मुलेठी वनस्पतीची संपूर्ण माहिती Mulethi Information In Marathi

Mulethi Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो भारत देशाला आयुर्वेदाचे उगमस्थान मानले जाते, आणि अश्या या देशात झाडपाला, जडीबुटीच्या औषधांना फार महत्व दिले जाते.

मुलेठी वनस्पतीची संपूर्ण माहिती Mulethi Information In Marathi

मित्रानो मुलेठी ज्याला जेष्ठमध म्हणूनही ओळखले जाते ती एक खोड सदृश्य आयुर्वेदिक वनस्पती आहे. ही वनस्पती साखरेहूनही कित्येक पटीने गोड असते, तसेच विविध फायटोन्यूट्रियंट्स, खनिजे आणि जीवनसत्त्वांनी देखील समृद्ध असते. यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, लोह, पोटॅशियम, कोलीन, झिंक, सेलेनियम, आणि सिलिकॉन यांचा प्रचंड मोठा साठा असतो.

मुलेठी ही टूथपेस्ट बनवण्यामध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जाते. सोबतच यांपासून कॅंडी, चूर्ण, आणि छोटे छोटे तुकडे इत्यादी गोष्टी बनवल्या जातात. मुलेठी अर्थात जेष्ठमध उत्तम फ्लेवरिंग एजंट असल्याने शीतपेयांमध्ये याचा सर्रास वापर केला जातो. असे असले तरीही मुख्यत्वे करून आयुर्वेदिक औषधांमध्ये याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

अशा या बहुगुणी मुलेठीबद्दल आजच्या भागामध्ये आपण माहिती बघणार आहोत…

नाव: मुलेठी (जेष्ठमध).
इंग्रजी नाव: Liquorice.
शास्त्रीय नाव: Glycyrrhiza glabra.
उपकुळ: Faboideae.
कुळ:Fabaceae.
वापराचा भाग: मुळांचे तुकडे
प्रकार: आयुर्वेदिक औषधी वनस्पती.

मित्रांनो मुलेठी ज्याला ज्येष्ठमध नावाने ओळखले जाते, ही थंडीच्या दिवसात वापरली जाणारी आयुर्वेदिक वनस्पती आहे. ही एक झुडूप वर्गीय वनस्पती असून तिच्या मुळांच्या तुकड्यांचा आणि सालेचा वापर आरोग्यासाठी अतिशय हितकारक असतो. या मुलेठी पासून अनेकविध आयुर्वेदिक औषधे बनवली जातात. यामध्ये प्रामुख्याने पोटदुखी, डांग्या खोकला, घसा खवखवणे, कफ होणे, क्षयरोग, तसेच अपस्मार इत्यादी रोगावरील औषधांचा समावेश होतो.

मुलेठी ही साखरेपेक्षा तब्बल ५९ पटीने चवीला गोड असते, त्यामुळे अनेक खाद्यपदार्थांमध्ये देखील गोडपणासाठी याचा वापर केला जातो. मुलेठी हानिकारक बॅक्टेरियांच्या वाढीला आळा घालते, त्यामुळे अनेक प्रकारच्या जखमांवरही याचा वापर केला जातो.

ज्येष्ठमधाचे जलज व स्थलज असे दोन प्रकार पडतात, तर उत्पत्तीच्या स्थानानुसारही मिसरी, अरबी आणि तुर्की असे तीन प्रकार पडतात.

मुलेठी चे फायदे

मित्रांनो मुलेठी अनेक प्रकारे मानवी आरोग्यासाठी फायदेशीर आहे, त्यामध्ये प्रामुख्याने विविध प्रकारचे औषधे बनवून वापरणे यांचा समावेश होतो.

मुलेठी म्हणजेच जेष्ठमधाची साल तोंडामध्ये ठेवून चघळल्यास घशाच्या आजारांवर आराम पडतो, त्याचबरोबर पित्तदोष देखील कमी पडतो.

मुलेठी ही कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवण्यात मोलाची भूमिका पार पाडते, त्यामुळे हृदयरोग असणाऱ्या किंवा हृदयरोग होऊ शकणाऱ्या रुग्णांना मुलेठीचा वापर करून फायदा होतो.

डोळ्यांच्या आरोग्यासाठी ही ज्येष्ठमधाचा फारच उपयोग होतो. ज्या रुग्णांना डोळ्यांमध्ये जळजळ होणे किंवा डोळ्याला पाणी येणे यासारखी समस्या असते त्यांनी बडीशेप आणि जेष्ठमध यांच्या चूर्णाचे म्हणजेच पावडरचे नियमित सेवन करावयास हवे. त्याने डोळ्यांचे आरोग्य सुधारून डोळ्यांच्या जळजळीची समस्याही मिटते.

काही लोकांना कायमच तोंड येणे किंवा तोंडातील अल्सर याची समस्या असते, यावर सुद्धा ज्येष्ठमध गुणकारी आहे. यासाठी जेष्ठमधाच्या चूर्णाचा नियमित वापर केल्याने या समस्येवरही मात केली जाऊ शकते.

मित्रांनो आजकाल प्रत्येकजण सौंदर्यासाठी जागृत झालेला दिसून येतो, मात्र चेहऱ्यावरील डाग, पुरळ, किंवा मुरुमे त्वचेच्या सौंदर्यात बाधा आणतात. तसेच चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या पडणे उतारवयाचे लक्षण दर्शवते. अशावेळी जेष्ठमधाचा उगळवून लेप तयार करावा, आणि तो चेहऱ्यावर लावावा. याने वरील सर्वच समस्यांवर मात केली जाऊ शकते.

कोरोना प्रादुर्भाव नंतर रोगप्रतिकारकशक्ती किंवा इम्युनिटी पावर हा शब्द जनमानसात असा काही रूढ झाला की काही विचारू नका. मुलेठीच्या मुळांचा अर्क काढून त्याचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढवली जाऊ शकते. त्यामुळे छोट्या मोठ्या आजारांविरुद्ध लढण्यासाठी शरीर सज्ज होते.

आज-काल करिअरच्या धावपळीत केसांच्या आरोग्याकडे लक्ष देणे प्रत्येकाला जमते असे नाही, अशावेळी केस गळती ही समस्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. या समस्येसाठी म्हशीचे दूध आणि मुलेठीच्या पानांचे चूर्ण एकत्र करून केसांना लावल्याने केस गळतीची समस्या तर दूर होतेच, शिवाय केस चमकदार होण्यासाठी देखील मदत मिळते.

मुलेठी मध्ये अँटिऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असल्याने मेंदूला उत्तेजना मिळविण्यासाठी ज्येष्ठमध अतिशय फायदेशीर ठरतो. म्हणूनच ज्या लोकांना विसराळूपणाची किंवा स्मरणशक्ती कमकुवत असण्याची तक्रार आहे अशा लोकांनी जेष्ठमधाचे सेवन करावे जेणेकरून स्मरणशक्ती पुन्हा एकदा चांगली होऊ शकेल.

मित्रांनो आजकाल बैठे काम आणि शरीराची हालचाल नसणे यामुळे पचन संस्थेची निगडित समस्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत चालली आहे. यामध्ये सुद्धा जेष्ठमध प्रभावीपणे वापरले जाऊ शकते. जेणेकरून पोटाच्या सर्व समस्या मिटविण्यात मदत होऊ शकेल.

काही लोकांना पोटातील आजारासाठी वमन अर्थात उलटी करावयाची असते, त्यासाठी मदनफळ, पिंपळी आणि इंद्रजव यांच्या सोबतीने ज्येष्ठमध घेऊन त्याचा काढा करून प्यावा. जेणेकरून वमन करण्यासाठी सोपे जाईल.

तूप आणि आवळ्यासोबत ज्येष्ठमधाचे चूर्ण कालवून ते मधासोबत चाटवल्याने ऍसिडिटी आणि पोटातील अल्सर वर आराम मिळू शकतो.

मित्रांनो जेष्ठमध हे एक वेगळेच रसायन आहे. हे पोट साफ होण्याच्या समस्या वरही वापरले जाऊ शकते त्याचबरोबर जुलाबावरही वापरले जाऊ शकते. यासाठी जेष्ठमध, डाळिंबाची साल, खडीसाखर, लोध्र आणि नीलकमल यांचा काढा बकरीच्या दुधाबरोबर घेतला जातो.

मुलेठीचे तोटे

मित्रांनो कुठल्याही गोष्टीचे जसे फायदे असतात तसे अति प्रमाणात वापर केल्याने तोटे देखील असतात. याप्रमाणेच मुलेठीचे देखील काही तोटे आहेत.

वजन कमी करण्यामध्ये जरी मुलेठीचा वापर केला जात असला, तरीही अति प्रमाणात मुलेठीचे सेवन केल्याने लठ्ठपणाच्या समस्याला तोंड द्यावे लागू शकते.

त्याचप्रमाणे अति प्रमाणात मुलेठीचे सेवन केल्याने मायग्रेन, अंग सुजणे, धाप लागणे, स्नायू मध्ये सूज येणे, आणि बरोबरीने सांध्या मध्ये जडपणा जाणवणे या प्रकारचे साईड इफेक्ट्स होऊ शकतात.

काही लोकांना जन्मतःच मुलेठीची एलर्जी असू शकते, अशा लोकांनी मुलेठी अर्थात जेष्ठमधाचे सेवन करताना डॉक्टरांचा सल्ला अवश्य घेतला पाहिजे. सहसा ज्येष्ठमधाच्या वापराचे प्रमाण तीन ते पाच ग्रॅम सांगितले जाते, मात्र काही विशिष्ट बाबींमध्ये हा डोस दहा ग्रॅम पर्यंत वाढवला जाऊ शकतो.

निष्कर्ष:

मित्रांनो आपल्या आयुर्वेदामध्ये अनेक औषधी वनस्पतींचे महत्त्व सांगितलेले आहे. त्यापैकीच एक म्हणजे ज्येष्ठमध अर्थात मुलेठी होय. या वनस्पतीचा वापर मुख्यत्वे करून घशाशी संदर्भातल्या आजारांवर केला जातो. ही वनस्पती तुम्ही चूर्ण किंवा छोटे छोटे तुकडे या दोन्ही स्वरूपात खाऊ शकता. चवीला गोड असणारी ही वनस्पती गायकांद्वारे देखील मोठया प्रमाणावर पसंत केली जाते, कारण यामुळे घसा मोकळा होण्यास मदत होते.

Focus on cultivated medicinal plant Liquorice ,Glycyrrhiza glabra ,मुलट्ठी

Mulethi Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो भारत देशाला आयुर्वेदाचे उगमस्थान मानले जाते, आणि अश्या या देशात झाडपाला, जडीबुटीच्या औषधांना फार महत्व दिले जाते.

FAQ

पोटाच्या विकारावर मुलेठी किंवा जेष्ठमध गुणकारी आहे का?

होय, मुलेठीचा वापर गॅस्ट्रो इंटेस्टायनल समस्यांवर प्रभावीपणे केला जाऊ शकतो.

मुलेठीच्या वापराने वजन नियंत्रणात आणले जाऊ शकते का?

होय, वजन कमी करताना सुद्धा मुलेठी अर्थात जेष्ठमध वापराचा सल्ला दिला जातो.

बद्धकोष्ठतेवर मुलेठीचा वापर कसा केला जातो.

एक कप पाण्यामध्ये ज्येष्ठमधाची एक चमचा पावडर आणि एक चमचा गूळ घालून त्याचा चहा उकळावा आणि तो प्यावा यामुळे झटकन पोट साफ होण्यास मदत होते.

मुलेठी वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा का?

जर तुम्हाला कुठलाही आजार नसेल तर अत्यल्प प्रमाणात तुम्ही जेष्ठमधाचा वापर स्वतःहून करू शकता मात्र तुम्हाला इतर आजार असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच मुलेठीचा वापर करणे फायदेशीर ठरते.

आपल्याला मुलेठी कोठे मिळू शकेल?

कुठल्याही जनरल स्टोअरच्या दुकानात किंवा किराणा मालाच्या दुकानात तुम्हाला छोटे खांड अर्थात तुकडे किंवा चूर्ण स्वरूपात जेष्ठमध अर्थात मुलेठी उपलब्ध होईल.

मित्रांनो, आजच्या लेखामध्ये आपण मुलेठी म्हणजेच सामान्यपणे जेष्ठमध नावाने ओळखल्या जाणाऱ्या आयुर्वेदिक औषधी वनस्पतीची माहिती बघितली, ती तुम्हाला आवडली असेलच. अश्याच नवनवीन माहितीपूर्ण लेखनासाठी आमच्या वेबसाईटला नियमित भेट देत रहा, तसेच आपल्या मित्रमैत्रिणींना सुद्धा या वेबसाईट बद्दल सुचवा.

धन्यवाद…

Vaishnavi Raut

वैष्णवी राउत (Vaishnavi Raut) हि एक content writer असून यांना पोस्ट लिहिण्याचा ३ वर्षांचा अनुभव आहे. यांचे शिक्षण बी.एसस्सी Agri.झाले असून ती मराठी भाषेत अचूक लेखनाचे कार्य करतात.

Leave a Comment