संत गाडगे महाराज यांची संपूर्ण माहिती Sant Gadge Maharaj Information In Marathi

Sant Gadge Maharaj Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो महाराष्ट्र या भूमीमध्ये अनेक समाजसुधारक होऊन गेले. त्यांनी समाजाला चांगल्या वळणावर घेऊन जाण्याचे महतकार्य केलेले आहे. या समाजसुधारकांमध्ये संत गाडगेबाबा यांचा देखील नंबर लागतो. महाराष्ट्र मधील स्वच्छतेचे भोक्ते असणारे सर्वोत्कृष्ट समाज सुधारक म्हणून संत गाडगे बाबांना ओळखले जाते. त्यांनी समाजामध्ये अनेक विधायक बदल घडून आणले. देशाला परोपकाकाराची आणि स्वच्छतेची शिकवण देण्यात गाडगेबाबा आग्रही होते. आज जगभरातील अनेक लोक संत गाडगेबाबा यांच्या विचारांनी प्रेरित झालेले आहेत.

Sant Gadge Maharaj Information In Marathi

संत गाडगे महाराज यांची संपूर्ण माहिती Sant Gadge Maharaj Information In Marathi

संत गाडगेबाबांच्या महान कार्याची आठवण राहावी म्हणून अनेक शाळा, महाविद्यालय किंवा विविध संस्थांना आणि योजनांना गाडगेबाबा यांचे नाव देण्यात आलेले आहे. भारत सरकारने त्यांच्या नावाने विविध स्वच्छता व पाण्यासाठीचे राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार देखील सुरू केलेले आहेत. इतकेच काय तर अमरावती येथिल विद्यापीठाला संत गाडगेबाबा यांचे नाव देण्यात आलेले आहे. महाराष्ट्र सरकारने देखील संत गाडगेबाबा यांच्या स्मरणार्थ संत गाडगेबाबा ग्राम स्वछता अभियान सुरू केलेले आहे.

अशा या थोर व्यक्तिमत्व असणाऱ्या संत गाडगेबाबा यांच्या जीवनचरित्राबद्दल आज आपण माहिती बघणार आहोत…

नावसंत गाडगे महाराज
संपूर्ण नावडेबूजी झिंगराजी जानोरकर
आईसखुबाई जानोरकर
वडीलझिंगराजी जानोरकर
जन्म दिनांक२३ फेब्रुवारी १८७६
जन्म स्थळशेंडगाव, महाराष्ट्र
ओळखअध्यात्मिक गुरू आणि समाजसुधारक
मृत्यू दिनांक२० डिसेंबर १९५६
मृत्यूचे ठिकाणअमरावती

मित्रांनो, महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यामध्ये असणाऱ्या सुरजी तालुक्यातील अंजन येथील शेगाव नावाच्या गावामध्ये एका गरीब धोबी कुटुंबामध्ये संत गाडगे महाराज यांचा जन्म झाला. तो दिवस होता २३ फेब्रुवारी १८७६. आई सखुबाई आणि वडील झिंगराजी हे त्यांचे पालक होते. गाडगे महाराजांचे खरे नाव देविदास होते, ज्यांना लहानपणी लाडाने सर्वजण डेबूजी म्हणत असत. मात्र पुढे त्यांच्या कार्यावरून त्यांना संत गाडगेबाबा असे नाव पडले.

संत गाडगेबाबा यांची समाजसेवा:

मित्रांनो, संत गाडगेबाबा यांनी स्वच्छता क्षेत्रामध्ये खूप मोठी समाजसेवा केलेली आहे, हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. मात्र यासाठी त्यांनी कधीही कोणाची मदत मागितली नाही. ते या सगळ्या गोष्टी स्वयंस्फूर्तीने करत असत. इसवी सन १९०५ या वर्षी त्यांनी पीडलेल्या लोकांना मदत करावी यासाठी घर सोडले, ते कायमचेच. त्यांनी आयुष्यभर दया, बंधुता, करुणा, मानव कल्याण, समरुपता इत्यादी मूल्यांची जपणूक करून या सर्व मूल्यांचा आपल्या जीवनामध्ये अंगीकार केला.

लहानपणापासून गाडगे महाराजांना स्वच्छतेचा फार व्यासंग होता. ते जिथे जात तिथे कुठलीही घाण दिसली की आपल्याजवळील झाडू व गाडग्याच्या साह्याने ती घाण साफ करत असत. यामुळे तेथील लोक त्यांच्यावर खुश होऊन त्यांचे कौतुक करत, आणि त्यांना काही पैसे देखील देत. जे पैसे गाडगे महाराज इतर ठिकाणच्या स्वच्छतेच्या कार्यासाठी आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी खर्च करत असत.

मित्रांनो, गाडगे महाराजांनी भौतिक सुखाच्या पलीकडे जीवन जगले होते. त्यांनी कधीही आयुष्य मौजमजेसाठी खर्चले नाही. त्यांनी अनेक गावांमध्ये शाळा, दवाखाने, धर्मशाळा, प्राण्यांसाठी निवारास्थान इत्यादी गोष्टींची निर्मिती केली, मात्र स्वतःसाठी कधी साधी झोपडी देखील बांधली नाही. यावरून त्यांचा परोपकार दिसून येतो.

दिवसभर स्वच्छता केल्यानंतर संत गाडगेबाबा तेथील लोकांना गोळा करून संध्याकाळच्या वेळी प्रवचन अथवा कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करत असत. यातून ते लोकांना स्वच्छतेचा तर संदेश देतच असत, मात्र अंधश्रद्धेमुळे लोकांचे कसे नुकसान होत आहे, आणि लोकांनी समाज हित कसे जोपासले पाहिजे याबाबत मार्गदर्शन देखील करत.

संत गाडगेबाबा यांच्या विषयी माहिती:

मित्रांनो, संत गाडगेबाबा यांचा जन्म अमरावती मध्ये झाला असला, तरी देखील त्यांचे बालपण हे मूर्तीजापूर या तालुक्यामधील दापुरी या त्यांच्या आजोळी गेले. तेथे शेती आणि जनावरे यांचा त्यांना लळा लागला होता.

पुढे १८९२ यावर्षी त्यांनी लग्न केले, आणि त्यातून त्यांना तीन अपत्य झाली. नंतर काही वर्ष संसारीक जीवन व्यतीत केल्यानंतर त्यांनी समाजाची पूर्णवेळ सेवा करता यावी यासाठी दिनांक १ फेब्रुवारी १९०५ या दिवशी आपले घरदार सोडून पूर्ण वेळ समाजाच्या सेवेसाठी स्वतःला झोकून दिले.

पुढे आयुष्यभर त्यांनी समाजासाठी स्वच्छता करणे, आणि मिळालेल्या काही पैशातून समाजासाठीच उपयोगी गोष्टी तयार करणे यासाठी उभे आयुष्य वेचले.

त्यांच्या कीर्तन करण्याच्या पद्धती सर्वांनाच आवडत असत, त्यामुळे लोक अगदीच तल्लीन होऊन त्यांची कीर्तने ऐकत. त्यांना प्राण्यांची हत्या करणे याचा नेहमी राग यायचा, त्यामुळे त्यांनी आपल्या विविध प्रवचनांमध्ये प्राण्यांचे कत्तल करू नका, दारूपायी आपले आयुष्य बरबाद करू नका, शिक्षण घेऊन भौतिक गोष्टींना न कवटाळता प्रगती करा, आणि चांगल्या आरोग्यासाठी नेहमी स्वच्छता राखा इत्यादी प्रकारचे संदेश दिले.

मित्रांनो, आयुष्यभर समाजासाठी जगणारे हे व्यक्तिमत्व दिनांक २० डिसेंबर १९५६ या दिवशी अनंतात विलीन झाले, मात्र जाताना त्यांनी स्वच्छतेच्या संदेशारुपी वारसा मागे ठेवला. आज त्यांच्या या कार्याची संपूर्ण जगाने दखल घेतलेली आहे.

निष्कर्ष:

मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक समाजसुधारक होते, ज्यांच्यामुळे समाज एका विशिष्ट वळणाला धरून राहण्यास मदत झाली. वेगवेगळ्या समाजसुधारकांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्य केले होते, जसे काहींनी शिक्षण क्षेत्रात काम केले, काहींनी अल्पवयीन विवाहांना रोखले, तर काहींनी समाजातील वाईट प्रवृत्तींचा नाश केला. तसेच एक समाज सुधारक म्हणजे संत गाडगेबाबा होय.

ज्यांनी स्वच्छता हे आपले समाजसुधारणेचे क्षेत्र निवडले. त्यांनी समाजातील प्रत्येक ठिकाणी स्वच्छता नांदावी, आणि सगळीकडे आनंदी आनंद पसरावा यासाठी स्वतः झाडू घेऊन स्वच्छतेचे कार्य केले. ते हातामध्ये गाडगे किंवा मातीचे भांडे घेऊन स्वच्छतेचे कार्य करत असत, त्यामुळे त्यांना संपूर्ण समाज हा गाडगेबाबा म्हणून ओळखत असे. हल्ली सुद्धा त्यांना डेबुजी झिंगराजी जानोरकर म्हणून ओळखण्याऐवजी सगळे लोक संत गाडगेबाबा या नावानेच ओळखतात.

मित्रांनो, त्यांनी केवळ स्वच्छतेचे कार्य केले असले तरीदेखील त्यांचे हे कार्य काही सोपे नव्हते. त्यांनी स्वच्छता करताना अनेक टीका-टिप्पण्यांचा सामना केला, मात्र त्यांनी आपले कार्य कोणालाही न जुमानता चालूच ठेवले, आणि पुढे जाऊन लोकांना स्वच्छतेचे महत्व पटले. परिणामी सगळीकडे स्वच्छता नांदण्यास मदत झाली, आणि स्वच्छतेमुळे आरोग्य आले. अशा या गाडगेबाबा बद्दल आज आपण माहिती पाहिलेली आहे.

FAQ

थोर समाजसुधारक श्री गाडगेबाबा यांचे संपूर्ण नाव काय आहे?

थोर समाज सुधारक श्री गाडगेबाबा यांचे संपूर्ण नाव डेबुजी झिंगराजी जानोरकर असे होते.

संत गाडगेबाबा यांचा जन्मदिवस अर्थात जयंती केव्हा असते?

संत गाडगेबाबा यांचा जन्मदिवस अर्थात जयंती २३ फेब्रुवारी या दिवशी असते. या दिवशी १८७६ साली त्यांचा जन्म झाला होता.

संत गाडगेबाबा यांच्या आई वडिलांचे नाव काय काय होते?

संत गाडगेबाबा यांच्या आईचे नाव सखुबाई तर वडिलांचे नाव झिंगराजी असे होते.

संत गाडगे बाबा यांनी आपले पदत्याग करून साधक अवस्था केव्हा धारण केली?

संत गाडगेबाबा यांनी आपले पदत्याग करून इसवी सन १९०५ मध्ये साधक अवस्था धारण केली.

संत गाडगेबाबा प्रवचन कीर्तन करत असताना कोणाच्या दोह्यांचा वापर करत?

संत गाडगेबाबा प्रवचन कीर्तन करत असताना कबीर यांच्या दोह्यांचा वापर करत असत.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण स्वच्छता दूत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत गाडगेबाबा या थोर समाजसुधारकाबद्दल माहिती पाहिली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट मध्ये तुम्ही नक्की कळवा, आणि सोबतच आपल्या इतरही मित्र-मैत्रिणींना स्वच्छतेचे महत्त्व पटावे म्हणून ही माहिती नक्की शेअर करा.

धन्यवाद…

Avatar

i am marathi content writer from last 5 years.

Leave a Comment