पंडित जवाहरलाल नेहरू यांची संपूर्ण माहिती Pandit Jawaharlal Nehru Information In Marathi

Pandit Jawaharlal Nehru Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून ओळखले जाणारे व्यक्तिमत्व म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू होय. त्यांच्या जन्मदिवसाच्या दिवशी बालदिन साजरा केला जातो. कारण नेहरू यांना लहान मुले फार आवडत असत. ते नेहमी आपल्या खिशाला गुलाबाचे फुल लावायचे. नेहरूंना लहान मुलांनी चाचा हे नाव दिले होते. मित्रांनो नेहरू हे अतिशय गुढ व्यक्तिमत्व होते, त्यांच्या चरित्रातून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळू शकतात.

Pandit Jawaharlal Nehru Information In Marathi

पंडित जवाहरलाल नेहरू यांची संपूर्ण माहिती Pandit Jawaharlal Nehru Information In Marathi

मित्रांनो, अहिंसेचे पुजारी असणारे महात्मा गांधी यांनी नेहरूंना स्वातंत्र्य कार्यामध्ये पाठिंबा दर्शवला होता. नेहरू यांच्या मनामध्ये देशाविषयी नेहमी तळमळ असे. महात्मा गांधी आणि नेहरू यांचे संबंध फारच घनिष्ठ होते. महात्मा गांधी नेहरूंना आपला सर्वात प्रिय आणि जवळचा शिष्य म्हणून ओळखत असत. आधुनिक भारताची जडणघडण करण्यामध्ये पंडित नेहरू यांचा फार मोठा वाटा होता, त्यामुळे त्यांना अजून एक भारताचे शिल्पकार या नावाने देखील ओळखले जाते.

आजच्या भागामध्ये आपण पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विषयी इत्यंभूत माहिती बघणार आहोत…

नावपंडित जवाहरलाल मोतीलाल नेहरू
पदवी / इतर नावचाचा
जन्म दिनांक१४ नोव्हेंबर १८८९
जन्म स्थळउत्तर प्रदेशातील अलाहाबाद
आईचे नावस्वरूपराणी नेहरू
वडिलांचे नावमोतीलाल नेहरू
पत्नीचे नावकमलाबाई नेहरू
अपत्यइंदिरा गांधी
मृत्यू दिनांक२७ मे १९६४
मृत्यू स्थळनवी दिल्ली

मित्रांनो, एक तेजस्वी लेखक, उत्तम राजकारणी, चांगले विचारवंत, आणि धडाडीचे नेतृत्व असणारे पंडित नेहरू यांचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ रोजी एका सुखवस्तू कुटुंबामध्ये  अलाहाबाद या ठिकाणी झाला होता. त्यांचे कुटुंब ब्राह्मण पंडित होते. त्यांच्या वडिलांचे नाव मोतीलाल नेहरू होते, जे एक प्रतिष्ठित वकील होते. तसेच सामाजिक कार्यकर्ते देखील होते. त्यांच्या आईचे नाव स्वरूप राणी असे होते. मोतीलाल नेहरू यांना तीन अपत्ये होती. त्यापैकी जवाहरलाल नेहरू हे सर्वात मोठे होते.

पंडित नेहरू अगदी जन्मापासूनच अतिशय बुद्धीने हुशार आणि सामर्थ्यवान होते. त्यांच्याकडे एक विलक्षण बुद्धिमत्ता होती. आयुष्यात ज्या ज्या व्यक्तींना ते भेटले त्या प्रत्येकावर त्यांचा चांगला ठसा उमटला होता. राजकारणामध्ये सुद्धा ते अतिशय प्रभावी होते. शिवाय त्यांचे विचार देखील खूप आदर्श होते, म्हणून ते लेखक म्हणून सुद्धा खूप यशस्वी झाले. ते मूळचे काश्मिरी पंडित असल्यामुळे त्यांना पंडित नेहरू या नावानेच संबोधले जात असे.

पंडित नेहरू यांचे शैक्षणिक जीवन:

मित्रांनो, सुखवस्तू कुटुंबात जन्म झाल्यामुळे जवाहरलाल नेहरू यांना लहानपणी शैक्षणिक सोयींसाठी फार त्रास भोगावा लागला नाही. लहानपणापासूनच चलाख बुद्धीचे असल्यामुळे ते अभ्यासात फार हुशार होते. त्यांना प्राथमिक शिक्षणासाठी खाजगी शिक्षक घरी येऊन शिकवत असत.

त्यानंतर त्यांनी अनेक प्रसिद्ध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये देखील प्रवेश घेतला होता. अगदी वयाच्या पंधराव्या वर्षीच त्यांनी इंग्लंड येथील हेरो स्कूल येथे शिक्षण घेतले होते. त्यानंतर त्यांनी केंब्रिज मधून सुद्धा आपला अभ्यासक्रम पूर्ण केला होता. त्यामध्ये त्यांनी कायद्याची पदवी घेतली होती.

पंडित जवाहरलाल नेहरू यांनी फेबियन समाजवाद व आयरिश राष्ट्रवाद या गोष्टींबद्दल देखील शिक्षण घेतलेले होते. परदेशी शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी १९१२ मध्ये पुन्हा मातृभूमी भारतामध्ये पाऊल ठेवले.

पंडित जवाहरलाल नेहरू यांचा विवाह:

मित्रांनो, ज्यावेळी १९१२ मध्ये पंडित नेहरू भारतामध्ये परतले, तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्वाने प्रत्येकालाच भुरळ घातली होती. त्यांच्या वडिलांनी त्यांचा विवाह लावून देण्याचे ठरविले, आणि ते १९१६ या वर्षी श्रीमती कमलाकर यांच्यासोबत विवाह बंधनात अडकले. त्यांच्या पत्नी कमलाकर या देखील कश्मीरी पंडित कुटुंबात जन्मलेल्या होत्या. त्यांच्या पोटी इसवी सन १९१७ या वर्षी इंदिरा गांधी या मुलीचा जन्म झाला.

पंडित नेहरू व महात्मा गांधी यांची भेट:

मित्रांनो, विवाहानंतर दुसऱ्याच वर्षी जवाहरलाल नेहरू यांनी इंडियन होम रुल या चळवळीमध्ये सहभाग नोंदवला. तसेच १९१९ मध्ये त्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा पाऊल ठेवले. ज्या दरम्यान त्यांची महात्मा गांधी यांच्याशी देखील भेट झाली, आणि नेहरू व गांधीजी यांची जोड गोळी खूपच प्रसिद्ध झाली, ती अगदी स्वातंत्र्य मिळेपर्यंत…

पंडित जवाहरलाल नेहरू यांचा राजकीय क्षेत्रामध्ये प्रवेश:

मित्रांनो १९२६ ते १९२८ यादरम्यान पंडित नेहरूंनी काँग्रेसच्या कमिटीचे सरचिटणीस पद भूषविले होते. त्यानंतर त्यांनी सुभाष चंद्र बोस यांच्यासोबत देखील अनेक दिवस काम केले. काँग्रेसच्या १९२९ मधील लाहोर अधिवेशनादरम्यान त्यांची काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी सर्व परिचित असणारा संपूर्ण स्वराज्याचा ठराव मांडला होता. त्यानुसार स्वातंत्र्यापूर्वीच स्वातंत्र्य दिन साजरा करणे सुरू करण्यात आले होते.

पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लिहिलेली पुस्तके:

मित्रांनो, नेहरुंनी ‘भारत व जग, सोवियत रशिया, भारताची एकता व स्वातंत्र्य, जागतिक इतिहासाची एक झलक’ इत्यादी पुस्तके लिहिली होती. जी खूपच प्रसिद्ध झाली होती.

निष्कर्ष:

मित्रांनो, भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेकांनी आपले योगदान दिलेले आहे. त्यामध्ये जवाहरलाल नेहरू यांचे देखील समावेश होतो. आज आपण याच पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विषयी माहिती पाहिली. लहान मुलांचे प्रिय असणारे पंडित नेहरू अतिशय दूरदर्शी विचारांचे होते, त्यांना चाचा नेहरू किंवा पंडित नेहरू म्हणून ओळखले जात असे.

त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताच्या पहिल्या पंतप्रधान पदाची धुरा सांभाळली होती. आणि या काळामध्ये अनेक कल्याणकारी योजना राबवून आणि लोकहिताची निर्णय घेऊन त्यांनी आधुनिक भारत घडवला होता. म्हणूनच त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार असे नाव देण्यात आलेले आहे.

FAQ

चाचा नेहरू यांच्या सुरुवातीच्या आयुष्याबद्दल काय सांगता येईल?

चाचा नेहरू यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९८९ या दिवशी अलाहाबादच्या एका सुखवस्तू कुटुंबामध्ये झाला. त्यांना अगदी प्राथमिक शिक्षणासाठी खाजगी शिक्षक देण्यात आले होते. वय वर्षे १५ असताना त्यांनी इंग्लंडमध्ये जाऊन दोन वर्ष हेरो येथे व्यतीत केली, तसेच त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून देखील शिक्षण घेतले होते.

पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय स्वतंत्र लढ्यामध्ये कशाप्रकारे योगदान दिले होते?

पंडित जवाहरलाल नेहरू यांनी गांधीजींसोबत मिळून भारतीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले होते. त्यांनी सविनय कायदेभंग मध्ये सुद्धा सहभाग नोंदवला होता. यासाठी त्यांना तुरुंगात सुद्धा जावे लागले होते. १९२८ मध्ये त्यांना काँग्रेसचे नेते म्हणून देखील निवडण्यात आले होते. दुसरे महायुद्ध संपताना महात्मा गांधीजी यांचे वैचारिक वारस म्हणून त्यांची चर्चा केली जात होती.

जवाहरलाल नेहरू यांनी केलेले कोणते भाषण सर्वात प्रसिद्ध झाले होते?

पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्याचा आदल्या दिवशी केलेले भाषण खूपच प्रसिद्ध झाले होते, जे त्यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून केले होते.

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासाठी फेब्रुवारी १९५० मध्ये बनवण्यात आलेल्या वेलकम गेट बद्दल काय सांगता येईल?

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासाठी फेब्रुवारी १९५० मध्ये एक वेलकम गेट बनवण्यात आले होते. जे संपूर्णपणे हिरव्या पालेभाज्या पासून बनवण्यात आले होते. नेहरूंनी सर्व पालेभाज्या वंचितांमध्ये वाटून दिल्या होत्या.

आजच्या युगामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांचे स्मरण कशा पद्धतीने केले जाते?

आजच्या युगामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांचे स्मरण त्यांच्या जयंतीदिनी बालदिन साजरा करून केले जाते.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण चाचा म्हणून ओळखले जाणारे जवाहरलाल नेहरू यांच्या विषयी माहिती पाहिली. ही माहिती तुम्हाला आवडली तर असेलच. तर मग क्षणाचा ही विलंब न करता आमच्यापर्यंत तुमच्या प्रतिक्रिया पोहोचवा. आणि आपल्या इतर  मित्र मैत्रिणींना देखील ही माहिती अवश्य पाठवा.

धन्यवाद…

Avatar

i am marathi content writer from last 5 years.

Leave a Comment