नाशपती फळाची संपूर्ण माहिती Pear Fruit Information In Marathi

Pear Fruit Information In Marathiनमस्कार मित्रांनो, मित्रांनो आजकाल प्रत्येक जण आरोग्याबाबतीत जागृत झालेला दिसून येतो. पूर्वीच्या काळी लोक अनेक वेगवेगळ्या प्रकारचा आहार घेत असत. ज्यामध्ये पालेभाज्या रानभाज्या विविध कंदमुळे फळे इत्यादींचा भरपूर समावेश असे, आणि सोबतच आरोग्यदायी तेलांचा वापर देखील केला जाई. कमी प्रदूषणामुळे पाणीदेखील नेहमी स्वच्छ मिळत असे, मात्र आजकाल धावपळीच्या युगात शुद्ध पाणी तर सोडाच ताज्या भाज्या मिळणे देखील दुरापास्त झालेले आहे. त्यातही सोसायटीच्या भाजीवाल्याकडे बोटावर मोजता येतील इतक्याच प्रकारच्या भाज्या आढळून येतात.

नाशपती फळाची संपूर्ण माहिती Pear Fruit Information In Marathi

शहरात राहणाऱ्या बऱ्याच लोकांना वर्ष वर्ष पालेभाज्यांची चव देखील चाखायला मिळत नाही. अशावेळी वेगवेगळ्या प्रकारचा आहार पोटात न गेल्यामुळे शरीराला आवश्यक असणाऱ्या घटकांचा पुरवठा होत नाही. परिणामी विविध प्रकारचे आजार बळवताना दिसून येतात.

या सर्वांवर मात करण्यासाठी फलाहार करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. त्यातही कुठले फळ निवडावे जेणेकरून जास्तीत जास्त आवश्यक घटक शरीराला मिळतील याबाबतीत आपल्याला माहिती नसते.यासाठीच आम्ही आज नाशपती अर्थात पीयर या फळाबद्दल माहिती घेऊन आलो आहोत.

या फळांमधून तुम्हाला सर्व प्रकारची नैसर्गिक जीवनसत्वे, फायबर्स, खनिजे इत्यादी गोष्टी भरपूर प्रमाणात मिळतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याची चव देखील अतिशय उत्कृष्ट असते. आणि हे फळ शरीरासाठी पौष्टिक देखील आहे. चला तर मग अशा या सर्वगुणसंपन्न पियर  फळाबद्दल माहिती बघूयात…

नाव: नाशपती
इंग्रजी नाव: पिअर फ्रुट
वैज्ञानिक नाव:Pyrus spp. (Pyrus communis)
आकार: बेलासारखा
झाडाचे साधारण आयुष्य: १०० वर्षे
प्रजातींची संख्या: सुमारे तीन हजार
उपलब्ध जीवनसत्त्व: जीवनसत्त्व क
कुळ: Rosaceae

मित्रांनो, नाशपती हे आरोग्यदायी फळ हंगामी स्वरूपातील असून ते तुम्हाला उन्हाळा ते पावसाळा या कालावधी दरम्यान खायला मिळू शकते. या फळाची चव किंचितशी आंबट गोडसर अशी असते. या फळाला इंग्रजीमध्ये पियर, हिंदी मध्ये नाशपाती, तमिळमध्ये पेरीके, तर पंजाबी मध्ये नास्पती असे म्हटले जाते.

नाशपतीचे फायदे:

मित्रांनो नाशपतीचे फळ रसाळ जरी असले तरी त्यामध्ये तंतुमय पदार्थ अर्थात फायबर्स चे प्रमाण बरेच आहे. त्यामुळे तुम्हाला जर पचनविकाराशी संबंधित तक्रारी असतील तर नाशपती हे फळ तुमचे पचन सुधारण्यास मदत करेल. नासपतीचे एक फळ तुम्हाला दिवसभरात आवश्यक असणाऱ्या फायबर्स पैकी तब्बल १८% फायबर्स प्रदान करते. नाशपती मधील पेक्टीन देखील अतिसार आणि बद्धकोष्ठता या समस्या दूर करते.

मित्रांनो आजकाल प्रत्येक जण कॅलरी कॉन्शियस झालेला आहे. त्यामुळे अशा लोकांसाठी देखील हे फळ अतिशय उत्कृष्ट आहे. नाशपतीमध्ये सर्वात कमी साखर आणि कॅलरी असतात म्हणजे तुम्हाला दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असलेल्या कॅलरीजपैकी केवळ पाचच टक्के कॅलरी या नाशपतीच्या फळाद्वारे मिळतात. म्हणून वजन कमी करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी नाशपती हे फळ अतिशय उत्तम आहे, या फळाद्वारे तुम्हाला कमी कॅलरीसह अत्यावश्यक सर्वच घटक मिळतात.

नाशपती हे कर्करोग आजाराच्या विरोधी लढण्यासाठी देखील मदत करते. नाशपती मधील हायड्रोक्सियानोमिक ऍसिड, फायबर्स आणि अँटीऑक्सिडंट्स कोलन, रेक्टल, प्रोस्टेट,  ब्रेस्ट, आणि लंग्ज कॅन्सरवर प्रभावी ठरतात.

मित्रांनो कर्करोगाचे मुख्य कारण धूम्रपान असते, त्यामुळे धुम्रपानानंतर नाशपती खाल्ली तर कर्करोगास निमंत्रण देणारे विषारी घटक त्वरित बाहेर पडण्यास मदत होते. मात्र धूम्रपान न करता नाशपती खाल्ल्यास कर्करोगावर त्वरितच विजय मिळवला जाऊ शकतो.

नाशपतीच्या झाडांच्या पानापासून चहा सुद्धा बनवला जाऊ शकतो, या चहाच्या सेवनाने युरेथ्रायटिस, सिस्टीसिस, आणि युरेथ्रल कॅल्युलस इत्यादी आजारांवर मात केली जाऊ शकते.

मित्रांनो, नाशपती हे फळ रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यामध्ये देखील मोलाची भूमिका पार पडताना दिसते. शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती चांगली असेल तर माणूस अगदी ठणठणीत राहतो. नाशपती मधील अँटिऑक्सिडंट्स आणि विटामिन सी हे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याच्या कामात महत्त्वाची भूमिका बजावतात. यामुळे पांढऱ्या रक्त पेशी वाढवून किरकोळ आजारांवर विनासायास मात केली जाऊ शकते.

नाशपतीच्या सेवनाने हृदयविकारावर देखील फायदा होतो. नाशपतीमध्ये पोटॅशियम असल्याने रक्तदाब नियंत्रित ठेवला जातो. तसेच हृदय व रक्तवाहिन्या यांच्यावरील ताण नियंत्रित केला जातो. परिणामी हृदयविकाराचा धोका टळतो.

नाशपतीच्या फळांमध्ये विविध प्रकारचे ऍसिड्स असतात, ज्यामुळे शरीरावरील छोट्या मोठ्या जखमा किंवा कट्स झटपट भरून येण्यासाठी मदत होते.

नाशपतीमध्ये कॉपर आणि आयर्न हे दोन महत्त्वाचे खनिज घटक असतात. ज्या लोकांना ॲनिमिया असेल त्यांच्यासाठी नाशपती खाण्याचा सल्ला दिला जातो. तसेच तांब्याच्या प्रमाणामुळे जेवणातून मिळणाऱ्या खनिजांचे रक्तामध्ये शोषण वाढविले जाते. तसेच यामुळे लाल रक्तपेशी देखील वाढण्यात मदत होते. परिणामी ऍनिमिया होणे, अशक्तपणाच्या समस्येवर मात करणे यांसारख्या गोष्टींवर देखील नाशपती फायदेशीर ठरते.

मित्रांनो, गर्भवती महिलांमध्ये फॉलिक ऍसिड चे महत्व सर्वांनाच माहिती आहे. आणि हाच फॉलिक ऍसिड घटक नाशपती मध्ये चांगल्या प्रमाणात असतो. परिणामी गर्भवती महिला आणि होणाऱ्या बाळाचे आरोग्य अबाधित राखण्यास मदत होते.

चांगले नाशपती फळ कसे ओळखावे:

मित्रांनो, नाशपतीचे अनेकविध चांगले फायदे असले तरी देखील अयोग्य नाशपतीच्या सेवनाने आरोग्यावर प्रतिकूल परिणाम देखील होऊ शकतात. म्हणूनच चांगली नाशपती निवडणे देखील महत्त्वाचे ठरते.

नाशपती निवडताना नेहमी सोनेरी रंगाची नाशपती निवडावी, तसेच ती जास्त मऊ किंवा जास्त कडक देखील नसावी. नाशपतीच्या फळावर कुठलेही ओरखडे असू नयेत, मात्र त्यावर तुम्हाला तपकिरी डाग आढळल्यासही अशी नाशपती तुम्ही खरेदी करू शकता.

नाशपती खरेदी करताना नाशपतीच्या देठाजवळील भागात तुम्ही दाबून बघू शकता, तिथे तुम्हाला जास्त मऊपणा आढळला तर अशी नाशपती घेणे शक्यतो टाळावी. कारण ही नाशपती एकतर खराब झालेली असते किंवा लवकरच खराब होण्याच्या मार्गावर असते. नाशपती खरेदी केल्यानंतर देखील तिचे योग्य प्रकारे साठवणूक करणे महत्त्वाचे ठरते. यासाठी स्वच्छ आणि कोरड्या जागी हवा लागेल अशा पद्धतीने नाशपतीचे फळ साठवावे.

निष्कर्ष:

मित्रांनो, कितीही धावपळीचे आयुष्य असले तरी देखील रोजचा आहार हा सर्वगुणसंपन्न असाच असावा, आणि त्यासाठी फळे फार मोलाची मदत करतात. याचमुळे आजच्या भागामध्ये आपण नाशपती ज्याला इंग्रजीमध्ये पीयर फूट असे म्हटले जाते त्याबद्दल माहिती पाहिली. हे एक क जीवनसत्त्वाने भरपूर असलेले फळ असून यामध्ये इतरही घटक जसे की खनिजे, फायबर्स भरपूर प्रमाणात आढळून येतात.

साधारणपणे सफरचंदा एवढे असणारे हे फळ बेलाच्या फळासारखे दिसते. आणि चवीला देखील अतिशय उत्कृष्ट असे असते. आजारी माणसांना शक्यतो हे फळ खाण्याचे सुचविले जाते, जेणेकरून शरीराची झालेली झीज लवकरात लवकर भरून काढली जाईल. त्यामुळे मित्रांनो किमान आठवड्यातून एकदा तरी हे फळ खाऊन तुम्ही तुमच्या आरोग्याला सुदृढ ठेवू शकता.

नाशपाती खाण्याचे फायदे | Benefits of Pears | Health Benefits of Pears

#नाशपाती #Benefitsofpears #healthBenefitsofpears

FAQ

नाशपती या फळाला इंग्रजी मध्ये काय म्हटले जाते?

नाशपती या फळाला इंग्रजी मध्ये पियर फ्रुट असे म्हटले जाते.

नाशपती फळाच्या किती प्रजाती बघायला मिळतात?

नाशपती या फळाच्या सुमारे ३००० प्रजाती बघायला मिळतात.

नाशपती फळांमध्ये कोणते जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणावर आढळून येते.

नाशपती या फळांमध्ये जीवनसत्व क हे मोठ्या प्रमाणावर आढळून येते.

नाशपती फळाचा आकार किती असतो.

साधारणपणे नाशपती हे फळ एका सफरचंदाच्या आकाराचे असते.

नाशपतीच्या झाडाचे साधारण आयुष्य किती असते?

नाशपतीच्या झाडाचे साधारण आयुष्य शंभर वर्षे इतके असते.

मित्रानो, आजच्या भागामध्ये आपण नाशपती म्हणजेच पीयर या फळाबद्दल माहिती बघितलेली आहे. या माहितीचा वापर करून तुम्ही देखील या फळाचे सेवन कराल तर ही माहिती सार्थकी लागली असे होईल.

धन्यवाद…

Kasturi Khule

कस्तुरी खुळे (Kasturi Khule) हि एक content writer असून यांना पोस्ट लिहिण्याचा २ वर्षांचा अनुभव आहे. हि बी.सी.एस.(Bachelor Of Computer Science) च्या तिसऱ्या वर्षाला असून ती content writer चे काम उत्तम प्रकारे करीत असतात.

Leave a Comment