मकर संक्रांती सणाची संपूर्ण माहिती Makar Sankranti Information In Marathi

Makar Sankranti Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो भारतीय संस्कृती ही सणावारांसाठी खासकरून ओळखली जाते. हिंदू रितीरिवाजांमध्ये सणांना फार महत्त्व देण्यात आलेले आहे. आणि हे प्रत्येक सण एक तर निसर्गाशी किंवा संस्कृतीशी जोडलेले आहेत. इंग्रजी दिनदर्शिका नुसार पहिल्याच म्हणजेच जानेवारी महिन्यात येणारा महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांति होय. खरे तर हा सण विज्ञान आणि निसर्ग या दोन्ही गोष्टींशी जोडला गेलेला आहे. संक्रांत या सणाला तिळगुळाचे वाटप केले जाते, आणि अशी मान्यता आहे की या दिवसापासून रात्रीच्या कालावधीमध्ये कमी होऊन दिवसाचा कालावधी तिळा-तिळाने वाढतो. तर थंडीच्या दिवसात शरीराला उष्णता प्रदान करण्याचे कार्य तीळ करतात, अशी देखील मान्यता आहे.

मकर संक्रांती सणाची संपूर्ण माहिती Makar Sankranti Information In Marathi

संपूर्ण भारतभर पतंग उडवत अतिशय मोठ्या उत्साहात संक्रांत हा सण साजरा केला जातो, त्यातही उत्तर आणि पश्चिम भारतामध्ये तर संक्रांतीला विशेष महत्त्व असते. या सणाचे प्रतीक म्हणून सूर्य देवाला पूजले जाते. संक्रांतीच्या दिवशी चंद्र दिनदर्शिका नुसार सूर्य हा कर्क राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो. ज्याला सोप्या भाषेत उत्तरायण असे म्हटले जाते. याच वेळी अनेक पिकांची कापणी जवळ आलेली असल्यामुळे संपूर्ण चराचरात आनंद पसरलेला असतो.

चला तर मग मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण सर्वांना आनंद प्रदान करणाऱ्या मकर संक्रांती या सणाविषयी आजच्या भागामध्ये माहिती बघूया…

सणाचे नाव: मकर संक्रांती
कालावधी: साधारणपणे इंग्रजी दिनदर्शिकेप्रमाणे जानेवारी महिन्यात
सूर्याची स्थिती:उत्तरायनास प्रारंभ
मराठी दिनदर्शिकेनुसार महिना:पौष
महत्व:कापणीचा सण
देवता:सूर्य
प्रमुख आकर्षण: पतंग उत्सव
राशी:मकर राशी
इतर नाव:संक्रमणाचा पवित्र टप्पा
सुरुवात: वसंत ऋतूची सुरुवात

मकर संक्रांति आणि पूजा:

मित्रांनो, विविध भागांमध्ये मकर संक्रांति साजरी करण्याच्या आणि पूजा करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्यातील आपण महत्त्वाच्या गोष्टी बघूया.

या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ केली जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी पहाटेचा कालावधी अतिशय पवित्र मानला जातो, आणि या कालावधीत केलेल्या पवित्र स्थानाचे हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व असते. त्यातही ज्यांना भारतातील पाच पवित्र नद्या म्हणजेच गोदावरी, गंगा, कृष्णा, यमुना, आणि कावेरी या नद्यांच्या पाण्याने स्नान करण्याचे भाग्य लाभते त्यांना अतिशय पुण्य प्राप्त होते असे म्हटले जाते.

अंघोळ केल्यानंतर देवपूजा आणि त्यानंतर देवाला नैवेद्य अर्पण केला जातो. या नैवेद्यामध्ये आपल्या ऐपतीप्रमाणे कुठलेही पदार्थ असू शकतात, मात्र यामध्ये तीळ हा मुख्य पदार्थ असतोच असतो. संक्रांतीमध्ये तिळाचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भाकरीमध्ये तीळ टाकले जातात, तसेच सर्व भाज्या एकत्र करून खेंगट किंवा भोगीची भाजी बनवली जाते. यातही तिळाचा वापर केला जातो.

तसेच संक्रांतीच्या आधी चार-पाच दिवस आणि संक्रांतीनंतरही चार-पाच दिवस आंघोळीच्या पाण्यात देखील तीळ टाकले जातात. यामुळे हिवाळ्यात रखरखीत झालेल्या त्वचेला तजेला येण्यास मदत होते.

या दिवशी दुपारच्या वेळी सर्व कामे आवरून स्त्रिया ववसा करायला निघतात. यामध्ये मातीच्या गाडग्यांमध्ये स्त्रिया बोरे, ऊस, गहू, हरभरा इत्यादी भरून त्यांनी एकमेकांना ववसतात. तसेच एकमेकांना हळदीकुंकू देखील लावतात. मकर संक्रांतीच्या काळात हळदीकुंकवाच्या समारंभाचे अनन्य साधारण असे महत्त्व आहे.

संध्याकाळच्या वेळी तिळगुळाचा समारंभ साजरा केला जातो, यामध्ये एकमेकांना तिळगुळ वाटतात आणि तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे म्हणतात. यावेळी वडीलधारी माणसे घरातील लहानग्यांना आशीर्वाद देखील देतात.

मकर संक्रांतीतील हळदी कुंकवाचे समारंभ:

मित्रांनो मकर संक्रांति आणि हळदी कुंकवाच्या समारंभाचे एक अनोखे असे नाते आहे. संक्रांतीच्या आसपास काही दिवस विवाहित महिला आपल्या आसपासच्या महिलांना घरी बोलावतात, त्यांना विविध पदार्थ खायला दिले जातात, तसेच सगळ्याजणी एकमेकींना हळदी कुंकू लावून आशीर्वाद देतात आणि ज्या स्त्रीने सर्वांना बोलावले आहे ती स्त्री सर्वांना भेटवस्तू देखील वाटते.

महाराष्ट्रामध्ये तर हा कार्यक्रम इतका लोकप्रिय आहे की गल्लीमध्ये किंवा नगरपालिकांच्या वार्डमध्ये देखील हा सण साजरा केला जातो. तसेच शाळा महाविद्यालयांमध्ये देखील महिला शिक्षिका विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून हा कार्यक्रम साजरा करतात. याप्रसंगी विविध खेळांच्या स्पर्धांचे आयोजन देखील बऱ्याच ठिकाणी केले जाते.

मकर संक्रांति आणि वेगवेगळ्या राज्यातील प्रथा:

मित्रांनो, भारत हा विविधतेने ओतप्रोत भरलेला असा देश आहे. येथे प्रत्येक राज्यात एकच गोष्ट वेगवेगळ्या पद्धतीने आचरानात आणली जाते. त्याला संक्रांत हा सण देखील कसा अपवाद असेल?

उत्तर प्रदेशात संक्रांतीला खिचरी असे म्हणून संबोधले जाते. यानिमित्ताने प्रयागराज येथे तब्बल एक महिना माघ मेळा हा धार्मिक उत्सव चालतो.

बंगालमध्ये गंगा नदीकाठी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

तामिळनाडू मध्ये संक्रांत हा पोंगल नावाने ओळखतात. तामिळनाडू मध्ये संक्रांत हा सण दिवाळी होऊनही अधिक लोकप्रिय आहे, आणि खास करून हा कापणीचा सण असल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये खूपच लोकप्रिय आहे. यावेळी सूर्य देवाची आराधना करत सर्व शेतकरी अगदी उत्साहात एकत्र येऊन हा सण साजरा करतात. आंध्र प्रदेश मध्ये देखील हा सण पोंगल म्हणूनच ओळखला जातो. मात्र काही तेलुगु लोक याला पेड्डा पांडुगा म्हणून देखील संबोधतात.

महाराष्ट्रामध्ये हा सण मकर संक्रांति म्हणून ओळखला जातो. त्यादिवशी तीळ आणि गुळ या पदार्थांना विशेष असे महत्त्व असते.

निष्कर्ष:

मित्रांनो, हिंदू संस्कृतीमध्ये अनेकविध सण आहेत. या प्रत्येक सणाचे स्वतःचे असे काहीतरी महत्त्व आहे. मकर संक्रांति ही उष्णतेचे देवता असणाऱ्या सूर्याला समर्पित केलेला सण आहे. या सणाच्या दिवशी सर्वत्र तिळगुळ वाटप केले जाते आणि तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे एकमेकांना म्हटले जाते.

या दिवशी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकजण पतंग उडविण्याचा आनंद घेतो. याच सुमारास कापणीचा हंगाम चालू असतो. काही पिके कापायची असतात तर काही पिके कापणीला आलेली असतात. त्यामुळे शेतकरी राजा देखील सुखावलेला असतो. तसेच महिलावर्ग मातीच्या छोट्या छोट्या गाडग्यांमध्ये बोर, उसाचे तुकडे, हरभरा, गव्हाच्या ओब्या आणि अनेक विविध पदार्थ भरून त्यांनी एकमेकींना औक्षण करत एकमेकींच्या डोक्यावरून टाकतात.

या सगळ्या गोष्टी निसर्गाशीच जोडलेल्या आहेत. मानव पहिल्यापासून निसर्गाशी नाते जोडत आलेला आहे. आणि या नात्यातूनच संक्रांती सारखे अनेक सण तयार झालेले आहेत. आजच्या भागामध्ये आपण संक्रांतीची माहिती पाहिली.

मकर संक्रांती 2021 संपूर्ण माहिती मराठी मध्ये || Makar Sankranti 2021 Marathi || Makar Sankrant 2021

मकर संक्रांती 2021 संपूर्ण माहिती मराठी मध्ये || Makar Sankranti 2021 information in Marathi || Makar Sankrant 2021#makarsankranti2021#makarsankrantimarathim...

FAQ

संक्रांति हा सण इंग्रजी दिनदर्शिका नुसार कोणत्या महिन्यात येतो?

संक्रांति हा सण इंग्रजी दिनदर्शिका नुसार जानेवारी महिन्यात येतो.

संक्रांतीची देवता कशाला मानले जाते?

संक्रांतीची देवता सूर्य याला मानले जाते.

मराठी दिनदर्शिकेनुसार संक्रांती हा सण कोणत्या महिन्यात येतो?

. मराठी दिनदर्शिका नुसार मकर संक्रांती हा सण पौष महिन्यात येतो.

मकर संक्रांतीला सूर्याच्या स्थितीमध्ये कसा बदल होतो?

मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते.

संक्रातीला कोणता खेळ खेळला जातो?

संक्रांतीला पतंग उडवण्याचा खेळ मोठ्या प्रमाणावर खेळला जातो.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण मकर संक्रांति या हिंदू सणाबद्दल माहिती पाहिली. मित्रांनो संक्रांति हा सण आपण लहानपणापासून इतक्या जवळून पाहिला आहे की त्याबद्दल सर्वच माहिती आपल्याला आहे, मात्र तरी देखील ही माहिती तुम्हाला आवडली असेलच. तुमचे काही प्रश्न आणि प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसेच ही माहिती इतर मित्र आणि मैत्रिणी यांना देखील पाठवा.

 धन्यवाद…

Vaishnavi Raut

वैष्णवी राउत (Vaishnavi Raut) हि एक content writer असून यांना पोस्ट लिहिण्याचा ३ वर्षांचा अनुभव आहे. यांचे शिक्षण बी.एसस्सी Agri.झाले असून ती मराठी भाषेत अचूक लेखनाचे कार्य करतात.

Leave a Comment