महात्मा गांधीं यांची संपूर्ण माहिती Mahatma Gandhi Information In Marathi

Mahatma Gandhi Information In Marathi मित्रांनो नमस्कार, मित्रांनो ना लाठी ना हथियार, साबरमती के संत तुने कर दिया कमाल। ही ओळ आपण आज पर्यंत कुठे ना कुठे नक्कीच वाचली असेल, किंवा बऱ्याचशा भाषणांमध्ये ऐकली तरी असेलच. हे वाक्य नेहमी महात्मा गांधी यांच्या बद्दल म्हटले जाते.

Mahatma Gandhi Information In Marathi

महात्मा गांधीं यांची संपूर्ण माहिती Mahatma Gandhi Information In Marathi

महात्मा गांधी हे स्वातंत्र्य चळवळीतील मवाळ गटाचे प्रमुख नेते होते. त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मवाळ पद्धतीचा अवलंब करून इंग्रजांशी वाटाघाटी करण्याचे तत्व अवलंबिले. त्यांनी अनेक प्रकारची सत्याग्रह, उपोषण इत्यादी मवाळ आंदोलने करून सरकारला जेरीस आणण्याचे प्रयत्न केले.

मित्रांनो लहानपणापासून आपल्या सर्वांची गांधीजी या शब्दांसोबत ओळख झालेली आहे, कारण या नेत्याच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या दिवशी विविध प्रकारे कार्यक्रमांचे सादरीकरण करून आपल्याला त्यांचा विषयी माहिती देण्यात येते.

आजच्या भागामध्ये आपण राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी यांच्या विषयी माहिती बघणार आहोत…

संपूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी
उपाधी महात्मा, राष्ट्रपिता
जन्म दिनांक२ ऑक्टोबर १८६९
जन्म ठिकाणगुजरात राज्यातील पोरबंदर
आईपुतलीबाई गांधी
वडील करमचंद गांधी
नागरिकत्वभारतीय
पत्नी कस्तुरबा गांधी
अपत्यमणीलाल गांधी, हरीलाल गांधी, देवदास गांधी, रामदास गांधी
व्यवसाय वकील, नेते, लेखक, राजकीय कार्यकर्ते
मृत्यू दिनांक  ३० जानेवारी १९४८
मृत्यूचे कारण हत्या (बंदुकीची गोळी झाडून)
मृत्यू ठिकाण नवी दिल्ली

प्रारंभिक जीवन

करमचंद गांधी आणि पुतलीबई गांधी यांच्या पोटी दिनांक २ ऑक्टोबर १८६९ रोजी महात्मा गांधी यांचा जन्म झाला. त्यांच्या जन्माचे गाव पोरगंदर हे होते. वय वर्ष १३ झाल्यानंतर तत्कालीन रीतिरिवाज नुसार महात्मा गांधी यांचे लग्न कस्तुरबा गांधी यांच्याशी झाले, पुढे त्यांना हरिलाल मनीलाल देवदास व रामदास असे चार पुत्र प्राप्त झाले.

महात्मा गांधी यांच्या घराला लहानपणापासूनच शिस्तीचा वारसा लाभलेला होता. त्यांचे वडील ब्रिटिश भारतातील दिवाण होते, किंवा असे म्हणता येईल किती पोरबंदर या संस्थानाचे मुख्यमंत्री होते. महात्मा गांधीजी यांच्या वडिलांना चार पत्न्या होत्या, त्यातील चौथ्या पत्नी पुतलीबाई गांधी यांच्याकडून गांधीजी यांचा जन्म झाला होता. त्यांचे कुटुंब अतिशय वैभव संपन्न होते.

महात्मा गांधीजींचे तरुणपण

मित्रांनो, महात्मा गांधीजींच्या आई पुतलीबाई या अतिशय धार्मिक वृत्तीच्या होत्या, त्यामुळे महात्मा गांधीजी तारुण्यात येईपर्यंत त्यांच्यावर अतिशय आध्यात्मिक अशा प्रकारचे संस्कार झाले होते. ते वैष्णव-धर्मांमध्ये वाढले होते, त्यामुळे महात्मा गांधी यांना भगवान विष्णू यांच्या प्रति अनामिक ओढ होती. तसेच त्यांचा जैन धर्माच्या बाबतीत देखील विश्वास होता, त्यामुळे ते अहिंसावादी बनले होते. अहिंसा या तत्त्वावर त्यांचा ठाम विश्वास होता, त्याचे प्रतिबिंब त्यांच्या तरुणपणातच दिसत होते. तरुणपणात हुल्लडबाजी करणारी इतर मुले त्यांना पसंत पडत नसत, ते नेहमी आपल्याच विश्वात गर्क असत.

महात्मा गांधी नेहमी शाकाहारी अन्न ग्रहण करत असत, निष्पाप जीवांना मारून खाणे हे त्यांना बिलकुल आवडत नसे. मात्र शालेय जीवनामध्ये असताना त्यांनी एकदा मांसाहार केला आणि ते घरच्यांपासून लपवून ठेवले असा देखील एक किस्सा सांगितला जातो.

पौगांडावस्थेत आल्यानंतर देखील गांधी इतर मुलांसोबत कधीही भांडत किंवा वाद घालत नसत. तोपर्यंत ते आपल्याच विश्वात गर्क असत. कोणाचे घेणे नाही देणे नाही एवढेच काय त्यांनी वय वर्ष १८ होईपर्यंत कुठलेही वर्तमानपत्र वाचले नव्हते, की राजकारणातल्या कुठल्याही घडामोडीवर लक्ष दिले नव्हते. अगदी इंग्लंडमध्ये त्यांचे बॅरिस्टरचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत देखील त्यांना राजकारणात जराही रस नव्हता. मात्र ज्यावेळी त्यांनी भारतातील गोरगरीब जनतेचे प्रश्न बघितले तेव्हा त्यांनी राजकारणात येण्याचे ठरविले.

लंडनमध्ये एक शाकाहारी लोकांची मिशनरी संघटना होती, ज्याचे नाव लंडन व्हेजिटेरियन सोसायटी असे होते. सुरुवातीला या सोसायटीचे सदस्य झालेले गांधीजी पुढे जाऊन त्याच सोसायटीच्या कार्यकारी समितीचे देखील सदस्य झाले.

महात्मा गांधीजींच्या राजकीय कार्याला सुरुवात

मित्रांनो, वरच आपण पाहिले की शिक्षण होईपर्यंत गांधीजींना राजकारणात जराही रस नव्हता. मात्र जेव्हा ते पंचवीस वर्षाचे झाले, त्यावेळी नेल्सन मंडेला यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव पडला. ब्रिटिश सरकार विधिमंडळाकडे भारतीयांनी एक मसुदा पाठवायचा निर्णय घेतला, जेणेकरून भारतीयांच्या समस्यांकडे लक्ष वेधले जाईल, आणि तो मसुदा यशस्वी देखील झाला.

त्यांनी डर्बन येथे वकिली करता करता  इंडियन काँग्रेस ही संस्था देखील सुरू केली, ज्यामुळे डर्बन येथील भारतीय लोकांना एकत्र करण्यात त्यांना मदत झाली. गांधीजी एक उत्तम नेतृत्व गुण असलेली व्यक्ती होती, त्यामुळे त्यांना राजकारणात उतरताना जनसामान्याचा प्रचंड सपोर्ट लाभला.

त्यांना इंग्लंडमधील वास्तव्यादरम्यान रंग आणि वंश भेदाचा अनेक घटनांना सामोरे जावे लागले, पुढे भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी राजकारणामध्ये आपले पाय भक्कम रोवले, आणि हळूहळू ते सर्वांच्या गळ्यातील ताईत असणारे नेते झाले. त्यांनी भारतामध्ये आल्यानंतर सर्वप्रथम चंपारण्य येथील शेतकऱ्यांसाठी सत्याग्रह केला, कारण ब्रिटिश व्यापारी चंपारण्य येथे मळेकरी शेतकऱ्यांना निळ पिकविण्याची सक्ती करत असत, मात्र ती नीळ खरेदी करताना त्यास योग्य भाव देत नसत.

परिणामी शेतकरी हवालदील होऊन अधिकच खचत चालला होता, शेतकऱ्याचे उत्पन्न घटत चालले होते, त्यामुळे शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती अगदी हलाखीची होऊन गेली होती. यावर मार्ग काढण्यासाठी गांधीजींनी चंपारण्य सत्याग्रह करून तेथील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे महत्त्वाचे कार्य केले होते.

निष्कर्ष

मित्रांनो, गांधीजी म्हणजे मवाळ गटातील एक सर्वात जास्त महत्त्व दिले गेलेले नेते होते. त्यांनी केलेले सत्याचे प्रयोग अतिशय लोकप्रिय झाले होते. ते आपल्या अहिंसेसाठी देखील खूप प्रसिद्ध होते. ज्यावेळी ते भारतामध्ये परतले, त्यांनी येथील जनतेचे दुःख दारिद्र्य आणि अगदी मूलभूत गरजाही भागत नसल्याचे चित्र पाहिले. त्यावेळेस त्यांनी साधी राहणीमान ठेवण्याचे निर्धार केला, तेव्हापासून त्यांनी आपला सूट, बूट आणि कोट त्यागुन केवळ एक पंचा आणि धोतर हाच आपला पोशाख पुढे मरेपर्यंत सतत ठेवला.

गांधीजी कधीही भांडण तंटा करण्यासाठी पुढाकार घेत नसत, अगदी त्यांनी इंग्रजांशी देखील कधीही भांडण्याचा पवित्र घेतला नाही. त्यांच्याबद्दल एक किस्सा आपण नेहमी ऐकतो तो म्हणजे रेल्वेमध्ये त्यांना कोणीतरी कानाखाली मारली तेव्हा गांधीजींनी आपला दुसरा गाल देखील पुढे केला, आणि या गालावर देखील मारण्यास सांगितले. यावरून त्यांचे अहिंसाचे तत्व दिसून येते.

महात्मा गांधी विषयी माहिती | महात्मा गांधी यांचा जीवन परिचय | महात्मा गांधी | Mahatma Gandhi

महात्मा गांधी विषयी माहिती | महात्मा गांधी यांचा जीवन परिचय | महात्मा गांधी | Mahatma Gandhiकोणती माहिती मिळेल महात्मा गांधी यांचा जीवन परिचय महात्मा गांधी य...

FAQ

महात्मा गांधी यांचे संपूर्ण नाव काय होते?

महात्मा गांधी यांचे संपूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते.

महात्मा गांधी यांचा जन्म केव्हा व कुठे झाला होता?

महात्मा गांधी यांचा जन्म सध्याच्या गुजरात राज्यातील पोरबंदर या गावी दिनांक २ ऑक्टोबर १८६९ या दिवशी झाला होता.

महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय होते?

महात्मा गांधी यांच्या आईचे नाव पुतलीबाई असे होते.

महात्मा गांधी यांना किती अपत्ये होती? व त्यांची नावे काय होती?

महात्मा गांधी यांना एकूण चार आपत्य होती, त्यांची नावे  मणीलाल गांधी देवदास गांधी हरिलाल गांधी आणि रामदास गांधी असे होते.

महात्मा गांधी यांनी आपल्या आयुष्यातील सर्वात पहिला सत्याग्रह कोणता केला?

महात्मा गांधी यांनी आपल्या आयुष्यातील पहिला सत्याग्रह चंपारण्य सत्याग्रह हा केला.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण महात्मा गांधी यांच्या विषयी माहिती पाहिली, या माहितीचा वापर तुम्ही निबंध लेखनासाठी कराल, तसेच आपल्या इतरही शाळकरी मित्र-मैत्रिणींना ही माहिती शेअर कराल अशी आशा बाळगतो.

धन्यवाद…

Siddharth Tambe

सिद्धार्थ तांबे (Siddharth Tambe) हे एक content writer असून यांना पोस्ट लिहिण्याचा ३ वर्षांचा अनुभव आहे. यांचे शिक्षण बी.एसस्सी Agri.झाले असून ते मराठी भाषेत अचूक लेखनाचे कार्य करतात.

Leave a Comment