रामनवमी सणाची संपूर्ण माहिती Ram Navami Festival Information In Marathi

Ram Navami Festival Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो भारत हा देश मुख्यतः हिंदू धर्मीय लोकांनी भरलेला आहे. त्यामुळे येथे अनेक हिंदू धर्मीय सणांना महत्त्व देण्यात येते. हिंदू धर्मामध्ये अनेक देवी देवतांना पूजण्यात येते. त्यातील सर्वात महत्त्वाचा देव म्हणून रामाची महती प्रसिद्ध आहे.

Ram Navami Festival Information In Marathi

रामनवमी सणाची संपूर्ण माहिती Ram Navami Festival Information In Marathi

रावणाचे दुष्कृत्य संपवण्याकरिता रामाने त्याचा वध केला होता, त्यामुळे पुन्हा एकदा या भूमीवर चांगले राज्य निर्माण झाले होते. श्रीराम यांना प्रभू राम या नावाने देखील ओळखले जाते. त्यांनी रावणाचा अंत करून अनेक लोकांचे कल्याणकारी राज्य निर्माण केले होते. सुरू असताना श्रीरामांच्या जयंतीला रामनवमी म्हणून साजरी केले जात असे, जे आजपर्यंत सुरू आहे. आजच्या भागामध्ये आपण रामनवमी बद्दल माहिती बघणार आहोत…

नावरामनवमी
प्रकारहिंदू सण
साजरा करण्याचे कारणभगवान श्रीरामांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो
तिथीचैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमीच्या दिवशी
मुहूर्तसकाळच्या ११ : १७ पासून ०१ :४६ पर्यंत

राम नवमी साजरी करण्याचे महत्त्व काय आहे:

हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सणाला एक विशिष्ट असा अर्थ प्राप्त आहे. पृथ्वीवरील वाईट शक्तीचा पराभव करण्याकरिता आणि सामान्य लोकांचा कल्याणकारी राज्य स्थापन करण्याकरिता प्रत्येक वेळी देवतांनी विविध रूपांमध्ये अवतार घेतलेली आहेत. असाच एक अवतार म्हणजे श्रीराम होय. या दिवशी श्रीरामाचा जन्म झाला त्या दिवशी च्या तिथीला राम नवमी साजरी केली जाते. राम हा भगवान विष्णू यांनी घेतलेला मानवी अवतार होता.

संपूर्ण हिंदू समाजासाठी राम नवमी हा एक अनोखा आणि उत्साहाचा सण आहे. त्या दिवशी रामभक्त अनेक प्रकारचे कार्यक्रम आयोजित करत असतात. या दिवशी शासकीय सुट्टी देखील असते. तसेच नवरात्रीतील शेवटचा दिवस देखील असतो. पौराणिक कथा असे सांगतात की श्री गोसावी तुलसीदासजी यांनी या दिवशी रामचरितमानस सुरू केले होते.

२०२३ मध्ये राम नवमी केव्हा होती:

मित्रांनो, मराठी व इंग्रजी दिनदर्शिका यांच्यामध्ये तफावत असल्यामुळे इंग्रजी दिनदर्शिका नुसार ही रामनवमीची तारीख बदलत असते. मराठी दिनदर्शिका नुसार प्रत्येक चैत्र महिन्याच्या नवव्या दिवशी येणाऱ्या या सणाला दरवर्षी इंग्रजी दिनदर्शिका नुसार वेगवेगळ्या दिवशी साजरी केली जाते. २०२३ मधील रामनवमी ३१ मार्च २०२३ या दिवशी साजरी केली गेली.

भगवान श्रीरामांच्या गुरु बद्दल माहिती:

मित्रांनो, कुठलीही गोष्ट शिकण्याकरिता प्रत्येकाला गुरु हा असावाच लागतो. आपण शिक्षकांच्या रूपात गुरू बघत असतो. त्याचप्रमाणे भगवान श्रीराम यांच्या गुरूंचे नाव ब्रम्हा ऋषी वशिष्ठ असे होते. ज्यांनी त्यांना विविध प्रकारचे वैदिक साहित्य, शस्त्र वापर इत्यादी गोष्टींमध्ये पारंगत केले. श्रीरामांना ब्रह्म ऋषी विश्वमित्र यांनी अनेक प्रकारची शास्त्रास्त्रे दिली होती. ज्यांचा वापर करून त्यांनी आपले प्रजेचे कल्याणकारी राज्य स्थापन केले.

रामनवमी उत्सव कसा साजरा केला जातो:

संपूर्ण भारतभर विशेषतः दक्षिण भारतामध्ये आणि उत्तर भारतामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर रामनवमीचा उत्सव साजरा केला जातो. त्या दिवशी प्रत्येक हिंदू लोक आपले घर सजवतात, तसेच श्रीरामांच्या मूर्तीची पूजा करतात. विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करतात. महाप्रसादाचे देखील आयोजन केले जाते. भगवान श्रीरामांना नैवेद्य दाखविल्यानंतर या महाप्रसादाचे भक्त जणांमध्ये वाटप देखील केले जाते.

हा रामनवमीचा सण विशिष्ट ठिकाणी विशिष्ट नावाने ओळखला जातो. महाराष्ट्रसह कर्नाटक, आंध्र प्रदेश, आणि तामिळनाडू इत्यादी ठिकाणी चैत्र नवरात्री वसंतोत्सव या नावाने याला ओळखले जाते. या दिवशी भगवान श्रीराम यांच्यासह लक्ष्मण, सीतामाता आणि हनुमान जी यांचे देखील मोठ्या भक्ती भावाने पूजा केली जाते.

भगवान श्रीराम यांच्या वनवासाची कथा:

मित्रांनो, भगवान श्रीराम यांनी त्यांच्या वडिलांच्या वचनानुसार वनवास भोगलेला आहे, असे तुम्हाला माहितीच आहे. त्याची कथा म्हणजे वडील राजा दशरथ यांना राम यांनाच राजा बनवायचे होते, मात्र त्यांच्या पत्नी कैकई यांच्यानुसार भरत यांनाच उत्तराधिकारी राजा बनविण्यात यावे असे वाटे. त्यांनी अतिशय चतुराईने राजा दशरथ यांच्याकडून वचन घेतले की भरत हा राजा बनेल, व भगवान श्रीराम वनवासाला जातील.

कैकईने युद्ध दरम्यान राजा दशरथ यांचा जीव वाचवला होता. त्याबद्दल्यात त्यांनी हे वचन मागितलेले होते. त्यानंतर आपल्या आई-वडिलांच्या आज्ञेनुसार श्रीराम १४ वर्षांच्या वनवासाला गेले. त्यांच्यासोबत सीतामाता व बंधू लक्ष्मण हे देखील होते. असे असले तरी देखील भरत यांचा आपल्या बंधू श्रीरामांवर प्रचंड जीव होता. त्यामुळे त्यांनी भगवान श्रीरामांच्या पादुकांचे पूजन करत १४ वर्ष भगवान श्रीरामांच्या नावानेच राज्य चालविले.

या वनवासाच्या शेवटच्या कालावधीमध्ये श्रीराम आणि रावण यांचे युद्ध झाले, यामध्ये भगवान श्रीराम विजयी झाले. आणि त्यानंतर संपूर्ण प्रजेने मोठ्या थाटामाटाने भगवान श्रीरामांचे पुन्हा स्वागत केले, आणि त्यांना राजा म्हणून घोषित केले. हा सण संपूर्ण भारतभर दीपावलीच्या पाडव्याच्या दिवशी साजरा केला जातो. ज्याचा संबंध दसरा या सणाची देखील जोडला जातो.

निष्कर्ष:

मित्रांनो, भारत हा देश रामांचा देश म्हणून ओळखला जातो. या भारत देशामध्ये साजरा केला जाणारा सर्वात महत्त्वाचा सण म्हणून राम नवमी हा सण ओळखला जातो. आजच्या भागामध्ये आपण या रामनवमी सणाबद्दल माहिती बघितली. ज्यामध्ये तुम्हाला रामनवमी चे महत्व २०२३ मध्ये रामनवमी कधी होती, रामांच्या गुरुबद्दल माहिती, रामनवमी साजरा करण्याचा इतिहास ,तसेच या वेळेचा उत्सव, अयोध्या मधील प्रथा परंपरा, त्यांच्या वनवासाची कथा, रावणाचा वध, रामनवमी साजरी करण्याची पद्धत, इत्यादी गोष्टींवर माहिती मिळालेली असेल.

FAQ

सर्वप्रथम राम नवमी केव्हा साजरी करण्यात आली होती?

मित्रांनो, अयोध्यातील रहिवाशांनी भगवान श्रीराम यांचा जन्मदिवस रामनवमी म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली, मात्र हा उत्सव केव्हापासून साजरा करण्यात येतो याचा उल्लेख कुठेही आढळून येत नाही.

राम नवमी बद्दल काय सांगता येईल?

मित्रांनो रामायणातील पात्र श्री राम यांचा जन्मदिवस म्हणून राम नवमी साजरी केली जाते, राजा दशरथ यांचे पुत्र असलेले श्रीराम अतिशय मर्यादा पुरुषोत्तम असे होते.

रामनवमी का साजरी केली जाते?

राम नवमी साजरी करण्यामागे भगवान श्रीराम यांचा जन्मदिवस असून, राजा दशरथ व कौशल्य यांच्या पुत्र प्रभू राम यांच्या आठवणीसाठी हा सण साजरा केला जातो. जो चैत्र महिन्यातील नवमीच्या दिवशी येत असतो.

भगवान श्रीरामांना नैवेद्य म्हणून कोणता पदार्थ दिला जातो?

भगवान श्रीराम यांचा आवडीचा पदार्थ खीर हा त्यांना प्रसाद म्हणून दिला जातो. त्या दिवशी साबुदाण्याची खीर बनवण्याकरिता साबुदाणा, तांदुळ, दूध, आणि साखर समान रीतीने शिजवून त्याचा प्रसाद बनवला जातो. भगवान श्रीराम यांना नैवेद्य दाखविल्यानंतर तो भक्तांमध्ये वाटप केला जातो.

अनेक लोक रामनवमीला लग्न करतात असे का?

मित्रांनो, असे म्हटले जाते की रामनवमीच्या त्या दिवशी भगवान श्रीराम यांनी माता सीता यांच्यासोबत लग्न देखील केले होते. त्यामुळे अनेक लोक या दिवशी लग्न करण्यास प्राधान्य देतात. तसेच दक्षिण भारतामध्ये भद्राचलम नावाचा सण याच गोष्टीचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण रामनवमी या हिंदू सणाबद्दल माहिती बघितली. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कमेंट सेक्शन मध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा. आणि काही सूचना असतील किंवा अजून माहिती असेल तर ती देखील जरूर सांगा. सोबतच ही माहिती इतरांना देखील अवश्य शेअर करा .

धन्यवाद…

Avatar

i am marathi content writer from last 5 years.

Leave a Comment