संत्रा फळाची संपूर्ण माहिती Orange Fruit Information In Marathi

Orange Fruit Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो जगाच्या पाठीवर जवळपास सर्वच देशात आढळणारे फळ म्हणजे संत्रा होय. संत्रा हा चवीला अतिशय अप्रतिम असून, त्यामध्ये विविध प्रकारची खनिजे आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणावर आढळून येतात. जी आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त समजले जातात.

Orange Fruit Information In Marathi

संत्रा फळाची संपूर्ण माहिती Orange Fruit Information In Marathi

आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे फळ सहज कुठे देखील उपलब्ध होते, आणि खाण्यास देखील अतिशय सोपे आहे. फक्त वरील साल सोलली की हे फळ चाखता येते, किंवा त्याचा रस बनवून पिता येतो. अनेक लोक या संत्र्यापासून बनविलेली ऑरेंज टी अर्थ संत्रा चहा पितात. या फळामुळे त्वचेवर चांगला ग्लो येतो, आणि शरीरासोबत केसांच्या आरोग्यासाठी देखील फायदा होतो.

चला तर मग अशा या खूप उपयुक्त असणाऱ्या फळाबद्दल अर्थात या संत्र्याबद्दल इत्यंभूत माहिती बघूया…

नावसंत्रा
इंग्रजी नावOrange
शास्त्रीय नावCitrus spp
किंगडमप्लांटी
विभागमॅग्लोलियोफायटा
कुटुंब किंवा कुळRutaceae
वंशसिट्रस

संत्री हे एक सदाहरित झाड असून ते सुमारे दहा मीटर पर्यंत वाढू शकते. अर्थात हे एक मध्यम उंचीचे झाड आहे. संत्री ची फळे ही सामान्यतः गोल आकाराची असतात, मात्र त्याच्या देठाकडील भाग थोडासा फुगीर असतो. मात्र संत्री चा आकार कसा असेल हे त्या झाडाच्या प्रजातीवरच अवलंबून असते.

संत्र्याचे फळ ज्यावेळेस कच्चे असते त्यावेळेस ते वरून एकदम हिरवे दिसते. मात्र पिकल्यानंतर त्याचा रंग केशरी होतो. एका जाडसर सालीच्या आतमध्ये अगदी पातळ लगद्यामध्ये या संत्र्याचे गर असतात. एका संत्र्याच्या फळांमध्ये सुमारे १० ते १४ लगद्यांची संख्या असते. बहुतांश वेळा संत्री चे फळ हे रस काढून सेवन केले जाते.

संत्री फळाची विविध जाती:

मित्रांनो, आपण वर पाहिल्याप्रमाणे जगभरामध्ये संत्र्याच्या सुमारे ४०० पर्यंत प्रजाती आढळून येतात. मात्र त्यातील चार प्रकार सर्वात जास्त प्रसिद्ध आहेत. ज्यामध्ये गोल संत्री सर्वात जास्त प्रचलित आहे. त्यानंतर देठाकडील भाग हा नाभीसारखा दिसणारा संत्र्याचा प्रकार म्हणजे नेव्हल संत्री होय. त्यानंतर येतो तो म्हणजे ब्लड संत्रा, अगदी रक्तासारखा लाल रंग असणारा हा संत्रा विशिष्ट प्रदेशातच उगवल्या जातो. आणि त्यानंतर आम्लमुक्त संत्रा येतो, ज्यामध्ये आम्लाचे अर्थात ऍसिडचे प्रमाण अतिशय कमी असते.

संत्र्याचे फळ सेवन करण्याचे फायदे:

मित्रांनो, संत्री चे फळ आरोग्यदायी आहे हे आपल्याला माहितीच आहे. आणि त्यामध्ये भरपूर प्रमाणात खनिजे, जीवनसत्वे आणि इतरही पोषक घटक आढळतात. मात्र ते शरीराला कशाप्रकारे फायदेशीर ठरते ते आता आपण बघूया.

संत्री च्या सेवनामुळे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते, कारण संत्रामध्ये उपलब्ध असणारे पोटॅशियम आणि विटामिन सी, तसेच विविध खनिजे हृदयाला मजबूत बनविण्याचे काम करतात. पोटॅशियम मुळे तर उच्च रक्तदाबाची समस्या आणि हृदयविकाराच्या झटक्याची तीव्रता कमी केली जाते.

तसेच ज्या लोकांना पक्षाघात होऊ शकतो, अशांनी खबरदारीचा उपाय म्हणून संत्र्याचे सेवन केल्यास फायदेशीर ठरू शकते. संत्रातील विटामिन सी मुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते, त्यामुळे हृदय मजबूत होते.

मित्रांनो, प्रत्येक आंबटसर फळ मानवाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी कारणीभूत असते. त्याच पद्धतीने हे संत्रा फळ देखील शरीरातील विविध बॅक्टेरियांना मारून शरीराचे रक्षण करत असते. तसेच यातील विटामिन सी रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, ज्यामुळे माणूस कुठल्याही साध्या रोगाला सहसा बळी पडत नाही.

डोळ्याच्या आरोग्यासाठी सुद्धा संत्री सेवन करणे फायदेशीर समजले जाते. तसेच वृद्ध लोकांमध्ये आढळणाऱ्या मोतीबिंदूची समस्या संत्रामधील विटामिन सी मुळे काही प्रमाणात का होईना कमी होते.

लठ्ठ लोकांसाठी सुद्धा संत्रा खाण्याचा सल्ला दिला जातो, कारण संत्र्याच्या रसामध्ये वजन कमी करण्याची शक्ती आहे. कारण संत्रा मधील फायबर सारखे पोषक घटक शरीरातील अतिरिक्त चरबी आणि अशुद्धीला वाट मोकळी करून देतात. त्यामुळे ज्या लोकांना आपले वजन नियंत्रणात ठेवायचे आहे त्यांनी नेहमी संत्रा हे फळ खावे.

मित्रांनो, संत्रा या फळांमध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर्स असतात, हे आपल्याला ठाऊकच आहे. आणि या फायबर्स मुळेच ज्या लोकांना पचनाची समस्या आहे त्यांना फायदा होतो.

तसेच संत्र्याच्या फळातील सायट्रिक आम्ल किडनीमध्ये क्षाराचे खडे होण्यापासून रोखतात. त्यामुळे नेहमी नेहमी किडनी स्टोनचा त्रास होणाऱ्या लोकांना रोज एक ग्लास संत्राचा रस पिण्याचा सल्ला दिला जातो.

सौंदर्यप्रसाधनांमध्ये सुद्धा संत्र्याचा वापर केला जातो, यातील सायट्रिक आम्ल त्वचेवरील मृत पेशी काढून टाकते. तसेच फुटकुळ्या आणि मुरूम असतील तर त्यांच्या स्वच्छतेसाठी सुद्धा मदत करते.

संत्रा सेवनाचे तोटे:

मित्रांनो, अति प्रमाणात संत्रा सेवन केला तर काही तोटे देखील होऊ शकतात. जसे की संत्रा मध्ये असणारी फायबर अपचन पोटदुखी किंवा अतिसार यांसारख्या समस्या निर्माण करू शकतात. तसेच पोटामध्ये गॅसेसच्या समस्या देखील निर्माण होऊ शकतात.

संत्र्याचे फळ आम्लधर्मीय असल्यामुळे या फळाच्या सेवनाने ऍसिडिटी किंवा आम्लपित्त होण्याची समस्या जाणवू शकते, तसेच छातीत जळजळ देखील होऊ शकते.

निष्कर्ष:

मित्रांनो, भारत देश हा विविधतेने नटलेला असल्यामुळे भारतामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये खूप व्हरायटी बघायला मिळते. तसेच व्हरायटी फळांमध्ये देखील आहे. अगदी सिट्रस अर्थात लिंबूवर्गीय फळ पिकांमध्ये सुद्धा असंख्य व्हरायटी बघायला मिळते. त्यामध्ये कागदी लिंबू, संत्रा, मोसंबी, ईडलिंबू, साधे लिंबू इत्यादी प्रकार बघायला मिळतात.

संत्रा हे एक उत्तम चवीचे फळ असून, यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी आणि खनिजे आढळून येतात. त्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी किंवा डीहायड्रेशन झालेल्या परिस्थितीमध्ये या फळाचा अतिशय फायदा होतो. हे फळ उष्णप्रदेशीय क्षेत्रामध्ये येत असल्यामुळे थोडेसे चवीला आंबट देखील असते, मात्र ही आंबटसर गोड चव प्रत्येकाला फारच आवडते.

या संत्रा फळाचे खूप उपयोग असून आजारी माणसांना दिले जाते. याचा रस दिल्यामुळे तरतरी वाटायला मदत होते. तसेच पोटाच्या समस्या असणाऱ्या रुग्णांना रोज हे फळ खाण्याचा सल्ला दिला जातो, जेणेकरून पचन सुधारले जाते.

मित्रांनो संत्र्याचे आरोग्यदायी फायदे असले तरी देखील संत्र्याच्या रसापेक्षा संत्रा खाने अधिक फायदेशीर ठरते. कारण त्यातील कुठल्याही फायबर व जीवनसत्वाचा नाश होत नाही.

FAQ

संत्रा हे फळ मधुमेही रुग्ण खाऊ शकतात का?

संत्रा फळामध्ये कॅलरी आणि साखरेचे प्रमाण कमी असल्यामुळे मधुमेही व्यक्तींना हे फळ खाता येऊ शकते. या एका फळांमध्ये केवळ ७० हूनही कमी कॅलरीज आणि केवळ १२ ग्रॅम इतकीच साखर असते.

संत्री या फळांमध्ये सर्वात जास्त कोणत्या जीवनसत्वाचे प्रमाण आढळून येते?

संत्री या फळांमध्ये सर्वात जास्त जीवनसत्व क याचे प्रमाण आढळून येते.

संत्रा या फळझाडाच्या किती प्रजाती आढळून येतात?

तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की संत्रा या फळाच्या सुमारे ४०० प्रजाती जगभरामध्ये आढळून येतात.

संत्र्याचे सेवन नेहमी केल्यामुळे कोणता फायदा होऊ शकेल?

संत्र्याचे सेवन केल्यामुळे शरीर कोलेजन तयार करते, ज्यामुळे त्वचेची गुणवत्ता सुधारते. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते, आणि हृदय देखील सदृढ बनते.

संत्री फळ खाण्याची योग्य वेळ कोणती आहे?

संत्री फळ खाण्याची योग्य वेळ ही सकाळी व दुपारीच असते. शक्यतो संध्याकाळच्या वेळी संत्री न खाण्याचा सल्ला दिला जातो, कारण हे फळ पचायला काहीसे जड असते.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण संत्रा या फळ पिकाबद्दल माहिती पाहिली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट च्या माध्यमातून अवश्य कळवा. आणि तुमच्या इतरही मित्र-मैत्रिणींना ही माहिती जरूर शेअर करा .

धन्यवाद…

Avatar

i am marathi content writer from last 5 years.

Leave a Comment