महाराष्ट्रची संपूर्ण माहिती Maharashtra Information In Marathi

Maharashtra Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो ‘गर्जा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा’ असे म्हटले की प्रत्येक महाराष्ट्रातील नागरिकांचा ऊर भरून येतो. आणि अंगावर शहारे उभे राहतात. कारण महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती महाराष्ट्र या राज्यावर प्रेम करत असतो.

Maharashtra Information In Marathi

महाराष्ट्रची संपूर्ण माहिती Maharashtra Information In Marathi

मित्रांनो, महाराष्ट्र हे राज्य भारत देशाच्या अगदी मध्यभागी असलेले असून, असंख्य पर्वत, समुद्रकिनारा आणि निसर्ग सौंदर्याने हे राज्य नटलेले आहे. यामध्ये विविध स्मारके, किल्ले, संग्रहालय बघायला मिळतात. आणि भारताच्या इतिहासातील एक गौरवशाली राज्य म्हणून या महाराष्ट्राचा उल्लेख केला जातो.

महाराष्ट्र हे भारतातील सर्वात श्रीमंत राज्य असून, भारताची आर्थिक राजधानी समजली जाणारी मुंबई शहर महाराष्ट्र राज्यामध्ये वसलेली आहे. या ठिकाणी आर्थिक केंद्र असून महाराष्ट्र हे नाव महान असे राष्ट्र यावरून घेण्यात आले असल्याचे सांगितले जाते.

नाव महाराष्ट्र
प्रकारराज्य
स्थापना१ मे १९६०
राजभाषामराठी
समाजमराठा
राजधानीमुंबई
क्षेत्रफळ३,०७,७१३ चौ किमी
जिल्हे३६
मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्रीअजित पवार आणि देवेंद्र फडणवीस
लोकसंख्या११.४२ कोटी (२०११ जनगणनेनुसार)

मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम मराठी भाषेचा वापर नागा कालावधीमध्ये करण्यात आला. त्यानंतर आठव्या शतकामध्ये या भाषेचा विकास होत आधुनिक मराठी भाषा तयार झाली. महाराष्ट्रावर पूर्वीपासून अनेक राजेराजवाड्यांनी राज्य केले असून, त्यामध्ये सातवाहन, कलचुरी, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव इत्यादी राजवंशांचा समावेश होतो.

मात्र १३०७ या वर्षानंतर महाराष्ट्र मध्ये मोघलांचे राज्य सुरू झाले, आणि या मोगली राज्यसत्तेला पराभूत करून छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र मध्ये स्वराज्याची स्थापना केली. त्यानंतर महाराष्ट्राचा ताबा पेशवाई कडे गेला, आणि त्यांच्याकडून इंग्रजांकडे. मात्र स्वातंत्र्यानंतर भारतावर कुठलीही राज्य वंशाची सत्ता नसून लोकशाही प्रकारचे राज्य आहे.

पूर्वी मुस्लिम आक्रमणामुळे मराठी भाषेवर फारशीचा प्रभाव पडलेला होता, मुस्लिम राजदरबारातील न्यायालयांमध्ये या भाषेचा वापर होई. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेतील विविध ग्रंथ तयार करून घेतले. तसेच शब्दकोश देखील बनवला. आणि इथून मराठी भाषेचा चांगलाच विकास झाला.

ब्रिटिश कालावधी मध्ये भारताचे विविध प्रांतांमध्ये विभाजन करण्यात आले होते, त्यानुसार महाराष्ट्र हा बॉम्बे प्रांताचा भाग होता. ज्यापासून ०१ मे १९६० या दिवशी गुजरात राज्य वेगळे करण्यात आले, आणि अखंड महाराष्ट्र शिल्लक राहिला.

मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचे वैशिष्ट्य म्हणजे अखंड भारताप्रमाणेच येथे तुम्हाला मोठी विविधता बघायला मिळते. कोकणामध्ये दमट असणारे वातावरण पूर्वेच्या गडचिरोली जिल्ह्याकडे जाताना मात्र कोरडे आणि उष्ण होत जाते. तसेच पावसाचे वितरण देखील मराठवाड्यासारख्या विभागात कमी, तर कोकणात प्रचंड असते. एकीकडे उंचच उंच कोकण कडा, तर मध्यवर्ती भागात लांबच लांब पठार व मैदाने. चालीरीती, भाषा यामध्ये देखील मोठी विविधता आढळून येते.

महाराष्ट्र राज्याचे विभाग:

मित्रांनो, सुमारे ०३,०७,७१३ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असणारा हा महाराष्ट्र प्रशासकीय दृष्ट्या फारच मोठा असल्यामुळे, त्याचे विभाजन करण्यात आलेले आहे. त्यामध्ये सहा महसूल विभाग पडतात. जसे की कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा, विदर्भाचा अमरावती विभाग, आणि नागपूर विभाग होय.

एकूण ३६ जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या राज्यामध्ये तालुक्यांची संख्या सुमारे ३५७ इतकी आहे, आणि या प्रत्येक तालुक्यांना देखील उपविभागांमध्ये विभागले गेले असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात १०९ उपविभाग पडलेले आहेत.

महाराष्ट्रातील सण उत्सव:

मित्रांनो, महाराष्ट्र मध्ये सण उत्सवांच्या निमित्ताने अनेक सुट्ट्या असतात. यातील महत्त्वाच्या सणांमध्ये रंगपंचमी, होळी, रामनवमी, गुढीपाडवा, अक्षय तृतीया, बैलपोळा, दसरा, दिवाळी तसेच विविध महापुरुषांच्या जयंती, इत्यादी सणांचा समावेश होतो. सोबतच गणेश चतुर्थी, नारळी पौर्णिमा, महावीर जयंती, वटपौर्णिमा, पारशी नववर्ष, गोकुळाष्टमी इत्यादी सण देखील मोठ्या भक्ती भावाने साजरे केला जातात.

महाराष्ट्रातील भाषा:

मित्रांनो, महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा मराठी असली तरी देखील तिच्या अनेक बोलीभाषांचा वापर महाराष्ट्र मध्ये करण्यात येतो. मुंबईमध्ये हिंदी मिश्रित मराठी वापरली जाते, मात्र जसजसे कोकणाकडे खाली यावे तसे कोकणी झलक भाषेमध्ये आढळून येते.

पश्चिम महाराष्ट्रामध्ये बऱ्यापैकी शुद्ध मराठी बोलली जात असली, तरी देखील उर्वरित भागांमध्ये खानदेशी, वऱ्हाडी, यासारख्या बोलीभाषा देखील बोलल्या जातात. सोबतच काही ठिकाणी इंग्रजी आणि हिंदी या भाषांचा देखील वापर करण्यात येतो.

महाराष्ट्र राज्यातील काही महत्त्वाची मंदिरे:

मित्रांनो, महाराष्ट्र मध्ये प्रेक्षणीय स्थळे अनेक आहेत. त्यामध्ये महत्त्वाचे म्हणजे मुंबादेवी मंदिर, बालाजी मंदिर, कैलाश मंदिर, एलिफंटा गुहा, गिरिजा माता, विनायक, वरदविनायक, सिद्धिविनायक, महालक्ष्मी मंदिर, कपालेश्वर मंदिर, त्र्यंबकेश्वर येथील मंदिरांचा संच इत्यादी मंदिरांचा समावेश होतो.

मित्रांनो महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याने ओळखला जातो. त्यांनी केलेल्या संघर्षाबद्दल आणि जनतेसाठीच्या कार्याबद्दल त्यांना आज देखील महाराष्ट्र मध्ये देवा समान पूजले जाते. त्यांनी स्थापन केलेल्या अनेक किल्ल्यांना मंदिरांच्या रूपात पूजले जाते.

याबरोबरच महाराष्ट्र मध्ये अनेक क्रांतिकारक देखील होऊन गेले, स्त्री शिक्षणासाठी ओळखले जाणारे ज्योतिराव फुले, आरक्षणाचे जनक म्हणून ओळखले जाणारे शाहू महाराज, तसेच सार्वजनिक उत्सवांचे जनक लोकमान्य टिळक इत्यादी अनेक शूरवीर मंडळींची ही कर्मभूमी आहे.

निष्कर्ष:

मित्रांनो, नावातच महान असे राष्ट्र असणाऱ्या या महत्त्वपूर्ण महाराष्ट्र राज्याची निर्मिती ०१ मे १९६० या दिवशी झाली हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण महाराष्ट्र या राज्याबद्दल माहिती घेतली. ज्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्रातील विविध जिल्हे, त्यांची वैशिष्ट्ये, महाराष्ट्र राज्याचे महत्त्वपूर्ण सण, राज्यभाषा, राज्यातील काही मंदिरे, तसेच अनेक ऐतिहासिक व्यक्ती, यांच्या विषयी माहिती मिळाली. सोबतच काही संतांबद्दल देखील आपण माहिती घेतलेली असून, प्रश्न उत्तरे देखील बघितलेली आहेत.

FAQ

महाराष्ट्र या राज्याची स्थापना कोणत्या दिवशी झाली?

महाराष्ट्र या राज्याची स्थापना १ मे १९६० या दिवशी झाली. पूर्वीच्या बॉम्बे प्रांतामधून गुजरात व महाराष्ट्र ही दोन स्वतंत्र राज्य निर्माण करण्यात आली होती.

महाराष्ट्रातील काही प्रसिद्ध संत कोणते आहेत?

महाराष्ट्र मध्ये संत ज्ञानेश्वर, रामदास स्वामी, संत तुकाराम, संत नामदेव, आणि संत एकनाथ यांसारखे प्रसिद्ध संत होऊन गेले.

महाराष्ट्र मधील काही ऐतिहासिक व्यक्ती कोणत्या आहेत?

महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात महान राजा समजले जाणारे छत्रपती शिवाजी महाराज सोळाव्या शतकामध्ये होऊन गेले. त्यांच्या बरोबरीनेच मध्ययुगीन इतिहासात ज्योतिराव फुले, शाहू महाराज, आणि लोकमान्य टिळक यांच्यासारखे ऐतिहासिक व्यक्ती होऊन गेले. सोबतच लक्ष्मीकांत बेर्डे, लता मंगेशकर, दादासाहेब फाळके यांसारखे कलाकार देखील होऊन गेले.

महाराष्ट्र कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे?

मित्रांनो महाराष्ट्र राज्यामध्ये संपूर्ण भारताचे आर्थिक केंद्र असणाऱ्या मुंबई या शहराचा समावेश आहे. तसेच मुंबईमध्ये एक उत्तम बंदर असल्यामुळे, याला भारताचे प्रवेशद्वार म्हणून देखील ओळख आहे. सोबतच अनेक निसर्गसौंदर्यांनी समृद्ध असलेला हा महाराष्ट्र पर्यटकांना देखील आकर्षित करत असतो. अगदी या महाराष्ट्रामध्ये युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ देखील आहेत.

महाराष्ट्रातील राजघराण्याचा इतिहास काय आहे?

इसवी सन पूर्व चौथ्या व तिसऱ्या शतकामध्ये महाराष्ट्रावर मौर्य साम्राज्य राज्य करत होते. त्यानंतर दुसऱ्या शतकामध्ये सातवाहन घराणे पुढील चारशे वर्षांपर्यंत येथे राज्य करत होते. त्यानंतर अगदी अलीकडील काळामध्ये मुघल साम्राज्याचा पराभव करून छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा राज्य स्थापन केले. त्यानंतर इंग्रज आणि सद्यस्थितीमध्ये एका लोकशाही राज्य म्हणून महाराष्ट्राचा उल्लेख आहे.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण महाराष्ट्र या महान राष्ट्राविषयी माहिती बघितली. ही माहिती प्रत्येक महाराष्ट्रातील व्यक्तीला नक्कीच आवडली असेल, मात्र आपल्या महाराष्ट्र राज्याची महती मित्रांनाही कळावी, याकरिता तुमच्या महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्र बाहेरीलही अमराठी लोकांना ही माहिती अवश्य शेअर करा.

धन्यवाद…

Avatar

i am marathi content writer from last 5 years.

Leave a Comment