सचिन तेंडुलकर यांची संपूर्ण माहिती Sachin Tendulkar Information In Marathi

Sachin Tendulkar Information In Marathi नमस्कार मित्रांनो, क्रिकेटचा देव किंवा क्रिकेटचा बादशहा म्हणून सर्व परिचित आणि प्रसिद्ध असणारा खेळाडू म्हणजे सचिन तेंडुलकर. भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार असणारा आणि एक उत्कृष्ट फलंदाज असणारा सचिन तेंडुलकर यांच्याकडे सर्वात जास्त क्रिकेट रेट केलेल्या धावा हा विक्रम असून सध्या अभिनेता म्हणून विविध जाहिरातीमध्ये देखील सचिन तेंडुलकर आपणास बघावयास मिळतो.

Sachin Tendulkar Information In Marathi

सचिन तेंडुलकर यांची संपूर्ण माहिती Sachin Tendulkar Information In Marathi

भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार समजला जाणारा भारतरत्न हा पुरस्कार प्राप्त असणारा हा खेळाडू प्रत्येक भारतीयांच्या मनावर राज्य करत होता, आणि इथून पुढे देखील राज्य करत राहील. इतर खेळाडू येतात, खेळतात, आणि विस्मरणात जातात. मात्र क्रिकेट विश्वातील एक सच्चा खेळाडू म्हणून सचिन तेंडुलकर हे नाव नेहमीच लोकांच्या लक्षात राहत आहे.

आजच्या भागामध्ये आपण सचिन तेंडुलकर या क्रिकेट विश्वातील देव अर्थात मास्टर ब्लास्टर समजल्या जाणाऱ्या व्यक्तीबद्दल माहिती बघणार आहोत…

संपूर्ण नावसचिन रमेश तेंडुलकर
इतर नावेक्रिकेटचा देव, क्रिकेटचा बादशाह, मास्टर ब्लास्टर, लिटिल मास्टर
जन्म दिनांक२४ एप्रिल १९७३
सध्याचे वय५० वर्षे (२०२३)
वडिलांचे नावरमेश तेंडुलकर
वडिलांचा व्यवसायमराठी लेखक (कादंबरी)
आईचे नावरजनी तेंडुलकर
भावंडभाऊ- अजित व नितीन तेंडुलकर; बहीण- सविता तेंडुलकर
पत्नीचे नावअंजली तेंडुलकर
अपत्येमुलगा- अर्जुन तेंडुलकर; मुलगी- सारा तेंडुलकर

मित्रांनो, मुंबईचे एक उपनगर समजल्या जाणाऱ्या दादर या ठिकाणी २४ एप्रिल १९७३ या दिवशी रजनी आणि रमेश तेंडुलकर यांच्या पोटी सचिन तेंडुलकर यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे आवडते संगीतकार सचिन देव बर्मन होते, म्हणून या अपत्याचे नाव सचिन असे ठेवण्यात आले. मात्र संगीतात तसू भरही रस नसणारा सचिन तेंडुलकर क्रिकेट विश्वात आपले नाव करून गेला. आणि आपले नाव क्रिकेटच्या इतिहासात क्रिकेटचा देव म्हणून सुवर्णाक्षरात कोरून ठेवले.

लहानपणी अगदी सर्वसामान्य कुटुंबात वाढलेल्या सचिनने आपले विद्यालयीन शिक्षण मुंबईच्या शारदाश्रम विद्यालय येथे पूर्ण केले. आज आपण ज्या सचिन तेंडुलकरला बघतो तो बालपणी अतिशय वेगळाच होता, मारामारी करणे हे तर त्याचे आवडते क्षेत्र होते. सचिनला बालपणापासूनच क्रिकेट बद्दल अनामिक ओढ होती, मात्र वडिलांच्या धाकामुळे सचिनला शाळेमध्ये जावे लागले.

पुढे जाऊन त्यांचे क्रिकेट प्रेम बघून सचिनचा मोठा भाऊ अजित तेंडुलकर यांनी सचिनला क्रिकेट अकादमी मध्ये सामील होण्यास सांगितले, आणि त्यासाठीची सर्व मदत केली. तेथे सचिनला रमाकांत आचरेकर नावाचे क्रिकेटचे गुरु मिळाले, त्याकाळचे सर्वात प्रसिद्ध आणि उत्कृष्ट प्रशिक्षक म्हणून रमाकांत आचरेकर यांचे नाव होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सचिनने क्रिकेटचे शास्त्रशुद्ध धडे गिरवायला सुरुवात केली.

सचिन तेंडुलकरचे कौटुंबिक जीवन:

मित्रांनो, सचिन तेंडुलकरचा जन्म एका मराठी मात्र ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला. त्यांचे वडील रमेश तेंडुलकर हे एक प्रख्यात मराठी कादंबरी लेखक होते. याबरोबरच त्यांना संगीताची देखील फार मोठी आवड होती. सचिन तेंडुलकरच्या आईचे नाव रजनी तेंडुलकर असे होते. सचिन तेंडुलकरने इसवी सन १९९५ मध्ये अंजली तेंडुलकर या त्यांच्या जीवनसाथी सोबत विवाह केला. या दांपत्याला पुढे जाऊन सारा तेंडुलकर नावाची मुलगी आणि अर्जुन तेंडुलकर नावाचा मुलगा अशी दोन अपत्ये झाली.

क्रिकेट आणि सचिनचे मिलन:

मित्रांनो, मुलाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हटले जाते, मात्र मुलाच्या इच्छेप्रमाणे जर त्याला करिअरची संधी दिली तर तो नक्कीच एक इतिहास घडवतो हे वेळोवेळी सिद्ध झालेले आहे. आणि ते सचिन तेंडुलकरच्या बाबतीत देखील खोटे नाही. सचिन तेंडुलकरला लहानपणापासूनच क्रिकेटचा खूप नाद होता. त्याच्या कुटुंबीयांनी त्याच्या या आवडीला प्रोत्साहित केल्यामुळे आज सचिन तेंडुलकर इथपर्यंत पोहोचू शकला. यामध्ये त्याच्या अजित तेंडुलकर या बंधूचा मोठा वाटा आहे.

शालेय अभ्यासापेक्षा क्रिकेटमध्ये जास्त रस असणारा सचिन सुरुवातीला टेनिस बॉलने क्रिकेट खेळत असे, मात्र अजित तेंडुलकर या त्याच्या भावाने वडिलांशी बोलणी करून सचिनला क्रिकेट अकादमी मध्ये भरती करण्याचे ठरविले, आणि इथूनच सचिनच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी सचिन रमाकांत आचरेकर नावाच्या गुरूंच्या हाताखाली क्रिकेट अकादमी मध्ये दाखल झाला. तेथे या गुरूंनी सचिन कडून सीजन बॉल च्या साह्याने सराव करून घ्यायला सुरुवात केली.

सचिनच्या क्रिकेट खेळण्यावर ते अत्यंत प्रभावी झाले होते, त्यामुळे सचिन हा त्यांचा सर्वात आवडता विद्यार्थी ठरला होता. मात्र शालेय शिक्षण देखील तितक्याच महत्त्वाचे आहे असे मत रमाकांत आचरेकर सरांचे होते. आणि त्यांच्याच सल्ल्याने सचिनने शरादाश्रम विद्यामंदिर हायस्कूल मुंबई येथे प्रवेश घेतला. रमाकांत आचरेकर सर हे शाळेच्या वेळेनुसार वेळ काढून सकाळी आणि संध्याकाळी सचिनचा क्रिकेटचा सराव करून घ्यायचे.

सचिन तेंडुलकरचे वैवाहिक जीवन:

मित्रांनो, सचिन तेंडुलकरची पत्नी ही प्रसिद्ध उद्योगपती अशोक मेहता यांची कन्या असून, सर्वप्रथम हे दोघे मुंबई विमानतळावर एकमेकांना भेटले होते  पुढे त्यांच्यातील ओळख वाढली आणि त्यांच्यामध्ये प्रेम निर्माण झाले. पेशाने डॉक्टर असणाऱ्या अंजली हिला सचिन क्रिकेट खेळतो हे देखील माहिती नव्हते, कारण क्रिकेटचा आणि अंजलीचा फारसा संबंधच नव्हता.

पाच वर्षे प्रेम संबंध टिकविल्यानंतर त्यांनी १९९५ यावर्षी लग्नाचा निर्णय घेतला, आणि दोघेही विवाह बंधनात अडकले. पुढे त्यांना सारा आणि अर्जुन नावाची दोन अपत्ये झाली. मुलांच्या जन्मानंतर पत्नी अंजलीने आपले डॉक्टरकीचे काम सोडले, आणि संपूर्ण वेळ आपल्या कुटुंबाला द्यायला सुरुवात केली.

निष्कर्ष:

मित्रांनो, क्षेत्र कुठलेही असो आपण चांगली कामगिरी केली की नाव हे होतेच. त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे सचिन तेंडुलकर होय. क्रिकेटला आपले सर्वस्व मानणारा हा व्यक्ती खरोखरच क्रिकेटच्या विश्वातील देवच म्हणावा लागेल, कारण भारतीय संघासाठी खेळताना नेहमी विजयी पताका भारतासाठी खेचून आणण्यात माहीर असणाऱ्या या सचिन तेंडुलकरच्या नावावर अनेक विश्वविक्रम देखील झालेले आहेत. क्रिकेटचे चाहते तर सचिनच्या नावाचा नेहमी उद्घोष करत असतात. आज वर्तमानात खेळणारे विविध खेळाडू देखील नेहमी सचिन तेंडुलकरला आपले गुरु मानत आलेले आहेत.

आज देखील त्यांच्यासाठी सचिन तेंडुलकर मार्गदर्शन करताना दिसतो. यावरून कितीही पद, प्रतिष्ठा, पैसा आला तरी देखील ज्या गोष्टीने अर्थात खेळाने आपल्याला मोठे केले त्याला सन्मान देण्याचा सचिन तेंडुलकरचा स्वभाव दिसून येतो. आज आपण या सचिन तेंडुलकर बद्दल माहिती पाहिली.

FAQ

सचिन तेंडुलकर यांना इतर कोणत्या टोपण नावांनी ओळखले जाते?

सचिन तेंडुलकर यांना मास्टर ब्लास्टर क्रिकेटचा देव आणि लिटिल मास्टर इत्यादी टोपण नावांनी ओळखले जाते.

सचिन तेंडुलकर यांच्या आपत्यांची नावे काय आहेत?

सचिन तेंडुलकर यांच्या मुलाचे नाव अर्जुन तर मुलीचे नाव सारा असे आहे.

सचिन तेंडुलकर यांचा जन्मदिवस कोणत्या दिवशी असतो?

सचिन तेंडुलकर यांचा जन्मदिवस २४ एप्रिल या दिवशी असतो, या दिवशी १९७३ साली त्यांचा जन्म झाला होता.

सचिन तेंडुलकर यांच्या वडिलांचे नाव काय आहे? व ते काय करतात?

सचिन तेंडुलकर यांच्या वडिलांचे नाव रमेश तेंडुलकर असून ते एक मराठी कादंबरी लेखक आहेत.

सचिन तेंडुलकर यांच्या आईचे नाव काय आहे?

सचिन तेंडुलकर यांच्या आईचे नाव रजनी तेंडुलकर असे आहे.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर या व्यक्तीविशेषबद्दल माहिती पाहिली. ही माहिती तुम्हाला आवडली का? ते आम्हाला कमेंट मध्ये कळवाच, मात्र क्रिकेट प्रेमी मित्र-मैत्रिणींना देखील शेअर करण्यास विसरू नका.

धन्यवाद…

Siddharth Tambe

सिद्धार्थ तांबे (Siddharth Tambe) हे एक content writer असून यांना पोस्ट लिहिण्याचा ३ वर्षांचा अनुभव आहे. यांचे शिक्षण बी.एसस्सी Agri.झाले असून ते मराठी भाषेत अचूक लेखनाचे कार्य करतात.

Leave a Comment