मण्यार सापाची संपूर्ण माहिती Manyar snake Information In Marathi

Manyar snake Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो साप म्हटलं की प्रत्येकाच्या पायाखालची जमीन ही हादरतेच. मग तो साप विषारी असो किंवा बिनविषारी, प्रत्येक जण सापाला घाबरतोच. काही लोक सर्पमित्राला बोलावून सापाला निसर्गात सोडून देतात, तर काही लोक सापाला मारतात. मात्र सापाला शेतकऱ्यांचा मित्र म्हणले जाते, कारण तो शेतातील उंदीर खाऊन पिकांचे रक्षणच करत असतो. त्यामुळे शक्यतो सापाला मारू नये.

मण्यार सापाची संपूर्ण माहिती Manyar snake Information In Marathi

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण अशाच एका अतिशय विषारी असणाऱ्या मण्यार या सापाबद्दल माहिती बघणार आहोत. ज्याला बंगाली क्रेट म्हणून देखील ओळखले जाते. ही सापाची प्रजाती भारतातीलच असून तिचा संबंध बिग फोर  प्रजातीशी येतो.

भारतीय उपखंडाच्या भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश या  देशांमध्ये घडणाऱ्या सर्पदंशांच्या घटनांमध्ये प्रामुख्याने या मण्यार जातीचा संबंध बऱ्याच ठिकाणी आढळून येतो. चला तर मग अशा या मण्यार जातीच्या सापाबद्दल माहिती घ्यायला सज्ज व्हा…

नाव:मण्यार साप
इंग्रजी नाव:कॉमन क्रेट
शास्त्रीय नाव: Bangarus carrullus
इतर नावे:बंगाली क्रेट
उगम: भारतीय उपखंड
संबंधित प्रजाती: बिग फोर
प्रकार: विषारी
रंग: निळसर काळा पांढरा पट्टेरी

मित्रांनो, भारतीय उपखंडात अनेक प्राणघातक विषारी साप आढळून येतात. त्यातीलच एक महत्त्वाचा साप म्हणजे मण्यार होय, ज्याला इंग्रजी भाषेमध्ये कॉमन क्रेट नावाने ओळखले जाते. निळसर काळा हा साप अंगावर पांढरे क्रॉस बार घेऊन फिरतो. या क्रॉस बार वरून मण्यार सापाचे वय ओळखले जाऊ शकते.

तरुण सापांमध्ये हे क्रॉस बार अगदी स्पष्ट दिसून येतात, तर म्हाताऱ्या सापांमध्ये या क्रॉसबारचे रूपांतर अरुंद पांढऱ्या रेषामध्ये किंवा पांढऱ्या ठिपक्यांमध्ये होऊन जाते. हा साप लांबीने भरपूर असतो, आणि त्याची शेपटी देखील चांगलीच लांब असते.

मन्यार सापाचा वावर:

मित्रांनो, मण्यार हा साप भारतीय उपखंडात म्हणजेच सिंध प्रांतापासून बांगलादेशपर्यंत तर भारताच्या उत्तर टोकापासून अगदी श्रीलंकेपर्यंत सर्वत्र आढळतो. भारत, नेपाळ, बांगलादेश, अफगाणिस्तान या सर्व देशांमध्ये हा साप अगदी सहजरित्या आढळतो.

जिथे लपायला जागा असेल, तिथे या सापांचे वास्तव्य असते. ज्यामध्ये झाडांनी अच्छादित क्षेत्र, लागवडीखालील जमिनी, फळबागा, जंगले, वाळवंटीय वनस्पतींचे प्रदेश, खडकांचा आणि भेगांचा प्रदेश व दाट लोकवस्तीच्या प्रदेशात हे साप आढळून येतात. शक्यतो हे साप रात्री जास्त सक्रिय होत असल्याने दिवसाचे उंदरांच्या बिळांमध्ये, वीटांच्या ढिगार्‍यांमध्ये, पाण्यामध्ये पालापाचोळ्यामध्ये, लाकडांच्या ढिगार्‍यात किंवा दगडांच्या कपारीत राहतात.

मण्यार सापाची जीवनशैली:

 मित्रांनो, मण्यार साप दिवसा किंवा रात्री दोन्हीही वेळेस आढळू शकतात, मात्र शक्यतो ते रात्रीच सक्रिय होताना दिसतात. मन्यार हा साप अतिशय आळशी असल्याने शक्यतो दंश करण्यास प्राधान्य देत नाही, मात्र एकदा दंश केल्यास तो लवकर सोडत सुद्धा नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर विष शरीरात पसरले जाते. दिवसा हा साप आपले डोके सुरक्षित ठिकाणी लपवतो, आणि अगदी निपचित पडून राहतो. या सापाला तुम्ही काही प्रमाणात हातळू शकता, मात्र त्यास अधिक डीवचल्यास अतिशय रागीटपणे तो दंश करतो.

हा साप आराम करताना आपले डोके सुरक्षित राहिल्याचे खात्री केली की उरलेले शरीर गुंडाळून ठेवतो. मात्र धोक्याची जाणीव झाल्यास हा अतिशय वेगवान हालचाली करतो. तसेच तो आपली शेपटी उचलण्यास देखील समर्थ आहे. मन्यार सापाचा दंश शक्यतो रात्रीच्या वेळी जास्त होतो, कारण याच वेळी ते सक्रिय असतात.

मण्यार या सापाचे विष:

मित्रांनो, आपण वरच पाहिले की मन्यार हा अतिशय विषारी साप आहे. मन्यारच्या विषामध्ये न्यूरोटॉक्सिन हा अतिशय घातक विषारी पदार्थ असतो, जो मानवाच्या चेतासंस्थेवर आघात करतो. त्यामुळे माणसाला अर्धांगवायूचा त्रास होतो. मन्यार हा साप एका वेळी दहा मिलिग्रॅम पर्यंत विष सोडू शकतो, मात्र मानसासाठी दोन ते तीन मिलीग्राम इतकेच विष घातक समजले जाते. यावरून तुम्ही मण्यार या सापाच्या दंशाची दाहकता लक्षात घेऊ शकता.

असे असून देखील इथे एक बाब लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे या सापाने दंश केल्यानंतर फार काही वेदना होत नाहीत, त्यामुळे हा साप विषारी नसावा अशी खोटी अशा मानवाला मिळते. त्यामुळे मानव उपचार घेण्यासाठी विलंब करतो किंवा निश्चिन्त होतो.

मात्र हे विष हळूहळू चेतासंस्थेवर आघात करते, तसेच त्यामुळे श्वसनावर परिणाम होण्यास सुरुवात होते, आणि चार ते आठ तासांमध्ये उपचार मिळाले नाहीत तर मानवाचा निश्चितपणे मृत्यू होतो. त्यामुळे मण्यार साप ओळखता आला तर उत्तमच, ओळखता नाही आला तरी देखील कुठलाही साप चावला तरीही औषधोपचारासाठी विना विलंब घेऊन जाणे अतिशय महत्त्वाचे असते.

पावसाळ्यात मात्र हे साप कोरडी जागा शोधत आसऱ्यासाठी घरामध्ये शिरतात. अशा वेळेला झोपलेल्या माणसाशी यांचा संपर्क आला तर माणसाच्या हालचालीने हे आक्रमक होऊन माणसाला दंश करतात. या दंशामुळे वेदना होत नसल्याने दंश झाल्याचे लक्षातही येत नाही.

हा दंश अगदीच डास किंवा मुंगी चावल्यासारखा असतो. परिणामी मानवाला सकाळी जाग येईपर्यंत या दंशाचा पत्ता सुद्धा लागत नाही. दंश होऊन बराच कालावधी लोटला असेल तर माणसाचा झोपेतच मृत्यू होऊ शकतो, त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात या सापांपासून घराचे रक्षण करणे अतिशय महत्त्वपूर्ण ठरते.

या सापाचा दंश झाल्यानंतर एक दोन तासांमध्येच चेहरा आखडू लागतो, पीडिताचे बोलणे आणि बघणे या दोन्हीही क्रियांवर परिणाम होतो, आणि हळूहळू माणसाची वाचा जाते. त्यानंतर हळूहळू माणसाला संपूर्ण शरीराला अर्धांग वायू होतो, आणि त्यानंतर उपचार मिळाले नाहीत तर चार ते पाच तासात रुग्णाचा प्राण जातो.

एका सर्वेक्षणानुसार मन्यार साप चावलेल्या रुग्णांपैकी ७० ते ८० टक्के रुग्ण हे केवळ उपचार घेण्यास विलंब झाल्यामुळेच मृत्युमुखी पडतात. बांगलादेशमध्ये तर साप चावून मारण्याच्या घटनांमध्ये ५०% घटना या मन्यार सापामुळेच झालेल्या असतात.

निष्कर्ष:

मित्रांनो, आपण शहरी भागात राहत असो की खेडे भागात, साप हा असा प्राणी आहे जो कुठेही आपल्याला दर्शन देऊ शकतो. आपल्याला जर या सापाबद्दल माहिती असेल तर संभाव्य धोका टळला जाऊ शकतो, अन्यथा विषारी सापांमुळे होणाऱ्या दुर्घटनांना आपल्याला सामोरे जावे लागू शकते.

आपण शेतकरी असाल तर आपल्याला प्रत्येक सापाबद्दल थोडीशी तरी माहिती असायलाच हवी. आजच्या लेखामध्ये आपण मण्यार या सापाबद्दलची माहिती पाहिली, या माहितीचा वापर करून तुम्ही सापाबद्दल जागरूकता निर्माण करावयास हवी, तसेच समाजातील प्रत्येकच घटकांनी सापाला न मारता सर्पमित्र बोलून त्याची निसर्गामध्ये सुटका करायला हवी.

Common krait snake 🐍| मण्यार | रात्री चावणारा विषारी साप

#Common_krait #snake #मण्यारभारतामध्ये मध्ये प्रामुख्याने हे चार विषारी साप आढळतात. १) नाग (cobra) सापा मध्ये ३ प्रकार असतात.- किंग कोब्रा (king cobra)- स्पॅ...

FAQ

मण्यार जातीचा साप विषारी आहे का?

मण्यार जातीचा साप अतिशय विषारी असा आहे.

मण्यार जातीच्या सापाचा साधारण रंग कसा असतो?

मन्यार जातीच्या सापाचा साधारणपणे रंग हा निळसर काळा पट्टेरी असतो.

मण्यार सापाला इंग्रजी मध्ये काय म्हणतात?

मण्यार सापाला इंग्रजी मध्ये कॉमन क्रेट असे म्हणतात.

मन्यार अर्थात कॉमन क्रेट हा साप प्रामुख्याने कुठे आढळून येतो?

मन्यार हा साप प्रामुख्याने भारतीय उपखंडातील देशांमध्ये आढळून येतो

कॉमन क्रेट या सापाच्या विषामध्ये कोणता घातक घटक असतो?

कॉमन क्रेट या सापाच्या विषामध्ये न्यूरोटॉक्सिन नावाचा घातक विषारी घटक असतो.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण मण्यार या विषारी सापाबद्दल माहिती पहिली. ही माहिती तुम्हाला नक्कीच अभ्यासपूर्ण वाटली असेल, त्याबाबत आम्हाला कमेंट मध्ये आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. तसेच आपल्या इतरही मित्र-मैत्रिणींना या सापाबद्दल माहिती व्हावी म्हणून त्यांना हा लेख शेअर करा.

धन्यवाद…

Kasturi Khule

कस्तुरी खुळे (Kasturi Khule) हि एक content writer असून यांना पोस्ट लिहिण्याचा २ वर्षांचा अनुभव आहे. हि बी.सी.एस.(Bachelor Of Computer Science) च्या तिसऱ्या वर्षाला असून ती content writer चे काम उत्तम प्रकारे करीत असतात.

Leave a Comment