Karmavir Bhaurao Patil Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो शिक्षण हे वाघिणीचे दूध असतं असं म्हटलं जातं. कारण शिक्षणाने कुठल्याही व्यक्तीला मोठा कर्तुत्ववान बनवला जाऊ शकतो. आणि शिक्षण नसेल तर अति श्रीमंत पैशावली व्यक्ती देखील वेळ प्रसंगी अडते. त्यामुळे आयुष्यात शिक्षण हे फारच मोलाचे ठरते, हीच गोष्ट कर्मवीर भाऊराव पाटील उर्फ अण्णा यांनी चांगल्या रीतीने जाणली होती. ते महाराष्ट्र राज्याचे शिक्षण तज्ञ आणि एक सामाजिक कार्यकर्ते होते. समाजाच्या सर्व स्तरातील लोकांना शिक्षण मिळविण्यासाठी त्यांनी उभी हयात घालवली.
कर्मवीर भाऊराव पाटील यांची संपूर्ण माहिती Karmavir Bhaurao Patil Information In Marathi
ते शिक्षणाचे कट्टर समर्थक होते. कमवा आणि शिका ही संकल्पना सर्वप्रथम कर्मवीर भाऊराव अण्णा पाटील यांनीच सुरू केली होती. त्यानुसार मागासलेल्या जाती-जमातीतील आणि कमी उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांना देखील शिक्षण घेता आले. कर्मवीर भाऊराव अण्णा पाटलांनी रयत एज्युकेशन सोसायटी ही संस्था स्थापन करून महाराष्ट्रात शिक्षणासाठी भरीव योगदान दिलेले आहे.
ते जन्माने कोल्हापुरातील होते मात्र त्यांचा कार्याचा प्रसार संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेला असून, या रयत एज्युकेशन सोसायटीचे आता एका मोठ्या वटवृक्षात रूपांतर झालेले आहे. सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा ज्योतिराव फुले यांनी कर्मवीर भाऊराव पाटलांना इसवी सन १९५९ मध्ये कर्मवीर ही उपाधी दिली, तसेच भारत सरकारने देखील त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार देऊन सन्मानित केलेले आहे.
मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण कर्मवीर भाऊराव पाटील अण्णा यांच्या जीवनचरित्र विषयी सखोल माहिती बघणार आहोत…
नाव | भाऊराव पायगोंडा पाटील |
उपाधी | कर्मवीर (कृतींचा राजा) |
पुरस्कार | पद्मभूषण |
जन्म दिनांक | २२ सप्टेंबर १८८७ |
जन्म ठिकाण | कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी |
आई | गंगाबाई पाटील |
वडील | पायगोंडा पाटील |
पत्नी | लक्ष्मीबाई पाटील |
स्थापन केलेली संस्था | रयत शिक्षण संस्था |
मृत्यू दिनांक | ९ मे १९५९ |
कोल्हापूरच्या कुंभोज या गावी एका मराठी शेतकरी कुटुंबामध्ये कर्मवीर भाऊराव अण्णा पाटलांचा जन्म झाला. त्यांचे वडील ईस्ट इंडिया कंपनीमध्ये क्लर्क चे काम करत असत. त्यांच्यावर कोल्हापूर संस्थानाचे शाहू महाराज यांचा फार मोठा प्रभाव होता, ते पदवीधर झालेल्या व्यक्तींपैकी एक होते.
भाऊराव पाटलांना कोल्हापूरच्या राजवाड्यामध्ये खुद्द शाहू महाराजांसोबत अभ्यास करण्याची परवानगी मिळालेली होती. पुढे उच्च शिक्षण घेण्यासाठी भाऊराव कोल्हापूर येथे आले असता, महात्मा फुले आणि वी .रा. शिंदे या दोन व्यक्ती त्यांना भेटल्या. ज्यांनी त्यांच्या विचारधारेमध्ये कमालीची प्रेरणा भरली.
भावरावांनी राजकीय क्षेत्रात देखील आपले लक्ष घातले होते. सार्वजनिक शिक्षण हे त्यांच्या कार्याचा मूळ गाभा होता. तसेच भारतीय स्वातंत्र्यासाठी सुद्धा त्यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांनी सत्यशोधक समाजाच्या उपक्रमांमध्ये देखील मोलाची भूमिका बजावली.
त्यांच्या मते तत्कालीन समाजामध्ये मागासलेपणाचा एक आजार पसरलेला आहे आणि त्या आजारावर सामूहिक शिक्षण हेच एकमेव औषध आहे, असे ते नेहमी म्हणत. इसवी सन १९१९ मध्ये त्यांनी मागास जातीतील आणि गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी एक वस्तीगृहाची स्थापना केली. पुढे जाऊन याच जागेवर रयत शिक्षण संस्थेच्या रोपट्याची लागवड झाली. जो वटवृक्ष आज संपूर्ण महाराष्ट्रभर दिमाखात पसरलेला आहे.
भाऊराव पाटील समाजासाठी स्वतःला वाहून घेणाऱ्या लोकांपैकी एक होते. त्यांनी गांधीजीच्या स्वतंत्र चळवळीत सुद्धा सहभाग घेतला. १९२१ मध्ये एका सभेमध्ये मुंबई या ठिकाणी भाऊराव पाटील यांचा संबंध गांधीजींशी आला. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने भाऊरावांना फारच प्रभावित केले, तेव्हापासून भाऊरावने देखील खादीचे कपडे आणि गांधी जीवनशैली अवलंबवयाला सुरुवात केली.
कर्मवीर भाऊराव पाटलांनी जनतेला शिक्षित करण्यासाठी आणि गांधी यांच्या स्मरणार्थ तब्बल १०१ शाळा बांधण्याचे स्वप्न पाहिले होते, आणि ते पूर्ण देखील केले. या शाळांसाठी स्वातंत्र्यानंतर भारतीय सरकारकडून निधी घ्यावा किंवा नाही यासाठी गांधीजी आणि भाऊराव पाटील यांच्यामध्ये मतभेद झाले, भावरावांच्या मते निधी घेणे हे फायद्याचे ठरेल, मात्र गांधीजींचे असे म्हणणे होते की निधी घेतल्यानंतर शासन आपल्या शाळांवर काही निर्बंध लावू शकेल.
भाऊराव पाटील आणि रयत एज्युकेशन सोसायटी:
मित्रांनो, भाऊराव पाटलांनी किर्लोस्कर कारखान्यात काम करतानाच सत्यशोधक समाज या संस्थेसाठी सुद्धा कार्य केले. येथे सत्यशोधक समाजाच्या परिषदेत ठराव मांडण्यात आला की, आपले स्वातंत्र्याचे कार्य पुढे न्यायचे असेल तर समाजातील सर्व स्तरातील लोकांना शिक्षित केले पाहिजे. तेथूनच प्रेरणा घेऊन भाऊराव पाटील यांनी ४ ऑक्टोबर १९१९ या दिवशी काळे या गावांमध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. यातील रयत हा शब्द समाजासाठी उद्देशून होता.
कारण समाजाच्या प्रत्येकच स्तरातील लोकांसाठी ही शाळा खुली होती. पुढे जाऊन या संस्थेमार्फत भाऊराव पाटील हयात असतानाच तब्बल ३८ बोर्डिंग स्कूल, ५७८ स्वयंसेवी शाळा, १०८ माध्यमिक शाळा, ०६ प्रशिक्षण शाळा, आणि ०३ महाविद्यालय इतक्या मोठ्या प्रमाणावर या संस्थेचा विस्तार केला. भाऊराव पाटलांच्या पश्चात देखील हा वटवृक्ष फार मोठ्या प्रमाणावर वाढतच गेला.
निष्कर्ष:
मित्रांनो, जन्म घेतलेला प्रत्येक माणूस मृत्यू पावणे हे निश्चित असते, मात्र माणूस लक्षात राहतो तो जन्म आणि मृत्यू या दरम्यान त्यांनी आयुष्यात केलेल्या त्याच्या कर्मामुळेच. अनेक लोक समाजासाठी निस्सीम त्याग करत. त्याकाळी वेळ प्रसंगी आपले घरदार सोडत, घरादारातून बेदखल होत, मात्र सामाजिक सेवेचा वसा कधीही सोडत नसत. त्यांना पैसा प्रसिद्धी या गोष्टी काहीच वाटत नसत, केवळ समाज बांधवांची सेवा करणे हाच त्यांचा एकमेव ध्यास असे.
त्यामध्ये कर्मवीर भाऊराव अण्णा पाटलांचा देखील नंबर लागतो. आपल्या सर्व सुख सोयी सोडून, घरदार सोडून, ते केवळ जनसामान्यातील मुलांना शिकवण्यासाठीच आयुष्यभर झटत राहिले. त्यांनी अनेक शाळांची स्थापना करून रयत शिक्षण संस्थेअंतर्गत विविध कार्यक्रमांची राबवणूक केली. त्यामुळे कमवा आणि शिका या योजनेसाठी ओळखले जाणारे कर्मवीर भाऊराव अण्णा पाटील समाजासाठी अतिशय दूरदृष्टी विचार करणारे होते.
कारण प्रत्येकाला मोफत शिक्षण देणे शक्य होणार नाही, हे त्यांनी हेरले होते. मात्र तरी देखील पैशामुळे कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये. म्हणून त्यांनी कमवा आणि शिका या योजनेचा शुभारंभ केला. या योजनेला जनमानसातून खूप मोठा प्रतिसाद लाभला.
आज कर्मवीर भाऊराव अण्णा पाटील आपल्यात नसले तरी देखील त्यांनी रयत शिक्षण संस्था या रूपाने लावलेल्या छोट्याशा रोपट्याचे आता मोठ्या महाकाय वृक्षांमध्ये रूपांतर झालेले आहे. त्यांच्याबद्दल संपूर्ण समाज खूप ऋणी आहे. त्यांचे नाव आणि त्यांचे कार्य सतत अजरामर राहो.
कर्मवीर भाऊराव पाटील यांची संपूर्ण माहिती || Biography of Karmaveer Bhaurao Patil || Sdnyan ||2022
'कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब आणि वंचितांच्या घरापर्यंत ज्ञानाचा प्रकाश नेला. त्यांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्र साक्षर ...
FAQ
कर्मवीर भाऊराव अण्णा पाटलांचा जन्म कोणत्या जिल्ह्यामध्ये झाला?
कर्मवीर भाऊराव अण्णा पाटलांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झाला.
कर्मवीर भाऊराव अण्णा पाटलांच्या पत्नीचे नाव काय होते?
कर्मवीर भाऊराव अण्णा पाटलांच्या पत्नीचे नाव लक्ष्मीबाई असे होते.
कर्मवीर भाऊराव अण्णा पाटलांना त्यांच्या शैक्षणिक कार्यामध्ये कोणी साथ दिली?
कर्मवीर भाऊराव अण्णा पाटलांना त्यांच्या शैक्षणिक कार्यामध्ये त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांनी साथ दिली.
कर्मवीर भाऊराव अण्णा पाटील यांना कर्मवीर ही उपाधी कोणी दिली?
कर्मवीर भाऊराव अण्णा पाटील यांना कर्मवीर ही उपाधी महात्मा ज्योतिबा फुले यांनी दिली.
कर्मवीर भाऊराव अण्णा पाटील यांनी स्थापन केलेल्या शैक्षणिक संस्थेचे नाव काय आहे?
कर्मवीर भाऊराव अण्णा पाटील यांनी स्थापन केलेल्या शैक्षणिक संस्थेचे नाव रयत शिक्षण संस्था असे आहे.
मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण शिक्षण सम्राट कर्मवीर भाऊराव अण्णा पाटील यांच्या विषयी माहिती पाहिली. या माहितीमध्ये तुम्हाला अजून काही भर घालायची असेल तर कमेंट मध्ये तुम्ही तो उतारा पाठवू शकता. योग्य माहितीला शहानिशा करून प्रसिद्धी दिली जाईल. तसेच माहिती आवडली असल्यास तुमचा प्रतिसाद देखील द्यायला विसरू नका. आणि ही माहिती शेअर करायला देखील विसरू नका.
धन्यवाद.