काशीबाई बाजीराव बल्लाळ यांची संपूर्ण माहिती Kashibai Bajirao Ballal Information In Marathi

Kashibai Bajirao Ballal Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रानो भारतभूमीला स्वतंत्र करण्याच्या महत्कार्यात अनेक शूरवीरांनी आपले रक्त सांडले, अनेकांनी आपल्या प्राणाची बाजी लावून अनेक जिकिरीच्या मोहिमा पार पाडल्या. तर असंख्य लोकांनी हसत हसत लाठ्यांचा मार अन तुरुंगाची हवा खाल्ली. भगतसिंग, राजगुरू, आणि सुखदेव यांसारखे कित्येक नौजवान तर आपल्या ऐन तारुण्यात फासावर गेले. मात्र या सर्वांमध्ये पुरुष स्वातंत्र सैनिकांचा च उल्लेख केला जातो. परंतु त्यांच्याच खांद्याला खांदा लावून भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावणाऱ्या स्त्री स्वातंत्र्य सेनानींची माहिती घेणेदेखील महत्वाचे ठरते. यामध्ये प्रामुख्याने झाशीची राणी लक्ष्मीबाई, रजिया सुलतान, राणी दुर्गावती तसेच महाराष्ट्रातील अग्रस्थानी असलेल्या काशीबाई अर्थात काशीबाई बाजीराव बल्लाळ यांचा समावेश होतो. आजच्या लेखांमध्ये आपण काशीबाई यांच्या बद्दल इत्यंभूत माहिती बघणार आहोत…

काशीबाई बाजीराव बल्लाळ यांची संपूर्ण माहिती Kashibai Bajirao Ballal Information In Marathi

संपूर्ण नाव: काशीबाई बाजीराव बल्लाळ (पेशवे).
जन्मदिनांक व जन्मस्थळ: १९ ऑक्टोबर १७०३, चासकमान, जिल्हा पुणे.
आई आणि वडील:शुबाई आणि महादजी कृष्ण जोशी.
बंधू: कृष्णराव चासकर.
पती: बाजीराव बल्लाळ उर्फ बाजीराव पेशवा प्रथम.
अपत्य: बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब पेशवे, रघुनाथराव, रामचंद्र, जनार्दन.
मृत्यू: २७ नोव्हेंबर १७५८, सातारा.

मित्रानो स्वराज्यसंस्थापक शिवरायांनी मराठा जनतेची अस्मिता असणारे मराठा साम्राज्य निर्माण केले हे आपण सर्वजण जाणतो, तसेच हे मराठा साम्राज्य पेशव्यांनी टिकवून वेगळ्या उंचीवर आणले होते हे देखील आपल्या सर्वांना माहीत आहे.  मराठा राज्य जवळजवळ संपूर्ण भारतभर स्थापित केले गेले होते.

मित्रांनो, काशीबाई ही पेशव्यांच्या सर्वात प्रभावशाली शासक बाजीराव पेशवा पहिला यांची पहिली पत्नी होती. धर्मपत्नी या नात्याने काशीबाईंनी बाजीराव पेशव्यांच्या बरोबरीने जुलमी राजवटीविरुद्ध निकराचा लढा दिला.

अशा कर्तव्यदक्ष, धाडसी आणि धर्मनिष्ठ राणीच्या चरित्रावर आपण या लेखाद्वारे प्रकाश टाकत आहोत, ज्यात तुम्हाला काशीबाई बल्लाळ यांच्याबद्दलचे अनेक पैलू जाणून घेता येतील.

१. काशीबाईंच्या सुरुवातीच्या जीवनाची  माहिती (बालपण):

काशीबाईं बल्लाळ यांचा जन्म १९ ऑक्टोबर १७०३ रोजी महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्यातील तत्कालीन मराठा साम्राज्याच्या अंतर्गत असलेल्या चासकमान या छोट्याशा गावात देशस्थ ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव महादजी कृष्ण जोशी आणि आईचे नाव शुबाई असे होते. श्रीमंत आणि सुखी कुटुंबात जन्माला आल्याने त्यांचे बालपण खूप प्रेमाने आणि लाडाकोडात गेले. त्यामुळे काशीबाईंना लाडूबाई या नावानेही हाक मारली जात होती, काशीबाईंना कृष्णराव नावाचा भाऊही होता.

काशीबाईंचे वडील महादजी यांनी मराठा साम्राज्याचे प्रमुख शासक छत्रपती शाहू महाराज यांना अनेक वेळा प्रतिकूल परिस्थितीत मदत केली होती. त्याबदल्यात त्यांना छत्रपतींनी कल्याण प्रांताचा सुभेदार बनवले होते. याशिवाय महादजी त्या काळी त्या प्रांताचे मोठे सावकार देखील होते. होते. तसेच अनेक कारणांमुळे, महादजीचे सुरुवातीपासूनच मराठा राजवटीशी चांगले संबंध होते, त्यामुळेच  महादजींच्या घरचे वैवाहिक संबंध पुढे पेशव्यांच्या कुटुंबाशी प्रस्थापित होण्यास मदत झाली.

२. काशीबाई आणि बाजीराव पेशवा प्रथम यांचा विवाह:

वयाच्या 17 व्या वर्षी पेशवे साम्राज्यातील सर्वात शूर आणि पराक्रमी शासक बाजीराव प्रथम यांच्या सोबत काशीबाईचा विवाह दिनांक ११ मार्च १७२० रोजी सासवड नावाच्या ठिकाणी पूर्ण विधिनिषेधात संपन्न झाला. बाजीराव आणि काशीबाईंचे नाते अतिशय गोड आणि प्रेमळ होते. काशीबाई या पेशवे बाजीराव प्रथम यांच्या पहिल्या पत्नी होत्या.

काशीबाईंनी आपले पती बाजीराव पेशवे प्रथम यांना आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मोलाचे समर्पण आणि साथ दिली होती. काशीबाईंनी पतीच्या अनुपस्थितीत केवळ कुटुंबच नाही तर प्रशासकीय जबाबदाऱ्याही पार पाडल्या. काशीबाई आणि पेशवा बाजीराव या दाम्पत्याला एकूण चार अपत्ये झाली. त्या सर्वांची नावे अनुक्रमे बाळाजी बाजीराव, (पेशवा नानासाहेब), रघुनाथ राव, रामचंद्र राव आणि जनार्दन राव अशी होती.

या एकूण चार मुलांपैकी दोन मुले अगदी लहान वयातच मरण पावली, मृत्यू पावणाऱ्यांत रामचंद्र आणि जनार्दन यांचा समावेश होता. पेशवा नानासाहेबांनी बाजीरावानंतर पुढचा पेशवा शासक म्हणून मराठा साम्राज्याची गादी घेतली.

३.काशीबाई आणि पेशवा बाजीराव पहिला या उभयंतात मस्तानी यांचा प्रवेश:

सुरुवातीच्या काळात बाजीराव आणि काशीबाई यांचे नाते खूप प्रेमळ आणि गोड होते, याशिवाय बाजीरावांनी काशीबाईंना खूप आदर आणि अधिकारही दिले होते. त्यामुळे बाजीरावांच्या युद्ध मोहिमेदरम्यान राज्याच्या कारभाराच्या बहुतांश जबाबदाऱ्या काशीबाई अनेक वेळा पार पाडत असत. काशीबाईंचे बाजीरावांप्रती समर्पण, प्रेम आणि विश्वास खूप जास्त असल्याने त्या आपल्या पतीलाच आपले गुरु मानत होत्या.

काशीबाई आणि बाजीराव यांच्यातील संबंध त्यावेळी बिघडले जेव्हा बाजीरावांनी बुंदेलखंड येथील शासक छत्रसाल याची मुलगी मस्तानी हिच्याशी विवाह केला, त्या काळी एकापेक्षा जास्त लग्ने करणे सामान्य होते, परंतु या घटनेने काशीबाईंचा अभिमान दुखावला गेला. त्या या धक्क्याने पुरत्या तुटल्या गेल्या.

इतिहास सुद्धा साक्षी आहे की काशीबाईं यांनी मस्तानीला कधीच सवत असल्याप्रमाणे वागणूक दिली नव्हती, एवढेच नाही तर पेशवा बाजीराव आणि मस्तानी यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा शमशेर बहादूर पहिला याचीही काशीबाईंनी चांगली काळजी घेतली होती. आणि त्यांना राज्यात चांगल्या पदावर सुद्धा ठेवले होते. आणि त्यांस राजकारभारात महत्वाचे स्थान दिले होते.

४. पेशवा बाजीराव प्रथम यांच्या मृत्यूनंतर काशीबाईचे जीवन:

आपल्या आयुष्याचा शेवटच्या दिवसात बाजीराव पेशवे खूप आजारी असत. १७४० मध्ये बाजीराव प्रथमच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी मस्तानी देखील मरण पावल्या, या दोन्ही घटनेनंतर काशीबाईंच्या जीवनात बरेच बदल झाले. काशीबाईंनी आपला बहुतेक वेळ धार्मिक कार्यात घालवला आणि १७४९ मध्ये त्यांनी पुणे जिल्ह्यातील सोमेश्वर शिव मंदिर देखील बांधले, जे अजूनही खूप प्रसिद्ध मानले जाते.

ऐतिहासिक कागदपत्रांनुसार, काशीबाईंनी त्या काळात यात्रेसाठी तब्बल १ लाख रुपये खर्च केले होते, ज्यामध्ये त्यांनी सुमारे १०,००० यात्रेकरूंना मोफत प्रवास उपलब्ध करून दिला होता. मस्तानीच्या मृत्यूनंतर सावत्र मुलगा समशेर बहादूर यांचे देखील काशीबाईंनी चांगले संगोपन केले आणि राज्य आणि युद्ध धोरणासाठी आवश्यक सर्व बाबतीतील प्रशिक्षण दिले.

५. काशीबाई यांचा मृत्यू:

पतीच्या निधनानंतर, काशीबाईंनी बहुतेक वेळ राज्याबाहेर घालवायला सुरुवात केली, ज्यामध्ये धार्मिक कार्यासाठी त्या बनारसमध्येही सुमारे चार वर्षे वास्तव्यास होत्या. सतत दौऱ्यावर असल्याने २७ नोव्हेंबर १७५८ रोजी महाराष्ट्रातील सातारा नावाच्या ठिकाणी काशीबाईंचा मृत्यू झाला, त्यावेळी सातारा हे मराठा साम्राज्याचे केंद्र मानले जात असे.

निष्कर्ष: 

अशा प्रकारे जीवनाच्या शेवटच्या काळापर्यंत धर्म, राज्यकारभार आणि पत्नी धर्माचे कर्तव्य अगदी चोखपणे बजावणाऱ्या, गोर गरीब जनतेच्या कैवारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, आणि राजनीतीमध्ये धुरंधर असणाऱ्या महाराणी म्हणून काशीबाई बाजीराव बल्लाळ यांची इतिहासात ओळख आहे. पेशवे आणि मराठा यांच्या साम्राज्याच्या इतिहासात, काशीबाई ही एक जबाबदार, धर्मनिष्ठ आणि कर्तबगार राणी मानली जाते, ज्यांचे भक्त आणि इतिहासप्रेमी आजही त्यांनी गावात बांधलेल्या शिवमंदिराला आवर्जून भेट देतात, आणि या थोर माऊलीच्या चरणी नतमस्तक होतात.

Kashibai | श्रीमंत काशीबाई बाजीराव पेशवे| Peshwa Bajirao | Biography |

Kashibai | Peshwa Bajirao | Biography | Real Story of The Great Maratha Warrior in Hindi Maratha Warrior maratha warriors movie maratha warriors reaction mar...

FAQ

काशीबाईंचा जन्म कोठे व केव्हा झाला?

काशीबाई यांचा जन्म चासकमान या गावी दिनांक १९ ऑक्टोबर १७०३ रोजी झाला.

काशीबाई या बाजीराव पेशवा प्रथम यांच्या कितव्या पत्नी होत्या?

काशीबाई या बाजीराव पेशवे प्रथम यांच्या पहिल्या धर्मपत्नी होत्या.

काशीबाईंचा मृत्यू केव्हा व कोठे झाला?

काशीबाईंचा मृत्यू २७ नोव्हेंबर १७५८ रोजी सातारा याठिकाणी फिरतीवर असताना झाला.

काशीबाई आणि मस्तानी यांच्यामध्ये काय नाते होते?

मस्तानी या काशीबाईंचे पती बाजीराव पेशवे प्रथम यांच्या द्वितीय पत्नी या नात्याने काशीबाईंच्या सवत होत्या.

मित्रांनो, आजच्या लेखामध्ये आपण काशीबाई बाजीराव बल्लाळ या व्यक्तिमत्त्वाबद्दल सखोल माहिती पाहिली, ती तुम्हाला कशी वाटली? ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. तसेच इतरांनाही शेअर करा.

 धन्यवाद…

Siddharth Tambe

सिद्धार्थ तांबे (Siddharth Tambe) हे एक content writer असून यांना पोस्ट लिहिण्याचा ३ वर्षांचा अनुभव आहे. यांचे शिक्षण बी.एसस्सी Agri.झाले असून ते मराठी भाषेत अचूक लेखनाचे कार्य करतात.

Leave a Comment