संताची संपूर्ण माहिती Sant Information In Marathi

Sant Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे असे आपण अनेकदा ऐकले किंवा कुठेतरी वाचले तरी नक्कीच असेल, कारण महाराष्ट्र मध्ये अगदी प्राचीन काळापासून आजतागायत अनेक संत होऊन गेले. त्यांनी अनेक चमत्कार केले तसेच बऱ्याचशा संतांनी अनेक संत साहित्याची रचना केली. तसेच आरत्या आणि संस्कृत काव्य देखील रचली. संत म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव, संत गोरोबा कुंभार इत्यादी संत येतात, कारण या संतांचे महाराष्ट्रासाठी योगदान खरोखरच अमूल्य असे आहे.

Sant Information In Marathi

संताची संपूर्ण माहिती Sant Information In Marathi

मित्रांनो आज जग विज्ञानाच्या माध्यमातून कितीही पुढे गेले असले तरी देखील मानवाला चांगल्या मार्गावर वागविण्याचे शिकवायला संतांचीच गरज भासते. संत आपल्या प्रेमळ वाणीने तर प्रसंगी कठोर उपदेशाने जन माणसांमध्ये विविध मूल्य रुजविण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे काळ कुठलाही असो संतांची गरज ही भासतेच.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण महाराष्ट्रातील विविध संतांबद्दल माहिती घेणार आहोत…

नाव: संत
कार्य: समाज सुधारणा
जीवन: वैरागी, संन्यासी
ध्येय:रामनाम जपत मुक्ती मिळवणे
प्रकार: देवसंत, अघोरी संत, देवालाशी संत

संत नामदेव:

मित्रांनो, संत कबीरांच्या जन्मापूर्वी सुमारे १३० वर्ष आधी संत नामदेव यांचा जन्म झाला होता. महाराष्ट्र मधील सध्याच्या सातारा या जिल्ह्यातील नरसी बामणी गावांमध्ये संत नामदेव जन्माला आले. त्यांच्या गुरूंचे नाव विसोबा खेचर हे होते. संत कबीरांच्या पूर्वी जन्मल्यामुळे कबीरांच्या अनेक स्त्रोतांमध्ये आणि गुरु ग्रंथ साहेब या ग्रंथांमध्ये सुद्धा संत नामदेवांचा उल्लेख आढळून येतो.

संत संत नामदेवांचा जन्म इसवी सन १२६७ मध्ये झाला होता. त्यांनी महाराष्ट्रापासून अगदी उत्तरेस पंजाब पर्यंत आपले संत कार्य पोहोचवले होते. हरिनामाचा प्रचंड व्यासंग असलेले संत नामदेव जनतेला ब्रह्मविद्या शिकवत असत आणि सर्वत्र तिचा प्रसार करत असत.

संत ज्ञानेश्वर:

मित्रांनो, अहमदनगर जिल्ह्यामधील पैठण या शहराजवळील आपेगाव या छोट्याशा गावांमध्ये संत ज्ञानेश्वर यांचा जन्म झाला, तो दिवस होता माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीचा, आणि साल होतं १२७५. मित्रांनो त्याकाळी भगवद्गीता प्रत्येकालाच वाचता येत नसे, भगवद्गीतेला सर्वांसाठी खुले करण्यासाठी संत ज्ञानेश्वरांनी आपल्या गुरूच्या आज्ञेनुसार ज्ञानेश्वरी या ग्रंथाची निर्मिती केली. ज्ञानेश्वरी मध्ये तब्बल दहा हजार श्लोक आहेत.

मित्रांनो महाराष्ट्रामध्ये विविध संतांनी अनेक संप्रदायांची निर्मिती केली त्यामध्ये दत्त महाराज संप्रदाय, नाथ संप्रदाय, समर्थ संप्रदाय, महानुभाव संप्रदाय यांसह इतरही अनेक संप्रदाय आणि पंथ बघायला मिळतात. त्यातील भागवत भक्ती संप्रदायाची निर्मिती संत ज्ञानेश्वरांनीच केलेली आहे. याच संप्रदायाला वारकरी भक्ती संप्रदाय म्हणून देखील ओळखले जाते. संत ज्ञानेश्वरांनी १२९६ मध्ये अतिशय कमी वयात समाधी घेतली.

संत एकनाथ:

मित्रांनो, महाराष्ट्रातील प्रमुख संतांमध्ये संत नामदेव यांच्यानंतर एकनाथांचे नाव अतिशय आदराने घेतले जाते. या संतांचा देखील जन्म पैठण येथेच गोदावरी काठी इसवी सन १५३३ मध्ये झाला. संत एकनाथ हे ब्राह्मण वर्णाचे होते, मात्र तरी देखील त्यांना जाती व्यवस्था मान्य नव्हती, त्यामुळे तत्कालीन जाती बांधवांनी त्यांना वाळीत टाकले होते. संत एकनाथांनी अनेक संत रचना केलेल्या आहेत, ज्यामध्ये भागवत पुराणाचा अनुवाद खूप प्रसिद्ध आहे. संत एकनाथांनी १५९९ मध्ये या जगाचा निरोप घेतला.

संत तुकाराम:

मित्रांनो, तुकोबा या प्रेमळ नावाने वारकरी संप्रदायात प्रसिद्ध असणारे संत म्हणजे संत तुकाराम होय. वारकरी संप्रदायातील एक उल्लेखनीय संत तर होतेच शिवाय सोबतच उत्तम कवी देखील होते. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील देहू या ठिकाणी झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव बोल्होबा तर आईचे नाव कनकाई देवी असे होते. संत तुकाराम महाराजांच्या जन्मतारखेबाबत एक मत नसले तरी देखील १५७७, १६०२, १६०७, १६०८, आणि १६१८ यापैकी त्यांचे जन्मदिवस समजले जातात.

समर्थ रामदास:

मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समकालीन असणारे संत म्हणजे समर्थ रामदास होय. त्यांचा जन्म सध्याच्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये इसवी सन १६०८ साली झाला, त्यांचे संपूर्ण नाव नारायण सूर्याजी कुलकर्णी असे होते. त्यांच्या आईचे नाव राणूबाई असे होते. समर्थ रामदास हे रामाचे खूप मोठे भक्त असल्यामुळे त्यांना रामाचा दास म्हणून रामदास असे नाव पडले.

तसेच समर्थ रामदास हे पवनपुत्र हनुमान यांचे देखील फार मोठे उपासक होते. अनेक संदर्भानुसार समर्थ रामदासांना छत्रपती शिवाजी महाराजांची गुरु म्हटले जाते. समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भेटींचे अनेक पुरावे देखील सापडतात.

समर्थ रामदास हे अगदी साधेपणाने जगत असत, ते नेहमी बलवान होऊन शक्तीची उपासना करा असा संदेश देत. त्यासाठी त्यांनी गावोगावी हनुमानाचे मंदिर आणि शेजारीच व्यायाम शाळा सुरू केल्या, शरीर उपासनेची प्रचंड आवड असल्याने ती नेहमी लंगोटी मध्ये वावरत. अशा या महान संतांनी इसवी सन १६८१ मध्ये वयाच्या ७३ व्या वर्षी किल्ले सज्जनगड येथे जिवंत समाधी घेतली, आणि आपली इहलोकीची यात्रा संपवली.

निष्कर्ष:

मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रातील विविध संतान बद्दल माहिती घेतली. मित्रांनो, विज्ञान जर गाडीचा एक चाक असेल तर दुसरे चाक म्हणजे अध्यात्म असं म्हटलं जातं. कारण वैज्ञानिक शोधाने माणूस कितीही पुढे गेला तरी देखील माणसाला कसं जगायचं हे शिकवण्याचं काम अध्यात्मच करत असतं. आणि हे अध्यात्म प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम संत करत असतात.

मित्रांनो, महाराष्ट्रातील संत आपल्या विविध चमत्कारांतून किंवा उपदेशातून सामान्य जनतेला जगण्याचा मूलमंत्रण शिकवत असत, आणि त्यातून बोध घेत माणसे देखील योग्य रीतीने वागत असत. त्यामुळे समाजामध्ये एक चांगली शिस्त राहण्यास मदत मिळत असे. तसेच समाज निकोप रीतीने मिळून मिसळून वागत असे.

आजकालची संत पैशांकडे आकर्षित झाल्यामुळे ते जनतेला शिस्त लावण्याचे विसरून गेले आहेत. त्यामुळे आजकाल समाज वेडा वाकडा वागायला लागला आहे. समाजात अनैतिक गोष्टींचे प्रमाण वाढले आहे, गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे, या सगळ्या गोष्टी संतांच्या शिकवणी द्वारे निश्चितच कमी केल्या जाऊ शकतात. मात्र त्यासाठी चांगल्या संतांची आजच्या समाजाला गरज आहे.

महाराष्ट्रातील संतांची माहिती मराठी भाषेत | Sant Eknath information in Marathi |संत एकनाथ जीवन परिचय

#maharashtra #information

FAQ

महाराष्ट्रातील काही प्रमुख संत कोणते?

महाराष्ट्र मध्ये संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम, समर्थ रामदास, संत जनाबाई, संत चोखामेळा, संत बहिणाबाई इत्यादी प्रमुख संत होऊन गेले.

संतांचे मुख्य कार्य कोणते?

जन सामान्यतील गोरगरीब जनतेचे प्रबोधन करणे, आणि त्यांना अध्यात्मीक मार्गावर वळविणे हे संतांचे कार्य आहे.

जीवनामध्ये संतांचे महत्त्व किती असते?

मित्रांनो, हिंदू म्हणून जन्म घेतला तर आयुष्याच्या वाटेवरून प्रवास करताना आपल्या इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी संत नावाच्या वाटाड्याची गरज भासतेच. संताच्या सानिध्यात माणूस जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होऊन मुक्ती मार्गाला लागतो.

महाराष्ट्रीयन संतांचे काय महत्त्व आहे?

खऱ्या महाराष्ट्रीयन संतांनी लोकांना जुन्या वाईट प्रथापरांपरा सोडून देऊन वारकरी वसा घेण्याचे आणि समतेने वागण्याचे शिकविले, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये संत परंपरा निर्माण होण्यास मदत झाली.

वारकरी संप्रदायातील काही महत्त्वाच्या स्त्री संत कोण होत्या?

संत जनाबाई, संत बहिणाबाई, संत मुक्ताबाई, संत अक्काबाई, संत मीराबाई, आणि संत कान्होपात्रा या काही वारकरी संप्रदायातील निवडक स्त्री संत होत्या.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण महाराष्ट्रातील संतांबद्दल माहिती पाहिली. ती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट द्वारे कळवा. तसेच आपल्या इतरही अध्यात्मिक मित्र मैत्रिणींना या माहितीचा आस्वाद घेता यावा यासाठी त्यांना शेअर करा.
धन्यवाद…

Siddharth Tambe

सिद्धार्थ तांबे (Siddharth Tambe) हे एक content writer असून यांना पोस्ट लिहिण्याचा ३ वर्षांचा अनुभव आहे. यांचे शिक्षण बी.एसस्सी Agri.झाले असून ते मराठी भाषेत अचूक लेखनाचे कार्य करतात.

Leave a Comment