गुलाब फुलाची संपूर्ण माहिती Rose Flower Information In Marathi

Rose Flower Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो फुल म्हणजे निसर्गाची मानवाला दिलेली एक म्हणावी लागेल. त्यातले त्यात गुलाबाचे फुल म्हणजे अतिशय सुंदर फुल. जगभरामध्ये उगवले जाणारे हे फुल जवळपास प्रत्येकालाच आवडत असते. कारण ते दिसायला सुंदर असण्याबरोबरच खूपच सुवासिक देखील आहे. या फुलांचे झाड छोट्या झुडूपाच्या स्वरूपात वाढते, ज्याला अनेक लहानसे काटे असतात.

Rose Flower Information In Marathi

गुलाब फुलाची संपूर्ण माहिती Rose Flower Information In Marathi

मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण या गुलाबाच्या फुलाबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत, त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा…

नावगुलाब
इंगजी नावरोज
शास्त्रीय नावRosa spp
हायर क्लासिफिकेशनरोसोईडी
कुटुंब / कुळरोजेसी
किंगडम प्लांटी
ऑर्डररोजेल्स

मित्रांनो, झुडूप वजा झाडावर उमलणारे एक सुंदर फुल म्हणजे गुलाबाचे फुल होय. फुलवर्गीय प्रकारचे हे झाड इंग्रजीमध्ये रोज नावाने ओळखले जाते. ही फुले दिसायला सुंदर असली तरी ती अतिशय नाजूक असतात. या गुलाबाच्या जगभर सुमारे १०० पेक्षाही अधिक प्रजाती आढळून येतात. यामध्ये आशिया सर्वात आघाडीवर आहे. मुख्यत्वे ही वनस्पती मूळची युरोपची, मात्र युरोप पेक्षाही अधिक प्रजाती अशीयामध्ये आढळून येतात.

मित्रांनो, मुख्यतः लालसर रंगाचे असणारे हे फुल गुलाबी, पिवळ्या, पांढऱ्या, किंवा अनेक इतरही रंगांमध्ये येते. ज्यावेळी फुलाची निर्मिती होते, तेव्हा ती हिरव्या रंगाच्या खालील पाकळ्यांमध्ये लपलेले असते, आणि त्यानंतर ते उमलते व त्याच्या रंगीत पाकळ्या बाहेर निघतात. त्यावेळी ते अतिशय आकर्षक आणि सुंदर दिसते.

गुलाबाचे झाडे अतिशय काटेरी असते. यातील संपूर्ण झाडावर काटे आढळून येतात. हे झाड सदाहरित प्रकारचे असल्याने त्यावर नेहमी पाने आढळून येतात. कधीही पान गळती होत नाही. या गुलाबाचे झाडे सुमारे पाच ते सहा मीटर उंचीपर्यंत देखील वाढू शकतात, आणि या झाडांच्या मुख्य फांदीवर थोडे थोडे अंतरावर उप फांद्या फुटतात.

गुलाबाबद्दल प्राथमिक माहिती:

मित्रांनो, गुलाब झाडाच्या फांद्या या फार जाड होत नाहीत. या फांद्यांवर दोन्ही बाजूंनी फुटणारे हिरवीगार पाने येतात. पाने ही काहीसे गोलाकार किंवा अंडगोलाकार मात्र समोरच्या बाजूस टोकदार असतात. ही पाने काहीशी रखरखीत असतात मात्र वरील भाग हा काहीसा गुळगुळीत असतो. गुलाबाचे फुल अतिशय सौंदर्य संपन्न असल्यामुळे त्याला जगभर नेहमीच मागणी असते.

प्रेमी युगलांसाठी तर गुलाबाचे फुल अतिशय प्रिय असते. ज्यावेळी दोन प्रेम करणाऱ्या व्यक्ती एकमेकांना भेटतात, तेव्हा ते गुलाबाच्या फुलांनी त्यांचे प्रेम व्यक्त करत असतात. दरवर्षी सात फेब्रुवारी या दिवशी गुलाब दिन साजरा केला जातो. त्यादिवशी प्रत्येक जण एकमेकांना गुलाब देत आपला आदर किंवा प्रेमभाव व्यक्त करतात.

गुलाब फुलाच्या असीम सौंदर्य व सुवासामुळे या फुलाला फुलांचा राजा अशी उपाधी देण्यात आलेली आहे. भारताचे प्रथम पंतप्रधान श्री पंडित नेहरू देखील गुलाबाचे फुल आपल्या कोटाच्या खिशाला नेहमी लावत असत. गुलाबाच्या फुलाचे विविध सौंदर्य प्रसाधनांमध्ये तसेच हार गुच्छ इत्यादींमध्ये वापर केला जातो.

मित्रांनो, गुलाब हे एक सौंदर्यवान आणि सुवासिक फुल असले तरी देखील त्याचा वापर एक उत्तम आहार म्हणून खाद्यपदार्थांमध्ये देखील केला जातो. गुलाबापासून बनवले जाणारे सर्वात महत्त्वाचे स्वादिष्ट खाद्यपदार्थ म्हणजे गुलकंद होय. अगदी विड्याच्या पानापासून गर्भवती स्त्रियांपर्यंत गुलकंद मोठ्या प्रमाणावर वापरले जाते.

गुलाबाचे फुल हे सौंदर्याचे प्रतीक समजले जात असल्यामुळे कुठल्याही सौंदर्यवान गोष्टीला उपमा देण्यासाठी गुलाबाचा वापर केला जातो. अनेक कवी व व लेखकांनी गद्य व पद्य रचना करून या गुलाबाला खूपच प्रसिद्ध केलेले आहे.

गुलाबाच्या विविध प्रजाती:

मित्रांनो, गुलाबाच्या फुलाला कुठला रंग आहे त्यानुसार गुलाबाचे अनेक प्रजातींमध्ये वर्गीकरण केलेले आहे. त्यानुसार प्रत्येक गुलाब हा वेगवेगळा असतो. बाकी सगळे काही सारखे असले तरी देखील त्याचा आकार व रंग मात्र वेगवेगळा असतो. खास गोस्ट म्हणजे या वेगवेगळ्या रंगाचे गुलाब वेगवेगळ्या प्रसंगी दिले जातात. त्यानुसार त्यांचे प्रकार पडत असतात.

यातील लाल रंगाचा गुलाब हा प्रेम भावना व्यक्त करताना दिला जातो, जो व्हॅलेंटाईन डे दरम्यान खूप चर्चेत असतो. शांततेचे प्रतीक म्हणून निळा गुलाब, प्रामाणिक मैत्रीचे प्रतीक म्हणून पिवळा गुलाब, सुख समृद्धी आणि आनंद यांचे प्रतीक म्हणून हिरवा गुलाब, उत्साह किंवा आवेश याचे प्रतीक म्हणून नारंगी गुलाब, कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून गुलाबी गुलाब, प्रथम प्रेम सांगताना जांभळा गुलाब, शुद्धता आणि निरागसता याचे प्रतीक म्हणून पांढरा गुलाब, आणि शत्रुत्वाचे प्रतीक म्हणून काळा गुलाब ओळखला जातो.

मित्रांनो, गुलाबाच्या झाडाची वनस्पती कशी आहे किंवा त्याचा आकार पोत इत्यादींवर देखील गुलाबाचे हायब्रीड टी, फ्लोरीबुंडा, मायक्रो, चायना रोज, सरपट्या गुलाब (क्रिपर) आणि बेबी गुलाब यांसारख्या प्रजाती सुद्धा आढळून येतात.

निष्कर्ष:

मित्रांनो, फुल हे मानवाच्या दैनंदिन जीवनात खूप उपयोगी पडणारी गोष्ट आहे. अगदी सकाळच्या पूजेपासून संध्याकाळी असणाऱ्या कार्यक्रमांपर्यंत, देव देवतांच्या हारापासून तर महिलांच्या गजऱ्यापर्यंत, जन्मापासून मृत्यूच्या घटीकेपर्यंत प्रत्येक वेळेस फुल हे आवश्यक असतेच. त्यातही गुलाबाचे फुल अतिशय प्रिय आहे, कारण हे फुल दिसायला चांगले असून याचा वास देखील अतिशय उत्तम असतो. त्यामुळे विविध प्रसंगी या फुलाची मागणी वाढते.

मुलगा किंवा मुलगी आपल्या जोडीदाराला प्रेमाचा प्रस्ताव देताना देखील या पुलाचा वापर करतात, त्यामुळे या फुलाला प्रेमाचे प्रतीक म्हणून देखील ओळखले जाते. आज आपण या गुलाब फुलाबद्दल ची माहिती पाहिली, त्यावरून तुम्हाला गुलाबाचे महत्त्व आणि गुलाब शेतीचे संभाव्य फायदे देखील समजले असतील. तसेच गुलाबाच्या विविध प्रजातींबद्दल देखील माहिती मिळाली असेलच.

FAQ

सर्वात पहिला गुलाब किती वर्षांपूर्वी आढळला होता?

सर्वात पहिला आढळलेला गुलाब म्हणजे वाइल्ड रोज होय, अर्थात जंगली गुलाब. हा गुलाब सुमारे ७० दशलक्ष वर्षांच्या आधी सापडला होता. तो काळ म्हणजे डायनासोर नामशेष होण्याचा काळ होय. आज आढळणाऱ्या सर्व गुलाबांचा पूर्वज म्हणून या गुलाबाला ओळखले जाते.

गुलाब मुख्यत्वे करून कोठे आढळतो?

गुलाब हा मुख्यत्वे करून आशियामध्ये आढळून येतो. तेथे गुलाबाची संख्या खूप आहे. मात्र त्याच्या खालोखाल अमेरिका, युरोप, वायव्य आफ्रिका इत्यादी ठिकाणी देखील कमी प्रमाणात का होईना गुलाब आढळला जातो.

गुलाबाचा वापर मुख्यत्वे करून कशासाठी होतो?

मुख्यत्वे गुलाबाचा वापर हा शोभिवंत झाड म्हणून बागांमध्ये किंवा घराच्या अंगणामध्ये लावण्यासाठी होतो. तसेच याचे कटफ्लावर सत्कार किंवा प्रेमप्रस्ताव देतेवेळी वापरले जातात. तसेच यापासून उच्च दर्जाचे परफ्युम देखील बनवले जातात.

गुलाबाचे रोपटे कसे तयार केले जाते?

चांगल्या निरोगी गुलाबाची एक फांदी तोडून त्याला दोन्ही बाजूंनी व्यवस्थित कट करून, शेंडा वरील बाजूस राहील अशा रीतीने मातीत खोचावे, व त्याच्या वरील बाजूस शेणाचा गोळा लावावा अशा रीतीने गुलाबाचे रोपे तयार केली जाऊ शकतात.

गुलाबापासून बियांची निर्मिती केली जाऊ शकते का? आणि त्यापासून नवीन झाड तयार होते का?

गुलाबापासून बियाण्यांची निर्मिती केली जाऊ शकते, तसेच त्यापासून नवीन झाड देखील तयार होते.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण गुलाबाच्या फुला बद्दल माहिती पाहिली. ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तर मग वेळ न दवडता लगेच तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत कमेंटमध्ये पोहोचवा, आणि सोबतच आपल्या इतरही मित्र-मैत्रिणींना या फुलाची माहिती नक्की शेअर करा.

धन्यवाद…

Avatar

i am marathi content writer from last 5 years.

Leave a Comment