वैज्ञानिकची संपूर्ण माहिती Scientist Information In Marathi

Scientist Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रानो कुठलाही देश पुढे घेऊन जायचा असेल तर त्या देशाने सर्वच क्षेत्रात प्रगती करणे गरजेचे असते, आणि त्यातही विज्ञान आणि अंतराळ क्षेत्रामध्ये खूपच प्रगती करणे गरजेचे असते. आणि या कामी प्रत्येक देशाचे शास्त्रज्ञ अहोरात्र मेहनत करत असतात. जागतिक स्तरावर असंख्य शास्त्रज्ञ होऊन गेले, त्यामध्ये भारतीय शास्त्रज्ञ देखील आघाडीवर आहेत. ज्यांनी विज्ञानाचा सर्व क्षेत्रांमध्ये विविध शोध लावून मानवाचे जीवन सुसह्य केले.

Scientist Information In Marathi

वैज्ञानिकची संपूर्ण माहिती Scientist Information In Marathi

शून्याचा शोध असो की गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध असो, मानवाला जीवन जगण्यासाठी सुसह्य करणारे अनेक शोध आपल्या या शास्त्रज्ञांनीच लावलेले आहेत. ‘विज्ञानात काहीही अशक्य नसते’ जणू असेच ब्रीदवाक्य घेऊन हे शास्त्रज्ञ नवनवीन शोधांसाठी दिवस रात्र झटत असतात. निसर्गामध्ये सतत बदल होत असतात, त्याचे आकलन करत हे शास्त्रज्ञ नवनवीन सिद्धांत मांडत असतात.

जगभरात अनेक महत्त्वाचे शास्त्रज्ञ होऊन गेले असले, तरी देखील भारतही यामध्ये पाठीमागे नाही. भारतातील जगदीश चंद्र बोस, डॉक्टर सी व्ही रमण, होमी भाभा, डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम, विक्रम साराभाई यांसारखे अनेक दिग्गज शास्त्रज्ञांनी लावलेले शोध जगभर प्रसिद्ध झाले.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण शास्त्रज्ञाबद्दल माहिती बघणार आहोत…

 • भारतीय शास्त्रज्ञांची यादी:
 • डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम
 • डॉक्टर होमी जहांगीर भाभा
 • डॉक्टर सी व्ही रमण
 • के एस कृष्णन
 • डॉक्टर वसंत गोवारीकर
 • मेघानंद सहा
 • बिरबल सहानी
 • जानकी अंमल
 • जगदीश चंद्र बोस
 • विक्रम साराभाई
 • विजय भटकर
 • तेजपाल सिंग
 • डॉक्टर सी एन आर राव
 • सत्येंद्रनाथ बोस
 • जयंत नारळीकर
 • वेंकटरमण राधाकृष्णन
 • नरेंद्र करमरकर
 • शंकर आबाजी भिसे

१. डॉ. सी व्ही रमण:

दिनांक ७ नोव्हेंबर १८८८ रोजी तामिळनाडूच्या तिरुचिरापल्ली या गावात असाधारण बुद्धीच्या एका बालकाचा जन्म झाला, ज्यांना आपण सर्वजण आज डॉ. सी व्ही रमण म्हणून ओळखतो. त्यांचे संपूर्ण नाव चंद्रशेखर व्यंकट रमण होते. भारत सरकारने त्यांच्या कार्याच्या सन्मानार्थ राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यास सुरुवात केली आहे. डॉक्टर सी व्ही रमण यांनी दिनांक २८ फेब्रुवारी रोजी त्यांचा रमण परिणाम सर्वत्र जगजाहीर केला होता.

त्यांच्या या शोधाच्या सन्मानार्थ २८ फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी डॉक्टर सी व्ही रमण यांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली होती. यावरून त्यांच्या बुद्धीची कल्पना केली जाऊ शकेल. त्यानंतर त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षीच एफ ए ही परीक्षा चांगल्या गुणांसह आणि शिष्यवृत्तीसह उत्तीर्ण केली.

डॉक्टर सी व्ही रमण यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यातील नोबेल पुरस्कार हा त्यांचा अतिशय महत्त्वाचा आणि मानाचा पुरस्कार समजला जातो. हा पुरस्कार त्यांना भौतिक शास्त्रातील अनन्य साधारण कामगिरीसाठी इसवी सन १९३० मध्ये मिळाला होता पुढे १९५४ साली भारत सरकारचा सर्वोच्च पुरस्कार समजला जाणारा भारतरत्न देखील त्यांना प्राप्त झाला.

२. डॉ. विक्रम साराभाई:

मित्रांनो, विक्रम अंबालाल साराभाई या पूर्ण नावाने ओळखले जाणाऱ्या या भारतीय  शास्त्रज्ञांचा जन्म गुजरात मधील अहमदाबाद येथे दिनांक १२ ऑगस्ट १९१९ रोजी अहमदाबाद मधील मोठे प्रस्थ असणाऱ्या प्रसिद्ध अश्या साराभाई कुटुंबात झाला.  या व्यक्तिमत्वाची खासियत म्हणजे हे भौतिकशास्त्रज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ तर होतेच मात्र त्यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मुख्य भूमिका घेत आपले मोठे योगदान सुद्धा दिले होते.

डॉ. विक्रम साराभाईंनी कम्युनिटी सायन्स सेंटरची १९१६ मध्ये स्थापना करून एक मोलाची भूमिका पार पाडली. तसेच त्यांनी इस्रो या संस्थेच्या स्थापणेतही मोलाचा हातभार लावला होता.

३. डॉ. होमी जहांगीर भाभा:

भारतीय परमाणू आयोगाचे प्रथम अध्यक्ष अशी ओळख असणाऱ्या होमी भाभा यांचा जन्म मुंबईत दिनांक ३० ऑक्टोबर १९०९ मध्ये झाला. भारतीय भौतिकशास्त्रज्ञ असणाऱ्या भाभा यांनी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च आणि भाभा अटॉमीक रिसर्च इन्स्टिट्यूट  या दोन महत्त्वपूर्ण संस्थांची स्थापना केली. भारतीय न्यूक्लिअर प्रोग्राम चे जनक समजले जाणाऱ्या भाभा यांनी क्वांटम थेअरी मध्ये सुद्धा महत्त्वाची भूमिका पार पाडली.

डॉक्टर होमी भाभा यांना पद्मविभूषण हा भारत सरकारचा पुरस्कार मिळालेला आहे.

४. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम:

मित्रांनो, डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे नाव जरी घेतले तरी आपल्या डोळ्यासमोर मधून भांग पाडलेली आणि चेहऱ्यावर नेहमी जिज्ञासा आणि हसू असणारी एक मूर्ती समोर येते. सर्वगुणसंपन्न असलेल्या अब्दुल कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ रोजी तामिळनाडूच्या रामेश्वरम या गावी झाला. भारतीय शास्त्रज्ञ, अंतराळ शास्त्रज्ञ, राष्ट्रपती अशा वेगवेगळ्या भूमिका बजावत असताना त्यांनी या सर्वच पदांना योग्य न्याय दिला.

डॉक्टर अब्दुल कलाम यांनी इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्त्रोमध्ये बरीच वर्षे काम करून उपग्रह क्षेत्रामध्ये मोठी क्रांती घडवून आणली. सोबतच त्यांनी डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन अर्थात डीआरडीओ येथे एरोस्पेस इंजिनियर म्हणून कार्य करताना भारताला मिसाईलच्या बाबतीत स्वयंपूर्ण केले. म्हणून त्यांना भारताचे मिसाईल मॅन म्हणून देखील ओळखले जाते. भारताचे ११ वे राष्ट्रपती म्हणून त्यांनी २००२ ते २००७ या कालावधीमध्ये पदभार सांभाळला.

मित्रांनो, भारतरत्न पुरस्कार प्राप्त असलेल्या डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना भारताच्या पहिल्या वहिल्या स्वदेशी उपग्रह प्रक्षेपण वाहन बनविण्यासाठी प्रकल्प संचालक पदाची जबाबदारी देण्यात आली होती, ती त्यांनी लीलया पार पाडत रोहिणी नावाचा उपग्रह यशस्वीरीत्या पृथ्वीच्या कक्षेत सोडला होता.

५. डॉ. जगदीशचंद्र बोस:

मित्रांनो, जन्माने बंगाली असणाऱ्या जगदीश चंद्र बोस यांचा जन्म पश्चिम बंगालच्या विक्रमपूर या गावात दिनांक ३० नोव्हेंबर १८५८ या दिवशी स्वातंत्र्यपूर्व काळात झाला. डॉक्टर जगदीश चंद्र बोस हे विविध क्षेत्रांमध्ये कार्य करणारे शास्त्रज्ञ होते. त्यांनी भौतिकशास्त्र, जैवशास्त्र, आणि वन्यजीव शास्त्र इत्यादी क्षेत्रांमध्ये बहुमूल्य कार्य केले.

त्यांना रेडिओचा पिता म्हणून ओळखले जाते, कारण त्यांनी रेडिओ आणि मायक्रोवेव या दोन उपकरणांच्या ऑप्टिक्स वर महत्त्वाचे संशोधन केले होते, ज्यासाठी त्यांना अमेरिकेचे पेटंट देखील मिळालेले आहेत. या बरोबरच त्यांनी वनस्पतींचा देखील चांगला अभ्यास केला. त्यांनी वनस्पतींना देखील भावना असतात असा सिद्धांत मांडला होता.

 जगदीश चंद्र बोस यांना जागतिक पातळीवरील सर्वात मोठ्या पुरस्काराने म्हणजेच नोबेल पुरस्काराने इसवी सन १९०९ मध्ये गौरविण्यात आले होते.

निष्कर्ष:

मित्रांनो, देश कुठलाही असो प्रगतीसाठी शास्त्रज्ञांचे महत्त्व वारंवार अधोरेखित झालेले आहे. शास्त्रज्ञाविना देश नवनवीन प्रगती करूच शकत नाही. ज्या देशात शास्त्रज्ञांना स्थान दिले जात नाही तो देश साधी उपग्रह सोडण्यासाठी देखील इतर देशांवर अवलंबून राहतो. भारताचा विचार करता भारत देश हा शास्त्रज्ञांनी समृद्ध असा देश आहे. भारतीय शास्त्रज्ञांनी परदेशी जाऊन देखील आपल्या कार्याचा अटकेपार झेंडा लावलेला आहे.

FAQ

दुर्बिणीचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला?

दुर्बिणीचा शोध गॅलिलिओ गॅलिली या शास्त्रज्ञाने लावला.

सर आयझॅक न्यूटन यांनी कुठला शोध लावला?

सर आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला.

शास्त्रज्ञ होण्यासाठी कुठल्या विषयाचा अभ्यास महत्त्वाचा असतो?

शास्त्रज्ञ होण्यासाठी विज्ञान विषयातील सर्वच उप विषयांचा अभ्यास महत्त्वाचा असतो.

प्राण्यांविषयीचे संशोधन करणाऱ्या लोकांना देखील शास्त्रज्ञ म्हणता येते का?

होय, प्राणी संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांना प्राणी शास्त्रज्ञ किंवा झूलॉजिस्ट असे म्हणून ओळखले जाते.

चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञांचा जन्म केव्हा झाला?

चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञांचा जन्म १२ फेब्रुवारी १८०९ रोजी झाला.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण भारतीय शास्त्रज्ञांविषयी संक्षिप्त स्वरूपामध्ये माहिती पाहिली. शालेय मुलांना निबंध लेखनासाठी या माहितीचा नक्कीच उपयोग होईल.

 धन्यवाद…

Vaishnavi Raut

वैष्णवी राउत (Vaishnavi Raut) हि एक content writer असून यांना पोस्ट लिहिण्याचा ३ वर्षांचा अनुभव आहे. यांचे शिक्षण बी.एसस्सी Agri.झाले असून ती मराठी भाषेत अचूक लेखनाचे कार्य करतात.

Leave a Comment