राम गणेश गडकरी यांची संपूर्ण माहिती Ram Ganesh Gadkari Information In Marathi

Ram Ganesh Gadkari Information In Marathi नमस्कार मित्रांनो बॉम्बे प्रेसिडेन्सी येथील एक प्रसिद्ध भारतीय नाटककार मराठी विनोद कार आणि कवी म्हणून राम गणेश गडकरी यांना ओळखले जाते. त्यांनी मराठी साहित्याच्या क्रांतीमध्ये भरीव योगदान दिलेले असून त्यांचे नाव मराठी साहित्याच्या जगतात मोठ्या आदराने घेतले जाते त्यांनी आपल्या लेखनासाठी वेगवेगळी टोपण नावे वापरली. कविता करताना ते गोविंदाग्रज या नावाने कविता लिहीत असत तर मजेशीर लेखन व नाटके यांच्याकरिता ते बाळकराम हे टोपण नाव वापरत असत. मात्र इतर कादंबरी सारखे प्रकार हाताळताना त्यांनी आपले स्वतःचे खरे नाव वापरलेले आहे.

Ram Ganesh Gadkari Information In Marathi

राम गणेश गडकरी यांची संपूर्ण माहिती Ram Ganesh Gadkari Information In Marathi

आजच्या भागामध्ये आपण या राम गणेश गडकरी अर्थात गोविंदाग्रजांबद्दल माहिती बघणार आहोत. चला तर मग एका उत्कृष्ट साहित्यकार व्यक्तिमत्त्वाबद्दल असणाऱ्या या माहितीच्या ज्ञानमय प्रवासास सुरुवात करूयात.

नावराम गणेश गडकरी
टोपण नावे बाळकराम, गोविंदाग्रज आणि सवाई नाटकी
जन्म दिनांक२६ मे १८८५
वडिलांचे नावगणेश वासुदेव गडकरी
आईचे नावसरस्वती गणेश गडकरी
नागरिकत्वभारतीय
कार्यमराठी साहित्य क्षेत्रात मोलाचे योगदान
साहित्याचे विषयनाटक, कविता, विनोदी कविता
प्रसिद्ध नाटकएकच प्याला, प्रेमसन्यास, पुण्यप्रभाव
मृत्यू दिनांक२३ जानेवारी १९१९

गोविंदाग्रज अर्थात राम गणेश गडकरी यांचे प्रारंभिक जीवन:

मित्रांनो गुजरात राज्याच्या नवसारी या शहरांमध्ये राम गणेश गडकरी यांचा जन्म झाला ती दिनांक होता २६ मे १८८५. त्यांचे कुटुंब हे मराठी चंद्रसेनिया कायस्थ प्रभू असे कुटुंब होते. त्यांना आपल्या वडिलांची छत्र छाया फारच कमी कालावधी करिता लाभली कारण त्यांच्या वडिलांचे अर्थात गणेश रघुनाथ गडकरी यांचे निधन २४ सप्टेंबर १८९३ या दिवशी झाले होते. वडिलांचे निधन आणि कुटुंबातील गरिबी यामुळे त्यांना आपले शिक्षण पूर्ण करता आले नाही.

वय वर्ष १९ असताना त्यांनी आपले हायस्कूलचे शिक्षण पूर्ण करून पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेज येथे पुढील शिक्षणाकरिता प्रवेश घेतला मात्र कॉलेजच्या पहिल्या वर्षी ते गणितात नापास झाले त्यामुळे त्यांनी आपले शिक्षण सोडून आपली साहित्यिक आवड जोपासायला सुरुवात केली. आणि पैसे मिळवण्याकरिता शिकवणी देखील सुरू केली.

मित्रांनो आज राम गणेश गडकरी यांच्या साहित्याने खूप लोक प्रभावित होतात मात्र खुद्द गोविंदा गरजांनाच वयाच्या नवव्या वर्षी पर्यंत मराठी बोलता येत नव्हते कारण त्यांचा जन्म गुजरात प्रांतामध्ये झालेला होता मात्र त्यांनी मराठी भाषा शिकून मराठी संस्कृत व इंग्रजी साहित्याचे प्रचंड वाचन केले. त्यांच्या वाचनामध्ये संस्कृत मधील कालिदास व भवभूती यांसारख्या उत्कृष्ट साहित्यकारांचा समावेश होता.

तसेच मराठी मधील केशवसुत श्रीपाद कृष्ण कोल्हटकर ज्ञानेश्वर व मोरोपंत इत्यादी लेखकांचा समावेश होता. इंग्रजी भाषेमधील शेक्सपियर, मार्क ट्वेन आणि पर्सि शैली यांसारख्या उत्तम लेखकांच्या लेखनाचे त्यांनी समीक्षण देखील केले होते.

राम गणेश गडकरी अर्थात गोविंदाग्रज यांचे वैयक्तिक जीवन:

मित्रांनो राम गणेश गडकरी यांनी दोन लग्न केलेली असून त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव सीताबाई असे होते ज्या त्यांना सोडून गेल्या होत्या तर त्यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव रमा असे होते जी त्यांच्यापेक्षा तब्बल १७ वर्षांनी लहान होती. मात्र दोन पत्नी असून देखील त्यांना फारसे वैवाहिक सुख लाभले नाही मग मात्र त्यांनी संसारिक गाडा सोडून लेखन कार्याकडे आपले लक्ष वळविले.

राम गणेश गडकरी यांचे साहित्य:

मित्रांनो राम गणेश गडकरी यांनी आपल्या अवघ्या ३५ वर्षांच्या आयुष्यात अनेक साहित्यरचना केल्या ज्यामध्ये दीडशे कवितासंग्रह विविध विनोदी निबंध चार पूर्ण तर तीन अपूर्ण नाटके लिहिली. ज्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला त्या दिवशी त्यांनी भावबंधन हे नाटक नुकतेच लिहून पूर्ण केलेले होते त्यांचे साहित्यिक लेखन सर्व स्तरातून गौरविले जाते आणि अतिशय उच्च दर्जाचे समजले जाते.

राम गणेश गडकरी यांची नाटक संपदा:

मित्रांनो राम गणेश गडकरी यांनी एकच प्याला, प्रेमासन्यास, पुण्यप्रभा आणि भावबंधन यासारखी पूर्ण तर गर्वा निर्वाण, वेड्यांचा बाजार, आणि राजसंन्यास, यांसारखी अपूर्ण नाटके लिहिलेली आहेत.

मित्रांनो सुप्रसिद्ध नाटककार श्री विजय तेंडुलकर यांच्या मते संस्कृत मधील कालिदास यांच्यानंतर सर्वोत्कृष्ट नाटके कोण लिहू शकत असेल तर ते राम गणेश गडकरी अर्थात गोविंदाग्रज आहेत. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व औरंगजेब यांच्या लढाईचे आपल्या नाटकामध्ये अतिशय हुबेहूब वर्णन केलेले आहे. याच प्रकारे आचार्य अत्रे देखील गडकरींच्या लेखनाचा गौरव करताना म्हणतात की गडकरींच्या मराठी साहित्यामध्ये विशेषता त्यांनी मराठीत लिहिलेल्या नाटकांमध्ये मराठी साहित्य क्षेत्राला सर्वोच्च स्थानावर घेऊन जाण्याची क्षमता आहे.

त्यांनी लिहिलेल्या एकच प्याला या नाटकांमध्ये सिंधू या एका निराधार मात्र प्रेमळ असणाऱ्या पत्नीची आणि तिच्या मद्यपी पतीची अर्थात सुधाकर ची कहाणी अतिशय छानपणे समजावून सांगितलेली आहे.

काही लोकांच्या मते गडकरी यांनी लिहिलेल्या एकच प्याला या नाटकांमध्ये त्यांनी स्वतःच्याच तीव्र मद्यपान करण्याच्या सवयीला रेखाटले होते. मात्र ही अफवा होती आचार्य अत्रे आपल्या आत्मचरित्रात या अफवेचे खंडन करताना म्हणतात की साहित्य ही गडकरी यांची खरी आवड होती त्यामुळे त्यांनी विविध क्षेत्रातील समस्यांवर भाष्य करत नाटके लिहिलेली आहेत. आचार्य अत्रे व गडकरी एकमेकांशी अतिशय ओळखीचे व निकडवर्तीय संबंध असणारे होते त्यामुळे आचार्य अत्रे यांनी सांगितलेल्या या गोष्टीला आधार मिळतो.

निष्कर्ष:

मित्रांनो मराठी साहित्य संपदा अतिशय समृद्ध अशी आहे या मराठी साहित्याला समृद्ध करण्यासाठी अनेक लेखकांनी आणि कवींनी आपले योगदान दिलेले आहे. त्यांच्यातीलच एक म्हणजे गोविंदाग्रज अर्थात राम गणेश गडकरी होय. आजच्या भागामध्ये आपण या राम गणेश गडकरी यांच्या बद्दल माहिती बघितली आहे.

ज्यामध्ये तुम्हाला त्यांच्या प्रारंभिक जीवनासह त्यांचे वैयक्तिक जीवन आणि साहित्य क्षेत्रातील योगदान याविषयी माहिती वाचायला मिळाली. त्याचप्रमाणे त्यांची विविध नाटके जी पूर्ण झालेली आहेत व अपूर्ण झालेली आहेत तसेच त्यांचे विनोद पर लेखन इत्यादी गोष्टींबद्दल माहिती मिळाली तसेच काही प्रश्न उत्तरे देखील वाचायला मिळाली.

FAQ

राम गणेश गडकरी यांचा जन्म केव्हा झालेला होता?

राम गणेश गडकरी अर्थात गोविंदाग्रज या प्रतीतयश मराठी साहित्य लेखकाचा जन्मदिनांक २६ मे १८८५ या दिवशी झालेला होता.

राम गणेश गडकरी यांनी कोणकोणत्या क्षेत्रामध्ये कार्य केलेले आहे?

राम गणेश गडकरी यांनी साहित्य क्षेत्रातल्या जवळ जवळ सर्वच क्षेत्रांना हात लावलेला असून त्यातील नाटके कविता गद्य लेखन विनोदपर लेखन इत्यादी सर्व क्षेत्रात त्यांनी कार्य केलेले आहे.

राम गणेश गडकरी यांनी लिहिलेली काही अपूर्ण नाटके कोणती आहेत?

राम गणेश गडकरी यांनी लिहिलेल्या काही नाटकांपैकी गर्वा निर्वाण वेड्यांचा बाजार राज संन्यास इत्यादी नाटके अपूर्ण आहेत.

गोविंदाग्रजांनी केलेल्या काही कवितांपैकी कोणाच्या कविता सर्वात जास्त प्रसिद्ध झाल्या?

गोविंदाग्रजांनी केलेल्या काही कवितांपैकी वाग्वैजयंती  आणि पिंपळ पान या कविता फारच प्रसिद्ध झाल्या.

राम गणेश गडकरी यांची काही प्रसिद्ध नाटके कोणती आहेत?

राम गणेश गडकरी यांच्या प्रसिद्ध नाटकामध्ये एकच प्याला, प्रेमासन्यास, पुण्यप्रभा आणि भावबंधन इत्यादी नाटकांचा समावेश होतो.

मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण राम गणेश गडकरी यांच्या विषयी माहिती बघितलेली आहे ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये अवश्य कळवा तसेच तुमच्या इतरही मित्र-मैत्रिणींना ही माहिती वाचायला मिळावी याकरता त्यांच्यापर्यंत ही माहिती शेअर करून मराठी साहित्याच्या माहितीला सर्वत्र पोहोचवा. 

धन्यवाद!!!!!

Avatar

i am marathi content writer from last 5 years.

Leave a Comment