एलएलबी कोर्सची संपूर्ण माहिती LLB Course Information In Marathi

LLB Course Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो आजकाल कायदा हा प्रत्येक ठिकाणी उपयुक्त असतो. अगदी लहान मुले देखील कायद्याची भाषा करताना आपल्याला दिसतात. पूर्वीच्या काळी ‘कोर्टाची पायरी नको रे बाबा’ म्हणत प्रत्येक जण या कोर्टकचेरीच्या आणि कायद्याच्या दहा हात लांबच राहत असत.

LLB Course Information In Marathi

एलएलबी कोर्सची संपूर्ण माहिती LLB Course Information In Marathi

मात्र प्रत्येकाला कायद्याचा खरा अर्थ उमगल्यामुळे कोणीही उगाच काय त्याला घाबरत नाही. आज काल मुले कायद्याचे शिक्षण घेण्यामध्ये खूपच आग्रही असल्याचे दिसून येतात. याच कायदेशीर शिक्षणामधील पदवी म्हणजेच एल एल बी पदवी होय. आजच्या भागामध्ये आपण याच एलएलबी पदवी बद्दल माहिती बघणार आहोत.

नावएल एल बी
प्रकारअभ्यासक्रम
शैक्षणिक पात्रताकिमान बारावीची परीक्षा उत्तीर्ण, आणि कुठल्याही क्षेत्रातील पदवी
करियरवकील किंवा न्यायाधीश
कार्यस्थळन्यायालय
पदवी/ उपाधीऍडव्होकेट

मित्रांनो, अनेक लोकांचे स्वप्न असते की आपण वकील अथवा न्यायाधीश व्हावे. त्यांच्यासाठी एलएलबी हा कोर्स करणे गरजेचे ठरते. बारावीच्या शिक्षणानंतर किंवा डिप्लोमा नंतर तुम्ही या कोर्सला प्रवेश घेऊन तुमचे करिअर करू शकता.

एलएलबी या कोर्सलाच बॅचलर ऑफ लॉ या नावाने देखील ओळखले जाते. साधारणपणे तीन वर्षांचा असणारा हा अभ्यासक्रम राज्यघटनेतील आणि त्यानंतरच्या काळातील देखील विविध कायद्याबद्दल माहिती देत असतो. त्यातून विद्यार्थ्यांना विधायी, कॉर्पोरेट, व्यवसाय, किंवा इतरही अनेक प्रकारच्या क्षेत्रांमध्ये कायदे माहीत होतात. आणि त्या ज्ञानावर पुढे जाऊन ते न्याय मिळवून देण्याचे कार्य करतात.

मित्रांनो, जसे इतर अभ्यासक्रमांना विविध विषय असतात, त्याचप्रमाणे एल एल बी कोर्स मधील विषय म्हणजे विविध प्रकारचे कायदे होय. जसे की मालमत्ता कायदा, व्यवसाय कायदा, कौटुंबिक कायदा, पुरावा कायदा इत्यादी.

बारावी नंतर एलएलबी करण्यासाठीच्या पात्रता:

मित्रांनो, बारावीनंतर तुम्हाला एलएलबी कोर्स करायचा असेल तर बारावी मध्ये तुम्ही किमान ४५ टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे. मात्र असे असले तरी देखील तत्कालीन गुणवत्ता यादीनुसार तुम्हाला उपलब्ध जागेच्या प्रमाणात योग्य मार्क्स असणे आवश्यक ठरते.

या प्रकारच्या एलएलबी साठी पाच वर्षांचा कार्यकाळ निश्चित केलेला आहे. या एल एल बी कोर्स साठी वयाची मात्र कुठलीही पात्रता ठेवण्यात आलेली नाही. या व्यतिरिक्त तुम्हाला एल एल बी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षा देखील उत्तीर्ण व्हाव्या लागतील.

एल एल बी कोर्स साठी प्रवेश परीक्षा:

मित्रांनो, तुम्हाला एलएलबी कोर्स करावयाचा असेल तर तुम्हाला प्रवेश परीक्षा ही द्यावीच लागते, त्याशिवाय तुमचे ॲडमिशन होत नाही. यासाठी तुम्ही बारावी मध्ये केलेला अभ्यास उपयोगी पडतो. या प्रवेश परीक्षांमध्ये सी ए टी आय एल आय, डी यु, ए आय एल इ टी, सी एल ए टी, आय एल एस ए टी, ए आय बी इ यांसारख्या प्रवेश परीक्षांचा समावेश होतो.

एल एल बी मधील स्पेशलायझेशन:

मित्रांनो, कुठलेही शिक्षण घेताना त्यामध्ये स्पेशलायझेशन असतेच. तसेच एल एल बी कोर्समध्ये सुद्धा स्पेशलायझेशन आहे. यामध्ये मालमत्ता कायदा, कंपनी कायदा, परदेशी कायदा, कामगार कायदा, दारू कायदा, बाजार चिन्ह, कॉपी राईट कायदा, पेटंट कायदा, कॉर्पोरेट कायदा, कौटुंबिक न्यायालय कायदे यांसारख्या विविध विषयांचा समावेश होतो.

एल एल बी कोर्स नंतरची इंटर्नशिप:

मित्रानो, कुठल्याही क्षेत्रांमधील अनुभव हा तुमच्याबद्दल एक विश्वासार्हता निर्माण करत असतो. तसेच एल एल बी संदर्भात सुद्धा आहे. एल एल बी हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्ही कुठल्याही वकिला सोबत इंटर्नशिप करू शकता, ज्या दरम्यान तुम्हाला न्यायालयाच्या विविध गोष्टींबद्दल शिकायला मिळेल.

तसेच दोन वकील न्यायाधीशांसमोर करत असलेला युक्तिवाद कसा केला जातो, न्यायालयातील काही शिष्टाचार, विविध प्रकरणांचा पाठपुराव्याची पद्धत, पुरावे सादर करण्याची पद्धत, इत्यादी गोष्टीबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती मिळते. त्यामुळे तुम्ही अगदी कसलेले वकील बनता. आणि पुढे जाऊन तुम्ही स्वतःची वकील फर्म सुद्धा सुरू करू शकता.

अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर राज्य बार कौन्सिल कडे नोंदणी करणे:

मित्रांनो, एकदा का तुमचे शिक्षण आणि इंटर्नशिप पूर्ण झाली, की तुम्ही स्टेट बार कौन्सिल यांच्याकडे तुमच्या वकिलीची नोंदणी केली पाहिजे. त्यासाठी तुम्हाला एक परीक्षा द्यावी लागते, त्यानंतर तुम्हाला प्रमाणपत्र मिळते. हे प्रमाणपत्र मिळाले की अगदी छानपैकी न्यायालयामध्ये वकील म्हणून कायद्याचा सराव करू शकता, आणि आपल्या अशिलांना न्याय मिळवून देऊ शकता. वकिली क्षेत्रामध्ये हे बार कौन्सिल कडे नोंदणी असणे अतिशय गरजेचे असते, त्याशिवाय तुम्हाला वकिली करता येत नाही.

निष्कर्ष:

शिक्षण हे वाघिणीचे दूध हे आपण बऱ्याचदा ऐकले आणि वाचले असेल. शिक्षण घेतले की माणूस कुणापुढेही लाचार होत नाही, उलट अतिशय सुसंस्कृत आणि आत्मनिर्भर होतो. असेच एक महत्त्वाचे शिक्षण म्हणजे कायद्याचे शिक्षण, अर्थात एल एल बी होय.

मित्रांनो पूर्वीच्या काळी हे शिक्षण घेण्यासाठी फारसे कोणी उत्साह दाखवत नसे, मात्र आज कायद्याचा व्याप आणि आवाका वाढल्यामुळे वकिलांच्या आणि न्यायाधीशांच्या मागणीत देखील मोठी वाढ झालेली आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी हल्ली वकिलाची आवश्यकता भासत आहे, अगदी लग्न करण्यापासून घटस्फोट घेण्यापर्यंत, जमीन जुमला खरेदी विक्री, कुठलीही प्रॉपर्टी घेणे, विकणे, किंवा त्याबद्दल वाद किंवा छोटी भांडणे किंवा तत्सम अनेक प्रकारांमध्ये वकिलाची आणि न्यायाधीशाची गरज ही लागते. मित्रांनो हा कोर्स अतिशय उत्तम असून, तुम्ही या कोर्स द्वारे एक उत्तम आयुष्य मिळू शकतात. तसेच चांगल्या करिअरद्वारे आपले जीवनमान देखील उंचवू शकता.

FAQ

एल एल बी कोर्सला प्रवेश घेण्यापूर्वी कोणती शैक्षणिक पात्रता संपादन करणे गरजेचे आहे?

एल एल बी कोर्सला प्रवेश घेण्यापूर्वी उमेदवारांनी किमान बारावीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे, आणि त्यासोबतच कुठल्याही एका विषयात पदवी चे शिक्षण घेतलेले असावे. ज्यामध्ये बी ए, बी बी ए, बी एससी किंवा बी कॉम इत्यादी पदव्यांचा समावेश होऊ शकतो.

एल एल बी कोर्स चा कालावधी काय आहे?

एल एल बी कोर्स चा कालावधी हा तीन वर्षे किंवा पाच वर्षे असतो.

एलएलबी कोर्स मध्ये कोणकोणते विषय समाविष्ट आहेत?

एल एल बी कोर्समध्ये फौजदारी कायदा, कामगार आणि कार्य कायदे, भौतिक संपदा विषयी हक्क, कौटुंबिक छळ कायदा, घटनात्मक विविध कायदे, ग्राहक संरक्षण कायदे, मानव अधिकार कायदे, पुराव्याचे कायदे, विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कायदे, पर्यावरण आणि व्यापार कायदे इत्यादी विषयांचा समावेश होतो.

एल एल बी कोर्स नंतर कोणते पुढील उच्च शिक्षण घेतले जाऊ शकते?

एल एल बी नंतर एल एल एम किंवा पी एच डी इत्यादी प्रकारचे उच्च शिक्षण घेतले जाऊ शकते.

एलएलबी कोर्सला प्रवेश घेण्यासाठी कोणकोणत्या प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात?

एल एल बी साठी प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्हाला डी यु, सी एल ए टी, ए आय बी इ, ए आय एल इ टी, एल एस ए टी, सी ए टी आय एल आय या आणि इतरही यांसारख्या प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण एल एल बी या कायदेशीर शिक्षणाच्या पदवी बद्दल माहिती पाहिली. ही माहिती तुम्हाला नक्कीच उपयोगाची ठरलेली असेल. या माहितीबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत, ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून अवश्य कळवा. आणि ही माहिती कायद्याच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील जरूर पाठवा.

धन्यवाद…

Avatar

i am marathi content writer from last 5 years.

Leave a Comment