पोपट पक्षाची संपूर्ण माहिती Parrot Bird Information In Marathi

Parrot Bird Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो पोपट हा अतिशय आकर्षक असणारा पक्षी जवळपास जगातील सर्वच देशांमध्ये आढळून येतो. अगदी हिरवट रंगीबेरंगी पिसारा, लालसर चोच आणि मंजूळ आवाज हे पोपटाचे लक्षण म्हटले जाते. हा पोपट आशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. ज्यांच्या सुमारे ३०० पेक्षा ही अधिक प्रजाती आहेत, मात्र या प्रजातीतील काही प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

Parrot Bird Information In Marathi

पोपट पक्षाची संपूर्ण माहिती Parrot Bird Information In Marathi

मुख्यतः उष्णकटिबंधीय प्रदेशात व उपोष्णकटिबंधीय परिसरात राहणारा हा पोपट त्याच्या राहण्याचे ठिकाणानुसार खानपानाच्या सवयी देखील बदलत असतो.

हल्लीच्या काळी त्याच्या सुंदर दिसण्यामुळे अनेक लोक पोपट पाळत आहेत, त्यामुळे त्यांचा मोठ्या प्रमाणावर बेकायदा व्यापार देखील सुरू आहे. याच कारणामुळे पोपटाच्या अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

आजच्या भागामध्ये आपण पोपट या पक्षाविषयी माहिती बघणार आहोत…

नावपोपट
इंग्रजी नावपॅरोट
इतर नावराघू
वैशिष्ट्यबुद्धिमान पक्षी
रंगहिरवा अथवा पोपटी
चोचलाल
आवडीचे फळपेरू

मित्रांनो, शाकाहारी गटातील पक्षी म्हणजे पोपट होय. भाज्या आणि फळे हे त्याचे प्राथमिक व सर्वात आवडीचे अन्न आहे. ते हिरव्या मिरच्या देखील खातात. तसेच अनेक प्रकारचे फळे देखील आवडीने खातात. पोपटाचा मूळ आवाज हा अगदीच कर्कश असतो, मात्र त्याला चांगला आवाज काढण्याचे शिकवले तर तो अगदी माणसाचा देखील हुबेहूब आवाज काढू शकतो. हे पक्षी नेहमी एक पत्नी प्रकारात असतात, म्हणजे ते मानवाप्रमाणेच आपला साथीदार बदलत नाहीत.

त्यांच्या कळपामधील जवळपास सर्वच नर आणि मादी एकासारखे दिसतात. ते झाडाच्या खोडामध्ये किंवा बेचक्या मध्ये आपले घरटे बनवून त्यामध्ये मादीद्वारे अंडी घातली जातात. त्यांची संख्या सुमारे एक ते बारा पर्यंत असते. पोपट हा मूळ ऑस्ट्रेलिया व न्युझीलँड मधील आहे. तिथून अनेक प्रकारच्या देशांमध्ये हे पक्षी निर्यात केले जातात. भारताचा राजस्थान मधील प्रदेश सोडता इतर अनेक प्रदेशांमध्ये हे पक्षी आढळून येतात.

पोपटाचा इतिहास:

मित्रांनो, हा पक्षी सर्वात प्रथम चीन या देशातील लोकांनी पाळला. आणि त्या खालोखाल भारतीयांनी देखील हा पक्षी पाळण्यास सुरुवात केली. पुढे अनेक लोकांनी हे पक्षी पाळले, त्यामध्ये इजिप्शियन लोकांचा देखील समावेश होतो. आजपासून सुमारे ३०० इसापूर्व मध्ये हे पक्षी युरोपमध्ये देखील पाळण्यात आले  हे पक्षी पाळणे त्याकाळी श्रीमंतीची लक्षणे समजले जात असे.

अनेक इतिहासातील प्रसिद्ध व्यक्तीने देखील हे पक्षी आपल्या कडे पाळले होते. ज्यामध्ये ॲरिस्टॉटल, मार्को पोलो, मेरी अँटोनेट, किंग आठवा हेन्री यासारख्या लोकांचा समावेश होतो.

पोपटांची आवाज काढण्याची कला:

मित्रांनो, मानवाला पोपट पाळण्याची सवय लागण्याचे मूळ कारण म्हणजे त्याचे आवाजाची नक्कल काढण्याची पद्धत होय. तो एकदा शिकवले की हुबेहूब कोणताही आवाज काढण्यास सक्षम असतो.

खरे तर निसर्गाने त्यांना ही देणगी आपले स्वतःचे संरक्षण करण्याकरिता दिलेली आहे, मात्र मानवाने त्यांना शिकवून हा आवाज काढत स्वतःचे मनोरंजन करून घेतलेले आहे. पोपट अगदी घरातील पाण्याचा आवाज, लोकांचे बोलणे, मशीन यांसारख्या विविध गोष्टींच्या आवाजांचे देखील नकल करू शकतात.

पोपट आणि बुद्धिमत्ता:

मित्रांनो, हे पक्षी अतिशय बुद्धिमान असून ते बोलणे देखील शिकू शकतात. ते आपल्या स्वतःला विविध परिस्थितीमध्ये जुळवून घेण्यास अतिशय सक्षम असून, त्यांना विविध वस्तू कशा वापरायच्या हे बघून देखील शिकता येते. चार वर्षाच्या मुलाचा मेंदू ज्या प्रमाणात प्रगत असतो तेवढा या पक्षांचा देखील प्रगत असतो असे म्हटले जाते. आणि या विधानाला शास्त्रज्ञांनी देखील पाठिंबा दर्शवलेला आहे.

आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पक्षी पायाने देखील अन्न खाऊ शकतात. तसेच ते फांद्यांना लटकून उलटा झोका देखील घेऊ शकतात. त्याचबरोबर पोपट मानवाप्रमाणेच उजव्या हाताने खाणारे किंवा डाव्या हाताने खाणारे अशा प्रकारात देखील आढळून येतात.

पोपट पक्षाविषयी काही मनोरंजक तथ्ये:

 • मित्रांनो, पक्षी प्रकारातील पाळला गेलेला सर्वात पहिला पक्षी म्हणून पोपटाला ओळखले जाते.
 • आफ्रिकेमध्ये आढळणारा राखाडी पोपट मानवाच्या बोलण्याची कॉपी करण्यामध्ये सर्वात आघाडीवर समजला जातो.
 • हा पक्षी अतिशय बुद्धिमान समजला जातो.
 • मानवाचे अनेक अन्न खात असले तरी देखील या पक्षाला कधीच चॉकलेट देऊ नये असे म्हणतात. कारण ते पोपटांसाठी विषारी असते.
 • हा पक्षी किमान १० ते कमाल ७५ वर्षांपर्यंत जगू शकतो.
 • पोपटाला एकटे राहण्याऐवजी नेहमी ग्रुप मध्ये राहायला आवडते, आणि मोठ्या आवाजात गोंगाट करणे हे त्यांचे अतिशय आनंद उपभोगण्याचे साधन म्हणता येईल.
 • पोपटाचा आवाज सुमारे एक मैल अंतरापर्यंत देखील ऐकायला जाऊ शकतो.
 • हे पक्षी चोचीने तर खातातच, शिवाय आपल्या पायाच्या साह्याने देखील ते खाऊ शकतात.
 • जगातील सर्वात लहान पोपटाची प्रजाती ही पॅसिफिक पोपट म्हणून ओळखली जाते.
 • पोपट आपले घरटे शक्यतो झाडांच्या पोकळी मध्ये बांधत असतात, ज्याला डोली असे देखील म्हटले जाते.
 • काही प्रकारच्या पोपटांचे वजन मांजरी इतपत देखील असू शकते.
 • पोपटाची अंडी ही पांढऱ्या रंगांमध्ये असतात.
 • पोपटाला बघून कधीही नर किंवा मादी आहे हे ओळखता येत नाही, त्यासाठी त्यांच्या रक्ताची तपासणी करणे गरजेचे ठरते.
 • पोपट हा शाकाहारी प्राणी असला तरी देखील काही वेळेला तो मांसाहार करण्यास प्राधान्य देतो.
 • जगातील सर्वात मोठी पोपटाची प्रजाती म्हणून काकापो या प्रजातीला ओळखले जाते, ज्यांना आपल्या वजन व आकारामुळे उडता येत नाही.

निष्कर्ष:

मित्रांनो, आपल्या आसपास आपल्याला अनेक पक्षी दिसून येतात मात्र काही पक्षांकडेच आपण आकर्षिले जातो. त्याचे कारण म्हणजे त्यांचा अतिशय रंगीबेरंगी आणि आकर्षक पिसारा व त्यांचे मंजूळ आवाज होय. असाच एक पक्षी म्हणजे पोपट. आजच्या भागांमध्ये आपण या पोपटाविषयी माहिती पाहिली.

त्यामध्ये तुम्हाला पोपटाचा इतिहास, त्याची मानवाचा आवाज काढण्याची पद्धती, पायाने खाऊ शकण्याची पद्धत, त्यांचा जीवनमान, चोचीबाबत माहिती, पोपटांची जोडी, त्यांच्या पाळण्याचा इतिहास, त्यांच्या डोक्यावरील पिसांचे वैशिष्ट्य, इत्यादी गोष्टींबद्दल माहिती घेतलेली आहे.

FAQ

पोपटाला इंग्रजी भाषेत काय म्हटले जाते, व त्याची इतर नावे काय आहेत?

पोपटाला इंग्रजी भाषेमध्ये पॅरट असे म्हटले जाते, तर त्याच्या इतर नावांमध्ये राघू हे नाव सर्वत्र प्रसिद्ध आहे.

पोपट उडू शकतो का?

पोपट उडू शकत असला तरी देखील जगातील एक पोपटाची प्रजाती अशी आहे जी उडू शकत नाही, तिचे नाव काकापो असे आहे.

पोपट इतर पक्षांपासून कोणत्या गोष्टींमध्ये वेगळे किंवा खास आहेत?

मित्रांनो, पोपट या पक्षाला बुद्धिमान पक्षी म्हणून ओळखले जाते, त्याचा मेंदू हा काही प्रमाणात मानवाच्या इतकाच प्रगत असल्याचे म्हटले जाते. याबरोबरच तो चतुर देखील असून मानवाचा आवाज काढण्यामध्ये माहीर आहे.

पोपट पक्षी साधारणपणे कुठे आढळून येतात?

जगभरात सर्वत्र पोपट हे पक्षी आढळून येत असले तरी देखील गवताळ प्रदेश, सवाना जंगले, आणि उबदार बेट हे त्यांचे आवडीचे राहण्याचे ठिकाण आहे. मात्र असे असले तरी देखील किया सारख्या पोपटांच्या प्रजाती थंड हवामानात राहणे पसंत करतात.

पोपट पाळण्याचा इतिहास काय आहे?

मित्रांनो, आज सर्वांचा आकर्षणाचा विषय असणारा पक्षी पोपटाला ओळखले जाते. मात्र या पोपटाला हल्ली काही वर्षांमध्ये पाळणे सुरू केले नसून, काही संदर्भानुसार हा पक्षी भारतामध्ये सुमारे ३००० वर्षांपासून पाळला जात आहे. त्याचे काही पुरावे देखील आढळतात.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण पोपट पक्षाविषयी माहिती पाहिली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये अवश्य कळवा. तसेच तुमच्या इतरही मित्र-मैत्रिणींना ही माहिती जरूर शेअर करा.

धन्यवाद…

Avatar

i am marathi content writer from last 5 years.

Leave a Comment