महाशिवरात्री सणाची संपूर्ण माहिती Mahashivratri Festival Information In Marathi

Mahashivratri Festival Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो सर्वात प्राचीन धर्म हा सनातन धर्म समजला जातो, आणि या सनातन धर्मामध्ये वर्षाच्या बाराही महिने कोणता ना कोणता महत्त्वाचा सण हा येतच असतो.

महाशिवरात्री सणाची संपूर्ण माहिती Mahashivratri Festival Information In Marathi

भारत देशामध्ये भगवान शिव अर्थात महादेव यांचे अगणित भक्त आहेत. कैलास पर्वतात वास करणाऱ्या भगवान शिवांना जगाचा पालनहार म्हणून ओळखले जाते, याच भगवान शिवांचा वर्षभरातील सर्वात मोठा उत्सव म्हणजे महाशिवरात्री होय.  संस्कृत मध्ये याचा अर्थ भगवान शिव यांची महान रात्र असा होतो. तसे तर आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी आणि कृष्ण पक्षाच्या प्रत्येक चौदाव्या दिवशी भगवान शिवांची उपासना मोठ्या भक्ती भावने केली जाते, मात्र महाशिवरात्री शिवभक्तांसाठी आनंदाची पर्वणीच असते.

या दिवशी अनेक जटाधारी अघोरी साधू कडक उपवास आणि व्रतवैकल्य करतात, तसेच इतर शिवभक्त देखील मोठ्या भक्ती भावाने भगवान शिवांना पुजतात. या दिवशी संपूर्ण भारतभर शिवमंदिरांमध्ये जणू यात्राच भरते. मोठ्या मोठ्या महाप्रसादांचे आयोजन केले जाते.

मित्रांनो तांडव नृत्य करणाऱ्या भगवान शिवांची मूर्ती मात्र नेहमी तेजस्वी आणि शांत दिसते, अशा या त्यागाच्या देवतेचा अर्थात भगवान शिवांचा सर्वात मोठा उत्सव महाशिवरात्री याबद्दल आजच्या भागात आपण माहिती बघणार आहोत…

सणाचे नाव:महाशिवरात्री.
संस्कृत अर्थ: भगवान शिवांची महान अशी रात्र.
तिथी: माघ महिन्यातील कृष्ण चतुर्दशी तिथी.
समर्पित देवता: भगवान शिव यांना समर्पित.
साजरा करणारा समाज: हिंदू समाज.
मान्यता असणारे साहित्य: बेल फुल.

महाशिवरात्रीची माहिती:

मित्रांनो माघ महिन्यातील अमावस्येला अर्थातच चौदाव्या दिवशी अतिशय चैतन्यमय वातावरणात साजरा केला जाणारा सण म्हणजे महाशिवरात्रि होय. या दिवशी भगवान शिवाची आराधना करत अनेक शिवभक्त शिवलिंगाला दूध, दही, पाणी, मध इत्यादी गोष्टींनी अभिषेक करतात. असे मानले जाते की भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा महाशिवरात्रीच्या दिवशी विवाह झाला होता. त्याची आठवण म्हणून हा सण साजरा केला जातो. तर इतर काही कथानुसार शिवरात्रीच्या दिवशी महादेव यांनी अखिल सृष्टीचा कल्याणार्थ तांडव नृत्य केले होते, म्हणून हा सण साजरा केला जातो.

शिवरात्रीच्या दिवशीच्या विविध परंपरा:

मित्रांनो शिवरात्रीच्या दिवशी अनेक कडक विधिवत परंपरा आणि चालीरीती पाळल्या जातात. त्या दिवशी सर्व शिवभक्त कडक उपवास धरतात, काहीजण संपूर्णतः निरंकार उपवास धरतात तर काही दुध फळे आणि पाणी यांचे सेवन करतात. या दिवशी उपवास केल्याने माणूस पापमुक्त होऊन जन्ममृत्युच्या विळख्यातून कायमचा सुटतो असे मानले जाते. तसेच माणसाच्या पुण्यसंचयामध्येही मोठी वाढ होते.

स्त्रियांसाठी तर महाशिवरात्री खूपच खास असते. कुमारीका मुली या दिवशी भगवान शिवांकडे चांगला पति मिळण्यासाठी प्रार्थना करतात, तर विवाह झालेल्या स्त्रिया आपल्या पतीचे कल्याण व्हावे आणि त्याचे रक्षण व्हावे यासाठी भगवान शिवांकडे आराधना करताना दिसतात.

शिवरात्रीच्या दिवशी सर्व शिवभक्त लवकर उठून स्नान करतात, ज्यांना शक्य आहे असे शिवभक्त नदीमध्ये स्नानास प्राधान्य देताना दिसतात. त्यानंतर स्वच्छ आणि नीटनेटके कपडे घालून शिवभक्त आसपासच्या शिव मंदिरामध्ये भगवान शिवांच्या शिवलिंगाला दूध, मध, पाणी, दही इत्यादी साहित्याने अभिषेक घालतात.

शिव मंदिरातील पुजारी रात्रंदिवस ओम नमः शिवाय म्हणत दूध, दही, मध, साखर, तूप, आणि तत्सम साहित्यांनी अखंड अभिषेक करताना दिसतात. त्यादिवशी शिव मंदिरांमध्ये भजन कीर्तन आयोजित केले जातात. तसेच दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचेही आयोजन केले जाते. भाविक भक्त महाप्रसादाचा आस्वाद घेत उपवास सोडतात.

शिव अभिषेकाचा महिमा:

मित्रांनो शिवलिंगाला अभिषेक करणे हे अतिशय पवित्र कार्य मानले जाते. शिवपुराणांमध्ये असे सांगितले आहे की दुग्ध, दही, साखर, मध, पाणी व तूप इत्यादी सहा प्रकारच्या द्रव्य पदार्थांनी शिवलिंगाला अभिषेक करत करत श्री रुद्रम चमकम दशशांती जप केल्याने भगवान शिव आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात. पुढे शिवपुराणात या सहा द्रव्यांचे महत्त्व देखील विशद करण्यात आलेले आहे.

मित्रांनो भगवान शिवांनी समुद्रमंथनातून निघालेले हलाहल विष पचविले होते हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे, त्यानुसारच या सहा द्रव्यांपैकी दूध हे शुद्धता आणि धार्मिकता याचे प्रतीक आहे. समृद्धी आणि संतती प्राप्तीसाठी दही अभिषेकाचे महत्त्व सांगितलेले आहे. तसेच मध हे मधाळ बोलणे म्हणजेच शुद्ध वाणीचे प्रतीक आहे. साखर आनंदाचे तर पाणी हे अत्यंत शुद्धता याचे प्रतिनिधित्व करते.

शिवरात्रीची पूजा कशी करावी:

मित्रांनो शिव हे भोळेपणाचे प्रतीक मानले जातात. आपण अनेक शिव गीतांमधून सांब सदाशिव भोळा शंकर असा उल्लेख ऐकला असेलच. त्यामुळेच भगवान शिवांना फार काही मोठी पूजा मांडावी लागत नाही. सर्वप्रथम घंटेच्या निनादात आणि मंत्रोच्चारात सहा द्रव्यांच्या सहाय्याने भगवान शिवांच्या शिवलिंगाला अभिषेक केले जातात. त्यानंतर शिवलिंगावर तीन बोटांनी भस्म लावले जाते. यानंतर भगवान शिवांना प्रिय असणारी बेलाची पाने देठासह वाहली जातात. असे म्हटले जाते की भगवान शिव हे गरम स्वभावाचे असल्याने त्यांना थंड ठेवण्यासाठी बेलफुल वाहिले जाते.

अनेक भक्त शिवांना तृप्ती आणि दीर्घायुष्याचे प्रतिक असणारे बोर आणि जुजूब हे फळे वाहतात. तर काहीजण प्रापंचिक सुखाचे समाधान लाभावे म्हणून सुपारी अर्पण करतात. त्यानंतर धूप लावून आणि दिवे लावून भगवान शिवांची आरती आणि आराधना केली जाते. या संपूर्ण पूजेदरम्यान ओम नमः शिवाय हा नामजप अखंड चालूच असतो.

शिवरात्रीचे महत्व:

मित्रांनो हिंदू धर्मामध्ये भक्ती भावाने साजरा केला जाणाऱ्या या शिवरात्री सणाचे फारच महत्त्व आहे. शिवरात्री ही पुरुष आणि स्त्रिया यांसह लहान मुलांसाठी देखील अतिशय महत्त्वपूर्ण आहे. पापक्षालनाचा हा सर्वात मोठा दिवस म्हणून मानला जातो. या दिवशी केलेल्या विधिवत पूजेने अनेक भक्तांनी चांगला फायदा झाल्याचे अनुभव सांगितले आहेत.

शिवरात्रीच्या पूजेने विवाहित आणि अविवाहित अशा सर्वच स्त्रिया भगवान शिवांना प्रसन्न करून आपली इच्छित मागणी मागू शकतात. भगवान शिवांच्या पूजेने संतती सुख लाभते असे देखील मानले जाते. त्यामुळे हिंदू धर्मामध्ये शिवरात्रीला महत्त्वाचे स्थान देण्यात आलेले आहे.

निष्कर्ष:

मित्रांनो, हिंदू संस्कृती मध्ये महाशिवरात्रीला खूप महत्व दिले जाते, यादिवशी सर्व शिवभक्तांमध्ये एक उत्साहाचे वातावरण बघायला मिळते. यादिवशी संपूर्ण घरदार उपवास करताना आढळते. महाशिवरात्र या सणावरून आपल्याला भगवान शिव यांची लोकप्रियता समजण्यास मदत होते, तसेच या सणाच्या निमित्ताने हिंदू संस्कृतीचे जतन आणि संवर्धनही केले जाते. सोबतच सर्व हिंदू बंधू-भगिनींना सलोख्याने एकत्र आणण्याचे देखील काम केले जाते. अशी ही महाशिवरात्री दरवर्षी साजरी केली जाते.

महाशिवरात्री पर मराठी निबंध/ महाशिवरात्रीची माहिती/ Mahashivratri Marathi Nibandh/महाशिवरात्रीची कथा

महाशिवरात्री पर मराठी निबंध/ महाशिवरात्रीची माहिती/ Mahashivratri Marathi Nibandh/ महाशिवरात्रीची कथा#Mahashivratri2023 #MahashivratriMarathinibandh #Mahashi...

FAQ

महाशिवरात्री हा सण कोणत्या देवतेला समर्पित केलेला आहे?

महाशिवरात्री हा सण भगवान शिव यांना समर्पित केलेला आहे.

मराठी महिन्यानुसार महाशिवरात्री कोणत्या महिन्यात येते?

मराठी महिन्यानुसार महाशिवरात्री ही माघ महिन्यात येते.

भगवान शिवाचे वास्तव्य कुठे असते?

भगवान शिव यांचे वास्तव्य कैलास पर्वतामध्ये असते

महाशिवरात्री चा अर्थ काय होतो?

संस्कृत मध्ये महाशिवरात्री म्हणजे भगवान शिव यांची महान अशी रात्र असा अर्थ होतो.

इंग्रजी महिन्यानुसार महाशिवरात्री सण कोणत्या महिन्यात येतो?

इंग्रजी दिनदर्शिका नुसार फेब्रुवारी किंवा मार्च या महिन्यांमध्ये महाशिवरात्री हा सण असतो.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण महाशिवरात्री या भगवान शिवांना समर्पित असणाऱ्या सणाबद्दल इत्यंभूत माहिती पाहिली, ती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. तसेच तुम्हाला देखील या सणाबद्दल काही माहिती असेल तर तीही कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. योग्य माहितीला प्रसिद्धी देखील देण्यात येईल.

 धन्यवाद…

Vaishnavi Raut

वैष्णवी राउत (Vaishnavi Raut) हि एक content writer असून यांना पोस्ट लिहिण्याचा ३ वर्षांचा अनुभव आहे. यांचे शिक्षण बी.एसस्सी Agri.झाले असून ती मराठी भाषेत अचूक लेखनाचे कार्य करतात.

Leave a Comment