Kho Kho Game Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो भारतामध्ये पूर्वापार अनेक खेळ खेळले जात आहेत. यातील बहुतांश खेळांना कुठल्याही साधनाशिवाय खेळले जाऊ शकते. हल्लीच्या काळात क्रिकेट सारख्या खेळांकडे मुलांचा ओढा वाढता असला तरी देखील पारंपारिक खेळ देखील तेवढेच लोकप्रिय आहेत, आणि राहतील सुद्धा.
खो खो खेळाची संपूर्ण माहिती Kho Kho Game Information In Marathi
मित्रांनो त्यातीलच एक खेळ म्हणजे खोखो होय. कुठल्याही साधनाशिवाय खेळता येणारा हा खेळ अगदी प्राचीन काळापासून भारतामध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. विशेष म्हणजे हा मैदानी खेळ असून देखील शारीरिक क्षमते बरोबरच बुद्धीची कसोटी लावणारा देखील आहे. मित्रांनो, खो खो हा एक अनेक लोकांमध्ये खेळला जाणारा मैदानी खेळ आहे. यामध्ये काही क्षणात चटकन निर्णय घेऊन तसे कार्य करावे लागते, परिणामी या खेळामुळे बुद्धी तल्लक होतेच, शिवाय शारीरिक चपळतेमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये वाढ होते.
मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण प्राचीन काळापासून भारतीयांना आनंद देणारा आणि मनोरंजन करणारा सर्वात महत्त्वाचा खेळ, म्हणजेच खोखो बद्दल माहिती बघणार आहोत…
नाव | खो खो |
खेळाडूंची संख्या | प्रत्येक बाजूजे मिळून १२ खेळाडू, पैकी ९ खेळाडू मैदानात असतात तर ३ खेळाडू अतिरिक्त खेळाडू म्हणून बाहेर असतात. |
आवश्यक साहित्य | केवळ मैदानावर रोवलेले दोन खांब |
मुले मुली एकत्र खेळू शकतात का | नाही |
खेळाचा उगम | भारतीय उपखंडात |
मित्रांनो, प्रचंड चपळता आणि गती आवश्यक असणारा खेळ म्हणजे हा खो खो. मात्र या खेळाची वैशिष्ट्य असे की याला खेळण्यासाठी तुम्हाला फार किमती साहित्याची गरज पडत नाही. एकदा दोन खांब उभारले की पुन्हा त्यावर कितीही वेळा तुम्ही सामना खेळू शकता. २९ मी लांब आणि १६ मी रुंद या मैदानात सामना सुरू असताना खेळाडू अगदी देहभान हरपून या खेळात आनंद घेतात, तर बघणाऱ्यांच्या देखील अंगावर रोमांच उभे होतात. केवळ ४० च मिनिटे चालणाऱ्या या खेळामध्ये मात्र खूप धमाल येते.
खो खो खेळाचा इतिहास:
मित्रांनो, खो खो या खेळाचा इतिहास अतिशय जुना आहे. भारतामध्ये सर्वप्रथम या खेळाचा इतिहास आढळून येतो. या खेळाचा उल्लेख महाभारत आणि श्रीमद्भगवद्गीता या दोन महाकाव्यांमध्ये आढळून येतो, त्यावरून तुम्ही या खेळाच्या उत्पत्तीचा अंदाज लावू शकता. मात्र प्राचीन काळात असाच खेळला जाणाऱ्या या खेळाचे यथायोग्य नियम बनवण्याचे कार्य बडोदा येथील श्री हनुमान व्यास प्रसाद मंडळ यांनी केले.
त्यानंतर इसवी सन १९२८ मध्ये अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षा मंडळ यांच्या वतीने एका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी हा खेळ खेळला गेला आणि तिथून तो अतिशय लोकप्रिय झाला. त्यानंतर आंध्र प्रदेश येथील विजयवाडा या जिल्ह्यामध्ये १९५६ ते ६० या दरम्यान राष्ट्रीय पातळीवरील खो खो ची पहिलीच स्पर्धा झाली, आणि तिथून पुढे खो खो ला एक वेगळीच ओळख मिळाली.
खो खो खेळाचे मैदान:
मित्रांनो, खो-खो हा एक मैदानी खेळ असल्याने याला मैदान आखले जाते. या खेळाचे मैदान २९ मीटर लांब व १६ मीटर रुंद या मापाचे असते, त्यामुळे ते एक आयताकृती मैदान बनते. या मैदानाच्या एका लांबड्या बाजूस १६ मीटर लांबीचे आणि पावणेतीन मीटर रुंदीचे सेक्टर्स असतात.
या मैदानाच्या दोन्ही लहान बाजूस अगदी मधोमध जमिनीपासून १२० सेमी म्हणजेच चार फूट उंचीचा लाकडी खांब रोवलेला असतो. या दोन्ही खांबांच्या मध्ये आठ खेळाडू बसण्यासाठी आठ भाग पाडलेले असतात. त्यामध्ये एक खेळाडू उजवीकडे तर दुसरा खेळाडू डावीकडे असे एक आड एक तोंड करून बसलेले असतात, आणि नववा खेळाडू प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूला पकडण्यासाठी धावत असतो.
खो खो या खेळाचे नियम:
- खोखो सांघिक खेळ असल्यामुळे यामध्ये दोन संघांची आवश्यकता असते.
- दोन संघांचे वेगवेगळे दोन डाव मिळून एक सामना धरला जातो.
- खो-खो मध्ये जरी १२ खेळाडूंचा समावेश असेल तरी देखील मैदानावर एका वेळी केवळ नऊच खेळाडू खेळू शकतात.
- प्रत्येक डाव हा नऊ मिनिटांपर्यंत चालेल.
- पाठलाग करणारा समोरच्या प्रतिस्पर्धी खेळाडूस किती वेळात पकडतो यावर पॉईंट दिले जातात.
- बसलेल्या खेळाडूला पाठलाग करण्याची संधी देण्यासाठी खो म्हणून पाठलाग करणारा खेळाडू त्याच्या पाठीस स्पर्श करेल, जेणेकरून बसलेला खेळाडू उठून प्रतिस्पर्धी खेळाडूस पकडण्याचा प्रयत्न करेल.
- कोणता संघ आधी पाठलाग करेल हे नाणेफेक करून ठरविले जाते.
- पाठलाग करणाऱ्या संघाने वेळेपूर्वीच प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंना बाद केल्यास हा डाव लवकर संपविला जाऊ शकतो.
- हा खेळ गुणांवर असल्याने जो संघ जास्त गुण मिळवितो तो संघ जिंकतो .
खो खो मध्ये आवश्यक असणारे कौशल्य:
खो खो खेळामध्ये पाठलाग करून पकडणे समाविष्ट असल्याने खेळाडूला अत्यंत चपळता बाळगणे आवश्यक असते. तसेच धावण्याची गती देखील इथे महत्त्वपूर्ण ठरते. पाठलाग करण्यादरम्यान पाठलाग करणारा खेळाडू दमल्यास इतर खेळाडूंना उठवण्यासाठी तो त्याच्या पाठीला स्पर्श करून अगदी मोठ्याने खो म्हणतो यासाठी आवाज देखील चांगला असावा लागतो. या खेळामध्ये खांबाला स्पर्श करून पळताना अतिशय गरकन वळावे लागते, त्यावेळी शरीराचा तोल सांभाळत अगदी चटकन वळून पुन्हा विरुद्ध दिशेने पाळण्याची कला अंगी बाळगून घ्यावी लागते.
प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू खाली बसलेल्या खेळाडूंना ओलांडून दुसऱ्या बाजूने प्रवेश करू शकतो, मात्र पाठलाग करणाऱ्या खेळाडूला अशी परवानगी नसते. त्यावेळी चटकन दुसऱ्या खेळाडूला खो देऊन उठविण्याचे कौशल्य देखील आत्मसात करून घ्यावे लागते. तसेच ज्या खेळाडूला खो मिळाला आहे त्याने क्षणाचाही विलंब न करता प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूला पकडण्यासाठी उठून धावावे लागते. यासाठी देखील त्वरित निर्णय क्षमता आवश्यक असते.
निष्कर्ष:
मित्रांनो, आजकालची मुले मैदानी खेळांकडे दुर्लक्ष करताना दिसून येतात. त्यात त्यांचीही चुकी म्हणता येत नाही. कारण सकाळी उठल्यानंतर ट्युशन पासून जो दिवस चालू होतो तो शाळेतले ट्युशन, शाळा, बाहेरची ट्युशन, अतिरिक्त ट्युशन या गोष्टींनीच संपून जातो. त्यामुळे त्यांना खेळायला वेळच मिळत नाही.
आठवड्यातून शनिवारी रविवारी मिळालेली सुट्टी होमवर्क करण्यात आणि कम्प्युटर गेम खेळण्यातच संपून जाते. त्यामुळे हल्ली मैदानावर मुले सहसा दिसतच नाहीत. मात्र खो-खो सारख्या खेळांमुळे मुलांच्या सर्वांगीण विकासात भर पडते, त्यामुळे पालकांनी स्वतःहून मुलांना प्रोत्साहित करून या खेळांकडे मुलांचा कल वाढविला पाहिजे. त्यामुळे मुलांना रिलॅक्स वाटण्यास मदत होईल आणि मुले नेहमी टवटवीत राहण्यात मदत मिळते.
खो खो खेळाबद्दल माहिती मराठीत । Kho Kho Information in Marathi
खो खो खेळाबद्दल माहिती मराठीत । Kho Kho Information in Marathi📽️ आणखी विडिओ बघा ➡️ https://www.youtube.com/channel/UCM2tdGSsY-gJkioWculBCQg🎉 About - मराठीं...
FAQ
खोखो हा खेळ कोणत्या प्रकारातील आहे?
खोखो हा खेळ सांघिक आणि मैदानी प्रकारातील आहे.
खो खो या खेळामध्ये खेळाडूंची संख्या किती असते?
खोखो या खेळामध्ये एकूण १२ खेळाडूंची संख्या असते, त्यातील नऊ खेळाडू एका वेळी मैदानात खेळत असतात, तर तीन खेळाडू अतिरिक्त म्हणून मैदानाबाहेर असतात.
खो खो खेळण्यासाठी कोणत्या साधनांची गरज पडते?
खोखो हा असा एक खेळ आहे ज्याच्यामध्ये साधनांची गरज नसते केवळ मैदानावर उभारलेल्या दोन खुंट्या हेच या खेळाचे साधन होय.
खो खो या खेळाचा उगम कोणत्या देशामध्ये झाला?
खो खो या खेळाचा उगम भारतीय उपखंडातील देशांमध्ये झाला.
खो खो खेळाचे नाव कसे पडले?
खोखो खेळताना खेळाडूला दुसऱ्या खेळाडूला उठवताना तोंडातून खो असा आवाज काढावा लागतो, त्यावरून या खेळाचे नाव पडले.
मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण खो-खो या खेळाबद्दल माहिती पाहिली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा. तसेच ही माहिती तुमच्या माहितीतील मैदानी खेळ आवडणाऱ्या मुलांना पाठवण्यास विसरू नका.
धन्यवाद…