कमळ फुलाची संपूर्ण माहिती Lotus Flower Information In Marathi

Lotus Flower Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो भारताचे राष्ट्रीय फूल असलेले कमळ सर्वांच्याच परिचयाचे आहे. कमळ ही वनस्पती पाण्यामध्ये फुलणारी वनस्पती असून, त्याला मोठे सुंदर फुले येत असतात. संस्कृत मध्ये कमळाच्या फुलाला कमल, पंखेरुह, पद्म, सरसिज, पंकज, सरोज, जलज, सरोरुह, नीरज, वारीज, अंबुज, अरविंद, नलिन या आणि इतरही नावांनी ओळखले जाते.

Lotus Flower Information In Marathi

कमळ फुलाची संपूर्ण माहिती Lotus Flower Information In Marathi

पर्शिया भाषेमध्ये कमळाला निलोफर नावाने ओळखले जाते, तसेच इंग्लिश भाषेमध्ये त्याला इंडियन लोटस अथवा सिक्रेट लोटस याबरोबरच वॉटर लिली इत्यादी नावे आहेत. त्याच प्रकारे इजिप्शियन भाषेत त्याला पायथागोरइन बिन हे नाव आहे.

कमळ हे पाण्यामध्ये आढळणारे फुल असून, त्याचा उगम भारतामध्ये झालेला आहे. हे फुल उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये उत्तम वाढते. त्याच प्रकारे इराण व ऑस्ट्रेलिया या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर आढळते.

कमळाचे फुल रंगाने गुलाबीसर पांढरे असते. ते अनेक पाकळ्यांनी मिळून गोलाकार बनलेले असते, या वनस्पतीच्या पानांमध्ये आणि देठांमध्ये तंतुमय पदार्थ असतात, काही लोक या तंतू किंवा धाग्यापासून कपडे बनवितात. हे कपडे घातल्यामुळे अनेक आजार व रोग बरे होतात असे सांगितले जाते.

कमळाचे देठ हे अतिशय लांब आणि सरळ वाढतात, जे आतून पोकळ असतात. कमळाची वनस्पती पाण्याखाली, चिखलामध्ये वाढत असते. व त्याचे पाणी आणि फक्त फुल पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगते. या देठांच्या गाठी मधून फुलांची निर्मिती होते, आणि ही वनस्पती वाढत जाते.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण कमळ या फुला विषयी माहिती बघणार आहोत.

नावकमळ
इंग्रजी नावलोटस
शास्त्रीय नावनेलुम्बो न्यूसिफेरा
वर्गवनस्पती
प्रकारपाणीवर्गीय वनस्पती
कुटुंब अथवा कुळ नेलुम्बोनासी
ऑर्डरप्रोटेअल्स

मित्रांनो, सर्वात लोकप्रिय आणि सर्व परिचित फुल म्हटलं की कमळाचे नाव पहिल्या क्रमांकावर घेतले जाते. मित्रांनो कमळ हे असे फुल आहे ज्याचे प्रत्येकच भाग औषधी गुणधर्माने युक्त आहेत. त्यामुळे हे फुल विविध आजारांच्या उपचारांमध्ये देखील वापरले जाते.

कमळफुलाचे फायदे:

मित्रांनो, कमळाच्या विविध भागांचे अनेक फायदे आहेत ते पुढीलप्रमाणे…

फुल:

मित्रांनो, कमळाच्या फुलांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोह व कॅल्शियम आढळून येते, जे शरीराला हायड्रेट ठेवण्याचे कार्य करते. अनेक लोक कमळाच्या फुलापासून तयार करण्यात आलेला चहा पीत असतात, ज्यामुळे ॲनिमियाच्या समस्येवर मात केली जाऊ शकते.

स्टेम किंवा खोड:

मित्रांनो, कमळ फुलाच्या देठामध्ये देखील चांगले आरोग्यदायी गुणधर्म आढळून आलेले आहेत, चवीला तुरट असणाऱ्या या देठामध्ये अनेक प्रकारची खनिजे आढळून येतात. ज्यामुळे हृदयाच्या व मूत्रपिंडाच्या समस्यांवर मात केली जाऊ शकते. अनेक प्रकारच्या मूत्रपिंडावरील औषधांमध्ये कमळाच्या देठाचा वापर केलेला दिसतो, त्याबरोबरच लघवीच्या अडचणींसाठी देखील कमळाचे देठ खूप फायदेशीर ठरत असते.

बियाणे किंवा बीज:

मित्रांनो, कमळाच्या बियांना कमलगट्टा नावाने ओळखले जाते. यामध्ये अनेक पोषक तत्त्व आढळून आलेले आहेत. ज्यामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरस, प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट्स इत्यादींचा समावेश होतो. तसेच या बियांच्या सेवनामुळे मेंदू सक्रिय राहण्यास मदत मिळते. आणि रक्तदाब देखील नियंत्रणात राहतो. कमळाच्या बिया सेवन करण्याकरिता त्या आधी पूर्ण सुकवून घ्याव्यात, मग त्याची पावडर करून मधामध्ये चाटवावे. यामुळे खोकला बरा होतो.

पान:

मित्रांनो, कमळाचे पान देखील खूप आरोग्यदायी आहेत. कमळाच्या पानावर अन्न खाल्ले जाऊ शकते, किंवा झाकून ठेवले जाऊ शकते. यामुळे व्यक्तीच्या शरीराला तापमाना नियंत्रणात फायदा होतो.

घरी कमळ कसे लावावे:

मित्रांनो, कमळाच्या चार ते पाच बिया घेऊन त्यांना हलक्या हाताने चोळावे. त्यानंतर काचेच्या भांड्यामध्ये पाण्यात हे बीजे ठेवावे, दहा ते पंधरा दिवसानंतर अंकुर फुटले की त्याची रवानगी चिखलामध्ये करावी. अश्या रीतीने तुम्ही घरबसल्या कमळ उगवू शकता.

कमळ फुलाचे सांस्कृतिक धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व:

मित्रानो, धनदेवता माता लक्ष्मी, कोमलतेचे प्रतीक असणाऱ्या कमळावर विराजमान आहे. जे भावनिक आणि मानसिक शुद्धतेला दर्शवत असते. तसेच भगवान श्री विष्णू यांची उत्पत्ती देखील कमळापासून झालेली आहे असे मानले जाते.

बौद्ध धर्मीयांसाठी सुद्धा कमळ फुलाचे पवित्र खूप आहे, बौद्ध शिकवणी नुसार पाण्यावर तरंगणारे हे कमळाचे फुल माणसाला अति इच्छा व आसक्ती सोडण्याचे संदेश देते. इजिप्त मध्ये देखील कमळाला पवित्र मानले जाते. तेथे कमळ हे सूर्यपुत्र असल्याचे मानतात, कारण सूर्याच्या येण्याने फुलणारे हे फुल रात्री मात्र पुन्हा बंद होते.

खाण्याकरिता कमळाचे फुल कसे वापरावे:

मित्रांनो, कमळ खाताना तुम्ही कंदचा रस वापरणार असाल तर तो प्रति दिन १० ते २० मिली, तर बियाण्याची पावडर वापरणार असाल तर प्रति दिन ०३ ते ०६ ग्रॅम या प्रमाणात घेण्याचा सल्ला दिला जातो.

कमळ फुलाबद्दल काही मनोरंजक तथ्य:

  • भारताचे राष्ट्रीय फूल असणारे हे कमळ व्हिएतनाम देशाचेही राष्ट्रीय फुल आहे.
  • जर मधमाशीने कमळाच्या फुलापासून पराग कण गोळा केलेले असतील, तर असा मध डोळ्यांसाठी उत्तम औषध समजला जातो.
  • चिखलात रुजत असले तरीदेखील या कमळाची पाने, बिया, फुल आणि कंद इत्यादी भाग खाल्ले जाऊ शकतात.
  • कमळाच्या फुलांचा साधारण व्यास हा सुमारे २० से. मी. पर्यंत असू शकतो. तर पाने देखील सुमारे ६० सेंटीमीटर म्हणजे दोन फुटांच्या व्यासाचे असतात.

निष्कर्ष:

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण कमळ फुलाबद्दल इत्यंभूत संपूर्ण माहिती पाहिली. ज्यामध्ये तुम्हाला कमळाच्या फुलाच्या विविध भागांचे फायदे व उपयोग तसेच त्याचे काही तोटे देखील समजले. सोबतच कमळाच्या लागवडीबद्दल माहिती, धार्मिक सांस्कृतिक किंवा ऐतिहासिक प्रकारचे महत्त्व, बागेमध्ये कमळाची जोपासना कशी करावी, तसेच याचे फुल कशाप्रकारे वापरावे इत्यादीही माहिती समजली. कमळाच्या वनस्पतीबाबत बोलायचे झाल्यास त्याचे उगमस्थान वितरण आणि संबंधित इतर महत्त्वाची तथ्य देखील समजले.

कमळ हे भारताचे राष्ट्रीय फूल आहे, त्यामुळे त्याचे खूप महत्त्व असून अध्यात्मिक दृष्ट्या देखील कमळ फार उपयुक्त आहे. हे फुल लावल्यामुळे आपल्या घराचे आणि आजूबाजूच्या परिसराचे सौंदर्य देखील वाढले जाते.

FAQ

कमळाचे फुल कशाचे प्रतीक आहे?

मित्रांनो भारताचे राष्ट्रीय फूल असलेल्या कमळाला शक्ती, शुद्धता आणि पुनर्जन्म यांचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. याला शुद्धतेचे प्रतीक म्हणून ओळखण्यामागे असणारे कारण म्हणजे अतिशय घाणीतून हे निष्कलंक कमळाचे फुले उगवत असतात.

कमळाच्या फुलाला कोणत्या व्याख्येमध्ये शब्दबद्ध केलेले आहे?

एक दोलायमान प्रकारचे मोठे, सुगंधित, पानांच्या मध्ये वसलेले, आणि पाण्यावर तरंगलेले, अनेक पाकळ्यांच्या सममितीय समूहातून तयार झालेले आणि चिखलातून रुजलेले, आकर्षक फुल अशी कमळाची व्याख्या केली जाते.

कमळाच्या फुलाला कोणता रंग असतो?

मुख्यतः कमळाचे फूल हे गुलाबीसर पांढऱ्या रंगाचे असते, मात्र वेगवेगळ्या प्रजातीनुसार निळ्या, जांभळ्या किंवा पिवळ्या रंगांमध्ये देखील कमळाची फुले सापडू शकतात. या फुलाला रंग देण्याचे कार्य पाकळ्यांमधील विविध रंगद्रव्य करत असतात.

कमळाला भारताच्या राष्ट्रीय फुलाचा दर्जा केव्हा देण्यात आला?

ज्या दिवशी भारताने संविधानाचा स्वीकार केला, अर्थात २६ जानेवारी १९५० या दिवशी कमळाला भारताच्या राष्ट्रीय फुलाचा दर्जा मिळाला.

भारतासह आणखी कोणत्या देशाचे कमळ हे राष्ट्रीय फूल आहे?

भारतासह व्हिएतनाम या देशाचे देखील कमळ हे राष्ट्रीय फूल आहे.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण कमळ या भारताच्या राष्ट्रीय फुलाबद्दल माहिती पाहिलेली आहे. या माहितीबद्दलच्या सूचना, प्रतिक्रिया आणि तुमच्याकडे असणारी इतरही माहिती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये निःसंकोचपणे लिहू शकता. तसेच आपल्या इतरही मित्र-मैत्रिणींना या माहितीचा आस्वाद घेता यावा, यासाठी त्यांच्यापर्यंत ही माहिती अवश्य पोहोचवा.

धन्यवाद…

Avatar

i am marathi content writer from last 5 years.

Leave a Comment