राजर्षी शाहू महाराज यांची संपूर्ण माहिती Rajarshi Shahu Maharaj Information In Marathi

Rajarshi Shahu Maharaj Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो स्वातंत्र्य पूर्व काळामध्ये झालेल्या अनेक स्वातंत्र्यसेनान्यांची आपल्याला ओळख आहे मात्र त्या काळात अनेक संस्थानिक देखील होऊन गेले. हे संस्थानिक म्हणजे जुन्या काळातील राजे होते, मात्र इंग्रज राजवटीत त्यांना संस्थानिक म्हणून मान्यता मिळाली.

राजर्षी शाहू महाराज यांची संपूर्ण माहिती Rajarshi Shahu Maharaj Information In Marathi

यापैकी महाराष्ट्रात होऊन गेलेले एक लोकप्रिय संस्थानिक म्हणजे छत्रपती शाहू महाराज. हे राजर्षी शाहू म्हणून प्रसिद्ध होते. त्यांचे संस्थान पश्चिम महाराष्ट्रातील सध्याच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होते. राजर्षी शाहू महाराज एक सर्वगुणसंपन्न संस्थांनीक होते, त्यांना संस्थानिक पेक्षा समाज सुधारक या नात्यानेच सर्वजण ओळखत असत. राजश्री शाहू महाराजांवर महात्मा ज्योतिबा फुले यांचा खूप मोठा प्रभाव होता, आणि त्याच प्रभावामुळे त्यांनी समाजसेवेचा वसा घेतला.

इसवी सन १८९४ मध्ये त्यांचा राज्याभिषेक करण्यात आला, त्यानंतर त्यांनी आपल्या मृत्यूपर्यंत केवळ आणि केवळ रयतेचाच विचार केला, आणि समाजातील प्रत्येक स्तरातील घटकांसाठी प्रभावी योगदान दिले. त्यांनी कधीही जातपातीला आपल्या राज्यामध्ये स्थान दिले नाही.

चला तर मग मित्रांनो, अशा या सर्व गुणसंपन्न राज्याच्या अर्थातच छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जीवनावर या लेखाद्वारे प्रकाश टाकूया…

संपूर्ण नाव: यशवंत आबासाहेब घाटगे
राज्याभिषेकानंतर नामकरण: शाहू महाराज
उपाधी: राजर्षी
जन्म: कागल, जिल्हा कोल्हापूर येथे २६ जून १८७४ रोजी
वडील: आबासाहेब घाटगे
आई: राधाबाई घाटगे
पत्नी: लक्ष्मीबाई भोसले
विवाह: बडोदा संस्थानाच्या गुणजीराव खानविलकर यांची मुलगी राधाबाई हिच्याशी दिनांक १ एप्रिल १८९४ रोजी
राज्याभिषेक: दिनांक २ एप्रिल १८९४ रोजी
मृत्यू: मुंबईच्या एका लॉज मध्ये दिनांक ६ मे १९२२ रोजी

बालपणीचे आयुष्य:

मित्रांनो, राजर्षी शाहू महाराजांचा जन्म कोल्हापूरच्या घाडगे कुटुंबात झाला. त्यांचे वडील हे गाव प्रमुख होते, तर आई मुधोळच्या राजघराण्यातील राजकन्या होत्या. जन्मतः त्यांचे नाव यशवंतराव असे ठेवण्यात आले होते. त्यांच्या जन्मानंतर अवघ्या तीनच वर्षात त्यांच्या आई राधाबाई त्यांना सोडून गेल्या.

वडिलांनी दहा वर्षापर्यंत त्यांच्या शिक्षणाची योग्य सोय केली, मात्र कोल्हापूर संस्थानातील राजे चौथे शिवाजी यांच्या निधनानंतर त्यांच्या विधवा पत्नी आनंदीबाई यांनी शाहू महाराजांना दत्तक घेतले. पुढे दत्तक विधानानंतर त्यांनी राजकोट येथे आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले.

त्यानंतर इंग्रज अधिकारी आणि तत्कालीन भारतीय नागरी सेवांचे प्रमुख असणाऱ्या सर स्टुअर्ड फेजर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी प्रशासकीय कामकाज कसे चालवावे याचे शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी विवाह केला, आणि १८९४ मध्ये राज्याभिषेक करून ते कोल्हापूर संस्थानाचे राजे बनले. राज्याभिषेकावेळी त्यांचे नामकरण यशवंतराव ऐवजी छत्रपती शाहू महाराज असे करण्यात आले.

सामाजिक कार्य:

मित्रांनो, आपण राजर्षी शाहू महाराजांना एक राज्यकर्ते म्हणून ओळखण्याऐवजी एक चांगला समाज सुधारक म्हणूनच ओळखतो. राज्याभिषेकानंतर त्यांनी राजकारभार स्वीकारला आणि तिथून पुढे त्यांनी समाज सुधारणाकडे आपला मोर्चा वळविला. त्यांचा मुख्य भर हा शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे, आणि समाजातील सर्वच स्तरांपर्यंत शिक्षण पोहोचवणे हा होता.

सर्व स्तरातील लोकांनी शिक्षण घ्यावे म्हणून त्यांनी शिंपी, चांभार, न्हावी, पांचाळ, धोबी, देवदैन्य इत्यादी समाजासाठी; सोबतच मुस्लिम ख्रिश्चन आणि जैन यासारख्या धर्मांसाठी देखील वसतिगृहे सुरू केली. सोबतच समाजातून बेदखल केलेल्या लोकांसाठी देखील त्यांनी मिस क्लार्क बोर्डिंग स्कूल ही संस्था स्थापन केली.

 मित्रांनो शिष्यवृत्ती ची सुरुवात राजर्षी शाहू महाराज यांच्यात कालावधीत झाली. त्याच प्रकारे त्यांनी सन १९१८ मध्ये तलाठी शाळा सुरू करून समाजातील सर्व घटकांना प्रशासकीय सेवेत समावेश करता यावा यासाठी प्रयत्न केले.

पूर्वीच्या काळी केवळ ब्राह्मणांनाच वेदांचे पठण करता येई, त्या गोष्टीला फाटा देण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी इतर समाजाला देखील वेद पठाण करण्यासाठी प्रोत्साहन दिले, मात्र यामुळे तत्कालीन समाजामध्ये वेदोक्त वादाची ठिणगी पडली. या गोष्टीला उच्चभ्रू वर्गणी मोठा विरोध केला.

मित्रांनो, राजर्षी शाहू महाराजांचे शैक्षणिक कार्य फार मोठे आहे, त्यांनी शिक्षणाचे महत्त्व जाणून अनेक शैक्षणिक संस्था देखील स्थापन केल्या. तसेच ब्राह्मणेतर समाजाला विविध अधिकार बहाल करण्यासाठी डेक्कन रयत असोसिएशन ही संस्था निपाणी येथे स्थापन केली.

छत्रपती शाहू महाराज यांना जातीभेद आणि अस्पृश्यता या दोन गोष्टींची फार मोठी चिरड होती, त्यांना ही व्यवस्था बिलकुल आवडत नसे. या दोन्ही गोष्टींना तिलांजली देण्यासाठी त्यांनी खूप मोलाचे प्रयत्न केले. अनेक संदर्भांच्या नुसार सरकारी नोकरी मधील पहिली आरक्षण व्यवस्था राजर्षी शाहू महाराजांनी सुरू केली. तसेच सार्वजनिक ठिकाणे, विहिरी, रुग्णालये, शाळा या ठिकाणी उच्चवर्णीय व निम्नवर्णीय असा भेदभाव दूर करून सर्वांना समान न्यायाने वागवावे असा राजादेश अर्थात रॉयल डीक्री त्यांनी काढला होता.

त्याकाळी आंतरजातीय विवाहांना खूप तुच्छ लेखले जाई, त्यामुळे समाजातील इतर घटकांना हिनतेची वागणूक मिळत असे. मात्र शाहू महाराजांनी आंतरजातीय विवाह मान्यता देणारा पहिला कायदा तयार केला, ज्यामुळे दुर्लक्षित समाजामध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले.

समाजासाठी कार्य करताकरता शाहू महाराजांनी स्त्रियांसाठी देखील खूप मोलाचे कार्य केले. त्यांनी आपल्या संस्थांमध्ये महिलांसाठीच्या शाळा सुरू करून महिलांना शिक्षणास प्रोत्साहित केले. तसेच देवदासी प्रथाविरुद्ध त्यांनी कायदा करून या वाईट प्रथेला कायद्याने आवर घातला.

तसेच अज्ञान मुलींना संरक्षण देण्यासाठी त्यांनी बालविवाह प्रतिबंधक कायदा देखील केला, सोबतच ज्या महिलांच्या पतीचे अकाली निधन झाले अशा महिलांसाठी त्यांनी विधवा पुनर्विवाह कायदा देखील मंजूर केला.

शाहू महाराजांचे सन्मान:

मित्रांनो छत्रपती शाहू महाराजांना केंब्रिज विद्यापीठाचे मानद एल एल डी; राणी विक्टोरियांच्या मार्फत ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ इंडिया; किंग एडवर्ड कोरोनेशन मेडल इत्यादीसह अनेक सन्मान मिळालेले आहेत.

मृत्यु:

मित्रांनो अशा या थोर समाज सुधारक असणाऱ्या शाहू महाराजांची मुंबई या ठिकाणी ६ मे १९२२ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनानंतर कोल्हापूरच्या संस्थानाचे सूत्र त्यांचे जेष्ठ पुत्र राजाराम महाराज यांनी स्वीकारले.

निष्कर्ष:

मित्रांनो आयुष्य जगावे ते राजश्री शाहू महाराज यांच्यासारखे. इतके सारे सुख वैभव असताना देखील आपली संपूर्ण हयात रयतेच्या सुखाचा विचार करणारा राजा म्हणजे राजश्री शाहू महाराज होय. स्वतः राज घराण्यातील असून देखील त्यांनी आपले उभे आयुष्य गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठीच वेचले. त्यांनी आपल्या संस्थानामध्ये जातीपातीला कधीही थारा दिला नाही, याउलट त्यांनी समाजातील दुर्लक्षित जाती-जमातींसाठी खूप मोठे योगदान दिले.

आज काल राजकारणामध्ये राजश्री शाहू महाराज यांचा आदर्श घेणे खूप गरजेचे आहे. वेळप्रसंगी त्यांनी स्वतः वेश बदलून संपूर्ण राज्यभरात दौरा केला, आणि रयतेच्या समस्या जाणून घेतल्या, आणि त्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. अशा या महान राजाला मानाचा मुजरा.

कोल्हापूरच्या राजगादीचा इतिहास | Histroy of Shahu maharaj

Follow the below link to buy amazing gadgets for shootingAmitasha New Foldable Wi-Fi Camera Drone with Altitude Hold and Headless Mode₹5,499.00https://amzn.t...

FAQ

राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म केव्हा आणि कोठे झाला?

राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म २६ जून १८७४ रोजी पश्चिम महाराष्ट्रातील सध्याचा जिल्हा असणाऱ्या कोल्हापूर मध्ये झाला.

राजर्षी शाहू महाराजांच्या वडिलांचे नाव घाटगे असून देखील शाहू महाराजांचे नाव भोसले का?

मित्रांनो छत्रपती राजर्षी शाहू महाराज अर्थात पूर्वाश्रमीचे यशवंत हे कोल्हापूरच्या संस्थानाचे दत्तक पुत्र होते. म्हणून त्यांच्या नावामध्ये ही तफावत आहे.

राजर्षी शाहू महाराजांच्या पत्नीचे नाव काय होते?

राजर्षी शाहू महाराज यांच्या पत्नीचे नाव लक्ष्मीबाई भोसले असे होते.

राजर्षी शाहू महाराज यांचा राज्याभिषेक केव्हा झाला?

राजर्षी शाहू महाराजांचा राज्याभिषेक २ एप्रिल १८९४ या दिवशी झाला.

राजर्षी शाहू महाराजांचा मृत्यू केव्हा झाला?

छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे निधन ६ मे १९२२ रोजी झाले.

मित्रांनो, आज आपण राजर्षी शाहू महाराज यांच्या बद्दल इत्यंभूत माहिती पाहिली, या माहितीचा वापर करून तुम्ही निबंध देखील लिहू शकता. ही माहिती आवडली असल्यास तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तसे नक्की कळवा.

 धन्यवाद…

Siddharth Tambe

सिद्धार्थ तांबे (Siddharth Tambe) हे एक content writer असून यांना पोस्ट लिहिण्याचा ३ वर्षांचा अनुभव आहे. यांचे शिक्षण बी.एसस्सी Agri.झाले असून ते मराठी भाषेत अचूक लेखनाचे कार्य करतात.

Leave a Comment