम वाक्य म्हटले आहेत. ती पुढील प्रमाणे:

फळाची अपेक्षा न धरता मानवाने नेहमी कार्य केले पाहिजे. आपण जे काम करू त्यामध्ये आपले सर्वस्व पणाला लावले पाहिजे. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.

जेव्हा तुम्हाला कुठल्याही ज्ञानी व्यक्तीकडून ज्ञान मिळवण्याची संधी मिळेल, त्यावेळेस जास्तीत जास्त ज्ञान आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. कारण हुशार माणसाचे ज्ञान सहसा भेटत नाही.

अनेक प्राचीन वाङ्मयाची ग्रंथसंपदा असणारे वेदग्रंथ यांचे वाचन करणे खूप महत्त्वाचे ठरते. केवळ बाह्य स्वच्छता न करता मानवाने मनाची अंतर्गत स्वच्छता देखील केली पाहिजे. पुस्तकी ज्ञान पेक्षा अनुभवाचे ज्ञान महत्त्वाचे असते.

निष्कर्ष:

मित्रांनो, आज आपण हिंदू संप्रदायातील एक गूढ म्हणून ओळखले जाणारे श्री स्वामी समर्थ यांच्या बद्दल माहिती पहिली. अगदी आसेतुहिमालय असा प्रवास केलेले हे व्यक्तिमत्व दुसरे तिसरे कोणी नसून भगवान दत्तात्रय यांचा चौथा अवतार आहे असे सांगितले जाते. त्यांच्या जन्माबद्दल कुठे देखील माहिती आढळत नाही, मात्र ते वृक्षापासून उगम पावलेले आहेत असे त्यांच्याच तोंडून ऐकायला मिळालेले आहे.

महाराष्ट्र बरोबरच त्यांनी संपूर्ण भारतभर भ्रमंती केली, आणि लोकांच्या कल्याणाकरिता कार्य केले. अगदी अलिकडच्याच काळात म्हणजेच स्वातंत्र्यपूर्व काळात स्वामी समर्थ यांनी आपल्या विविध चमत्कार आणि लीलांनी जनसामान्यांच्या मनावर राज्य केले आणि सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मदत केली.

FAQ

श्री स्वामी समर्थ इतके प्रसिद्ध असण्यामागे काय कारण आहे?

श्री स्वामी समर्थ प्रसिद्ध असण्यामागील कारण म्हणजे ते हिंदू धर्मीय लोकांचे आराध्य दैवत असलेले दत्तात्रय प्रभू यांचे एक चौथे अवतार मानले जातात. तसेच दत्त संप्रदायाचे अध्यात्मिक गुरु असणाऱ्या नरसिंह सरस्वती यांचा पुनर्जन्म असल्याचे देखील मानले जातात.

श्री स्वामी समर्थ यांच्यावरील मराठी दूरदर्शन मालिका किंवा सिरीयल कोणत्या मराठी वाहिनीवर दाखविली जाते?

श्री स्वामी समर्थ यांच्यावरील मराठी दूरदर्शन मालिका अर्थात सिरीयल कलर्स मराठी या वाहिनीवर दाखवली जाते.

स्वामी समर्थ यांनी आपल्या अनुयायांना किंवा भक्तांना कोणती गोष्ट शिकवली?

श्री स्वामी समर्थ यांनी आपल्या अनुयायांना अर्थात भक्तांना आपल्या गुरुचे म्हणणे संपूर्ण लक्ष देऊन ऐकावे, आणि त्यांच्याकडून ज्या रूपाने मिळेल त्या रूपाने ज्ञान घ्यावे ही गोष्ट शिकविली.

श्री स्वामी समर्थ यांच्या मुखामध्ये कोणते वाक्य नेहमी असे?

श्री स्वामी समर्थ यांच्या मुखामध्ये नेहमी असणारे वाक्य म्हणजे “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” हे होय.

श्री स्वामी समर्थ यांचा उगम कोठे व कसा झाला?

काही प्रचलित आख्यायिका नुसार श्री स्वामी समर्थ आंध्र प्रदेशातील श्रीशैलम या पवित्र शहराजवळीच्या एका कर्दळीच्या जंगलामध्ये उगम पावलेले आहेत, असे सांगितले जाते.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण श्री स्वामी समर्थ या संतांबद्दल माहिती पाहिली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट मध्ये जरूर कळवा. आणि आपल्या इतरही अध्यात्मिक मित्र मैत्रिणींना ही माहिती अवश्य शेअर करा.

धन्यवाद…

Avatar

i am marathi content writer from last 5 years.

Leave a Comment