Mahendra Singh Dhoni Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो महेंद्रसिंग धोनी हे नाव ऐकलं की भारतातील प्रत्येक क्रिकेट रसिकांच्या अंगावर शहारे उभे राहतात. कारण हे नाव म्हणजे अगदी जगभरातील अव्वल दर्जाच्या क्रिकेटर्स मध्ये एक नाव आहे. आज महेंद्रसिंग धोनी क्रिकेट विश्वात एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचलेला आहे, मात्र सुरुवातीच्या आयुष्यापासून आजपर्यंत त्यांनी केलेला संघर्ष काही सामान्य नव्हता. त्यांनी या क्रिकेट विश्वात आपले नाव कमवण्यासाठी खूप मेहनत केलेली आहे, तेव्हा कुठे तो आज प्रसिद्धीच्या झोतात आलेला आहे.
महेंद्रसिंग धोनी यांची संपूर्ण माहिती Mahendra Singh Dhoni Information In Marathi
महेंद्रसिंग धोनी याला अगदी बालपणापासूनच क्रिकेटची आवड होती. शाळेत असल्यापासूनच तो क्रिकेट खेळत असे, मात्र भारतीय संघाचा कर्णधार पद मिळवण्यापर्यंत प्रत्येक दिवशी त्याला संघर्षाच्या वाटेवरून जावे लागले, आणि ज्या ज्या वेळी त्याला कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळाली त्या प्रत्येक वेळी त्यांनी आपल्या खेळीने स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण केली. आज आपण त्याच्या या संघर्ष यात्रेबद्दल माहिती बघणार आहोत…
नाव | महेंद्रसिंग धोनी |
संपूर्ण नाव | महेंद्रसिंग पानसिंग धोनी |
इतर नावे | कॅप्टन कुल, एम एस, माही, एम एस डी |
जन्म दिनांक | ७ जुलै १९८१ |
जन्म स्थळ | बिहार राज्यातील रांची, भारत. |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
धर्म | हिंदू |
वडील | पान सिंग |
आई | देवकी देवी |
बहिण | जयंती गुप्ता |
बायको | साक्षी सिंह रावत |
भारतीय क्रिकेट संघाला मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये विजय मिळवून देणारा खेळाडू म्हणजे महेंद्रसिंग धोनी होय. ११ सप्टेंबर २००७ पासून ४ जानेवारी २०१७ पर्यंत भारतीय संघाचा कर्णधार आणि २००८ पासून २८ डिसेंबर २०१४ पर्यंत कसोटी कर्णधार राहिलेला महेंद्रसिंग धोनी त्याच्या हेलिकॉप्टर शॉट साठी प्रसिद्ध आहे. त्याने २०११ मध्ये दुसऱ्यांदा भारतासाठी विश्वचषक जिंकला होता, त्यामुळे त्याला खूप प्रसिद्धी मिळाली होती. आणि यानंतर मात्र त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही.
२००४ या साली बांगलादेश विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यामधून महेंद्रसिंग धोनी यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले. पुढे २००७ ते २०१६ या कालावधीत त्यांनी याच क्रिकेट प्रकारात भारतीय संघाचा कर्णधार राहुन नेतृत्व केले. त्यामुळे त्याचे नेतृत्व गुण जगासमोर आले. त्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये त्यांनी २ डिसेंबर २००५ रोजी श्रीलंके विरुद्धच्या सामन्यामधून पदार्पण केले. एक कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनी अतिशय उत्कृष्ट असून, त्याची क्रिकेट बद्दलची रणनीती सर्वत्र खूप प्रसिद्ध आहे.
आपल्या कर्णधार पदाच्या कालावधीत त्यांनी भारतीय संघाला विजय मिळवून देत अनेक विक्रम आपल्या नावे केलेले आहेत. जागतिक क्रमवारीत सक्षम नेतृत्वासाठीच्या २००९ च्या यादीमध्ये भारतीय संघाला अव्वल स्थानी पोहोचवण्यात महेंद्रसिंग धोनी याचे खूप मोठे योगदान आहे. त्यांनी २००७ व २०१३ या दोन वर्षी आयसीसी विश्व २०-२० क्रिकेट सामन्यांमध्ये व आयसीसी चॅम्पियनशिप ट्रॉफी सामन्यांमध्ये भारतीय संघाला मार्गदर्शन करण्याचे कार्य केले.
आयपीएल मध्ये तर केवळ महेंद्रसिंग धोनी खेळणार म्हणून अनेक लोक आयपीएल सामने बघतात. आयपीएल सामन्यांमध्ये त्याने चेन्नई सुपर किंग या संघाकडून खेळताना २०१० व २०११ या दोन्ही वर्षांचा आयपीएल सामना जिंकला होता.
महेंद्रसिंग धोनीच्या बालपणाबद्दल बोलायचे झाल्यास त्याचा जन्म बिहारच्या रांची या ठिकाणी, जो सध्या झारखंड राज्याचा भाग आहे, येथे ७ जुलै १९८१ या दिवशी झाला. त्याचे कुटुंब उत्तराखंड मधील राजपूत घराणे होते. त्याचे वडील पानसिंग हे पोलाद मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या सार्वजनिक संस्थांतील सेवानिवृत्त मेकॅनिकल होते, तर त्याची आई देवकी देवी ही एक गृहिणी होती. त्याच्या मोठ्या भावाचे नाव नरेंद्र सिंह धोनी, तर बहिणीचे नाव जयंती गुप्ता असे होते. त्याचा भाऊ हा सद्यस्थितीमध्ये राजकारणी व्यक्तिमत्व आहे.
लहानपणी महेंद्रसिंग धोनी याचे शिक्षण शामली या ठिकाणावरील डीएव्ही जवाहर विद्या मंदिर या शाळेमध्ये झाले. शालेय वयापासूनच महेंद्रसिंग धोनी हा मैदानी खेळांमध्ये अतिशय तरबेज होता. तो बॅडमिंटन व फुटबॉल अतिशय उत्कृष्टपणे खेळत असे. बऱ्याच कालावधीसाठी त्याच्या शाळेतील फुटबॉल संघासाठी त्याने गोलकीपर म्हणून देखील कार्य केलेले आहे, त्यामुळे लहानपणापासूनच त्याला संघासाठी खेळण्याचे प्रशिक्षण मिळाले होते.
महेंद्रसिंग धोनीला फुटबॉल शिकवणाऱ्या शिक्षकांनी तेथील स्थानिक क्रिकेट संघामध्ये धोनीला खेळण्यासाठी पाठविले आणि येथूनच धोनीच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. फुटबॉल खेळणारा हा खेळाडू क्रिकेट इतके उत्कृष्ट खेळू शकतो यावर सर्वजण अतिशय चकित झाले. त्यामुळे त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर त्याने कमांडो क्रिकेट क्लब येथे कायमस्वरूपी विकेटकीपर म्हणून आपले स्थान निश्चित केले.
इथून पुढे मात्र त्यांनी क्रिकेटलाच आपले सर्वस्व मानले, तो क्रिकेट खेळल्याविना राहूच शकत नसायचा. त्याने विनो मंकड ट्रॉफी अंडर १६ चंपियनशिप मध्ये १९९७ – ९८ मध्ये स्थान मिळवले. त्याने इयत्ता दहावी नंतर मात्र सर्वस्व पणाला लावून क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली, मात्र यामुळे त्याचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ लागले. त्याने कसेबसे आपले बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि शाळेला रामराम ठोकला. आणि क्रिकेटवरच आपले संपूर्ण लक्ष केंद्रित केले.
महेंद्रसिंग धोनी यांनी आतापर्यंत एकूण ३१८ एक दिवसीय क्रिकेट सामने खेळलेले असून, त्यामध्ये त्यांनी एकूण १० शतके आणि ६७ अर्धशतके केलेली आहेत. हा विक्रम काही थोडका नाही.
निष्कर्ष:
मित्रांनो, महेंद्रसिंग धोनी म्हणजे भारतीय क्रिकेट रसिकांचे जणू काळीजच होय. ज्यावेळी सन २०२० च्या ऑगस्ट महिन्यामध्ये महेंद्रसिंग धोनी यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सोळा वर्षांच्या कारकीर्दीला निवृत्तीच्या माध्यमातून कायमचे राम राम करण्याचे ठरविले, त्यावेळी त्याच्या हजारो च्याहत्यांवर दुःखाचा डोंगरच कोसळला.
सर्व चाहत्यांनी सोशल मीडियावर त्यांचे हे दुःख व्यक्त केले. यावरून माही अर्थात महेंद्रसिंग धोनी याच्या विषयी लोक किती हळवे आहेत हे दिसून येते. मात्र हे नाव कमावणे काही सोपं नाही. सुरुवातीच्या काळात महेंद्रसिंग धोनी याला देखील प्रसिद्धी मिळालेली नव्हती, त्यावेळी तो देखील सामान्य खेळाडूंप्रमाणेच संघर्ष करत होता. मात्र त्याचा हा संघर्ष फळाला आला आणि तो हळूहळू क्रिकेटमध्ये नाव कमवत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील पोहोचला. तो बराच काळ भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार देखील राहिलेला आहे.
Mahendra Singh dhoni biography in Marathi| महेंद्रसिंग धोनी जीवन परिचय मराठीमध्ये|PART1|
पुर्ण नाव (Name): महेन्द्र सिंग धोनीजन्म (Birthday): 7 जुलै 1981, रांची, बिहार (भारत)उंची (Height): 5 फुट 9 इंच (1.75 मीटर)पत्नी (Wife Name): साक्षी धोनीवडील...
FAQ
महेंद्रसिंग धोनी चे संपूर्ण नाव काय आहे?
महेंद्रसिंग धोनी यांचे संपूर्ण नाव महेंद्रसिंग पानसिंग धोनी असे आहे.
महेंद्रसिंग धोनीच्या हॉटेलचे नाव काय आहे व ते कोठे आहे?
महेंद्रसिंग धोनी याच्यात हॉटेलचे नाव माही निवास असे असून ते रांची येथे आहे.
एक क्रिकेटर असण्याबरोबरच महेंद्रसिंग धोनी आणखी काय काय करतो?
महेंद्रसिंग धोनी हा एक उत्तम क्रिकेटर तर आहेच सोबतच तो व्यवसायिक देखील आहे. त्याच्या मालकीचे हॉटेल असून त्याने कापड उद्योगात देखील प्रवेश केलेला आहे. त्याच्या कपड्यांच्या ब्रँड चे नाव सेवन असून तो विविध जाहिरातींमध्ये देखील अभिनयाचे काम करतो. तसेच त्याला गाड्यांचा देखील प्रचंड छंद आहे. त्यामुळे तो गाड्यांचे कलेक्शन देखील करतो.
महेंद्रसिंग धोनी यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केव्हा केली?
महेंद्रसिंग धोनी यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा १५ ऑगस्ट २०२० रोजी केली.
महेंद्रसिंग धोनीवरील चित्रपटाचे नाव काय आहे?
महेंद्रसिंग धोनी वरील चित्रपटाचे नाव धोनी: द अनटोल्ड स्टोरी असे आहे.
आजच्या, भागामध्ये आपण भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार राहिलेला माही, अर्थात महेंद्रसिंग धोनी याविषयी माहिती पाहिली. ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असणार, क्रिकेटरसिक तर या माहितीला कमेंट च्या माध्यमातून नक्कीच दाद देतील, तसेच आपल्या इतरही क्रिकेट प्रेमी मित्रांना ही माहिती देखील शेअर करतील अशी अपेक्षा.
धन्यवाद.