ससा प्राण्याची संपूर्ण माहिती Rabbit Animal Information In Marathi

Rabbit Animal Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो ससा हा सर्वांचाच आवडीचा प्राणी. एकदम सुंदर, सालस आणि गोंडस असा हा प्राणी दिसायला देखील अतिशय सुंदर असा असतो. त्यामुळे बरेचसे लोक सशांना पाळतात सुद्धा. मात्र गोंडस दिसणारा हा ससा अतिशय धूर्त आणि चतुर असतो. मांजर आणि ससा या दोन प्राण्यांमध्ये बऱ्याचशा गोष्टींमध्ये साम्य आढळून येते, ज्यावेळी ससे जन्माला येतात तेव्हा मांजरी प्रमाणेच त्यांचे डोळे देखील मिटलेले असतात. सुमारे सात ते बारा वर्षे जगणारे हे ससे शिकार झाल्यास मात्र लवकर मृत्युमुखी पडतात.

Rabbit Animal Information In Marathi

ससा प्राण्याची संपूर्ण माहिती Rabbit Animal Information In Marathi

आजच्या भागामध्ये आपण ससा या अतिशय गोंडस दिसणाऱ्या प्राण्याबद्दल इत्यंभूत माहिती बघणार आहोत…

प्राण्याचे नाव: ससा
इंग्रजी नाव: रॅबिट
शास्त्रीय नाव: ऑरीक्टोलागस क्यूनिक्युलस
प्रकार: सस्तन प्राणी
साधारण जीवनकाळ:९ वर्षे (७ ते १२ वर्ष)
साधारण झोपेचा काळ: दिवसातील सुमारे ८.४ तास
गर्भधारणेचा कालावधी: केवळ २८ ते ३५ दिवस.
धावण्याचा वेग: सुमारे ४० ते ४२ किलोमीटर
सरासरी वस्तुमान: १.२५ ते २.५० किलोग्राम

मित्रांनो सस्तन प्राण्यांमधील लहान असणारा अतिशय देखणा प्राणी म्हणजे ससा होय. जगामध्ये या सशाच्या सुमारे आठ प्रजाती आढळतात, ज्या गवताळ प्रदेश, वाळवंट, जंगले इत्यादी ठिकाणी आपले बीळ करून राहतात, तसेच ओलसर जागा त्यांच्यासाठी अतिशय उत्तम अशी असते. ते जमिनीमध्ये आपल्याला नख्यांद्वारे उकरण्यात अतिशय महिर असतात. सव्वा ते दीड फुट लांब असणारा हा प्राणी खूप गोंडस दिसतो, म्हणून बहुतेक युरोपीय लोकांकडे ससे पाळलेले आपल्याला दिसून येतात.

संख्येने सुमारे २८ असणारे सशाचे दात नेहमी वाढत असतात. मात्र संतती झाल्यानंतर हे खूप मोठ्या प्रमाणात वाढतच राहतात. त्यांच्या शरीरावरील उत्तम पोत त्यांना आकर्षक बनवत असतो. जास्तीत जास्त ससे ही काळसर पांढऱ्या, तपकिरी, किंवा करड्या रंगाची असतात. तसेच पाळण्यासाठी वापरण्यात येणारी ससे हे पांढराशुभ्र रंगाचे असतात. त्यांचे कान देखील खूप आकर्षक असतात. मादी ससा एक वेळेला सुमारे सरासरी नऊ पिल्लांना जन्म देते.

सशाचे खाणपान:

मित्रांनो ससा हा शाकाहारी प्राणी आहे, त्यामुळे तो गवत, भाज्या, फळे, इतर शाकाहारी पदार्थ आणि काही वेळेला अन्नधान्य खाण्यावर भर देतो. सशाला कोवळे अन्न खायला फार आवडते. त्याचे दात अत्यंत भक्कम असल्यामुळे तो कुठलेही शाकाहारी पदार्थ अगदी सहजतेने करंडून खाऊ शकतो. ससा हा गाजर खायला अतिशय प्राधान्य देतो. तसेच इतरही कोवळे कोवळे भाजीपाला पिके त्याच्या अत्यंत आवडीची आहेत.

ससा या प्राण्याची प्रजनन प्रक्रिया:

मित्रांनो, ससा हा सस्तन प्राणी असल्यामुळे तो आपली पिल्ले स्वतः जन्माला घालतो. मिलनानंतर सुमारे ३५ दिवसानंतर मादी आपली पिले जन्माला घालते, म्हणजेच सशामधील गर्भधारणेचा कालावधी अंदाजे ३५ दिवसांपर्यंत असतो. मादी ससा एका वेळेला तब्बल नऊ पिल्लांपर्यंत पिल्ले जन्माला घालू शकते. मांजरीप्रमाणेच सशाची पिल्ले जन्माला आल्यानंतर पंधरा दिवसानंतर आपले डोळे उघडतात. जन्माला येताना पिल्लांच्या अंगावर बिलकुल केस नसतात. त्यानंतर हळूहळू ते केस यायला लागतात.

सश्याचे आयुर्मान:

मित्रांनो, ससा हा प्राणी अतिशय चपळ आणि गतिमान असल्यामुळे तो नेहमी इकडून तिकडे उड्या मारत असतो. त्यामुळे ससा या प्राण्याचे आयुष्य कमी असते. अंदाजे सशाचे वय हे सहा ते बारा वर्षांपर्यंत असते, मात्र ते सरासरी नऊ वर्ष इतके समजले जाते.

मात्र आजकाल कुत्र्यासारख्या प्राण्यांसोबतच माणूस देखील सशांची मोठ्या प्रमाणावर शिकार करू लागले आहे. त्यामुळे ससे सहसा कुठे दिसत नाहीत, त्यांची लोकसंख्या देखील कमी झालेली आहे. आणि त्याबरोबरच त्यांचे सरासरी आयुष्य देखील खूप कमी झालेले आहे.

ससा या प्राण्याबद्दल काही मनोरंजक तथ्य माहिती:

मित्रांनो, ससा हा मानवाप्रमाणे समाजशील प्राणी आहे. तो एकटा न राहता कळपामध्ये राहायला प्राधान्य देतो. आजकाल रानावनात एकटा दुखटाच ससा दिसला की त्याची शिकार केली जाते, मात्र जंगलामध्ये बघितल्यास ससे नेहमी कळपाच्या स्वरूपातच आढळून येतात. यामध्ये अनेक नर आणि मादी ससे असतात. सशांना नर आणि मादी असे एकत्र राहायला आवडते.

मित्रांनो, आपण लहानपणी गोष्ट ऐकली असेल, की ससा हा खूप खादाड आहे, आणि ते खरे देखील आहे. तो आपल्या जेवणामध्ये विशेष रुची घेऊन खातो. त्याला कोवळे आणि उत्तम खाद्य पदार्थच आवडतात. या सर्वांपेक्षा जास्त महत्त्वाचे गोष्ट म्हणजे ससा कुठलेही अन्न खाण्याआधी त्याचा वास नक्की घेतो, त्याशिवाय तो अन्न खात नाही. यावरून तुम्ही सशाच्या चतुराई बद्दल कल्पना करू शकाल.

मित्रांनो, ससा हा शाकाहारी प्राणी असला तरी देखील अनेक लोक सशाची शिकार करून त्याला खातात. सशाचे मांस हे त्याच्यासारखेच अगदी गुबगुबीत आणि चवदार असते, असे खाणारे लोक सांगतात.

मित्रांनो, आपण रानात ससा बघतो आणि तो क्षणामध्ये नाहीसा होतो, याचे कारण म्हणजे सशाचे आपल्याकडे तोंड जरी नसेल तरी देखील तो आपल्याला बघत असतो. सशाचे डोळे हे अशा रीतीने पारंगत असतात कि तो सभोवताली सुमारे २६० अंश मध्ये सहजतेने बघू शकतात. त्यामुळे सशाला संकटाची चाहूल अगदी सहजतेने लागते, आणि तो आपल्या सफाईचा वापर करून अगदी क्षणात उड्या मारत नाहीसा होतो. तो एकाच वेळी सर्व दिशांना बघू शकत असल्यामुळे शिकारी जवळ येण्या आधीच तो आपला जीव वाचवून पळणे पसंत करतो.

मित्रांनो, चिनी लोक विविध प्रकारचे मांस खाण्यासाठी जगभर ओळखले जातात, तिथे ते सशाचे मांस कसे बरे सोडतील?, जगामधील सर्व देशांपैकी चीन हा असा एकमेव देश आहे जिथे सर्वात जास्त प्रमाणात सशाचे मांस तयार केले जाते आणि खाल्ले जाते.

आपण लहानपणी ऐकलेल्या गोष्टी मधील ससा हा भारी आळशी होता, ज्यामुळे तो शर्यत हरला होता असे आपण वाचलेले आहे. मात्र खराखुरा ससा सुद्धा अगदी आळशी असा असतो. तो दिवसभरातील सुमारे साडेआठ ते नऊ तास केवळ झोपण्यामध्येच व्यतीत करतो.

निष्कर्ष:

मित्रांनो, ससा हा अतिशय गोंडस आणि सुंदर असा असतो. मात्र तो तेवढाच चपळ आणि वेगवान देखील असतो. सशाला आपण आळशी प्राणी म्हणतो आणि ते खरेच आहे, सशाला झोप फार प्रिय आहे. तो दिवसातील सुमारे साडेआठ तास झोपेमध्येच व्यतीत करतो, जे लहान प्राण्यांमध्ये असणाऱ्या झोपेच्या प्रमाणाच्या तुलनेत बरीच अधिक आहे. अगदी सव्वा ते अडीच किलो वजनाचा हा प्राणी अतिशय चतुर देखील असतो.

ज्याला खाण्यामध्ये अगदी ताजा आणि शेलका माल लागतो, त्यामुळे ससा देखील अगदी गुबगुबीत असा असतो. अनेक लोक याचे मांस खायला प्राधान्य देतात. मात्र सशाची शिकार करणे चांगले नाही, त्यामुळे सशाची शिकार करू नका. आणि कोणी करीत असेल तर त्याला देखील त्या गोष्टीपासून परावृत्त करा.

ससा माहिती मराठी | rabbit information in marathi

sasa vishay mahiti | sasa chi mahiti | sasha chi mahiti | sasha vishay mahiti | sasa vishe mahitiYour queries solved in this video:- 1. rabbit information in...

FAQ

ससा दिवसातून किती वेळ झोपतो?

ससा दिवसातील सुमारे साडेआठ तास झोपतो.

ससा किती वेगाने पळू शकतो?

ससा सुमारे  प्रति तास ४० किलोमीटर या वेगाने धावू शकतो, मात्र तो जास्त वेळ याच वेगाने जाऊ शकत नाही.

सशाचे वजन साधारणपणे किती असते?

ससा चे वजन साधारणपणे सव्वा ते अडीच किलोच्या दरम्यान असते.

ससा साधारणपणे किती वर्ष जगतो?

ससा साधारणपणे सात ते बारा वर्ष जगतो मात्र त्याचे सरासरी आयुर्मान ९ वर्षे सांगितले जाते.

सशामध्ये दातांची संख्या किती आढळून येते?

सशामध्ये दातांची संख्या सुमारे २८ इतकी असते.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण ससा या प्राण्याबद्दल माहिती पाहिली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली, आवडली ना? तर मग अगदी क्षणाचा ही विलंब न करता ही माहिती आपल्या कॉन्टॅक्ट लिस्ट मधील मित्र-मैत्रिणींना शेअर करा.

 धन्यवाद…

Kasturi Khule

कस्तुरी खुळे (Kasturi Khule) हि एक content writer असून यांना पोस्ट लिहिण्याचा २ वर्षांचा अनुभव आहे. हि बी.सी.एस.(Bachelor Of Computer Science) च्या तिसऱ्या वर्षाला असून ती content writer चे काम उत्तम प्रकारे करीत असतात.

Leave a Comment