कविता राऊत यांची संपूर्ण माहिती Kavita Raut Information In Marathi

Kavita Raut Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो खेळ हा मानवाला आनंद देणारा म्हणून बघितला जातो. मात्र काही लोक या खेळालाच आपले करिअर बनवतात, आणि सर्व दूर आपला नावलौकिक मिळवत असतात. अशीच एक खेळाडू म्हणजे कविता राऊत होय. महाराष्ट्र राज्यातील नाशिक या जिल्ह्यामधील असणाऱ्या कविता राऊत दिनांक ०५ मे १९८५ या दिवशी जन्माला आल्या. त्यांनी दहा किलोमीटरचा रस्ता सुमारे ३४ मिनिटे आणि ३२ सेकंद इतक्या कमी वेळेत धावण्याचा राष्ट्रीय विक्रम केलेला आहे. शिवाय १ तास १२ मिनिटे आणि ५० सेकंद या वेळेचा अर्ध मॅरेथॉन मधील राष्ट्रीय विक्रमही या कविता राऊत यांच्याच नावे आहे.

Kavita Raut Information In Marathi

कविता राऊत यांची संपूर्ण माहिती Kavita Raut Information In Marathi

मित्रांनो, कविता राऊत यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये पहिले वैयक्तिक ट्रॅकपदक इसवी सन २०१० मध्ये जिंकले होते, जे दहा हजार मीटर शर्यतीसाठी मिळालेले एक कांस्यपदक होते. आणि हे पदक एका भारतीय महिलेद्वारे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मिळवलेले पहिलेच पदक होते. त्याचप्रमाणे २०१० च्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये देखील त्यांनी दहा हजार मीटर अंतरासाठीचे रौप्य पदक मिळवले होते.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण धावपटू कविता राऊत यांच्या विषयी इत्यंभूत माहिती बघणार आहोत.

नावकविता राऊत
संपूर्ण नावकविता रामदास राऊत
ओळखभारतीय महिला धावपटू तसेच भारताची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर धावण्याच्या स्पर्धेत भाग घेणारी महिला अथलेट
जन्म दिनांक५ मे १९८५
जन्म स्थळ
नाशिक, महाराष्ट्र
आईचे नावसुमित्रा राऊत
वडिलांचे नावरामदास राऊत

कविता राऊत यांच्या प्रारंभिक जीवनाबद्दल माहिती:

मित्रांनो, कविता राऊत यांचा जन्म नाशिक जिल्ह्याच्या सावरपाडा या ठिकाणी ०५ मे १९८५ या दिवशी झाला, हे आपण वर पाहिलेलेच आहे. आपल्या धावण्याच्या आवडीला त्यांनी आपल्या करिअरमध्ये परावर्तित केलेले आहे. यामध्ये अनेक आव्हाने बघायला मिळाली. तसेच अतिशय प्रतिकूल परिस्थितीने देखील त्या ग्रासल्या गेल्या, मात्र या सर्वांवर मात करत त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये यश संपादन करत आपले नाव मोठे केले.

अतिशय खडतर पार्श्वभूमीतून मोठ्या झालेल्या काही निवडक खेळाडूंमध्ये कविता राऊत यांचा समावेश होतो. अतिशय कमी पैसा, शिवाय एका ३४ वर्षीय महिलेने आपले करिअर म्हणून धावण्याची स्पर्धा पार पाडणे हे काही सोपे नव्हते. मात्र या सर्वांवर मात करत त्यांनी आयुष्यात यशस्वी होऊन दाखवले.

त्यांच्या या धावण्याचे मूळ त्यांच्या बालपणामध्ये आढळते. घराजवळ शाळा नसल्यामुळे त्यांना जवळपास २० किलोमीटर रोज अनवाणी पायांनी शाळेत जावे लागत असे. त्यांच्याकडे शाळेत जाण्यासाठी चांगल्या सोयी नसल्यामुळे त्यांचे हे २० किलोमीटरचे रपेट रोज सुरू असे.

काही वेळेस शाळेत जाण्यासाठी उशीर व्हायचा, मग अशावेळी पळत पळत शाळेत जावे लागे, आणि त्यातूनच त्यांनी लांब पल्ल्याच्या धावपटू बनवण्यासाठी लागणाऱ्या सर्व पात्रता पूर्ण केल्या असे म्हणायला हरकत नाही. १६ वर्षांच्या असताना कविता राऊत यांनी १४ दिवसांचे अतिशय कठोर प्रशिक्षण घेतले होते. त्यावेळेस त्यांनी राष्ट्रीय रौप्य पदक प्राप्त केले होते, कविता राऊत यांना एक लहान आणि एक मोठा असे दोन भाऊ होते. या कुटुंबाच्या कल्याणाकरिता त्यांनी धावण्यालाच आपले करिअर बनविले.

कविता राऊत यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल माहिती:

मित्रांनो, कविता राऊत यांचा जन्म एका आदिवासी कुटुंबामध्ये झाला असला, तरी देखील त्यांच्यातील प्रतिभा कुटुंबातील व्यक्तींनी लहानपणीच हेरली होती. मात्र असे असले तरी देखील त्यांना करिअरचा पर्याय म्हणून धावणे निवडण्याकरिता सुरुवातीला बराच विरोध झाला. नाशिक म्हटलं की धावणे हा काही फक्त खेळ नाही, अगदी पाण्यासाठी, शाळेसाठी, किंवा अनेक गोष्टींसाठी त्यांना खूप मोठा प्रवास करावा लागत असे, आणि उशीर होऊ नये म्हणून धावावे देखील लागे.

तिच्या याच लहानपणीच्या वातावरणामुळे तिला आपोआपच सराव होऊन गेला. कविता राऊत कमी पल्याच्या खेळांमध्ये देखील भाग घेऊ शकल्या असत्या, मात्र लांब पल्ल्याच्या खेळाकरिता तिला अनवाणी सराव देखील करता येणे शक्य होते, आणि तिच्यासाठी या स्पर्धा परवडणाऱ्या होत्या. कारण त्यांचे कुटुंब अतिशय गरीब परिस्थितीत होते, शिवाय अनेका जबाबदाऱ्या देखील पार पाडत तिला हा सराव करावा लागे.

कविता राऊत यांनी लहानपणी झेललेल्या हाल अपेष्टा इतरांना भोगावे लागू नये, म्हणून त्यांनी २०११ यावर्षी नाशिक येथे एकलव्य अथलेटिक्स अँड स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट या संस्थेची स्थापना करून तिच्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांसाठी खेळ सोपा बनवून दिला. त्यानंतर त्यांनी २०१३ यावर्षी पेशाने मेकॅनिकल इंजिनियर असणाऱ्या महेश तुंगार यांच्याशी विवाह केला.

कविता राऊत यांचा बहुचर्चित वाद:

मित्रांनो, व्यक्ती प्रसिद्ध झाला की काही ना काही कारणास्तव तो वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता देखील त्याच प्रमाणात वाढत असते. ज्यावेळी ओपी जैसा या भारतीय अधिकाऱ्यांवरील झालेले आरोप कविता राऊत यांनी खोडून काढले होते.

हा आरोप रियो ओलंपिक येथे महिलांच्या मॅरेथॉन स्पर्धेदरम्यान अधिकाऱ्यांनी कुठलीही काळजी दाखवली नाही याबाबतचा होता. मात्र कविता राऊत यांनी सांगितले की त्यांना सर्व सोयी सुविधा पुरवल्या गेल्या, आणि त्यांना एथेलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया बद्दल कुठलीही तक्रार नाही.

निष्कर्ष:

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण भारताच्या महिला धावपटू म्हणून नावलौकिक मिळवणाऱ्या कविता राऊत यांच्या बद्दल माहिती पाहिली. त्यामध्ये तुम्हाला त्यांच्या प्रारंभिक जीवनाबद्दल माहिती मिळण्याबरोबरच वैयक्तिक जीवनातील कविता राऊत तसेच त्यांची प्रोफेशनल लाईफ याबद्दल देखील माहिती मिळाली. सोबतच त्यांच्यावरून झालेल्या वादाबद्दल देखील वाचायला मिळाले. या माहितीने नक्कीच तुमच्या ज्ञानामध्ये मोठी भर पडली असेल.

FAQ

धावपटू म्हणून भारतामध्ये सर्वात अव्वल कोणाचे नाव घेतले जाते?

एक धावपटू म्हणून सर्वात प्रथम भारतीय एथिलिट मिल्खा सिंग यांचे नाव घेतले जाते. त्यांना फ्लाईंग जट किंवा भारतीय ट्रॅक अँड फिल्ड स्प्रिंटर या नावाने देखील ओळखले जाते. शिवाय फ्लाईंग स्कीट ऑफ इंडिया म्हणून देखील त्यांचा नावलौकिक आहे. त्यांनी ४०० मीटर मध्ये सुवर्णपदक जिंकण्याचा पहिला बहुमान पटकावलेला आहे.

कविता राऊत यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते?

कविता राऊत ह्या एक लांब पल्ल्याच्या धावपटू असून, त्यांना सावरपाडा एक्सप्रेस या नावाने देखील ओळखले जाते. त्यांनी रिओ या ठिकाणी झालेल्या ब्राझील आधारित ऑलिंपिक स्पर्धेमध्ये स्थान मिळवण्याकरिता दोन्ही प्रकारच्या अर्थात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या होत्या.

कविता राऊत यांना सावरपाडा एक्सप्रेस म्हणण्याचे काय कारण आहे?

मित्रांनो, कविता राऊत यांचा जन्म महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यामध्ये वसलेल्या हरसुल या गावाजवळील एका छोट्याशा सावरपाडा नावाच्या गावामध्ये झाला. त्यांनी धावण्याच्या स्पर्धेमध्ये आपले नावलौकिक मिळवल्यामुळे त्यांना सावरपाडा एक्सप्रेस या त्यांच्या गावाच्या नावामुळे नाव पडलेले आहे.

कविता राऊत यांच्या पती बद्दल काय सांगता येईल?

मित्रांनो, आदिवासी कुटुंबात जन्मलेल्या कविता राऊत यांनी महेश तुंगार नावाच्या व्यक्तीसोबत विवाह केला असून, त्यांचे हे पती भारत सरकारच्या ओ एन जी सी अर्थात ऑइल अँड नॅचरल गॅस कंपनी या ठिकाणी कार्यरत आहेत.

कविता राऊत सर्वात प्रथम केव्हा प्रसिद्ध झाल्या?

ज्यावेळी सर्वात प्रथम सण 2009 यावर्षी ग्वांगझो या ठिकाणी झालेल्या आशियाई ऍथलेटिक चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये कविता राऊत यांना कांस्यपदक मिळाले, त्यावेळेस त्या खऱ्या अर्थाने सर्वत्र प्रसिद्ध झाल्या.

मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण कविता राऊत यांच्या विषयी माहिती पाहिली. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आहे, याबाबत तुम्ही कमेंट मध्ये जरूर लिहून पाठवा. तसेच तुमच्या काही शंका असतील, तर त्याही आम्हाला विचारू शकता. सोबतच मैदानी खेळाची आवड असणाऱ्या आणि त्यामध्येच करिअर करू इच्छिणाऱ्या तुमच्या मैत्रिणीला, बहिणीला, किंवा आसपासच्या मुलींना ही माहिती अवश्य शेअर करा.

 धन्यवाद…

Avatar

i am marathi content writer from last 5 years.

Leave a Comment