महात्मा ज्योतिबा फुले यांची संपूर्ण माहिती Mahatma Jyotiba Phule Information In Marathi

Mahatma Jyotiba Phule Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो शिक्षण क्षेत्रामध्ये एक उल्लेखनीय क्रांती घडवणारे समाजसुधारक म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले होय. समाज सुधारक असण्याबरोबरच ते स्वातंत्र सैनिक, क्रांतिकारक आणि एक प्रख्यात लेखक देखील होते. ते भारतातील एक नामवंत विद्वान व तत्वज्ञ म्हणून ओळखले जात.

Mahatma Jyotiba Phule Information In Marathi

महात्मा ज्योतिबा फुले यांची संपूर्ण माहिती Mahatma Jyotiba Phule Information In Marathi

स्त्रियांसाठी पहिली शाळा सुरू करण्याचा मान किंवा विक्रम म्हणता येईल तो महात्मा ज्योतिबा फुले यांच्याच नावावर आहे. त्यांनी इसवी सन १८५४ मध्ये पुण्यात मुलींसाठी ची पहिली शाळा सुरू केली. ही संपूर्ण भारत देशातील अशी एकमेव आणि पहिलीच शाळा होती. त्यांनी पुढे देखील शैक्षणिक कार्याचा विस्तार करून, शिक्षण प्रसाराचे कार्य अगदी आपल्या मृत्यूपर्यंत केले.

त्यांनी केलेल्या समाजसुधारणांमध्ये सर्वात महत्त्वाची समाजसुधारणा म्हणजे ब्राह्मणाविना त्यांनी विवाह सोहळा लावण्यास सुरुवात केली, ज्याला वैदिक विवाह असे देखील म्हटले जाते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाने देखील या गोष्टीला कायदेशीर मान्यता दिली होती.

आता प्रश्न येतो तो म्हणजे महात्मा फुले यांना महात्मा हे नाव कोणी दिले?, तर १८८८ साली मुंबईमध्ये एक मेळावा आयोजित करण्यात आला होता. तिथे त्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल दखल घेऊन त्यांना महात्मा ही पदवी देण्यात आली.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण शैक्षणिक क्षेत्रात आपले योगदान देऊन मुलींच्या शिक्षणात क्रांती घडवणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विषयी माहिती बघणार आहोत…

नावज्योतिराव गोविंदराव फुले
इतर नावेमहात्मा फुले, ज्योतिबा फुले, ज्योतिराव फुले
जन्म दिनांक११ एप्रिल १८२७
जन्म स्थळकटगुण, सातारा, महाराष्ट्र राज्य
आईचे नावचिमनाबाई फुले
वडिलांचे नावगोविंदराव फुले
पत्नीचे नावसावित्रीबाई फुले
निधन दिनांक१८ नोव्हेंबर १८९०
निधनाचे ठिकाणपुणे
आयुष्य६३ वर्षे

मित्रांनो, ११ एप्रिल १८२७ हा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात एक उल्लेखनीय दिवस ठरला. कारण या दिवशी स्त्री शिक्षणाचे प्रणेते आणि एक समाजसुधारक असणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म झाला. त्यांचे वडील फुलांचा व्यवसाय करत असत. त्यामुळे पूर्वी गोरे आडनाव असताना देखील त्यांचे नाव फुले असे पडले.

महात्मा फुले यांचे लहानपणीचे आयुष्य फार कठीण गेले. जोतिबांच्या जन्मनंतर अवघ्या एक वर्षानंतरच आई चिमणाबाई यांचे निधन झाले. त्यानंतर सुगुनाबाई नावाच्या एका सुईनीने त्यांचा सांभाळ केला. उपलब्ध माहितीनुसार महात्मा फुले यांचे वडील फुलांचा व्यवसाय करण्यासोबतच विविध लोकांच्या बागांमध्ये माळी म्हणून काम करत असत. तसेच हार, फुले, गजरे इत्यादी गोष्टी देखील विकत. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाहक चाले.

महात्मा फुले यांचे शैक्षणिक आयुष्य:

मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले यांना लहानपणापासूनच शिक्षणाची प्रचंड आवड होती. वयाच्या अवघ्या सातव्या वर्षीच त्यांच्या वडिलांनी त्यांना स्थानिक शाळेमध्ये पाठवण्यास सुरुवात केली. मात्र तेथे त्यांच्या शिक्षणामध्ये जात आडवी आली. त्यामुळे त्यांना त्या शाळेतून काढून टाकण्यात आले. मात्र वडिलांची प्रचंड इच्छाशक्ती, आणि ज्योतिबा फुले यांचे शिक्षणाप्रती असणारे प्रेम त्यामुळे सगुणाबाई यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी घरीच अभ्यास सुरू केला.

त्यावेळी त्यांची शैक्षणिक प्रगती बघून तेथीलच एका ख्रिश्चन धर्मगुरूंनी, जे उर्दू आणि पारशीयन चे चांगले प्रशिक्षक देखील होते, यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दाखल करून घेण्यास इच्छा दाखवली. आणि तेथेच त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. लहानपणी शिक्षणात भेदभाव झाल्यामुळे त्यांनी अगदी बालवयातच ठरवले होते की, महिलांच्या आणि दलितांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करावे.

महात्मा फुले यांचे सामाजिक कार्य:

मित्रांनो, आज महात्मा ज्योतिबा फुले यांना संपूर्ण जग एक समाज सुधारक म्हणून ओळखते. लहानपणी शाळेत आलेल्या कटू अनुभवामुळे त्यांनी समाज व्यवस्था पुनर्रचित करण्याचे ठरवले, तसेच त्यांनी वाचन देखील प्रचंड केलेले होते. त्यांच्या वाचनामध्ये गौतम बुद्ध, दादू, संत कबीर, रामानंद, आणि तुकाराम महाराज इत्यादी नामवंत लेखकांचे साहित्य होते. त्यामुळे नकारात्मक विचारांपासून त्यांनी केव्हाच सुटका करून घेतलेली होती.

राष्ट्र आणि संपूर्ण समाज या दोघांच्याही प्रगतीतील अडथळा म्हणजे जातीभेद होय. जातीभेदाची ही भक्कम भिंत पाडण्यासाठी त्यांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न केले. तसेच समाजामध्ये पडलेली फुट नष्ट करण्यासाठी देखील ते नेहमी लढत असत.

महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाचे महत्त्व ओळखून सर्वप्रथम त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षित करण्यासाठी प्रयत्न केले, आणि त्यांच्या मदतीने इतर स्त्रियांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण करत त्यांनी एक इतिहास रचला. आज महिला शिक्षण घेऊन सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने आल्या आहेत.

याचे सर्व श्रेय महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले या उभयतांना जाते. त्यांनी १८५४ मध्ये महिलांसाठी ची पहिली शाळा काढून स्त्री शिक्षणाची मुहूर्त मेड रोवली. आणि तिथून आजतागायत स्त्रियांना शिक्षणापासून कुणीही वंचित ठेवू शकलेले नाही. एक शाळा सुरू करून फुले दांपत्य थांबले नाही, त्यांनी एका मागून एक अशा अनेक स्त्री शाळा सुरू करून आपल्या शैक्षणिक कार्याचा डोलारा संपूर्ण महाराष्ट्रभर पसरवला.

निष्कर्ष:

मित्रांनो, आजच्या काळामध्ये प्रत्येकाला स्वतःचे पडलेले आहे. आपण समाजासाठी काहीतरी देणे लागतो, हा विचार आजकाल कोणाच्याही मनात येत नाही. कारण आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला स्वतःला पुढे जायचे आहे. मात्र त्यासोबत समाजाचा विचार करायला कोणीही तयार होत नाही.

मात्र स्वातंत्रपूर्व काळात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले नावाचे एक थोर दाम्पत्य होऊन गेले, ज्यांनी मुलींच्या आणि बहुजनांच्या शिक्षणासाठी स्वतः पैसा खर्च करून आणि वेळप्रसंगी उच्चवर्णीय लोकांच्या शिवा शाप खाऊन हे शिक्षणाचे महत कार्य जोराने पुढे नेले. आज महात्मा फुले यांच्या नावाने अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी या ठिकाणी कृषी विद्यापीठ देखील स्थापन करण्यात आलेले आहे.

हे त्यांच्या असामान्य कार्याची प्रचिती देत असते. कारण कुठल्याही व्यक्तीचा पुतळा उभारणे किंवा मोठ्या गोष्टीला त्या व्यक्तीचे नाव देणे म्हणजे त्या व्यक्तीने भूतकाळात काहीतरी चांगले कार्य नक्कीच केलेले असते. आणि फुले दांपत्याने तर स्वतःच्या  हाऊस मौजेला बाजूला सारून स्त्री शिक्षणाचे अतिशय महत्त्वाचे कार्य पार पाडलेले आहे. त्यामुळे अखिल स्त्री जात तसेच संपूर्ण समाज देखील महात्मा फुले यांचा आणि त्यांच्या बरोबरीनेच सावित्रीबाई फुले यांचा देखील ऋणी आहे, आणि नेहमी ऋणी राहील.

FAQ

महात्मा फुले यांचे संपूर्ण नाव काय होते?

महात्मा फुले यांचे संपूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले असे होते.

महात्मा फुले यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला?

महात्मा फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ या दिवशी झाला.

महात्मा फुले यांनी कोणते महत्त्वाचे कार्य केलेले आहे?

महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा प्रसार आणि वैदिक विवाह यांसारखे महत्त्वाचे समाजसुधारक कार्य केलेले आहे.

महात्मा ज्योतिबा फुले यांचे पूर्वीचे आडनाव काय होते?

महात्मा ज्योतिबा फुले यांची पूर्वीचे आडनाव गोरे असे होते.

महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला?

महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कटगुण या ठिकाणी झाला.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण स्त्री शिक्षणाचे प्रणेते असणाऱ्या महात्मा फुले यांच्या बद्दल माहिती पाहिली. ही माहिती प्रत्येक वाचकाला आणि खास करून महिलांना कशी वाटली, हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही कळवालच. मात्र त्यांच्या कार्याचे हे गौरवद्गार आपल्या मित्र-मैत्रिणींनाही वाचायला मिळावे यासाठी त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की शेअर करा.

धन्यवाद…

Siddharth Tambe

सिद्धार्थ तांबे (Siddharth Tambe) हे एक content writer असून यांना पोस्ट लिहिण्याचा ३ वर्षांचा अनुभव आहे. यांचे शिक्षण बी.एसस्सी Agri.झाले असून ते मराठी भाषेत अचूक लेखनाचे कार्य करतात.

Leave a Comment