Kabaddi Game Information In Marathi नमस्कार मित्रांनो, मित्रांनो आज-काल संगणकाचे युग चालू आहे त्यामुळे मैदानावरची गर्दी हळूहळू ओसरत चालली आहे. त्यातच covid-19 च्या प्रादुर्भावानंतर पालक देखील आपल्या मुलांना गर्दीचे ठिकाणी आणि मैदानावर पाठवायला कचरत आहेत, त्यामुळे कुठेतरी मैदानी खेळ मागे पडत चालले आहेत. पूर्वी सुट्टीच्या दिवशी मैदाने बालगोपाळांनी भरलेले असत, त्यामुळे मुलांना देखील मैदानी खेळाबद्दल पुरेपूर ज्ञान असे.
कबड्डी खेळाची संपूर्ण माहिती Kabaddi Game Information In Marathi
मित्रांनो कबड्डी देखील भारताचा एक महत्त्वाचा खेळ, मात्र मोबाईल आणि कम्प्युटरवर तासंतास गेम खेळणाऱ्या पिढीमध्ये कबड्डीची लोकप्रियता फारच कमी होत चालली आहे. त्यामुळे कबड्डी बद्दल मुलांना इतकी माहिती देखील नाही. यासाठीच आजच्या या लेखांमध्ये आम्ही कबड्डी या खेळाबद्दल माहिती घेऊन आलो आहोत…
खेळाचे नाव: | कबड्डी |
प्रकार: | सांघिक |
उपप्रकार: | मैदानी |
उगमस्थान: | तामिळनाडू, भारत |
उगमवेळ: | चार हजार वर्षांपूर्वी |
खेळाडूंची संख्या: | प्रत्येक संघामध्ये सात खेळाडू |
खेळाचा कालावधी: | महिलांसाठी ३० मिनिटे तर, पुरुषांसाठी ४० मिनिटे |
ब्रेक टाइम: | पाच मिनिटे |
राष्ट्रीय खेळ: | बांग्लादेश या देशाचा |
मैदानाचा आकार: | पुरुषांसाठी १३० चौ. मी. तर महिलांसाठी ९६ चौ. मी. |
प्रथम कबड्डी विश्वचषक: | इसवीसन २००४ |
प्रथम महिला कबड्डी विश्वचषक: | इसवीसन २०१४ |
कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया: | १९५० साली स्थापना |
मित्रांनो, प्राचीन काळापासून मानवाने आनंद मिळावा यासाठी अनेक गोष्टींची निर्मिती केली आहे. त्यातीलच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे खेळ होय. मग तो बैठा खेळ असो किंवा मैदानी. खेळ हा प्रत्येकालाच आनंदच देत असतो. त्यातीलच एक खेळ म्हणजे कबड्डी. तो सर्वांचा अतिशय आवडीचा खेळ आहे.
हा एक भारतीय खेळ असून वर पहिल्याप्रमाणे तामिळनाडूमध्ये याचा उगम आढळून येतो. खरे तर ‘काई पीडी’ या तमिळ भाषेतील शब्दाचा अपभ्रंश होऊन कबड्डी हे नाव तयार झालेले आहे. या तमिळ शब्दाचा मराठी अर्थ हात पकडणे असा होतो. कबड्डी हा खेळ पूर्वीच्या काळी जवान आणि योध्या लोकांसाठी शक्ती प्रदर्शन करण्याची आणि त्यांचे सामर्थ्य दाखविण्याचे प्रतीक मानले जाई.
खेळाचे स्वरूप:
मित्रांनो कबड्डी हा एक सांघिक खेळ आहे, यामध्ये आयताकृती मैदानावर ज्याला कोर्ट असे म्हटले जाते दोन्हीही संघ परस्परांसमोर उभे ठाकतात. यातील प्रत्येक संघामध्ये सात अशा एकूण चौदा खेळाडूंचा समावेश असतो. आलटून पालटून प्रत्येक संघातील खेळाडू प्रतिस्पर्धी संघाच्या अर्ध्या भागात प्रवेश करतो. त्याच वेळी प्रतिस्पर्धी संघातील इतर खेळाडू त्या खेळाडूला पकडून त्यांच्याच क्षेत्रामध्ये ठेवण्याचे प्रयत्न करतात.
मात्र प्रतिस्पर्धी संघाच्या क्षेत्रात गेलेला खेळाडू शक्य तेवढ्या खेळाडूंना स्पर्श करून पुन्हा स्वतःच्या क्षेत्रामध्ये परतण्याचे प्रयत्न करतो. यावेळी जर तो खेळाडू स्वतःच्या क्षेत्रामध्ये परत येण्यास यशस्वी झाला तर तो नाबाद राहतो, तसेच प्रतिस्पर्धी संघाच्या क्षेत्रात जाऊन त्यांनी ज्या ज्या खेळाडूंना स्पर्श केला ते सर्व खेळाडू बाद होतात.
मात्र प्रतिस्पर्धी खेळाडूंनी त्यास पकडून ठेवले आणि तो पुन्हा स्वतःच्या क्षेत्रामध्ये परत येण्यास अयशस्वी झाला, तर मग मात्र तो खेळाडू बाद होतो. असेच प्रत्येक संघातील खेळाडू आलटून पालटून एकमेकांच्या क्षेत्रात जाऊन प्रतिस्पर्धी खेळाडूला बाद करण्याचे प्रयत्न करतात. या सर्व प्रक्रियेदरम्यान प्रतिस्पर्धी संघात प्रवेश करणाऱ्या खेळाडूला श्वास रोखून अबाधितपणे कबड्डी कबड्डी असे म्हणत रहावे लागते.
कबड्डीची लोकप्रियता:
मित्रानो, गेल्या काही वर्षांपासून भारतासह परदेशातही कबड्डी अतिशय लोकप्रिय होत चालली आहे. आता हा खेळ आंतरराष्ट्रीय स्पर्धेमधेही मोठ्या प्रमाणावर खेळला जातो. भारतासह बांगलादेश, दक्षिण कोरिया व इराण या देशाने देखील कबड्डीला चांगलेच महत्त्व दिले आहे. या देशांनी त्यांच्या कबड्डीच्या राष्ट्रीय लीग देखील तयार केलेल्या आहेत, आणि हे देश जागतिक कबड्डी स्पर्धांमध्ये हिरीहीरीने सहभाग घेताना दिसतात. कबड्डी ची वाढती लोकप्रियता लक्षात घेता भारताने सुद्धा इसवी सन २०१४ मध्ये प्रो कबड्डी लीग सुरू करून एक ऐतिहासिक निर्णय घेतला. यामुळे कबड्डी खेळाडूंना एक हक्काचे व्यावसायिक व्यासपीठ मिळण्यास मदत झाली, आणि कबड्डी चाहत्यांना ही जणू एक आनंदाची पर्वणीच होती.
जसजशी कबड्डी लोकप्रिय होत गेली तसतसे भारतामध्ये कबड्डी बद्दल जागरूकता वाढत गेली. पूर्वी कबड्डीसाठी विशेष अशी क्रीडांगणे देखील नव्हती, मुले कुठल्याश्या साध्या क्रीडांगणावरच काठीने मैदान आखत आणि त्यातच खेळत असत. मात्र आता सरकार आणि कबड्डी लीग यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे कबड्डीसाठीचे सुद्धा चांगले मैदाने तयार होण्यास मदत मिळाली आहे.
कबड्डीच्या लोकप्रियतेमागे दूरदर्शन आणि ऑनलाईन स्ट्रीमिंग करणाऱ्या वाहिन्यांचा फार मोठा हात आहे. यांच्यामुळेच खरे तर कबड्डीच्या सामन्यांना घराघरात ओळख मिळाली, आणि त्याचमुळे भारताच्या कानाकोपऱ्यात कबड्डीचे चाहते निर्माण झाले. त्यातूनच अनेक नामवंत कबड्डी खेळाडू देखील निर्माण होण्यात मदत झाली.
प्रो कबड्डी लीगची निर्मिती:
मित्रांनो, कुठल्याही गोष्टीला प्रसिद्धी मिळावी किंवा त्याची भरभराट व्हावी असे वाटत असेल तर त्याचा कैवारी हा असावाच लागतो. त्याच पद्धतीने भारतामध्ये प्रो कबड्डी लीग ही जणू कबड्डी खेळाडू आणि कबड्डी चाहते यांची कैवारीच बनली आहे. खरे तर भारतामध्ये अशी प्रो कबड्डी लीग स्थापन करणे हा एक ऐतिहासिक निर्णय होता.
या कबड्डी लीगने भारतामध्ये फ्रेंचाईजीवर आधारित असणारे मॉडेल स्वीकारले, आणि त्या माध्यमातून दिग्गज व्यावसायिक आणि चित्रपट अभिनेते, सेलिब्रिटी यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक उभा केली. या गुंतवणूकदारांच्या अपेक्षेला मान देत प्रो कबड्डी लीगने उच्च दर्जाचे कबड्डी सामने उपलब्ध करून दिले. यामुळे मनोरंजनासह पारंपरिक क्रीडा प्रकारांची आवड असणाऱ्या प्रेक्षक वर्गाला नवीन मेजवानीच मिळाली.
या प्रो कबड्डी लीग बरोबरच कबड्डी खेळाला अनेक संघटना सक्रियपणे प्रोत्साहित करत आहेत. यामध्ये राष्ट्रीय कबड्डी संघटना, आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संस्था, तसेच कबड्डी बाबतचे अनेक विकास कार्यक्रम, कबड्डी प्रशिक्षण संस्था, आणि आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धा यांचा मोठा वाटा आहे. हल्ली कबड्डीला आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. त्यामुळे कबड्डीचा मान मरातब अजूनच वाढण्यात मदत झाली आहे.
कबड्डी खेळाचे प्रकार:
मित्रांनो कबड्डी हा खेळ ४००० वर्षांपूर्वीचा आहे असे आपण पाहिले, आणि इतक्या दिवसात तो भारत देशासह जगभर पसरला. स्थानिक लोकांनी त्यात आपल्या सोयीनुसार विविध बदल करत त्याचे विविध प्रकार तयार केले. यामध्ये पारंपारिक शैली कबड्डी, सर्कल स्टाईल कबड्डी, बीच कबड्डी, गमीनी किंवा हुतुतू कबड्डी, सदू गुड्डू कबड्डी, आंतरराष्ट्रीय कबड्डी इत्यादी प्रकार पडतात.
निष्कर्ष:
मित्रांनो आज-काल च्या पिढीचा मैदानी खेळ वगळून मोबाईल किंवा कम्प्युटरवर गेम्स खेळण्याचा कल वाढत चालला असला तरी देखील मैदानी खेळ खेळणे देखील तेवढेच गरजेचे आहे. मैदानी खेळांमुळे शारीरिक बळकटी येते, तसेच संघामध्ये खेळल्यामुळे नेतृत्व गुण देखील निर्माण होण्यात मदत होते. कबड्डी हा असा एक खेळ आहे जो मुलांचे सर्वांगीण व्यक्तिमत्व घडविण्याचा चांगला मार्ग आहे.
आजकाल अभ्यास एके अभ्यास आणि केवळ घरातच बसून राहणे यामुळे मुलांना येणारा ताण तणाव देखील कब्बडी खेळल्यामुळे नाहीसा होण्यात मदत होते. त्यामुळे मुलांनी थोडेसे घराच्या बाहेर येऊन कब्बडी सारखे मैदानी खेळ खेळायला प्राधान्य द्यायला हवे.
कबड्डी चे नियम | कबड्डी संपूर्ण माहिती | Learn kabaddi rules | Physical Education | Game Knowledge
@shivanshphysicalfitness1453 कबड्डी चे नियम | कबड्डी संपूर्ण माहिती | Learn kabaddi rules |Realted search: 1) kabaddi2) कबड्डीचे नियम3) kabaddi rules and reg...
FAQ
कबड्डी हा खेळ कोणत्या प्रकारातील आहे?
कबड्डी हा खेळ सांघिक मैदानी खेळ प्रकारातील आहे.
कबड्डी मध्ये किती खेळाडू असतात?
कबड्डीच्या प्रत्येक प्रतिस्पर्धी संघामध्ये सात खेळाडू असतात.
कबड्डीचा उगम कोठे झाला?
कबड्डी या खेळाचा उगम तामिळनाडू या राज्यात सुमारे चार हजार वर्षांपूर्वी झाला.
कबड्डीचा संबंध कोणत्या देवतेशी जोडला जातो?
असे म्हणले जाते की गौतम बुद्ध विरंगुळा म्हणून कबड्डी खेळत असत, त्यावरून कबड्डीचा संबंध त्यांच्याशी जोडला जातो.
कबड्डीचे मैदान आखीव असते की मुक्त?
कबड्डी या खेळाचे मैदान चौरस आकारात आखीव असते.
मित्रांनो, आजच्या भागात आपण कबड्डी या खेळाबद्दल अतिशय मौल्यवान माहिती पाहिली, ही माहिती तुम्हाला आवडली का? याबद्दल तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही आवर्जून वाट बघत आहोत. तसेच ही पोस्ट इतर लोकांना शेअर करून तुमच्या सहकार्याची सुद्धा अपेक्षा ठेवत आहोत.
धन्यवाद…