शलभासनची संपूर्ण माहिती Shalabhasan Information In Marathi

Shalabhasan Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो आज आपण एका योगासना विषयी माहिती घेणार आहोत ज्याचे नाव आहे शलभासन. या शलभासनाला इंग्रजीमध्ये ग्राशॉपर या नावाने ओळखले जाते. हे आसन मनक्याच्या आजारासाठी अतिशय उत्तम समजले जाते.

Shalabhasan Information In Marathi
Shalabhasan Information In Marathi

शलभासनची संपूर्ण माहिती Shalabhasan Information In Marathi

या लेखामध्ये आपण शलभासन कसे केले जावे? त्याचे फायदे काय आहेत याविषयी माहिती दिलेली आहे. सोबतच हे आसन करताना कोणती खबरदारी घेतली पाहिजे याबाबत देखील माहिती दिलेली आहे. चला तर मग सुरवात करूयात या शलभासन योगासनाबद्दल माहिती घ्यायला.

नावशलभासन
प्रकारयोगप्रकार
फायदामणक्याच्या आजारांमध्ये उपयुक्त
कार्यभुकेवर नियंत्रण मिळवणे.

शलभासन करण्याचे फायदे:

शलभासन हे विविध अवयवांना बळकटी देण्याचे कार्य करत असते. मुख्यत्वे पाठीच्या कण्याचा खालील भाग मजबूत करून पाठदुखी सारख्या आजारांवर मात करणे हे शलभासनाचे मुख्य उद्देश आहे.

कटी प्रदेशातील सौम्य दुखणे किंवा पाठीची चकती सरकणे यामध्ये देखील या आसनाचा फायदा होत असतो. मात्र मोठ्या प्रमाणावर हे दुखणे असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करून मगच या आसनाचा वापर करावा अन्यथा दुखणे आणखी वाढू शकते.

या आसनामुळे पोटाचे स्नायू ताणले जातात. तसेच आतड्यांमध्येही ताण पडल्यामुळे पोटाचे आणि आतड्याचे विकार कमी होण्यास मदत होते. तसेच यकृत पोट जठर इत्यादी अवयवांचे कार्य उत्तम रीतीने चालण्याकरिता या आसनाचा फायदा होत असतो.

शलभासन केल्यामुळे व्यक्तीच्या भुकेवर नियंत्रण मिळवता येऊ शकते. शरीराच्या विविध भागातील स्नायूंना रक्तपुरवठा वाढवणे तसेच जड झालेली पाठ रिलॅक्स करणे याकरिता देखील शलभासन फार मोठी भूमिका निभावत असते. शलभासन योग्य रीतीने व्हावे याकरिता यापूर्वी कोणते आसन करावे?

मित्रांनो शलभासन करणे सोयीचे व्हावे याकरिता भुजंगासन म्हणजेच कोब्रा पोज गोमुखासन उर्धवा मुख श्वानासन किंवा अर्धमुखी कुत्रा मुद्रा आणि वीरभद्रासनाची पहिली स्थिती इत्यादी आसने करणे सुचविले जाते.

शलभासन करण्याच्या पद्धती:

मित्रांनो हे आसन करण्याकरिता सर्वप्रथम आपल्या पोटावर झोपावे याकरिता खाली काहीतरी अंथरणे सुचविले जाते. आता आपल्या हाताचे दोन्ही पंजे व दोन्ही पायाचे तळपाय एकमेकांना जोडावे. तळवे व तोंड हातासह वर उचलावे जेणेकरून संपूर्ण भार हा पोटावर येण्यास मदत मिळेल.

हाताचे तळवे यावेळी मात्र मांडीच्या खाली आणि तळहात जमिनीकडे असेल अशा रीतीने ठेवावे. हे आसन करून झाल्यानंतर हळूहळू आपली हनुवटी खाली घेत जमिनीला टेकवावी. काही काळ डोळे मिटून शरीर शांत स्थितीमध्ये ठेवावे.

त्यानंतर पाय हळूहळू शक्य होईल त्या उंचीपर्यंत वर घ्यावे मात्र या दरम्यान शरीर संपूर्ण स्ट्रेच असले पाहिजे. आता दोन्ही हातांनी जमिनीवर पुरेसा दाब देऊन पाय आणखी उचलण्याचा प्रयत्न करावा. ज्यावेळी तुमच्या पूर्ण क्षमतेने तुम्ही पाय वर घेता त्यावेळी या आसनाची ही अंतिम स्थिती समजली जाते. तुमच्या शरीराची जशी क्षमता असेल त्यानुसार कमीत कमी ३० सेकंद तर जास्तीत जास्त ६० सेकंद याच स्थितीमध्ये पाय वर ठेवून थांबावे.

त्यानंतर पुन्हा आपले पाय पूर्वस्थितीत आणत हळूहळू जमिनीकडे घ्यावे.

हे आसन करताना घ्यावयाच्या खबरदारी:

मित्रांनो अनेक आसने खूपच फायदेशीर ठरत असले तरी देखील चुकीच्या व्यक्तींनी किंवा चुकीच्या पद्धतीने हे आसन केल्यास शरीराला अपाय होऊ शकतो आणि नसलेले दुखणे देखील मागे लागू शकते. याकरिता काही खबरदाऱ्या पाळणे खूपच गरजेचे असते. शलभासन करताना कोणकोणत्या खबरदारी घ्याव्यात त्या पुढे दिलेल्या आहेत.

ज्या व्यक्तींना हृदयरोग किंवा हृदयासंबंधी कुठल्याही समस्या असतील अशांना शलभासन न करण्याचा सल्ला दिला जातो.

त्याचप्रमाणे ज्या व्यक्तींना उच्च रक्तदाबाची समस्या असेल त्यांनी देखील हे आसन करू नये कारण हे आसन करताना शरीरातील प्रत्येक अवयवावर ताण पडत असल्याने शारीरिक कष्ट फार लागत असतात. अशावेळी उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना त्रास होऊ शकतो म्हणून त्यांच्यासाठी हे आसन टाळणे चांगले असते.

ज्या लोकांना प्रॅक्टिक अल्सर सारख्या समस्या असतील त्यांनी देखील हे असं करू नये. हर्निया असणाऱ्या रुग्णांना हे आसन न करण्याचा सल्ला दिला जातो. ज्या रुग्णांना आतड्यांचे आजार असतील त्यांनी शलभासन करू नये असे सांगितले जाते.

मित्रांनो हे आसन खूपच फायदेशीर असले तरी देखील योग्य माहितीनुसार व योग्य पद्धतीने जाणकार व्यक्तीच्या देखरेखीत हे आसन करणे खूपच फायदेशीर ठरते कारण शरीरातील विविध अवयव ताणले जात असल्यामुळे त्यातून काही अपाय देखील होणे शक्य असते. अशावेळी प्रशिक्षित व्यक्ती सोबत असेल तर हा धोका कमी केला जाऊ शकतो. आणि योग्य रीतीने या आसनाचा फायदा मिळवता येऊ शकतो.

निष्कर्ष:

मित्रांनो योगासनामुळे आपल्या शरीराला एक वेगळ्याच प्रकारची बळकटी प्राप्त होते. शिवाय लवचिकता देखील मिळते. सोबतच व्यक्तीच्या सर्वांगीण आरोग्याचा देखील विकास केला जातो. वेगवेगळ्या शरीराच्या अवयवांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योगासनांची निर्मिती करण्यात आलेली आहे.

शलभासन या योगासन प्रकाराबद्दल आज आपण माहिती बघितली त्यामध्ये तुम्हाला शलभासन म्हणजे काय त्याचे फायदे काय असतात शलभासन सोयीचे व्हावे म्हणून त्याआधी कुठले असं करावे याच्या पद्धती काय असतात तसेच हे आसन करताना घ्यावयाच्या खबरदारी याविषयी माहिती पाहिली. सोबतच काही नेहमी विचारले जाणारे प्रश्न देखील बघितलेले आहेत.

FAQ

प्रश्न१. शलभासन म्हणजे काय असते?

मित्रांनो शलभासन हे एक योगासनाचा प्रकार असून पिकांवर येणाऱ्या टोळ या कीटकाप्रमाणे यामध्ये शरीराची स्थिती केली जाते. या शलभासनामुळे शरीरातील अनेक अवयव बळकट होण्यास मदत मिळते.  त्याचप्रमाणे पोटाच्या आजारावर देखील हे फायदेशीर ठरते.

शलभासनाचा मुख्य उद्देश काय असतो?

शलभासनामुळे शरीराच्या पाठीच्या कण्यामध्ये असणारे विकार दूर केले जाऊ शकतात तसेच पोटांच्या समस्येमध्ये देखील या शलभासनाचा मोठा फायदा होतो.

शलभासनाला ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे?

या शलभासनाचे मूळ संस्कृतमध्ये सापडते, शलभासन म्हणजे टोळ तर आसन म्हणजे स्थिति होय. यावरून हे शलभासन नाव पडलेले आहे. १९०५ मध्ये प्रकाशित झालेल्या योग सोपान पूर्वकातुस्का मध्ये देखील या आसनाचा उल्लेख आढळून येतो.

शलभासनामुळे काय फायदे होतात?

या आसनामुळे शरीरातील प्रत्येक स्नायू मजबूत होण्यास मदत होते. त्यामध्ये हाताचे, मांड्यांचे, नितंबाचे, पायाचे आणि पोटाच्या स्नायूचा समावेश होतो. तसेच या आसनामुळे खांद्याचे, ओटी पोटाचे, छातीचे, मांडीचे स्नायू, ताणले जात असल्यामुळे स्ट्रेचिंग देखील होते.

शलभासन न करण्याचा सल्ला कोणाला दिला जातो?

ज्या व्यक्तींना हृदयाच्या समस्या किंवा उच्च रक्तदाब असेल त्यांनी हे आसन करू नये तसेच अल्सर, हर्निया, आतड्या संबंधित असलेला टीबी इत्यादी आजार असतील तरीदेखील या आसनाच्या वाटे जाऊ नये.

मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण शलभासन या योग्य प्रकाराबद्दल माहिती बघितली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला आवर्जून कळवा. तसेच तुम्ही योगासन करता का व त्यातील कुठले कुठले प्रकार तुम्हाला करता येतात याविषयी देखील आमच्या सोबत चर्चा करा आणि ही माहिती आपल्या इतरही मित्र-मैत्रिणींना शेअर करा. जेणेकरून त्यांना देखील या योगासनाची माहिती होईल.

धन्यवाद!!!

Avatar

i am marathi content writer from last 5 years.

Leave a Comment