ऑलिम्पिक खेळाची संपूर्ण माहिती Olympic Information In Marathi

Olympic Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो खेळ हा प्राचीन काळापासून मानवाच्या मनोरंजनाचा एक उत्तम स्त्रोत आहे. खेळाद्वारे माणसाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते, तसेच माणूस आनंदी आणि टवटवीत देखील होतो.

 Olympic Information In Marathi

ऑलिम्पिक खेळाची संपूर्ण माहिती Olympic Information In Marathi

ऑलम्पिक खेळ हे जागतिक पातळीवरील क्रीडा स्पर्धा आहेत. यामध्ये उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा आणि हिवाळी ऑलिंपिक स्पर्धा अशा दोन प्रकारच्या स्पर्धा असतात. या खेळांमध्ये जगभरातून हजारोंच्या संख्येने खेळाडू सहभागी होत असतात.

ऑलम्पिक स्पर्धा या दर चार वर्षांनी घेतल्या जातात, मात्र १९९४ पासून ऑलिंपिक स्पर्धा या चार वर्षांच्या कालावधीमध्ये हिवाळी आणि उन्हाळी अशा दर दोन वर्षांनी बदलल्या जातात.

स्पर्धेचे नाव: ऑलिम्पिक स्पर्धा
आयोजन कालावधी: दर चार वर्षाच्या अंतराने
प्रकार: उन्हाळी ऑलिम्पिक व हिवाळी ऑलिम्पिक अशे दोन प्रकार
सुरुवात: इसवी सन पूर्व १८९४
सुरुवातिचे ठिकाण: ओलिम्पिया
सुरुवातीचा देश: ग्रीस
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना: १८९६
पहिले ऑलिम्पिक खेळ:१८९६ मध्ये

मित्रांनो, ऑलिम्पिक स्पर्धा या जागतिक पातळीवरील सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धा आहेत. या खेळामध्ये जगातील २०० पेक्षा अधिक संघ आणि हजारोंच्या संख्येने खेळाडू या खेळामध्ये सहभागी होतात.

आज मीतीस जगभरातील जवळपास सर्वच देशांनी ऑलम्पिक स्पर्धांमध्ये प्रवेश केलेला आहे. प्रत्येक देश आपले संघ या खेळासाठी पाठवू लागले आहेत, मात्र या विस्ताराबरोबरच खेळाबरोबर बहिष्कार घालणे, लाचखोरीपणा करणे, किंवा अमली पदार्थांचे सेवन करून खेळ खेळणे यासारख्या समस्या सुद्धा निर्माण झालेल्या आहेत.

ऑलिंपिक चा इतिहास:

मित्रांनो, हल्लीच्या आधुनिक ऑलम्पिक खेळांची सुरुवात ही प्राचीन ऑलिम्पिक स्पर्धांपासून झाली होती. ग्रीस या देशातील ऑलिम्पिया येथे आठव्या ते चौथ्या शतकामध्ये या स्पर्धा खेळल्या जात. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या स्थापनेनंतर मात्र ऑलिंपिक स्पर्धांना आधुनिक दर्जा आला, आणि तो आजतागायत सुरू आहे.

आधुनिक ऑलम्पिक सामने सर्वप्रथम १८९६ मध्ये अथेन्स या ठिकाणी खेळले गेले. ऑलिम्पिक स्पर्धा संबंधी सर्व प्रशासकीय अधिकार असणारी संस्था ही आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक असोसिएशन ही आहे यामध्ये सर्व देश सदस्य आहेत.

२० आणि २१ व्या शतकामध्ये खऱ्या अर्थाने ऑलम्पिक स्पर्धांची उत्क्रांती झाली. त्यामुळे ऑलम्पिक स्पर्धांचे अनेक नियम देखील तयार झाले, त्याचबरोबर अनेक स्वरूपांची देखील निर्मिती करण्यात आली. यामध्ये हिम आणि बर्फ खेळांसाठी हिवाळी ऑलिम्पिक खेळाला मान्यता मिळाली, अपंगांच्या साठी वेगळे प्यारा ओलंपिक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या, तसेच बाल गटातील १४ ते १८ वयोगटासाठी युवा ऑलिम्पिक खेळ स्पर्धा निर्माण करण्यात आल्या. आणि सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे वेगवेगळ्या पाच महाद्विपांच्या साठी सुद्धा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. आणि याबद्दल आयोजित केलेल्या स्पेशल ऑलिम्पिक स्पर्धांना इंटरनॅशनल ऑलिंपिक कमिटीने सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. या बदला दरम्यान भारतीय ऑलम्पिक असोसिएशनला सुद्धा अनेक आर्थिक, राजकीय व तांत्रिक बदल स्वीकारावे लागले.

मित्रांनो, ऑलम्पिक स्पर्धांवर अनेक कारणांमुळे बंधने येतात. ईस्टर ब्लॉक राष्ट्रांनी ऑलिंपिक खेळाचे नियम उल्लंघीत केले होते, त्यामुळे त्या देशांना खेळामध्ये सहभाग घेण्याची परवानगी नाकारण्यात आली होती. तसेच पहिल्या महायुद्धामुळे व १९१६, १९४० आणि १९४४ या वेळेला ऑलिंपिक सामने रद्द करण्यात आले होते. १९८० आणि ८४ च्या ऑलम्पिक स्पर्धा देखील शीतयुद्धाच्या कारणामुळे केवळ मर्यादित खेळाडूंच्या सहभागानेच भरविण्यात आल्या होत्या. अगदी हल्लीचे उदाहरण घ्यायचे झाल्यास covid-19 महामारी दरम्यान २०२० साली  होणाऱ्या ओलंपिक स्पर्धा या सन २०२१ पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती ही प्रत्येक खेळ प्रकारासाठी यजमान शहर निवडणे, आणि या संपूर्ण खेळाच्या निर्विघ्न पार पाडण्यासाठी निधीदेखील उपलब्ध करून देते. तसेच या खेळा संदर्भातील कुठलेही निर्णय घेण्याचे कार्य देखील आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती करत असते.

ऑलिंपिक स्पर्धांमध्ये कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना ऑलिंपिक पदके मिळतात. यातील प्रथम, द्वितीय, आणि तृतीय स्थान पटकावणाऱ्या खेळाडूंना अनुक्रमे सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके देण्यात येतात. २०१६ मध्ये झालेल्या उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धा आणि २०१८ मध्ये झालेल्या हिवाळी ऑलिंपिक स्पर्धांची आकडेवारी एकत्रित करता वेगवेगळ्या पस्तीस प्रकारच्या खेळांमध्ये ४०० स्पर्धांचे सामने झाले, त्यामध्ये तब्बल १४००० हुन अधिक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला.

ऑलम्पिक स्पर्धांमध्ये खेळले जाणारे खेळ:

मित्रांनो तुम्ही जर ऑलम्पिक स्पर्धांसाठी तयारी करणार असाल तर तुम्ही खेळणारा खेळ हा ऑलिंपिक स्पर्धांमध्ये समाविष्ट आहे का हे तपासणे देखील महत्त्वाचे ठरते. ऑलिंपिक खेळ स्पर्धांमध्ये अनेक प्रकारचे खेळ खेळले जातात, त्यामध्ये प्रामुख्याने तिरंदाजी, बॅडमिंटन, अथलेटिक्स खेळ, बॉक्सिंग, सायकलिंग, बास्केटबॉल, रेसिंग, माऊंटन बाईकिंग, जुडो कराटे, फुटबॉल, जिम्नॅस्टिक, टेनिस, टेबल टेनिस, गोल्फ, तायक्वांदो,  हॉलीबॉल, मॅरेथॉन, हॉकी, नेमबाजी इत्यादी खेळांचा समावेश होतो.

ऑलिम्पिकचे निशाण:

मित्रांनो, कुठलीही गोष्ट त्याच्या चिन्हांनी किंवा लोगो ने ओळखली जाते. त्याला ऑलम्पिक स्पर्धा तरी कशा अपवाद असतील? ऑलिम्पिक स्पर्धेचा लोगो हा एकमेकात गुंतलेल्या पाच रंगेबिरंगी कड्यांचा मिळून बनलेला आहे. यातील रंगांचा क्रम हा उजवीकडून डावीकडे बघितल्यास लाल, हिरवा, काळा, पिवळा, आणि निळा या क्रमाने आहे.

हा लोगो बनविण्याचे श्रेय बॅरन पियारे डी कौबर्टीन यांना दिले जाते. त्यांनी हा लोगो १९१२ मध्ये तयार केला होता, आणि हा लोगो हल्ली सगळीकडे ऑलिम्पिक स्पर्धेत वापरला जातो.

हा लोगो बनवण्यामागे प्रेरणा काय असे विचारले असता सर बॅरन पियरे डी कौबर्टीन यांनी सांगितले की जशा या पाच कड्या एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत, त्याचप्रमाणे या स्पर्धांमध्ये भाग घेणारे देश एकमेकांशी जोडले गेलेले आहेत. या पाच कड्या म्हणजे ऑलिंपिक स्पर्धांमध्ये भाग घेणारे पाच खंड आणि त्यातील देश होय. तसेच ऑलिंपिक स्पर्धांची काही मूल्य देखील आहेत, त्याचे प्रतीक म्हणून सुद्धा या रिंग्स ओळखल्या जातात.

ऑलिंपिकची ही सात मूल्ये म्हणजे दृढनिश्चय, मैत्री, धैर्य, आदर, प्रेरणा, समानता, आणि उत्कृष्टता ही आहेत. ही मूल्ये केवळ ऑलिंपिक स्पर्धा दरम्यानच उपयुक्त आहेत असे नाही, तर प्रत्येकाला दैनंदिन आयुष्यात देखील ही मूल्य फार उपयोगी पडतात.

निष्कर्ष:

मित्रांनो, रोजच्या धकाधकीच्या जीवनात कितीही कंटाळवाण्या कामाचा बोजा असेल तरी देखील खेळामुळे हा सर्व ताण हलका होण्यास मदत होते. अगदी तुम्ही खेळ खेळले जरी नाहीत, तरी देखील खेळाचे सामने बघूनही तुमचा आनंद द्विगुणित होतो, त्यामुळे माणसाच्या आयुष्यात खेळ हा अतिशय महत्त्वाचा आहे. ऑलम्पिक सारख्या आंतरराष्ट्रीय खेळांमुळे खेळाडूंच्या सोबतच देशाची प्रतिष्ठा देखील पणाला लागते.  त्यामुळे ऑलिम्पिक सामन्याना तर फारच महत्त्व प्राप्त होते.

History of Olympics | ओलम्पिक खेलों का इतिहास l Ancient Greek Olympics & Modern Olympics Movement

Click for free access to Educator's best classes: https://unacademy.onelink.me/RICs/bafir8ax#Tokyo2020 #Olympics #History #UPSC #ओलम्पिकखेलोंकाइतिहास #static...

FAQ

ऑलम्पिक स्पर्धा कोणत्या दर्जाच्या आहेत?

ऑलम्पिक स्पर्धा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आहेत.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना केव्हा झाली?

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची स्थापना इ. स. पू. १८९४ मध्ये झाली.

ऑलम्पिक खेळ सामन्यांची सुरुवात कुठून झाली?

ऑलम्पिक खेळ सामन्यांची सुरुवात ओलिम्पिया येथून झाली.

सर्वात पहिले आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक खेळ सामने कुठे खेळले गेले?

सर्वात पहिले आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक सामने अथेन्स या शहरांमध्ये खेळले गेले.

बॅरन पियरे डी कौबर्टीन हे कोण आहेत?

या व्यक्तीने आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीची स्थापना केली होती.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण ऑलम्पिक प्रकारातील खेळाच्या सामन्याबद्दल माहिती पाहिजे, ती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा. तसेच इतरही मित्र मैत्रिणींना या माहितीचा आस्वाद घेता यावा म्हणून शेअर करा.

धन्यवाद…

Jyoti Tongalkar

ज्योती टोंगळकर (Jyoti Tongalkar) हि एक content writer असून यांना मराठी भाषेत पोस्ट लिहिण्याचा ५ वर्षांचा अनुभव आहे. यांचे शिक्षण एम.कॉम.बी.एड. झाले असून ते सिनियर content writer म्हणून काम करतात.

Leave a Comment