लोकमान्य टिळक यांची संपूर्ण माहिती Lokmanya Tilak Information In Marathi

Lokmanya Tilak Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे आद्य प्रवर्तक आणि जहाल विचारसरणीचे संस्थापक म्हणून ओळखले जाणारे बाळ गंगाधर टिळक हे भारतीय राष्ट्रीय चळवळीचे प्रथम नेतृत्व होते. टिळक हे अतिशय साधे, शिस्तबद्ध व्यक्ती, उत्तम नेतृत्व गुण असलेले नेते, चांगले शिक्षक, उत्तम वकील, समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते, आणि भारतीय स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांचा इतिहास, भूगोल, संस्कृत, गणित, आणि खगोलशास्त्र या विषयांमध्ये गाढा अभ्यास होता.

Lokmanya Tilak Information In Marathi

लोकमान्य टिळक यांची संपूर्ण माहिती Lokmanya Tilak Information In Marathi

बाळ गंगाधर टिळक यांना लोक लोकमान्य म्हणून ओळखत असत. त्यांची “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि मी तो मिळवणारच” ही घोषणा खूप गाजली होती. त्यातून अनेक लोकांना स्वातंत्र्यासाठी काम करण्याची प्रेरणा मिळाली होती. अहिंसेचे जनक महात्मा गांधी आणि जहाल मतवादी लोकमान्य टिळक यांचे कधीच पटले नाही. त्या दोघांचीही विचारधारा पूर्णपणे टोकाची होती, त्यामुळे लोकमान्य टिळक यांनी राष्ट्रीय काँग्रेसला वेगळ्या गटामध्ये विभाजित केले.

आजच्या भागामध्ये आपण बाळ गंगाधर टिळक अर्थात लोकमान्य यांच्या विषयी इत्यंभूत माहिती बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया…

नावलोकमान्य टिळक
संपूर्ण नावबाळ गंगाधर टिळक
जन्म दिनांक२३ जुलै १८५६
जन्म स्थळरत्नागिरी, महाराष्ट्र
आई वडीलपार्वतीबाई गंगाधर टिळक, आणि गंगाधर रामचंद्र टिळक
पत्नीसत्यभामा टिळक
राजकीय पक्षभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
मृत्यू दिनांक १ ऑगस्ट १९२०
मृत्यूचे ठिकाणमुंबई

मित्रांनो २३ जुलै १८५६ या दिवशी रत्नागिरीतील एका ब्राह्मण कुटुंबात बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म झाला. त्यांचे वडील रत्नागिरी मधील प्रसिद्ध संस्कृतचे प्राध्यापक होते, तर त्यांची आई गृहिणी होती. वडिलांची बदली झाल्यामुळे ते सहकुटुंब पुण्यामध्ये आले. या काळात त्यांचा १८७१ यावर्षी विवाह झाला. त्यांच्या पत्नीचे नाव तापीबाई असे होते, मात्र त्यांचे नाव बदलून सत्यभामा असे करण्यात आले होते.

लोकमान्य टिळक यांचे शैक्षणिक जीवन:

मित्रांनो, लोकमान्य टिळकांनी शिक्षणाचे महत्त्व अगदी बालपणापासून हेरले होते. लहानपणापासूनच ते अतिशय तल्लख बुद्धीचे होते. गणित हा विषय तर त्यांच्या विशेष आवडीचा. लहान असताना प्राथमिक शिक्षण त्यांनी आपल्या वडिलांकडूनच घेतले होते. त्यानंतर त्यांनी पुण्याच्या अँग्लो व्हर्नाक्युलर या हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. यादरम्यानच त्यांच्या दोन्ही पालकांचे निधन झाले, मात्र या परिस्थितीतही ते खचले नाहीत.

पुढे त्यांनी १८७७ या वर्षी डेक्कन कॉलेज पुणे येथून गणित आणि संस्कृत या विषयांमधील बीए ही पदवी मिळवली. आणि पुढे मुंबई येथील गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून एलएलबी हे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांना १८७९ यावर्षी कायद्याची पदवी मिळाली.

लोकमान्य टिळक यांचे कौटुंबिक जीवन:

लोकमान्य टिळक हे त्यांच्या आई वडिलांचे दुसरी अपत्य होते. त्यानंतर त्यांना दोन बहिणी झाल्या. असे म्हणले जाते की मुलगा व्हावा म्हणून टिळकांच्या आईने नवस केले होते, आणि त्यानंतर टिळकांचा जन्म झाला होता.

जन्माच्या वेळी लोकमान्य टिळक अगदीच अशक्त असे होते, मात्र या अशक्त मुलानेच पुढे भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये मोठे योगदान दिले, आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक म्हणून प्रसिद्ध झाले.

लोकमान्य टिळकांची शिक्षक म्हणून कारकीर्द:

मित्रांनो, शिक्षणाची बालपणापासून आवड असल्याने टिळकांनी आपल्या शिक्षणानंतर पुण्याच्या एका खाजगी शाळेमध्ये इंग्रजी व गणित हे विषय शिकवायला सुरू केले. मात्र लहानपणापासूनच्या स्वभावामुळे त्यांचे तिथे कोणाशीही पटले नाही, आणि मतभेद झाल्यामुळे त्यांनी १८८० यावर्षी ती शाळा सोडली.

त्यानंतर त्यांनी स्वतःचीच शाळा देखील सुरू केली होती, जिचे नाव डेक्कन एज्युकेशन सोसायटी असे होते. या कामी त्यांना त्यांचे वर्गमित्र आणि समाज सुधारणेमध्ये अग्रेसर असलेले गोपाळ गणेश आगरकर आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर यांची मदत लाभली.

पुढे याच सोसायटीने १८८५ मध्ये न्यू इंग्लिश स्कूल, आणि उच्च शिक्षणासाठी फर्ग्युसन कॉलेज या दोन संस्था देखील स्थापन केल्या. मात्र समाजसेवा आधी की स्वातंत्र्य आधी या मुद्द्यावरून गोपाळ गणेश आगरकर आणि टिळक यांच्यामध्ये मतभेद झाले, आणि ते तिथून वेगवेगळ्या वाटेला गेले.

एक पत्रकार म्हणून बाळ गंगाधर टिळक यांची कारकीर्द:

मित्रांनो, लोकमान्य टिळक म्हटलं की आपल्यासमोर केसरी व मराठा ही दोन वृत्तपत्र हमखास येतात. टिळक यांनी फार पूर्वीच हेरले होते की सर्वसामान्य लोकांना स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी करून घ्यायचे असेल, तर वृत्तपत्र हे खूप प्रभावी माध्यम ठरू शकेल. आणि त्यामुळेच त्यांनी १८८१ यावर्षी केसरी व मराठा नावाची दोन साप्ताहिक पत्रके सुरू केली.

या दोन्ही साप्ताहिकांना लोकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला, टिळक या वृत्तपत्रांमधून इंग्रजांविरुद्धच्या कारवाया, इंग्रजांकडून भारताला होणारे नुकसान, संभाव्य संकटे, इत्यादी गोष्टींची माहिती देत. तसेच स्वराज्याची जाणीव करून देण्यासाठी विविध लेख देखील लिहीत. ज्यामुळे लोकांना आपले हक्क आणि या हक्कांसाठी लढण्याचे बळ मिळत असे. यातील केसरी हे वृत्तपत्र मराठी भाषेतून तर मराठा हे वृत्तपत्र इंग्रजी भाषेतून प्रकाशित होत असे. हे दोन्ही वृत्तपत्र खूपच प्रसिद्ध होते.

निष्कर्ष:

मित्रांनो, भारतीय स्वतंत्रलढ्यामध्ये अनेक लोकांनी आपले मोलाचे योगदान दिलेले आहे. यामध्ये प्रत्येकाने आपापल्या विचारधारेनुसार कार्य केले होते. तसेच बाळ गंगाधर टिळक अर्थात लोकमान्य टिळक हे त्यांच्या जहाल मतवादी विचारांसाठी आणि हिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवण्याच्या विचारांनी ओळखले जातात. रत्नागिरी मधील एका सुसंस्कृत घराण्यात जन्मलेल्या टिळकांनी संपूर्ण आयुष्य स्वातंत्र्य मिळविण्यासाठी वेचले.

त्यांनी अनेकांना जवळ करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्या जहाल विचारांमुळे त्यांचे सर्वांशी खटके उडत असत. त्यांच्या मताप्रमाणे समाज सुधारण्यापेक्षा स्वातंत्र्य मिळवणे अतिशय महत्त्वाचे आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण आपल्या देशात हव्या त्या पद्धतीने समाज सुधारणा घडवून आणू शकतो, असे त्यांचे प्रामाणिक मत होते. आणि त्यावरून अनेक समाजसुधारकांशी त्यांचे खटके उडत असत.

तसेच गांधीजी यांच्याशी देखील त्यांचे पटत नसे, कारण गांधी अहिंसाच्या मार्गावर चालणारे व्यक्ती होते, तर टिळक क्रांतिकारी कारवाया करून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आग्रही होते. आजच्या भागामध्ये आपण या जहाल मतवादी विचाराच्या बाळ गंगाधर टिळक यांच्या विषयी माहिती पहिली.

FAQ

लोकमान्य टिळक यांची जयंती कोणत्या दिवशी साजरी केली जाते?

लोकमान्य टिळक यांची जयंती २३ जुलै या दिवशी साजरी केली जाते.

लोकमान्य टिळक यांचे संपूर्ण नाव काय होते?

लोकमान्य टिळक यांचे संपूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते.

लोकमान्य टिळक यांच्या द्वारे सुरू करण्यात आलेली सर्वात महत्त्वाची चळवळ कोणती होती?

लोकमान्य टिळक यांच्या द्वारे सुरू करण्यात आलेली सर्वात महत्त्वाची चळवळ म्हणजे १०९५ मध्ये सुरू केलेली स्वदेशी चळवळ होय. ज्या अंतर्गत विदेशी मालाची होळी करून टिळकांनी स्वदेशी मालाचा पुरस्कार केला होता.

स्वदेशी साठी टिळकांनी कोणासोबत मिळून कार्य केले होते?

स्वदेशी साठी टिळकांनी जमशेदजी टाटा यांच्याशी मिळून बॉम्बे स्वदेशी स्टोअर्स ची स्थापना केली होती.

लोकमान्य टिळक यांनी कोणकोणते उत्सव महाराष्ट्रात साजरे करणे सुरू केले होते?

लोकमान्य टिळकांनी १८९३ यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सव आणि १८९५ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यास सुरुवात केली होती.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण बाळ गंगाधर टिळक यांच्या विषयी संपूर्ण माहिती पाहिली. ही माहिती तुम्हाला शालेय जीवनामध्ये उपयोगी पडेलच, शिवाय वैयक्तिक आयुष्यात देखील तुम्हाला यातून काही धडे मिळतील. तुम्हाला लोकमान्य टिळकांमधील कुठला गुण आवडतो, याविषयी प्रतिक्रिया आम्हाला कळवा. तसेच इतरांपर्यंत देखील ही माहिती शेअरच्या माध्यमातून पोहोचवा.

धन्यवाद…

Avatar

i am marathi content writer from last 5 years.

Leave a Comment