एम ए कोर्सची संपूर्ण माहिती M A Course Information In Marathi

M A Course Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो शिक्षण हे वाघिणीचं दूध असतं असं म्हटलं जातं. कुठल्याही क्षेत्रात शिक्षण घेतले तरी देखील माणसाचे भविष्य सुखकर होण्यास मदत होते, मग ते नोकरी मिळवून सेटल होणं असो की त्या ज्ञानाचा वापर करून कुठलाही व्यवसाय चालू करणे असो.

M A Course Information In Marathi

एम ए कोर्सची संपूर्ण माहिती M A Course Information In Marathi

शिक्षण हे कधीही वाया जात नाही. आजकाल डिग्री झालेल्या विद्यार्थ्यांना देखील सर्वसामान्य समजले जाते, त्यामुळे अनेकांचा आजकाल उच्च शिक्षण घेण्याकडे म्हणजेच मास्टर्स डिग्री करण्याकडे कल वाढत चाललेला आहे. त्यातीलच एक सर्वात सोपी मात्र तेवढीच महत्त्वाची असणारी मास्टर्स डिग्री म्हणजे एम ए अर्थात मास्टर्स इन आर्ट्स होय.

हा अभ्यासक्रम कुठल्याही क्षेत्रात ग्रॅज्युएट असणाऱ्या विद्यार्थ्यांना करता येतो. मात्र बीए हा मास्टर कोर्स केल्यानंतर एम ए करण्यासाठी सर्वात जास्त पसंती दिली जाते. आजच्या भागामध्ये आपण याच एम ए कोर्स बद्दल इत्यंभूत माहिती बघणार आहोत…

कोर्सचे नावM. A. (एम. ए.)
कोर्सचे संपूर्ण नावMasters of Arts (मास्टर्स ऑफ आर्टस्)
कोर्सचा कालावधीदोन वर्षे
करियर चॉइसेसप्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, कार्यकारी सहाय्यक, शाळा/ कॉलेज समुपदेशक, माहिती विश्लेषक

एम ए अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठीची प्रक्रिया:

मित्रांनो, एम ए या कोर्सला ऍडमिशन घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही कुठल्याही विषयांमध्ये बॅचलर डिग्री केलेली असावी. त्यानंतरच तुम्ही एम ए या कोर्ससाठी प्रवेश घेऊ शकता.

 या प्रवेशासाठी काही विद्यापीठे प्रवेश परीक्षा हा मार्ग अवलंबतात तर काही विद्यापीठे गटचर्चा किंवा वैयक्तिक मुलाखत या पर्यायातून विद्यार्थी निवडतात. काही विद्यापीठे मात्र बॅचलर डिग्री च्या मार्क नुसार थेट प्रवेश देतात. आपण ज्या विद्यापीठा अंतर्गत प्रवेश घेऊ इच्छिता त्यानुसार आपण योग्य ती प्रवेश प्रक्रिया अनुसरून प्रवेश घेऊ शकता.

एम ए या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी च्या पात्रता:

मित्रांनो, कुठल्याही क्षेत्रात करिअर करायचे तर आपण त्यास पात्र असणे फार गरजेचे ठरते. मग त्यात एम ए हा कोर्स सुद्धा मागे नाही. या कोर्सला प्रवेश घेण्यापूर्वी संबंधित संस्थेने अथवा विद्यापीठाने ठरविलेले काही पात्रता निकष विद्यार्थ्यांना पार पाडावेच लागतात. हे पात्रता निकष साधारणपणे काय असतात हे आपण बघूया.

एम ए या कोर्सला प्रवेश घेण्यापूर्वी बॅचलर ऑफ आर्ट्स किंवा सायन्स अथवा कॉमर्स शाखेची डिग्री करणे गरजेचे असते.

बीए किंवा कुठल्याही बॅचलर डिग्रीचे शिक्षण हे विद्यार्थ्यांनी मान्यताप्राप्त असलेल्या विद्यापीठातूनच पूर्ण करणे गरजेचे ठरते. तसेच या डिग्री मध्ये किमान ५०% गुण घेऊन विद्यार्थ्यांनी पास होणे आवश्यक असते.

या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी वयाची कुठलीही अट नाही.

एम ए कोर्स मध्ये स्पेशलायझेशन करणे:

मित्रांनो कुठल्याही क्षेत्रामध्ये मास्टर्स डिग्री करणे म्हणजे त्यातही एका विषयांमध्ये प्राविण्य मिळवणे असे असते. त्यामुळे एम ए कोर्सला ऍडमिशन घेतल्यानंतर आपल्याला कुठलाही एक स्पेशल विषय निवडावा लागतो. ज्यामध्ये तुम्ही हे उच्च शिक्षण घेऊ शकता, ज्यामध्ये तुम्ही दोन भाषा म्हणजेच हिंदी व इंग्रजी, मानसशास्त्र, तत्त्वज्ञान, सामाजिक कार्य, एच आर व्यवस्थापन, शिक्षण, मानसशास्त्र, आंतरराष्ट्रीय संबंध, इतिहास, व राज्यशास्त्र इत्यादी विषय निवडू शकता.

एम ए कोर्स व त्याचे प्रकार:

मित्रांनो, एम ए या कोर्सला उपस्थितीनुसार विविध प्रकारात वर्गीकृत केलेले आहे. हे प्रकार तीन असून ते नियमित एम ए, डिस्टन्स एम ए, व ऑनलाईन एमए इत्यादी आहेत. व त्यात काय वेगळेपण आहे याबद्दल माहिती बघूया.

नियमित एम ए:

जे विद्यार्थी आपल्या बॅचलर डिग्री नंतर लगेचच या कोर्सला ऍडमिशन घेतात ते शक्यतो नियमित एम ए हा प्रकार अवलंबतात. ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी सुद्धा दोन वर्षे देणे शक्य आहे त्यांच्यासाठी हा प्रकार अतिशय उपयुक्त आहे. यामध्ये विद्यार्थी पारंपारिक पद्धतीनेच नेहमी वर्गात उपस्थित राहतात आणि लेक्चरर त्यांना शिकवतात.

डिस्टन्स एम ए:

ज्या लोकांना बॅचलर डिग्री नंतर किंवा त्यानंतर काही कालावधी गेल्यानंतर हा कोर्स करायचा असेल त्यांच्यासाठी डिस्टन्स एम ए हा अतिशय फायदेशीर अभ्यासक्रम ठरतो. मुख्यतः जे लोक नोकरी किंवा व्यवसाय करत करत हा कोर्स करू इच्छितात त्यांच्यासाठी डिस्टन्स एम ए हा अतिशय उत्तम पर्याय असतो. यामध्ये विद्यार्थ्यांना कॉलेजच्या कॅम्पसमध्ये किंवा वर्गामध्ये बिलकुल उपस्थित राहण्याची गरज पडत नाही. त्यामुळे विद्यार्थी आपले इतर कामे पार पाडत पाडत हे शिक्षण घेऊ शकतात. हा अभ्यासक्रम कुठल्याही प्रकारच्या मुक्त विद्यापीठांमध्ये उपलब्ध असतो.

ऑनलाइन एम ए:

मित्रांनो, ज्यांना स्वतःचा अभ्यास करणे शक्य नाही मात्र कॉलेजला उपस्थित राहणे देखील शक्य होणार नाही अशा लोकांसाठी ऑनलाइन एम ए हा अतिशय उत्तम प्रकार ठरत आहे. हा एक आधुनिक शिक्षण प्रकार असून यामध्ये ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम आणि परीक्षा देखील ऑनलाईन घेऊन हा कोर्स पूर्ण करता येतो.

निष्कर्ष:

मित्रांनो, आज शिक्षणाचे महत्त्व सर्व स्तरांमध्ये पोहोचलेले आहे. पूर्वीसारखे आजकाल कोणीही अर्ध्यात शाळा सोडताना दिसत नाही, त्यामुळे बरेच विद्यार्थी किमान पदवी पर्यंत तरी शिक्षण घेतातच. मात्र एवढ्या शिक्षणावर नोकरी मिळवणे फार कठीण जाते. त्यामुळे आजकाल मास्टर्स अर्थातच पदव्युत्तर शिक्षण घेणे गरजेचे बनलेले आहे.

एम ए ही देखील एक मास्टर्स डिग्री असून बी ए नंतर साधारणपणे या डिग्रीला ऍडमिशन घेतले जाते. मात्र बीएससी किंवा बीकॉम केलेल्या विद्यार्थ्यांना देखील या डिग्रीस ऍडमिशन घेणे शक्य आहे. त्यासाठी काही पात्रता निकष असतात ते पार पाडले की झाले. तसेच अनेक मुक्त विद्यापीठांमध्ये देखील तुम्ही हा अभ्यासक्रम पूर्ण करू शकता. यासाठी तुम्हाला स्वतः कॉलेजमध्ये उपस्थित राहणे आवश्यक नसते, त्यामुळे तुम्ही तुमचे इतर कामकाज किंवा नोकरी सांभाळून देखील हा कोर्स अतिशय सहजरित्या पूर्ण करू शकता. यासाठी केवळ दोन वर्षे इतकाच कालावधी लागतो.

What is MA | MA kya hai | MA Course Duration | MA Course Subject List | Career Opportunity after MA

What is MA | MA kya hai | MA Course Duration | MA Course Subject List | Career Opportunity after MA नमस्कार दोस्तोंयहाँ आप सभी एकदिवसीय परीक्षाओं से संबंधित ...

FAQ

एम ए या कोर्सचे संपूर्ण नाव किंवा फुल फॉर्म काय आहे?

एम ए या कोर्स चे संपूर्ण नाव अर्थात फुल फॉर्म हा मास्टर ऑफ आर्ट असा आहे.

एम ए या कोर्सचा कालावधी किती असतो?

एम ए या कोर्सचा कालावधी साधारणपणे दोन वर्षांचा असतो. जो तीन वर्षांच्या बीए या कोर्स नंतर केला जातो. त्यामुळे बारावीनंतर एम ए कोर्स साठी किमान पाच वर्षांचा कालावधी लागतो.

एम ए करण्यासाठी स्पेशल विषय घेता येतो का?

एम ए करण्यासाठी तुम्ही नक्कीच एकदा स्पेशल विषय घेऊ शकता. यामध्ये राज्यशास्त्रासारख्या विषयाचा समावेश होतो. यामध्ये एम ए केल्यानंतर तुम्ही रिपोर्टिंग, लेखक, प्रचार, राजकारण, मास मीडिया, सोशल मीडिया इत्यादी प्रकारचे क्षेत्रामध्ये कार्य करू शकता. आणि आपले करिअर बनवू शकता.

नोकरी करताना आपण एम ए हा कोर्स करू शकतो का?

नक्कीच तुम्ही नोकरी करताना एम ए हा कोर्स करू शकता. यासाठी तुम्हाला मुक्त विद्यापीठे किंवा ऑनलाईन शिक्षण प्रणाली किंवा डिस्टन्स एम ए इत्यादी गोष्टींचा आधार घेता येईल.

एम ए करण्यासाठी कोणते स्पेशल विषय घेता येऊ शकतात?

एम ए करण्यासाठी तुम्ही इंग्रजी, हिंदी, सामाजिक कार्य, तत्त्वज्ञान, आंतरराष्ट्रीय संबंध, शिक्षण, एच आर मॅनेजमेंट, मानसशास्त्र, इतिहास व राज्यशास्त्र इत्यादी प्रकारचे स्पेशल विषय घेऊ शकता.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण एम ए अर्थात मास्टर ऑफ आर्ट्स या पदव्युत्तर अभ्यासक्रमाविषयी संपूर्ण माहिती पाहिली. या कोर्सच्या माहितीबद्दल तुमचे अभिप्राय आम्हाला कमेंट मध्ये तर मिळतीलच, मात्र या लेखाला अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा ही नम्रतेची विनंती.

धन्यवाद.

Vaishnavi Raut

वैष्णवी राउत (Vaishnavi Raut) हि एक content writer असून यांना पोस्ट लिहिण्याचा ३ वर्षांचा अनुभव आहे. यांचे शिक्षण बी.एसस्सी Agri.झाले असून ती मराठी भाषेत अचूक लेखनाचे कार्य करतात.

Leave a Comment