शतावरी वनस्पतीची संपूर्ण माहिती Shatavari Plant Information In Marathi

Shatavari Plant Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो भारत देश आणि भारतीय संस्कृती जगाच्या पाठीवर सर्वांसाठीच उपयुक्त सिद्ध झालेली आहे. आणि त्यामध्ये आयुर्वेदासारख्या गोष्टीचा देखील समावेश होतो. आपल्या भारतीय आयुर्वेदाने अनेक जडीबुटींपासून शरीराला बरे करण्याचे तंत्र सांगितलेले आहे. या जडीबुटी किंवा औषधीय वनस्पतींमध्ये शतावरी या भारतीय उगमाच्या वनस्पतीचा देखील समावेश होतो. या वनस्पतीच्या वाढीसाठी उष्ण किंवा समशीतोष्ण हवामान आवश्यक असून, समुद्रसपाटीपासून तब्बल चार हजार फूट उंचीपर्यंत देखील ही वनस्पती उगवू शकते.

Shatavari Plant Information In Marathi

शतावरी वनस्पतीची संपूर्ण माहिती Shatavari Plant Information In Marathi

आपल्याकडे सह्याद्री पर्वतात, सातपुडा पर्वतात आणि कोकणकड्याच्या भागांमध्ये ही वनस्पती मोठ्या प्रमाणावर उगवलेली आढळून येते. ही वनस्पती औषधीय असण्याबरोबरच एक शोभिवंत वनस्पती म्हणून देखील सर्वपरिचित आहे. या वनस्पतीला संस्कृत मध्ये नारायणी म्हणून संबोधले जाते.

आजच्या भागामध्ये आपण या शतावरी वनस्पती बद्दल इत्यंभूत माहिती बघणार आहोत…

नावशतावरी
संस्कृत नावनारायणी
इंग्रजी नावअस्पॅरँगस
शास्त्रीय नावAsparagus resimosum
वर्णनलांबट, पर्णहीन वेल
प्रकार बहुवार्षिक वनस्पती

शतावरी वनस्पतीचे स्वरूप कसे असते?

शतावरी ही एक वेलवर्गीय वनस्पती असून तिला पानांऐवजी काटे असतात. ही वनस्पती लांबट वाढते, या वनस्पतीला अनेक पेरे असतात, आणि या प्रत्येक पेरांवर पानांच्या स्वरूपातील हिरव्यागार उप फांद्या असतात. या उपफांद्यांनाच पर्णकांडे म्हणून देखील ओळखले जाते.

दुरून बघताना या पर्णकांड्या म्हणजे पाने असल्याचेच भासतात. सरू या वनस्पती सारखे दिसणारे, काहीशी बारीक पाने या वनस्पतीवर आढळून येतात. या वनस्पतीला सुमारे एक सेंटीमीटर लांबीचे टोकदार आणि नखासारखे वाकडे काटे आढळून येतात. शतावरी वनस्पतीचे अगदी छोटीशी पाने गुच्छमध्ये आढळून येतात.

शतावरी वनस्पती कुठल्याही गोष्टीला आधारासाठी गुंडाळली जाते, आणि त्यानंतर तिच्या फांद्या आणि उप फांद्या मिळून त्या गोष्टीला अगदी हिरवागार रंग प्राप्त करून देतात. भारतामध्ये शतावरीची आणखी एक डोमेस्टिक प्रकारची प्रजाती आढळून येते, ज्यापासून भाजी देखील बनवली जाऊ शकते.

भारता बरोबरीनेच अमेरिका, फ्रान्स, चीन, जपान, तैवान यांसारख्या देशांमध्ये देखील शतावरी ची लागवड केली जाते. आणि यापासून बनविले गेलेली भाजी देखील आवडीने खाल्ली जाते.

शक्यतो थंड ठिकाणी बनविण्यात येणाऱ्या या भाजीमध्ये अनेक आरोग्यदायी गुणधर्म असतात. या भाजीचे कोवळी लुसलुशीत कोंब आरोग्यदायी तर असतातच, शिवाय चवीला देखील अतिशय उत्तम असतात. यामध्ये विटामिन ए आणि सी रायबोफ्लोविन, थायमीन आणि पोटॅशियम यांसारखी घटकतत्वे आढळून येतात, जी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. भाजी बरोबरच या वनस्पतींच्या कोवळ्या कोंबांपासून सुपदेखील बनवले जाऊ शकते. जे खूप पसंत केले जाते.

महाराष्ट्र मध्ये शतावरीला ससुर किंवा ससुर मुळी म्हणून देखील ओळखले जाते. मृग नक्षत्रा मधील पहिला पाऊस पडला की विना लागवड करता ही वनस्पती आपोआप उगवण्यास सुरुवात होते.

शतावरीची लागवड:

मित्रांनो, मुख्यत्वे करून शतावरी ही एक रानभाजी आहे. मात्र तिचे विविध गुणधर्म आणि तिला वाढती मागणी बघता अनेक ठिकाणी या शतावरीची शेती देखील केली जाते. शतावरी ही अशी वनस्पती आहे जी अनेक वर्ष चालू शकते, त्यामुळे एकदा लागवड केली की सुमारे १४ ते १५ वर्ष ही शतावरी जमिनीमध्ये राहते.

आजकाल शतावरी कडे शेतकरी लोक नगदी पीक म्हणून बघत आहेत, कारण यापासून नेहमी उत्पन्न मिळत राहते. भाजीसाठी ही वनस्पती कोवळ्या कोंबाच्या स्वरूपात, तर औषधासाठी मुळ्यांच्या स्वरूपात विकली जाते. लागवडीपासून एक वर्षानंतर या शतावरी चे उत्पन्न सुरू होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही शतावरी आयुर्वेदिक औषधे, होमिओपॅथी औषधे, आणि ऍलोपॅथिक औषधे अशा सर्वच औषध निर्मिती शास्त्रांमध्ये वापरली जाते.

शतावरी वनस्पतीचे आरोग्यदायी फायदे:

मित्रांनो, आतापर्यंत आपल्या लक्षात आलेच असेल की शतावरी ही वनस्पती औषधी गुणधर्म असणारी आहे. मुख्य म्हणजे या वनस्पतीचे मुळे आणि शेंडे किंवा कोवळे कोंब खूपच फायदेशीर असतात. या भागांपासून अनेक औषधे बनवली जातात. आपल्याला माहितीच आहे की खोकल्यावरील औषधे हे कडवट असतात, ते शतावरी पासूनच बनवलेले असतात. ही शतावरी खोकला, छातीतील कफ इत्यादी गोष्टींमध्ये अतिशय फायदेशीर ठरते. शिवाय या शतावरी च्या वापरामुळे पित्त प्रदोष असणाऱ्या व्यक्तींना देखील खूप फायदा होतो.

शतावरी ही शरीरातील विविध स्नायू बळकट करण्यासाठी खूप फायदेशीर सिद्ध झालेली आहे. त्यामुळे कष्टाचे काम करणाऱ्या लोकांना देखील शतावरी सेवनाचा सल्ला दिला जातो.

शतावरी वनस्पती पासून तेल, घृत, कलप, मिशतेल आणि प्रमेह इत्यादी उत्पादने मिळविली जातात. अर्धांग वायू असणाऱ्या रुग्णांसाठी शतावरी पासून बनविलेले नारायणी तेल अतिशय फायदेशीर असते.

शतावरी वनस्पती जनावरांना म्हणजेच गाई किंवा म्हशींना खाऊ घातल्यामुळे दूध उत्पादन मोठ्या प्रमाणावर वाढते. शतावरी च्या सेवनांमुळे पित्त, ताप, मुतखडा इत्यादी आजारांवर मात केली जाऊ शकते. शतावरी च्या सेवनामुळे रक्त शुद्धीकरणाचे कार्य केले जाते.

शतावरी ही प्रथमतः मासिक पाळी येणाऱ्या मुलींना आणि मासिक पाळी बंद होण्याच्या मार्गावर असणाऱ्या स्त्रियांना वेदनांपासून मुक्ती देण्याची कार्य करते.

शतावरीच्या सेवनामुळे पुनरुत्पादन क्षमता वाढवली जाऊ शकते, तसेच स्त्रियांमध्ये प्रसूती देखील सुलभ होण्यास मदत मिळते.शतावरीच्या सेवनामुळे पुरुषांमध्ये धातू वृद्धी केली जाऊ शकते. ज्यामुळे वंद्यात्वाच्या समस्यांवर मात केली जाते.

स्तनपान करत असणाऱ्या मातांसाठी दूध वाढविण्याचे कार्य शतावरी वनस्पती करत असते. शतावरी वनस्पतीच्या सेवनामुळे वजन वाढविले जाऊ शकते, मात्र ज्या लोकांना शतावरीची एलर्जी आहे त्यांनी शतावरी चे सेवन टाळणे उचित ठरते.

निष्कर्ष:

मित्रांनो, आज आपण शतावरी या वनस्पती बद्दल माहिती पहिली, शतावरीही एक औषधीय वनस्पती असण्याबरोबरच तिला शोभिवंत वनस्पतीचा देखील दर्जा देण्यात आलेला आहे. घरोघरी शोभेचे झाड म्हणून या वनस्पतीची लागवड करण्यात येते. ती वनस्पती वेलवर्गीय असून अतिशय लांबच लांब वाढते. या वनस्पतीला कुठेही पाने बघायला मिळत नाहीत, मात्र काटे भरपूर असतात.

अशी ही वनस्पती आरोग्याच्या दृष्टीने खूपच फायदेशीर असते. या शतावरी वनस्पतीच्या मुळ्या आणि शेंडा कडचा भाग विविध औषधांची निर्मिती करण्यामध्ये वापरला जातो. चवीला गोडसर कडू असणारी ही वनस्पती पित्त शमविण्यासाठी आणि छातीतील कफ दूर करण्यासाठी खूप फायदेशीर असते.

FAQ

शतावरी च्या वनस्पतीवर पाने आढळून येतात का?

शतावरी च्या वनस्पतीवर पाने आढळून येत नाही, मात्र त्या ऐवजी काटे आढळून येतात.

शतावरी ही वनस्पती कोणत्या आजारांसाठी सर्वात जास्त फायदेशीर ठरते?

शतावरी ही वनस्पती छातीतील कफ या आजारावर सर्वात जास्त प्रभावी ठरते.

शतावरी च्या पानांचे रूपांतर कशामध्ये झालेले आहे?

शतावरी च्या पानांचे रूपांतर सुरू सारख्या लांबट फांद्यांमध्ये झालेले आहे.

एकदा लागवड केल्यानंतर शतावरी ची वनस्पती किती वर्ष जगते?

एकदा लागवड केल्यानंतर शतावरीची वनस्पती साधारणपणे १४ ते १५ वर्ष आरामात जगते.

शतावरी वनस्पतीची शेती केली जाऊ शकते का?

नक्कीच, शतावरी वनस्पतीची शेती केली जाऊ शकते. किंबहुना जे लोक अशी शेती करतात त्यांच्याकडून औषधे निर्मिती कंपन्या या मुळ्या विकत घेत असतात.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण एक औषधीय वनस्पती असणाऱ्या शतावरी बद्दल माहिती आणि तिचे फायदे जाणून घेतले. तुम्हालाही अजून काही फायदे माहिती असतील, तर ते आम्हाला कमेंट मध्ये लिहून पाठवा. योग्य माहितीला नक्कीच प्रसिद्धी देण्यात येईल. तसेच या माहितीनुसार ज्या ज्या मित्र-मैत्रिणींना शतावरी सेवन करणे गरजेचे आहे, अशांना ही माहिती अवश्य शेअर करा.

धन्यवाद…

Avatar

i am marathi content writer from last 5 years.

Leave a Comment